Friday, 25 September 2026

स्वप्न

स्वप्न मनाला धुंद करणारे,
स्वप्न जीवनालाही भावनारे,
स्वप्न आयुष्याला सुगंधित करणारे,
आणि स्वप्नच आपल्या आकांक्षा पुर्ण करणारे...

स्वप्न पाहणे ते गैर नाही,
स्वप्नच हे आपले वैर नाही,
स्वप्नांनाही असतो अर्थ समजून घेतला तर 
स्वप्नांचे महाल शोधत मन सैरभैर वाही...

स्वप्न तुझे माझे नी सर्वांचे ,
स्वप्न काही जागीर नाही एकाचे,
स्वप्नांना सत्यात उतरवायला आपण 
कष्ट मेहनत आणि भागीदार हवे एकमेकांचे...

स्वप्न पूर्णच होते असेही नाही,
स्वप्न ज्याचे त्याचे तो वेगवेगळे पाही 
स्वप्नांनाही लागती ठोकरा जेव्हा जाग येते,
आणि स्वप्नच सत्यात उतरत असते काही काही...

स्वाप्न जणू रात्रीचा जागर 
स्वप्न बहरलेल्या आंब्याचा मोहर
फुलून उमलून सुगंध मनात पसरवून
कधी कधी फुटत असतो त्या स्वप्नालाही पाझर...

©
गजेंद्र ढवळापुरीकर 
दि.26/09/2026 वार शनिवार...