Monday, 30 January 2017

मज वेड लागले सुरांचे

स्पर्धेसाठी
*विषय:- मज वेड लागले सुरांचे*
****************************
*टिप:- प्रत्येक ओळ दोन अक्षरी
शब्द घेऊन केली आहे आणि प्रत्येक
ओळीत फक्त तिन शब्द आहे*

*प्रत्येक ओळ पुढीलप्रमाणे*
*2+3+3=8*



माझे जीवन जीवन
गेले  संगित  बनून,
नित्य करीन श्रवण
श्वास  बनून  कवन.....!


सुर  हळूच  छेडीला
वारा सांगतो वेडिला,
ताला सुरात ओढीला
रंग गीतांच्या गोडिला.....!


ध्यास मजला लाविलें
गीतं  प्रेमाचे  गाईले,
भाव हृदयी जाणीले
वेड   सुरांचे  लागले.....!


स्वप्न मलाहे गाण्यांचे
तुला हृदयी पान्ह्याचे,
गीत  तुझेच होण्याचे
आले  भाग्य मोलाचे.....!


लय  सुरास  मिळूदे
देवा  संगित  फुलूदे,
जन्म  सुकर होऊदे
वेड   सुरांचे  लागुदे.......!




                  ✍🏻गजेंद्र
         ढवळापुरीकर औरंगाबाद
***************************

Sunday, 29 January 2017

जीवन कविता

 ::♡जीवन कविता ♡

आईच्या मधुर सुरातुन,
बाळाच्या कानात गुंजलेली….!
अंगाई बाळाची माझी,
आहे ही कविता पहिली…..!

बाळाचे बोबडे बोबडे बोल,
मनाला मोहिनी माझ्या घाली….!
 मूक्याचा आधार असते.
कविता आपली असे चिंबओली…………!
 -
जीवणात प्रेमाची सुरूवात कविता -
प्रेमाची ओड निर्माण करते कविता…!
प्रेमात पडलेल्या  सुचते प्रेम कविता
प्रेमाचा पाजर फोडते प्रेमकविता….!

विद्रोहाचा आवाज आसते कविता
प्रेमभंगातून सावरल्यावर होते विरह कविता..!
कविची वेगळीच नशा असते कविता
कविच्या जगण्याचा श्वास आसते कविता…!

खचलेल्या माणसास जगण्याची
आस आणि आधार बनते कविता…!
वेदनेचा अतं असतो कवी म्हणून
कवीच्या हृदयाच्या सागरातून वाहते कविता…!

कविच्या नसा नसा तुन वाहत जाउन
गगनाला गवसनी घालते कविता….!
चंद्र तारे सुर्य्  धरती आकाश
पाऊस वारा ऊन यांचे वर्णन कविता…!

शब्दांवर  कवीचे प्रेम असते कविता
कवि जळतो सरणावर आमर राहते कविता…!
मनाच्या पटलावर हेलकावे घेते कविता
कवीच्या जगण्याला जीवन बनवते कविता …!

..........सुरजकुमारी गोस्वामी..
                हैद्राबाद

चारोळ्या

स्पर्धेकरीता चारोळ्या

1………रहाट पाळणा आयुष्याचा
            दिवसेंदिवस फिरतो आहे……….!
            संसारात मी सुख दुःखाचा
          जिवघेणा खेळ बघतो आहे…….!!...... (1)

2………आयुष्य हे खुपच सुंदर आहे
          त्यास आपल्या परिने आकार द्या…!
          मनात मानवता जागवण्यासाठी
          आयुष्याच्या संगतीला होकार द्या….!!.... (2)

3………आयुष्यात चढ उतार येतंच असतात
           म्हणून जगणं का सोडायचं………….!
           आज दुःख आहे उद्या सुख येणारंच
           आपण फक्त आपलं कर्तव्य करायचं….!!....(3)

__________कवी गजानन कचरू काळे
                     9623714012
                         (औरंगाबाद )
           

तिरंगा

**************************
*कवी विचार मंच आयोजित*
*काव्य स्पर्धेसाठी*
**************************
*विषय:-तिरंगा* (अष्टाक्षरी)

*************************
माझा    तिरंगा    तिरंगा
लहरतो   किती     छान,
हृदयात         अभिमान
माझ्या काळजाचा प्राण,
माझा    तिरंगा    तिरंगा
लहरतो    किती     छान.....||धृ||


उजळला     भारत     हा
उजळल्या   दाही   दिशा
गर्व    मज   सांगतो   मी
मज   स्वातंत्र्याची  नशा
सांडलेल्या   रक्ताचे    हे
आहे    स्वातंत्र्य   महान
माझा     तिरंगा   तिरंगा
लहरतो     किती    छान.....||1||


सदा      फडकत     राहो
माझ्या  देशाचा  हा  ध्वज
निस्वार्थ   भावना  माझ्या
निर्मळ      ठेवावे      मज
जपेन      या       हृदयात
माझ्या   तिरंग्याची   शान
माझा     तिरंगा     तिरंगा
लहरतो     किती      छान.....||2||


रक्त    हुतात्म्यांचे    होते
धरेवर             सांडलेले
स्वातंत्र्याच्या      समरात
बलिदान    किती     गेले
देशाच्या       रक्षणासाठी
ज्वलंत    ठेवू       संग्राम
माझा    तिरंगा     तिरंगा
लहरतो     किती     छान.....||3||


अजून     दुश्मन     बघा
तिरंग्यावर          जळतो
रंग     तिरंग्याचा      पहा
मनास   त्याच्या   छळतो
खवळलेल्या       डंखाची
राखण           तिरकमान
माझा    तिरंगा     तिरंगा
लहरतो     किती     छान.....||4||


                      ✍🏻गजेंद्र
                      ढवळापुरीकर
                       औरंगाबाद
**************************

जुदाई/विरह

**************************
*स्पर्धेसाठी*
**************************
*विषय:- जुदाई/विरह*
**************************


जुदाई में तेरी हरवक्त
तकलीफ में रहना।
नियतीने छळले मजला
प्रिये का कळेणा.


आँखे भी नमसी हो गई,
तेरी बाते सुनसुनकर।
तुझीच वाट पाहत आहे,
माझी हि वेडी नजर.


जुदाई ने तेरी जाने
क्या क्या सिखा दिया।
विरहात अश्रूंनी तुझ्या
मला घायाळ केले प्रिया.


                       ✍🏻गजेंद्र....
              ढवळापुरीकर औरंगाबाद

**************************

Sunday, 22 January 2017

झीज

************************
*स्पर्धेकरिता*
************************
*विषय :- झीज*
************************


झिजले गं प्रत्येक क्षण
वेडे झाले माझे मन
फिरू किती वणवण
मजला समजेना..........!...........(1)

झिजते आहे हे जीवन
घायाळ झाले तन मन
या दुःखलाही घसरण
सांग का मिळेना..........!...........(2)

सुखा विना सुने अंगण
दुःखचीच मिळते वैरण
आयुष्याचे सुखी दर्पण
मजला  दिसेना...........!...........(3)

आयुष्य पडले हे तारण
वृत्ती कोणती करू धारण
केले किती आत्मचिंतन
काही साध्य होईना.......!...........(4)

झिज श्वासांची करते मनन
खोलवरची भरेणा जखम
गेले कुठे तुझे आपलेपण
येऊन मला सांगणा.......!..........(5)



----------------✍🏻गजेंद्र
                          (ढवळापुरीकर)
                            औरंगाबाद

स्वप्नांचे आकाश

***************************
*स्पर्धेसाठी*
***************************
*विषय:-स्वप्नांचे आकाश*
 *(बालगीत)*
***********************छेडे*टिप. लहान मुलाचे मन समोर ठेऊन कविता लिहीली आहे*


लहान आमच्या नयनी दिसे स्वप्नांचे आकाश
मोठे होऊन संस्कारी होऊ आहे हा विश्वास
लहान आमच्या नयनी दिसे स्वप्नांचे आकाश..||धृ||


लहान म्हणूनी कुणी छेडे
उत्तर तयांचे तेथेच मिळे
मुर्ती लहान अन् किर्ती महान
शब्दांचे उत्तर तेथेच कळे
बोबड्या बोबड्या ओठांमधला बोबडा
हा आभास.
लहान आमच्या नयनी दिसे स्वप्नांचे आकाश..||1||


स्वच्छ सुंदर निर्मळ मनाचे
हेवेदावे आम्हा नसती कुणाचे
जे थिरकले या हृदयावरती
तालावर त्या थय थय नाचे
जगण्यासाठी नव्या दमाचा मिळतो नवा प्रवास.
लहान आमच्या नयनी दिसे स्वप्नांचे आकाश..||2||


भविष्य उद्याचे आम्ही गडे
संस्काराचे गिरवू पाढे
समाज मनाला चंचलतेचा
वारसा मिळो हे साकडे
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळावा बालमनी प्रवास.
लहान आमच्या नयनी दिसे स्वप्नांचे आकाश..||3||


------------------✍🏻गजेंद्र
                             (ढवळापुरीकर)
                                औरंगाबाद
****************************
****************************

Wednesday, 18 January 2017

💐माझ्या मायभूमीचा इतिहास..💐

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
              स्पर्धेसाठी कविता
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

     💐माझ्या मायभूमीचा इतिहास..💐

माझ्या मायभूमीला आहे असंख्य वेदनांची साक्ष,
ब्रिटिशांनी  मागे  तिला  बनवले  होते त्यांचे भक्ष,
बनावयाचे तिला जगाची महासत्ता हे एकच लक्ष्,म्हणून माझ्या मायभूमीवर लावायचा एकात्मतेचा वृक्ष…!1

माझ्या मायभूमीला आहे इतिहास महान संताचा,
फिरंग्यांशी  झुंज  देणार्या  लाखो  शुरवीरांचा,
किती सोसलेला घाव अंतरात लाख वेदनांचा,
म्हणून माझ्या मायभूमीला सांगायचा संदेश बंधुत्वाचा….!2

माझ्या मायभूमीला आतंकवादाने छळले किती,
लढता लढता हुतात्मे अन् अजरामर झाल्या छाती,
आता वाटते आहे बळवणार्या दहशतवादाची भीती,
म्हणून माझ्या मायभूमीला जपायची अनेक नाती,…!3

माझ्या मायभूमीचे उपकार इथे जपतो शेतकरी,
मरमर कष्ट करुनही खातो प्रेमाने चटणी-भाकरी,
त्यांच्यासाठी जवान इमानाने करतो सरहदीवर नौकरी,
म्हणून माझ्या मायभूमीला झटण्याची ओढ माझ्या अंतरी….!4

माझ्या मायभूमीचं आहे मानवाला एकच सांगणं,
माझं अस्तित्वं जपण्यासाठी तुम्ही एकदिलाने राहणं,
आतंक दहशत अत्याचार भ्रष्टाचार लुटमार बंद करणं,
म्हणून काळ्या दगडावरची रेघ आहे,भारताचं महासत्ता होणं…!5

______________✏📚कवी:-गजेंद्र
___________________औरंगाबाद
---------------मो:-9623714011.

🌹👬🌹अनाथांची माता:-सिंधूआई 🌹👭🌹

💫💫💫💫स्पर्धेकरिता कविता 💫💫💫💫

🌹👬🌹अनाथांची माता:-सिंधूआई 🌹👭🌹

हुंदका आठवला मनास माझ्या,
माझ्याच सिंधूआईचा….!
श्वासांत भरला होता त्यांनी,
हुंकार समाजसेवेचा……!!
       हुंदका आठवला मनास माझ्या
       माझ्याच सिंधूआईचा…..….…….||धृ||

शेकडो हजारो अनाथांच्या,
आधारस्तंभ त्या बनल्या…..!
स्वतःचा श्वास रोखून हो,
दिनांच्या माता त्या बनल्या..!
ह्रदयातुन वाहतो त्यांच्या,
खळखळ झरा मानवतेचा…!
श्वासांत भरला होता त्यांनी,
हुंकार समाजसेवेचा………!!
       हुंदका आठवला मनास माझ्या
       माझ्याच सिंधूआईचा…………..||1||

पाहता हिन - दुबळ्यांना,
दुःख कळले पण मन जळले..!
पोटाच्या खळगीसाठी त्यांच्या,
मग भिक मागण्याचे ठरले…..!
मातृत्व बहरण्यासाठी त्या,
शोधच घेई फक्त अनाथांचा……!
श्वासांत भरला होता त्यांनी,
हुंकार समाजसेवेचा……..!!
       हुंदका आठवला मनास माझ्या
       माझ्याच सिंधूआईचा….…….….||2||

दिसता अंध लुळे पांगळे,
मनच ते पाझरू लागे…….!
भुकेला दिसताच कुणी,
ममतेचे रूप ते होई जागे…!
घरात आणि दारात सर्वांना
एकच हक्क समानतेचा….!
श्वासांत भरला होता त्यांनी,
हुंकार समाजसेवेचा……….!!
      हुंदका आठवला मनास माझ्या
      माझ्याच सिंधूआईचा…………..…||3||

स्वतः झिजुन या माउलीने,
मोठा मोठाच वटवृक्ष केला…!
साथ मिळाली दानशुरांची…..!
अन् तयार कल्पवृक्ष झाला
लाखो मनातुन होतो आहे,
आज वर्षाव शुभेच्छांचा…….!
श्वासांत भरला होता त्यांनी,
हुंकार समाजसेवेचा.. ………!
       हुंदका आठवला मनास माझ्या,
       माझ्याच सिंधूआईचा…………..…||4||

हुंदका आठवला मनास माझ्या,
माझ्याच सिंधूआईचा……..!
श्वासांत भरला होता त्यांनी,
हुंकार समाजसेवेचा………!
श्वासांत भरला होता त्यांनी,
हुंकार समाजसेवेचा…………!


__________🍂📝कवी:-गजेंद्र🍂
                   🌷औरंगाबाद🌷
                 🌹क्रमांक:-(72)🌹









----- *क्षितीजापलिकडे* ----

🌷💝🌷💝🌷💝🌷💝🌷💝🌷

*स्पर्धेकरिता*

 ----- *क्षितीजापलिकडे* ----

क्षितीजापलिकडे मन जाऊन आले
शोध ख-या प्रेमाचा घेऊन आले
क्षितीजापलिकडे मन जाऊन आले…..||धृ||


स्वप्नात ही मला मिळतो इशारा
आपल्या प्रेमास मिळावा किनारा
क्षितीजाला ही गवसणी घालूनी आले
शोध ख-या प्रेमाचा घेऊन आले
क्षितीजापलिकडे मन जाऊन आले……||1||


अंबर अधुरे आहे जसे  धरे विणा
मीही अधुरा सखये तुझिया विणा
देऊन वचने मन स्वप्नात भेटूनी आले
शोध ख-या प्रेमाचा घेऊन आले
क्षितीजापलिकडे मन जाऊन आले……||2||


नशील्या त्या चंद्रास बोले चांदणी
तुझ्यामुळे फुलली सखया प्रेमकहाणी
तुझे अन् माझे तन मन जुळूनी आले
शोध ख-या प्रेमाचा घेऊन आले
क्षितीजापलिकडे मन जाऊन आले…..||3||


चल घेऊ वचने दोघं साताजन्मांची
विरह न येवो आशा वेड्या मनाची
जन्मभरांची कहाणी जीवन होऊनी गेले
शोध ख-या प्रेमाचा घेऊन आले
क्षितीजापलिकडे मन जाऊन आले…….||4||


-------------गजेंद्र काळे
         ढवळापुरीकर औरंगाबाद

🌷💝🌷💝🌷💝🌷💝🌷💝🌷

Monday, 16 January 2017

👇 तो सध्या काय करतोय👇

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

👇 तो सध्या काय करतोय👇


तो सध्या तीला छ्ळतोय
रोजच तीचा घात करतोय...!
लहान समजेना की मोठी
फक्त जीवन तीचं बरबाद करतोय...!!

पाठलाग तर रोज करतोय
जगणं तीचं मुश्किल करतोय...!
उच्च रूढ या समाजामध्ये
भामटा रोजच तीचा अंत करतोय...!!

हक्क नाही त्याचा कोणावर
तरीही हक्क कसला दाखवतोय...!
आया बहीणींची इज्जत करणे सोडा
समाजमन कलंकित दूषित करतोय...!!

तो सध्या फक्त एकच करतोय
गाडीवर बसवून तीला फिरवतोय...!
तिच्या शालिनतेचा फायदा घेऊन
तीला समाजातून बेदखल करतोय...!!

वापर करून तिच्या चांगुलपणाचा
स्वतःच आई वडीलांचा उद्धार करतोय...!
आणि जगणं हिसकावून घेऊन तीचं
तीला आत्महत्या करायला भाग पाडतोय...!!

तीला आत्महत्या करायला भाग पाडतोय...!
तो निचवृतीचा फक्त हेच करतोय...!!
तो निचवृतीचा फक्त हेच करतोय...!!!


--------------✍🏻गजेंद्र
         ढवळापुरीकर औरंगाबाद

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

💝प्रेम 💝

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

      ....प्रेम....

भावना समजायला,
फक्त शब्द नाही बरं
ह्रदय ही असावे लागते...!
शब्दांत तर ताकद
असतेच भिडण्याची..!
पण...!
ते शब्द पचवायला,
आपल्या अंतरात ओतायला..!
अंतरीची तळमळ लागते...!
तेव्हाच त्या शब्दांना,
अर्थ येतो,
भावना येतात,
अन् नकळत जुळून जातात...!
त्याच भावनांना प्रेम म्हणतात,
त्याच भावनांना प्रेम म्हणतात...!

------------✍🏻गजेंद्र
      🌷ढवळापुरीकर औरंगाबाद🌷

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Sunday, 15 January 2017

💝आज तुझ्या नयनांत💝

        *आज तुझ्या नयनांत*


आज तुझ्या नयनांत मी पण जाणवले,
तुला कळण्याआधीच डोळे पाणवले,

सांगणा काय गुन्हा होता असा माझा,
कि तुझे वागणे मला तंतोतंत जाणवले….1

स्मित हास्यही का नव्हते आज ओठांवर,
प्रिये आपलेपण तुझे मोजले मी बोटांवर ,

ह्रदयात मज दे अथवा नको देउस जागा,
काट्यांप्रमाणे सलेन मी फुलांच्या देठांवर….2

तुझे असणेच मला निशब्द करून जाते,
आठवांनी  मन भरुन माझे वाहू लागते,

तुझे वरवरचे आपलेपण पाहून हे ह्रदय,
आभाळभर संकटाची चाहुल देऊन जाते…3

थांब त्या वळणावर जिथे भावनांचे जन्म झाले,
डोळ्यांत अश्रू बघून तिथे जीवन उदास झाले,

मिळणारे सुखही आता नकोसे वाटते आहे,
कुणास ठाऊक आता जगणे ही भकास झाले…4


                   
                   *गजेंद्र काळे*
                  (9623714011)
          *ढवळापुरीकर औरंगाबाद* 

Friday, 13 January 2017

बाळा जो जो रे

--'------💝अंगाईगीत💝------

बाळा जो जो रे बाळा जो जो रे
अंगाई ऐकुनी आईची तु धाव रे
                 बाळा जो जो रे..........||धृ||

किती दिस झाले मी होते उदास
गळ्यात माझ्या नियतीचा फास
नाही भरोसा कधी कुणाचा खास रे
                 बाळा जो जो रे..........||1||

या जन्मीचा  संसार माझा फरपटलेला
आर्त कळांनी मनास माझ्या झाकलेला
तुझे येणे जीवनी माझ्या बनले श्वास रे
                बाळा जो जो रे...........||2||

बोबड्या बोलांनी तुझ्या आयुष्य सुखावले
हस-या  चेह-याने  तुझ्या हे मन मोहिले
अंगणात तुझे खेळणे भावते ह्रदयास रे
                  बाळा जो जो रे.........||3||

जन्माने तुझ्या बाळा सुखी जाहले रे
या डोळ्यांत एकच मी स्वप्न पाहिले रे
राहो जन्मोजन्मी तुझे अंतरात वास रे
                 बाळा जो जो रे..........||4||

होईन मी यशोदा तु होशील का कान्हा
येऊन ह्रदयास माझ्या फोडीला पान्हा
सळसळतो अंतरात तुझाच आभास रे
                बाळा जो जो रे..........||5||


------------------✍🏻गजेंद्र काळे
             *ढवळापुरीकर औरंगाबाद*

Thursday, 12 January 2017

माझ्या भावनांना थोडे

आज मला सांगायचे दडले जे या मनात आहे
माझ्या भावनांना थोडे मांडायचे क्षणात आहे...! (1)

आपलेच तुला मी मानले ह्रदयाने या जाणले
हे सुख माझे तुझ्या अंतरीच्या ह्रदयात आहे....! (2)

आवर्जून मी तुला प्रिये सांगतो प्रेमाची बंधने
राग तुझ्या मनावरचा आजही भासात आहे...! (3)

स्वप्न मी रोज पाहिले श्वास देखील जागवले
आयुष्यभर एकच माझे जगणे तुझ्यात आहे...! (4)

ऋतु बहरलेल्या प्रेमाचा आपल्या दोन आठवांचा
आठवलेले गीत माझे तुझे आजही श्वासांत आहे...! (5)

------------------👍*गजेंद्र काळे*
                   ढवळापुरीकर औरंगाबाद
                        (9623714011)
 





Wednesday, 11 January 2017

🌹माझी मोठी बहीण🌹

  🌹माझी मोठी बहीण🌹

लग्न करून ताई माझी
गेली हो सासरी
भेटले ना तीला कधी 
सुख या संसारी 
नित्य रिकामी मला 
दिसे सुखाची ओसरी 
आठवता मी मजला 
हुंदका ना आवरी…….(1)

बहीण आमची मोठी 
आम्ही होतो लहान
सदाच होती आमच्यावरती 
मातृत्वाची शान
सासरी असुन भावांचा 
नित्य तीला अभिमान
दुर राहून आमच्यासाठी 
पेटवायची रान……(2)

संसाराला ताईच्या 
ग्रहण लागले नव-याचे
क्षणक्षण देत गेला तो 
दुःख अतिव वेदनांचे
सांगितले न आंम्हा 
कधी वागणे त्या ढोराचे
ति म्हणे उजळायचे 
नशीब माझ्या पोरांचे….. (3)

सतत ऐकी तो नराधम 
बोलने अपमानास्पद
बाप आमचा स्वर्गामधे 
म्हणून होती फरफट 
आम्ही लहान असल्याने 
सहन करी त्याची लत
नाव बापाचे जपायला 
जगत होती रोज कुढत..(4)

अशा प्रेमळ बहीणीचा 
अंत वाईट झाला😢
दहा वर्षांपूर्वी आम्हांस 
एकटे करून गेला
दुःख घायाळ करते 
भाऊबीज व राखीला
आठवण छळते ताईची 
मज क्षणाक्षणाला…..(5)

ताई तुझ्या नंतर मुलाचा 
वनवास खुप झाला
बाप म्हणणाराच त्यांचा गं
वैरी बघ का निघाला
आज एक माझ्याकडे 
एक तिकडेच रहायला
तुझ्या सोनुचा *(मुलीचा)* संसार 
आम्ही सुखाचा करवून दिला.(6)

सावत्रपणाचा रोग हा 
वाढतोच आहे अजून
बेचैन होते गं मन ताई 
आजही तुझ्या वाचुन
वाट पाहतो मी तुझी 
तु येशील का परतून..
आठवणीत तुझ्या अश्रू 
पाझरते या नयनांतून.😢.(7)

ये ना ताई हात माझा बघ
सुना तुझ्या राखीव वीणा
भाऊबीज सण देखील जातो
देऊन मज वेदना
तुझ्या माघारी ताई माझी
*भाचीच झाली बहीण*
तुझ्यावरती खुप कविता
मी दिवसेंदिवस लिहीन….. (8)


---------------*गजेंद्र काळे*
                 9623714011
         *(ढवळापुरीकर औरंगाबाद)*

Monday, 9 January 2017

🌺ती सध्या काय करते🌺

ती सध्या काय करते
मनास माझ्या श्वास भरते
जगण्याचे बळ देते आणि
माझी अर्धागिंनी होते
ती सध्या हेच करते......

ती सध्या काय करते
घरास माझ्या घरपण आणते
जगण्याचे नियम शिकवते
आणि सुखदुःखात भागिदार होते
ती सध्या हेच करते.......

ती सध्या काय करते
माझ्या नावाचे कुंकू लेते
माझ्या मुलांचा सांभाळ करते
पोटाला दोन प्रेमाचे घास देते
ती सध्या हेच करते......

ती सध्या काय करते
माझ्या संसाराला साथ देते
माझी सहचरिणी होते
निर्विवाद हक्क माझ्यावर सांगते
ती सध्या हेच करते.......

ती सध्या काय करते
लढण्याची हिम्मत आणि बळ देते
माझ्या जीवनाची ढाल होते
माझ्यावर स्वच्छ सुंदर प्रेम करते
ती सध्या हेच करते.......
ती सध्या हेच करते.......

-
-------------------*कवी:-गजेंद्र*

Friday, 6 January 2017

😢आई तुझ्या जाण्याने😢

*आई तुझ्या जाण्यानं मी पोरकी झाले*
*आज खर्या अर्थाने मी माहेराला*
*परकी झाले ग.....||धृ||*

*माझा जन्म झाला तेव्हा तु*
 *मनातुन खुलली होतीस गं,*
*माझ्यही मुलींच्या लग्नांची स्वप्न*
*रंगवुन ठेवली होतीस गं.*
*मायलेक या शब्दांतुन मी*
*आज एकटीच राहीले गं......*
*आज खर्या अर्थानं मी माहेरला*
*परकी झाले गं........||१||*

*माझ्या लग्नाची स्वप्न पाहुन*
*ती पुर्णही केलीस तु,*
*लावुन हळद माझ्या अंगाला*
*मुक्तही झालीस तु,*
*आई सप्तपदी चालुन मी*
*सासरी आले गं.......*
*अन् खर्या अर्थानं मी माहेरला*
*परकी झाले गं.......||२||*

*आई मी जेवत होते अन्*
*दादाचा निरोप आला,*
*आई गेली म्हणताच माझ्यावर*
*दुःखाचा डोंगर कोसळला,*
*कशी कमनशिबी मी तुझ्या*
*वाचुन अधुरी झाले गं......*
*आज खर्या अर्थानं मी माहेरला*
*परकी झालेग गं......||३||*

*आई मुलं माझी तुझ्यासाठी*
*धाय मोकळुन रडली गं,*
*माय...म्हणत हबंरडा फोडुन*
*माझ्या गळ्यात पडली गं.*
*आई तुझ्या वाचुन माझी दुनिया*
*हलकी झाली गं......*
*आज खर्या अर्थानं मी माहेरला*
*परकी झाले गं........||४||*

*आई आता बाबांना समजावनं*
*खुप जड जाईल गं*
*कारण त्याचं प्रेम जन्मभर*
*तुझ्या प्रेमाची वाट पाहील गं.*
*बाबांची दुनिया माझ्या नजरेत*
*निर्दयी झाली गं.....*
*आज खर्या अर्थानं मी माहेरला*
*परकी झाले गं.......||५||*

                           
                            *कवी:गजेंद्र*
                           *(औरंगाबाद)*

*दोन वर्षांपूर्वीच्या सत्यघटनेवरील रचना*आई

🌻संस्कार🌻

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

      🌻संस्कार🌻

पता नहीं तुझे संस्कार
किसीने सिखाये या नहीं ।
इसिलीये तेरा खाली दिमाग
शैतान का घर हैं शायद ।........1

बातों की तमीज नहीं
चेहरे पे मुस्कराहट नहीं ।
सुंदरता भी तेरे पास नहीं
तो क्यूँ दिखाये अपनी औकात ।.....2

जीवन की इस मंच पे
एक आत्मविश्वास रख ।
होंठोपे अच्छाई का इमान रख
जीवन तेरा सफल हो जाएगा ।........3

____________🍀कवी:-गजेंद्र🍀
                        🌹औरंगाबाद🌹

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

🌷दुःख आसवांचे🌷

🌷दुःख आसवांचे🌷

स्वर्थापोटी मानव
खालच्या थरालाही जातो...!
स्वप्नभंग होते म्हणून
वैर करायलाही जातो....!
समजेना अंधारातला काजवा
दिवसा का चमकत नाही...!
अरे मानवाची जात तुझी
हेवेदावे तूझे का सुटत नाही...!
बघ त्या भास्कराला निस्वार्थ
भावनेने रोजच जळतो आहे...!
पण स्वार्थासाठी तु का
वेड्या मनास छळतो आहे...!
गांभीर्य समज यातनांचे
घाव कशाला हे वेदनांचे...!
अरे पाठीवर द्यायची नसेल कौतुकाची थाप
तर...का द्यावे हे दुःख आसवांचे.....!!

_________________✏कवी:-गजेंद्र{औरंगाबाद }
                                           9623714011

Wednesday, 4 January 2017

*तुझ्या ह्रदयात*

तुला माझ्या विना मला तुझ्या विना,
एक क्षण ही दुरदुर राहवत नाही....
हे प्रेमच असावं प्रिये दुसरे काही नाही....1

तहान लागेना भुक लागेना तुझ्याविना,
रात्र रात्र जागतो मी मज आता करमेना....
एक ओंजळ  प्रेमाची भरुन तुझी देना.....2

सोबत असताना सारखं एकटक पाहणं,
नजरेस माझ्या तुझं गुपित नजर देणं....
अन धुंद होउन अलगद मिठीत येणं..........3

सुंदरतेने मनास पुरते घायाळ केले,
जगणे तुझ्याविना आता असह्य झाले.....
म्हणून यास मी सखये् प्रेम हे नाव दिले.......4

तारुण्य तुझे तारुण्य माझे त्रासले विरहाने,
बेभान वार्यापरी इकडून तिकडे हुंदडत जाणे...
एक झलक पाहण्यासाठी बेचैन होणे........5

आता समज मला मी तुला कळलो असेल,
तुझ्याही ह्रदयात मी थोडासा बसलो असेल......
समजलीस भावना तर नयनांचे पारणे फिटेल....6


__________कवी:-गजानन कचरू काळे
_____________मो:-9623714011
________________संभाजीनगर

*शौचालय बांधु घरोघरी*

जाणार एक लेक माझी 

सोडून माहेर नांदायला सासरी,
येणार एक लेक पुन्हा
नव्याने नांदायला सासरी,
चला गड्यानों स्वागताला त्यांच्या
शौचालय बांधु घरोघरी............||धृ||

हुंडा देऊच नका कुणी
तर शौचालय बांधून द्या,
आया बहिणींनी परवड
ह्रदयातून जाणून घ्या,
शौचास जाणे उघड्यावर
सांगा रीत आहे का बरी....
चला गड्यानों स्वागताला त्यांच्या
शौचालय बांधू घरोघरी...........||1||

दुर्गंधी पसरते चहूबाजुला
रस्त्याच्या दोन्ही कडेला,
येता अतिथी गावामध्ये
घाणच घाण चारी दिशेला,
खाली माना झुकवूनी जातात
सान थोरांच्या नारी
चला गड्यानों स्वागताला त्यांच्या
शौचालय बांधू घरोघरी............||2||

लेक लग्न करून जाते आपली
दुस-याची लेक नटून दारी येते,
चार चौघात बघा मर्दानों
हातात डबकं घेऊन बाहेर जाते,
काॅलर टाईट करणा-यानों
अब्रू जात नाही का चव्हाट्यावरी
चला गड्यानों स्वागताला त्यांच्या
शौचालय बांधू घरोघरी............||3||

शौचास बाहेर जाणे सर्वांचे
आहे आजाराला स्व निमंत्रण,
घरी शौचालय बांधून घेता
होईल नारीचे आरोग्यदायी जीवन,
व्हावा हागणदांरी मुक्त देश
हिच  आशा  उरली  अंतरी
चला गड्यानों स्वागताला त्यांच्या
शौचालय बांधू घरोघरी..........||4||

पिडा वेदना जातील नारीच्या
आणि होईल गाव सुंदर,
शौचास बाहेर जाणा-यां महिलांचे
एकच येईल मग उत्तर,
वेदना क्षमल्या माझ्या आज
आहे घराची मी इज्जत खरी
चला गड्यानों स्वागताला त्यांच्या
शौचालय बांधू घरोघरी..........||5||

--------✍🏻 *कवी गजेंद्र*
       *(ढवळापुरीकर औरंगाबाद)*

Tuesday, 3 January 2017

👭मैत्री ही दोघांमधली.👬

काही दिवसांपुर्वि मला
एफबीवर एक मित्र भेटला,
बोलण्या वरून मला
मैत्रीत त्याच्या अर्थ वाटला.....1

हळूहळू मग मैत्रीत
ओळख जास्तच वाढत गेली,
त्याची दुःख मी माझ्या
मनापासून ह्रदयात साठवत नेली.........2

भेट आम्हा दोघांची
यापूर्वी कधीच झालेलि  नव्हती,
मैत्री तर दिवसेंदिवस
वाढत बहरत चाल्लेली होती.....3

पण वेड्या मनास
कळलं नाही तो मतलबी होता,
काही पैशांसाठी
मैत्रीला या टिकवु पाहत होता....4

मी चांगल्या श्रीमंत
घरातून आहे असं त्याला वाटलं,
मी काय त्याला सांगू
माझं तर नशीबच होतं फाटलेलं....5

जेव्हा कळलं त्याला
माझ्या आणि माझ्या गरीबी बद्दल,
काय सांगू मित्रहो
मला कळण्या आधीच दूर लोटलं....6

मित्रहो सांगाणा
मित्र हा श्रीमंतच असायला हवा का,
पैसाच असेल सर्वकाही
तर सांगा पैशांतच मित्र शोधावा का...7

मी नाही पैशांत
अन् मित्रांत अंतर ठेवणार कधी,
अगोदर सांगेण
गरीब समजूनच जागा दे ह्रदयामधी...8

मैत्री ही निस्वार्थ
असावी दोघांच्याही ह्रदयामधली,
प्रेम आणि आदराने
फुलून बहरावी मैत्री ही दोघांमधली....9

                  कवी:-गजानन कचरु काळे
                             ढवळापुरीकर
                         मो:-9623714011
                             संभाजीनगर

@@रास@@



मी चंद्र आहे तुझा
तू  माझी  तारका
शोधितो मी वेडा
तुला एकसारखा,
नको छेडु गं सखे
वेड्या मनास माझ्या
मी कृष्णा तुझा गं
तू माझी राधिका....1

रास रंगु दे आपला
या  चांदण्यां राती
उजळुन  जाऊ  दे
माझी जीवन ज्योती,
टीपऱ्यांच्या तालात
माझे  भान  हरु दे
तुझेच गीत सखये
माझ्या ओठी येती...2

तुझ्या प्रेमाचा मला गं
सहवास  कळू  दे
ज्योत होऊन मज
तुझ्या ह्रदयात जळु दे,
सातजन्म घेऊन मी
तुजकडे  येईन पुन्हा
थोडेसे प्रेम तुझे वेडे
साजणी मला मिळू दे...3

कवी:-गजेंद्र कचरू काळे
           ढवळापुरीकर
           संभाजीनगर

💥मुरझलेली मैत्री..💥

("उद्या मैत्रीचा दिवस म्हणून
एक कविता केलिये
आवडली तर लाईक करा.....!")

मुरझलेल्या मैत्रीला आपल्या थोडीशी बाग दे,
मित्रा  मैत्रीला  आपल्या  सुंदरशी  हाक  दे....।।धृ।।

दूर आहेस मजपासुन तरी या ह्दयात आहे,
चुकलं होतं कुणाचं अजूनही मनात आहे,
ह्दयातल्या आठवणीचां मज थोडासा भाग दे,
मित्रा  मैत्रीला  आपल्या  सुंदरशी  हाक  दे....।।1।।

किती दिवस असं सांग दूर दूर रहायचं,
आधी बोलेल कोण हेका पाहत बसायचं,
येण्यासाठी ह्दयात तुझ्या मज एक माग दे,
मित्रा  मैत्रीला  आपल्या  सुंदरशी  हाक  दे ....।।2।।

सोड रे आता जुणं सारं थोडंसं विसरून जा,
उद्या आहे मैत्रीचा दिवस एक आठवण देऊन जा,
ताठरलेल्या मैत्रीला आता थोडासा वाक दे,
मित्रा  मैत्रीला  आपल्या  सुंदरशी  हाक  दे....।।3।।

               
                   कवी:- गजेंद्र कचरु काळे
                              ढवळापुरीकर
                         मो:- 9623714011

🌼अरे जगणं जगणं 🌼

अरे जगणं जगणं
आहे जिवंत मरणं
जातो दिसामागं दिसं
मी रचितो सरणं
               अरे जगणं जगणं
               आहे जिवंत मरणं...।।धृ।।

कसा टोला दारिद्र्याचा
कुणी मारला नशीबाला
घाव एका मागं एक दिले
दुःख झाले या ह्रदयाला
                रोज कुढंत जगणं
                कसं येईना मरणं
जातो दिसामागं दिस
मी रचितो सरणं
               अरे जगणं जगणं
               आहे जिवंत मरणं...।।1।।

घडा पाप आणि पुण्याचा
कुणी भरलेला पाहिला
पाप पुण्य किती करावे
दिसले असते ना माणसाला
                पाप पुण्याला शरणं
                जाते मानवाचे मनं
जातो दिसामागं दिसं
मी रचितो सरणं
                अरे जगणं जगणं
                आहे जिवंत मरणं...।।2।।

किती झगडावे गरिबीशी
घास येईना रे तोंडाशी
काम करुन दिवस रातं
झोपे हा उपाशी पोटाशी
                देवा सुखाची भरुणं
                एक घासाची दे वैरणं
जातो दिसामागं दिसं
मी रचितो सरणं
                अरे जगणं जगणं
                आहे जिवंत मरणं...।।3।।

नाही उधाण आनंदला
प्राण मुठीत मी पाळला
रोज जगावे मरून तरी
नाही स्पर्श सुखाचा जीवनाला
                 अरे जिवनाचं लोढणं
                 कसं ठेवावं बाधुणं
जातो दिसामागं दिसं
मी रचितो सरणं
                अरे जगणं जगणं
                आहे जिवंत मरणं...।।4।।

लई आबाळ जिवनाची
झाली आयुष्य जगताना
किती आठवु आठवणी
अश्रु डोळ्यांचे पुसताना
               झालं जगणं कठिनं
               आत्मा रडतो पाहूनं
जातो दिसामागं दिसं
मी रचितो सरणं
                अरे जगणं जगणं
                आहे जिवंत मरणं...।।5।।

झरा नियतीचा का आटला
प्राण हा ह्रदयात फाटला
देवा उघड तिसरे नयन
श्वास माझा  कंठी साठला
                   घे रे हळुच काढूनं
                   आत्मा या देहातुनं
जातो दिसामागं दिसं
मी रचितो सरणं
                 अरे जगणं जगणं
                 आहे जिवंत मरणं...।।6।।

रंग विखुरले जीवनाचे
कोणी तुडवले पायदळी
कंप कंप सुटे देहाला
मागते मरण प्रितभोळी
                 त्याग जीवनाचा करुनं
                 श्वास ठेविन रोखुणं
जातो दिसामागं दिसं
मी रचितो सरणं
                अरे जगणं जगणं
                आहे जिवंत मरणं...।।7।।

                कवि:- गजेंद्र कचरु काळे
                             ढवळापुरीकर
                   मो :-   9623714011

मरते दम तक...!

कुछ ऐसे फ़ैसले बता दीये
तो ये फासले बन गये।
जाने क्यू ज़िंदगी के हर
राहपर ये काफिले बन गये।

सच झूठ से कडवा होता हैं
हम उसे क्यू दबाये रखते हैं।
खुदको चोट ना पहुँचे इसलिए
साँसें घूँट घूँट के मरते हैं।

दिलसें समजने वाले मिलते नहीं
रोते हैं जो उन्हें और रूलाते हैं।
एक आहट प्यार की कभी देते नहीं
ठोकर खाने वाले को और ठुकराते हैं।

समजो थोड़ासा हमें ए दोस्तों
देखो हमें दिल की गहराई से।
पहचानो मत कभी हमें भिड़ में
मिले कभी अकेले देखो नरमाई से।

मिला जो ज़िंदगी से हमे
उसे सहलेगें अंतिम साँस तक।
ना बाटेंगें दुख अपना किसीसे
सहलेंगें अकेले मरते दम तक।

          कवि गजानन कचरू काले
              मो : 9623714011

क्षणभर तुझ्या देहात. गजानन

रक्त पिऊन शरिरातले,
थेंब थेंब थेंब थेंब सांग,
तुझी तहान भागली नाही का...?
सलतोच आहे काटा,
दयनीय अवस्थेत तुझ्या,
ह्रदयात आजही अतृप्तीचा.....!
_________________________1

भोगविलासी बनण्यापेक्षा,
आधारवड बन भेकडा,
वासनांधा गिधाडाच्या जातीच्या...!
छिनभंगुर आहे हे जीवन,
ओंजळभर तुझे नाही मग,
बांधशिल का दावणीला प्रेताच्या...!
__________________________3

रोजच कुजणे तीळतीळ तुटने,
रोज सोसावा आघात,
अन् रोजचा हा अंकात,
सावरले कितीही शरिरास
तरिही वासना भडकतेच
क्षणभरांसाठी तुझ्या देहात...!
_________________________5

_________________📚कवी:-गजेंद्र📚
                                  9623724011
___________________(औरंगाबाद)ख

🍀सगळे का सारखेच🍀



अंतरीचे दुःख,त्याची सल,
अन् असतात भावना अबोल...!
प्रित दुहेरी असह्य होणारी,
तरी जाना प्रितीचे मोल......!
गांभीर्य अंजनाचे नयनांच,
जाणवते दुःख ह्रदयालाच....!
घडला कितीही भयंकर गुन्हा,
माफी का असते आपल्यालाच...!
अपराधी कोण आहे इथे,
तुम्ही आणि आम्ही सगळेच....!
भावना नसतात ह्रदयामधे,
या जीवनात सगळे का सारखेच....!

______________📚कवी :-गजेंद्र📚
                               (औरंगाबाद)

🌿पहिलं पाऊल तुच उचल🌿



सावकाश चल तिमीरातुन वाट काढत,
संकटाची तमा न बाळगता,
तु एकटी नाहीस,
धडधाकट आहेस झुंज देण्यासाठी....!
दुश्मन खुणावतो आहे,
पण तु सावध रहा,
आत्मविश्वासाने सामोरी जा,
विजयश्री खेचून आणण्यासाठी....!
पाउलां पाउलांचं अंतर हे,
तुला पार करायचंय संकट हे,
तु स्री आहेस पण अबला नाहीस,
अत्याचार इथले सहनकरण्यासाठी.....!
झुंज तुझी एकाकी आहे,
वादळात नौका सापडावी तशी,
मार्ग तुला काढायचा आहे,
हे सुंदर जीवन सुखाने जगण्यासाठी....!
बलात्कारात अत्याचारात इथल्या,
वासनेच्या खेळात रममाण झालेल्या नजरा,
भेदायच्या आहेत अचूक अर्जुनासारख्या,
तुला तुझ्याच रक्षणासाठी....!
पाहिलं पाउल तुच उचल,
हा समाज विसरलाय मानपान तुझा,
त्यांच झोपेचं सोंग अंधकारातुन,
प्रकाशात आणण्यासाठी,पहिलं पाउल तुच उचल....!!

__________________________✏गजेंद्र
                                              9623714011
                                                {औरंगाबाद}

🌹🌹माझं बालपण🌹🌹



बालपण हा जीवनातला,
अविस्मरणीय अनुभव…..!
पण मला चाखायला नाही
मिळाली या अनुभवाची चव…!
आज पुन्हा वाटतं मी लहान व्हावं,
न मिळालेले प्रेम भरून काढावं….!
सुंदरशा आठवणीनी पुन्हा एकदा ,
बालपण सजवून काढावं….!
का….? का माझं आयुष्य,
इतकं दगडा सारखं कठीण…!
त्यावर संस्कार घडवायला हातं तर होती,
पण त्या हातानां ती धार नव्हती…,
जी मला घडवायला हवी होती……..!
खरंच माझं बालपण सर्वात कठीण असावं,
वडीलांच दारू पिणं…,
आईचं मोल मजुरीला जाणं…,
बहिणीचं लग्न ही लवकर झालेलं……!
मग घरात लहान असूनही दुःखच मिळत गेलं…,
आई-वडीलांच्या भांडणापासून ते
गरीबीत मिळणार्या वैतागापर्यंत…!
सर्व बाजूंनी मन चिरशांत असायचं…..!
हौस-मौज अशी कधीच नाही,
कुठली सहल नाही की…,
कसलं मनोरंजन नाही…सतत जीव गुदमरलेला…!
कसंतरी दहावी झालं अन्…,
पुढच्याच दिवसात वडीलांच अकाली निधन झालं…!
…………पुन्हा एकदा सगळी जबाबदारी….,
बालखांद्यावर घेउन…लग्ना आधीच……,
संसार सुरू झाला…!
नंतर लग्न झालं..,मुलं झाली…,
तो संसार चालतोच आहे आजही….,
बालपणीच्या आठवणी शोधत……!
आता फक्त एकच करायचं….,
जे आपणांस अनुभवायला नाही मिळालं,
ती कमतरता या मुलांना नाही होउ द्यायची…!
कारण….!कारण मला "माझं बालपण"…!
माझ्या या मुलांत पहायचंय….,
त्यांच्या आनंदात रहायचंय….,
त्यांना सतत हसत ठेवायचंय…,
आणि "माझं बालपण "मला त्यांच्यात जगायचंय…!
………..माझं बालपण मला त्यांच्यात जगायचंय….!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
___________कवी गजेंद्र कचरू काळे
                     मो:-9623725011
                          (औरंगाबाद )……!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

बेइमान थे ओ लोग...

बेइमान थे ओ लोग
जो प्यार को समज ना सके।
प्यार करने वालो की
गलतियाँ सुलझा न सके।

चंद लम्हे तेरी बाहो में
हमने प्यारसे गुजार क्या दी।
ओ खुदको दिल से
रुला और हँसा न सके।

खेद भी अंदर से होता है
जबसे चुभने लगी उनकी बातें ।
हमने प्यास अपनी दबा ली
मगर ओ हमको उलझा न सके।

___________कवि:-गजेंद्र काले
_____________ संभाजीनगर

Monday, 2 January 2017

📚✏तुम्ही सावित्रीच्या लेकी...✏📚

तुम्ही सावित्रीच्या लेकी
हाती   तुमच्या  लेखणी
किती  वर्णू   गं  महिमा
सांगा   सावित्री  चरणी.....!.... (1)

स्रीस शिक्षणाची त्यांनी
मुहूर्त     मेढ     रोवली
वारसा   पुढे   नेण्याची
शक्ती  तुम्हास मिळाली.....!.... (2)

आज  वचन  पाळा  गं
सावित्री  महिमा जाणा
या  तुमच्या  लेखनीचा
आहे   धारदार   बाणा.....!.... (3)

वात्सल्याचं   जगणं   हे
माया     ममतेचं    रूप
लेखनी    मधे    साठवा
माझ्या  सावित्रीला खुप.....!....(4)

सावित्रीनं    जे     पेरलं
तेच    रूजवा    बियाणं
रूढी    परंपरा    सा-या
टाका    मातीत    गाडूनं....!... (5)

हाती  शस्त्र  या  उचला
तुम्ही  सावित्रीच्या लेकी
उद्धार    या   जीवनाचा
हीच     करेल    लेखनी....!....(6)

---------📚गजेंद्र काळे📚
      ढवळापुरीकर(औरंगाबाद)








वेडे तुझाच होण्याची वाट पाहिन..!

जीवन जगता जगता त्यालाही नवं वळण मिळतं...
मनही सैरावैरा धावु लागतं..,
नभाच्या निळसर छायेत या मला तुझं प्रेम मिळतं...
थांब मि येणार आहे न विसरता...
तुझ्यासाठी..थोडीसी वाट पहा...
उशिर झाला तरी येइन तुला मिठीत घेण्यासाठी..
तुला प्रेम देण्यासाठी...
तुझं थोडंसं प्रेम घेण्यासाठी....
सांग कितीही संकटे आली तरी तु माझा हात
सोडणार नाहीस,
ओठांवरचे रंग तुझे माझ्यासाठी तु हरवणार नाहीस....
मी वचन देतो तुला..
तुलाही उशिर झाला तरी मी जाणार नाही...
तुला एक नजर पाहील्या शिवाय मी मरणार नाही...
तुझ्या सहवासाचा गंध मला हवा आहे,
तुझ्यात मला गुतांयचय, तुझ्यासाठी जगायचंय...
माझी ओळख विसरुन तुझ्या ओळखित हरायचंय...
हे आयुष्य...तुझं आहेे तुलाच देइन,
तुजसाठी वेडा होइन...
तु नाही आलीस तरी, फक्त तुुझाच राहीन..
तुझ्या येण्याची वाट पाहीन...
मग पुर्ण आयुष्य गेलं तरी चालेल.....
पण.....वेडे तुझाच होण्याची वाट पाहीन.....!!!!!!
     
                                     .....गजेंद्र काळे....
                                        ढवळापुरीकर
                                      ता.जि.औरंगाबाद..

👬मित्र 👭

मित्र असतात फुलपाखरा सारखे,
आलेच मनात तर यायचे.....!
नाहितर भुुर्रकण उडुन जायचे.......

जीवनही आहे त्याच सारखे,
आलेच सुख तर उपभोगायचे,
नाहीतर आहे ते दु:ख सोसायचे......

जेव्हा गरज असते आपल्यांची,
ते खुपच दुर असतात,
ह्रदयात असुनही आपल्या,
मैलोंमैल दुर का भासतात........

मित्र चुकतात कि चुकते मैत्री,
हे का शोधत बसायचं,
शोधुन काही सापडत नाही,
बस आपल्या जीवनाला शोधत,
आयुष्याला नविन आकार देत पुढे जायचे....
अन् हे जीवन जगायचे.........

                           •गजेंद्र  काळे•
                        🌺9623714011🌺
                        (औरंगाबाद)

🌹वेळ बदलता काळ बदलतो🌹

वेळ बदलते काळ बदलतो
माणुसही का तसाच बदलतो,
आपलेच खरे करण्यासाठी
दिलेल्या वचनांना विसरतो.....||धृ||

नाजुक धागा असे मैञीचा,
वर्षानुवर्षेे नसे खाञीचा.
मिञ बदलता आपणही बदलतो,
आपलेच खरे करण्यासाठी
दिलेल्या वचनांना विसरतो....||१||

येईल एखादी अशीच वेळं,
मैञित आपल्या उठेल वादळं.
रुप बदलते रंगही बदलतो,
आपलेच खरे करण्यासाठी
दिलेल्या वचनांना विसरतो.....||२||

इच्छा उफळली जर या मनाची,
हाक एेकणा तु त्या ह्रदयााची.
तन बदलता श्वासही बदलतो.
आपलेच खरे करण्यासाठी
दिलेल्या वचनांना विसरतो.....||३||

असेल किंमत तुला आमची,
जाणिव असुदे तु या श्वासांची.
रीत बदलता कर्मही बदलतो.
आपलेच खरे करण्यसाठी
दिलेल्या वचनांना विसरतो.....||४||

दिलेले वचन तर मी पाळणार,
हि भावणा तुला तिथे छळणार.
ह्रदय बदलता प्राणही बदलतो.
आपलेच खरे करण्यासाठी
दिलेल्या वचनांना विसरतो.....||५||

                        कवी
        गजेंद्र काळे औरंगाबाद
           9623714011

Sunday, 1 January 2017

🌼एकदा सख्या प्रेम देऊन जा🌼



🌺वाट पाहते तुझी तु येउन जा…
एकदा सख्या प्रेम देउन जा....
प्रेम देउन जा...प्रेम देउन जा...||धृ||🌺

🌺तरसले नयन हे तुला पाहण्या...
जीव झाला खुळा तुला पाहण्या...
दिल्या आठवणी तु घेउन जा...
प्रेम देउन जा...प्रेम देउन जा....||१||🌺

🌺आठवणी तुझ्या वेड लावी मला...
भास रे तुझा नित्य रडवी मला...
यातना सख्या तु पाहुन जा....
प्रेम देउन जा...प्रेम देउन जा....||३||🌺

🌺मी युगानुयुगे वाट तुझी पाहिनं...
प्राण गेला तरी आत्मा तुला पाहिनं...
सजणा प्रीतफुले तु वाहुन जा...
प्रेम देउन जा...प्रेम देउन जा....||५||🌺

🌺वाट पाहते तुझी तु येउन जा...
एकदा सख्या प्रेम देउन जा...
प्रेम देउन जा...प्रेम घेउन जा...🌺

   
                          🌺📚कवी:-गजेंद्र📚🌺
                               🌺औरंगाबाद🌺
                        

*साहित्य काव्यगंध*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

स्वप्न सर्वांचे दाही दिशांना
नव्याने उमलत बहरत जावे....!

नव्या वर्षाची नवी सुरवात
नव्या उम्मेदिने करत जावे......!

शुभेच्छा या आहे सा-यानां
मज दिल्या आणि घेतल्यानां...!

आपले म्हणून कायमचे हो
माझ्या ह्रदयामधे बसलेल्यानां....!

नाते हे सुंदर जुळले नव्याने
लेखक आणि कवी मनाने...!

क्षणात दिली मज मनी जागा
आपल्या साहित्य कल्पवृक्षाने....!

*साहित्य काव्यगंध* गृप माझा
सर्वांच्या मनात घट्ट घट्ट होवो...!

काढू पाहिले कधी कुणी जर
पहिले नयनांना त्या पाणी येवो.....!

नव्या वर्षी नवा संकल्प करू
जागा ठेवू साहित्याचा महामेरू...!

न दुखवता या व्यासपीठावर
स्वच्छ मनाने एकमेकां प्रेम करू...!

नवे नवे राबवू उपक्रम येथे
जरी आहोत एक इथे एक तिथे...!

अंतःकरण हे जोडले जावो
जुळून येवो बहिण भावाचे नाते....!

पुन्हा एकदा शुभेच्छा मनातून
वर वर नाही तर अंतःकरणातून....!

2017सुखसमृद्धिचे जावो सर्वांना
नित्य भेटू *साहित्य काव्यगंधातून*....!


--------✍🏻गजेंद्र कचरूजी काळे
                      9623714011
                         (औरंगाबाद)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐