Tuesday, 21 July 2020

[18/7/2017, 11:08 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*चारोळी उपक्रम*
*विषय:-ओथंबलेले क्षण*

मोहपाश जखडलेला होता
तुझा माझ्याच का हृदयात
असाही एक प्रेमवीर होता
पडून ओथंबलेल्या क्षणात...!


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
[18/7/2017, 11:08 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
*ओथंबलेले क्षण*

ओठांवरवरती प्राजक्ताचा
गंध दरवळून जात होता...
ओथंबलेल्या क्षणांमधे
मोहरून शहारा येत होता...!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
[18/7/2017, 11:08 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: ☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
*ओथंबलेले क्षण*

दुर रानामधे श्वास ओथंबलेला
भास होई मनाला प्रणयाचा
स्वप्नातूनी जेव्हा जागले मन
आभास क्षणभर तुझ्या आश्रयाचा...!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
[18/7/2017, 11:08 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: 🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
*रोजचा चारोळी उपक्रम*

*विषय: -चांदणं*

चांदणं मनात भरलंया
मन चिंब चिंब झालंया
आठवणीत साजणीच्या
लई गहिवरून गेलंया....!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
[18/7/2017, 11:08 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

औरंगाबादकरांची लेखणी
का ओथंबुनी वाहत नाही...
कवी मन तयांचे बहुधा
इथल्या शब्दांत रमत नाही...!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
[18/7/2017, 11:08 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: चारोळी उपक्रम
विषय:- विरह


विरह उफाळून येतो सखये
अन् साद तुझी छळून जाते
बघत असतो इकडे तिकडे
आठवण तुझी जाळून जाते....

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
 मो:9623714011
[18/7/2017, 5:06 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *चारोळी उपक्रम*
*विषय:-पहिले प्रेम*

पहिले प्रेम सहज मिळते
अजून वेगळे मग काय हवे...!
हजार संकटांना भेदुन ही
प्रेमात रस्ते मिळतात नवे....!!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
[19/7/2017, 11:29 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
आजचा चारोळी उपक्रम
विषय:-चाहुल

चाहुल मला तुझ्या येण्याची
घायाळ करून जाते पुन्हा...!

इशारे तुझ्या नयनांनी सखे
करू नकोस घडेल गुन्हा....!!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
९६२३७१४०११
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
[19/7/2017, 9:52 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: इथेच करतो तयार


*विषय:- निसटते क्षण*

आठवते गं सखये प्रेम आपुले
अन् बावरते माझे वेडे मन
घेऊनी शपथा साता जन्माच्या
कळेना कसे निसटून गेले क्षण...!!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623715011
[20/7/2017, 12:17 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: आजचा चारोळी उपक्रम
*विषय:-वणवा*

बरसेना पाऊस कसा कळेना
दाह धरीत्रीचा अजून क्षमेना
वातावरण झालेय उष्ण फार
वणवा दुष्काळाचा निवेना....!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011

🌧🌧⛈🌧🌧🌧
[22/7/2017, 1:19 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: आजचा चारोळी उपक्रम
विषय :- फुलपाखरू

फुलपाखरां परी उडावे
स्वछंदी आनंदी जगावे...!
एक एक क्षण विहरताना
स्वप्न उद्याचे हृदयी वसावे....!!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
[26/7/2017, 10:50 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: स्पर्धेसाठी नाही
विषय:- निसटते क्षण

१)
निसटलेले क्षण आठवताना
डोळ्यांत अश्रूंचा पुर दाटतो,
कसे  विसरावे पहिले प्रेम ते
तुझे नसणे अंधकार भासतो..!

2)
ताई  तुझ्या  आठवांचा  आजही
तेवणारा  दिवा  हृदयात  पाहिला,
निसटत्या क्षणांचा जहरी घाव तो
कायमचा  माझ्या  उरात  राहिला...!

3)
मैत्रीचे  नाते  जपण्यासाठी
वाहून  घेतले  संपूर्ण जीवन,
चुक  होती  कुणाची  गड्या
शोधतो आहे  निसटलेले क्षण..!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
[27/7/2017, 12:33 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: चारोळी महास्पर्धेसाठी
विषय:-निसटते क्षण

फुलांप्रमाणे रे प्रेम तुजवरी केले
जेव्हा जगत होतास तू बालपण
आज  पाऊल तू  पुढे टाकताना
विसरलास का ते निसटलेले क्षण...!

माहेरची माया बनते सासरची छाया
कर्तव्य तुझ्या सोबत निभावताना
सुखदुःखाच्या उंबरठ्यावर आजही
मी शोधीत आहे निसटलेल्या क्षणांना..!


तरूणपणाच्या अल्लड वाटेवरती
जुळले होते ऋणानुबंधाचे आपलेपण
आजही हवाहवासा वाटतो सख्या
आयुष्यातून निसटलेला मोहक क्षण...!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद 9623714011
[11/8/2017, 3:08 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: स्पर्धेला नाही...

कसे सांगू चांदणीला..
चंद्र अधुरा तुझ्यावीणा
निशा ही घुटमळते
आहे माझ्या साजणा...!!

गजेंद्र ढवळापुरीकर
[20/9/2017, 2:28 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: नमस्कार सर्वांना 💐🙏

*~~☆☆☆☆☆☆☆☆~~*
*मनास ओलावा देती*
*पहाटेचे दवबिंदू*
*चला कवीमनानों आता*
*एक दिलाने नांदू*
*~ गजेंद्र ढवळापुरीकर ~*
*मो:9623714011*
*~~☆☆☆☆☆☆☆☆~~*
[20/9/2017, 2:30 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*
पाऊस आहे स्वागताला
लेखणी ही बहरत आहे
आज खरंच साहित्यातून
विचार पानी उतरत आहे

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
*¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*
[20/9/2017, 2:30 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*
घट्ट विणलेले नाते
सहज तुटत नाही
हिरवाई चढेल त्यावर
मन देत आहे ग्वाही...!

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
*¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*
[20/9/2017, 2:30 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*
सहवास आपुलकिचा
मनामनात भिनावा
आपल्या सर्वांच्या प्रेमात
भेदभाव कुठेच नसावा...!

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
*¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*
[20/9/2017, 2:30 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*
आश्चर्य पाहिलं शेगावात
माणुसकीचं दर्शन झालं
साहित्याच्या प्रवासात या
मी पणाचं घर्षन झालं...!

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
*¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*
[20/9/2017, 2:30 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*
मिळेल मंच छान
नवा प्रवाह मिळेल
साहित्य काव्यगंध
चहुकडे दरवळेल....!

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
*¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*
[20/9/2017, 2:30 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*
नवा किनारा शोधू
साहित्य सेवेसाठी
लेखणीस धार लावू
 विश्वा शांततेसाठी..!

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
*¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*
[20/9/2017, 3:06 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *➖➖➖➖➖➖➖➖*
*त्या तिथे वळणावर*

त्या तिथे वळणावर
तू एकटा थांबलेली
आजही मी आठवतो
तु क्षणभर हसलेली....!

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
*➖➖➖➖➖➖➖➖*
[20/9/2017, 3:14 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
त्या तिथे वळणावरती
सखये तुझी साथ होती
मी तर होतो थबकलेला
तु हसरी नी चंचल होती

गजेंद्र काळे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[20/9/2017, 3:18 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
झुगारून बंध सखये
चल तिमिरात जाऊ
त्या तिथे वळणावर
दोघे प्रेमाचे गीत गाऊ...!

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[20/9/2017, 3:47 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
त्या तिथल्या वळणावर
मी फिरत असतो दिवसभर
एकतरी अशी आठवण दे
जगवील मला जी जीवनभर

गजेंद्र काळे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[20/9/2017, 6:15 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मन निरंतर म्हणायचे
सखे चल त्या वळणावर
तु आणि मी मिळून
राज्य करूया प्रेमावर....!

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[20/9/2017, 6:15 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आयुष्याला रंगत होती
त्या तिथे वळणावर
आज एकलकोंडी बघा
बसली आहे मानगुटीवर....

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[20/9/2017, 6:15 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
त्या तिथे वळणावर
साजणी मोहपाश होता
आपण हृदयी साठवलेला
सुंदरसा तो फास होता....!

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[20/9/2017, 6:15 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ओघळणारी आसवे
तरळली नयनावर
दुःख साठवले मी
त्या तिथे वळणावर

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[20/9/2017, 6:15 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
स्वप्न उद्याचे पाहू दोघं
प्रीतीच्या या काठावर
प्रेमास रंग देऊ प्रिये
त्या तिथे वळणावर...!

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[20/9/2017, 6:41 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
गंध सुगंध दरवळतो
हिरव्यागार रानावर
ये लवकर सखे मोहिनी
त्या तिथे वळणावर....!

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[21/9/2017, 2:09 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ओंजळ शब्द फुलांची ही
टाकितो आपल्या पदरात
आलेल्या पाहुण्यांचे स्वागत
साहित्य काव्यगंधच्या अंगणात

गजेंद्र काळे ढवळापुरीकर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[11/11/2017, 1:03 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*

अबोल अंतर मनातले
जपायचे हृदय गाभारी,
संकटे येवोत कितीही
प्रेमात असुद्या उभारी..

©गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[11/11/2017, 5:32 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.24

कळेल का तुला कधी
अबोल अंतर मनातले,
सौंदर्यापरी जपले मी
नाते तुझ्या जगातले..


©गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[11/11/2017, 5:34 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.25

थांबण्याचा हा नको बहाणा
अबोल अंतर मनातले बोले,
तुझ्या नी माझ्या प्रेमामधले
राज दडलले अलगद् खोले..


©गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[11/11/2017, 5:39 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.26

नखरेली अदा साजणीची
घायाळ करते गं हृदयाला,
अबोल अंतर जुळता मनाचे
तरसतो तुझ्या हसण्याला..


©गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[11/11/2017, 11:04 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.


©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[11/11/2017, 11:09 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.२८

अरे देवा! या अबोल्याने
मन जास्तच घायाळ केले,
मन जरा दुखवले गेल्याने
दुःखास जरा कमीपण आले..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[11/11/2017, 11:12 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.२९

चलता चलता ठोकर लागली
रक्त भळाभळा वाहू लागले,
अबोल अंतर मनात साठवताना
तुजसाठी दुःखाश्रू वाहू लागले..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[11/11/2017, 11:12 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.२७

अबोल अंतराला आता
मनातच ठेवायचे आहे,
तुझ्या कमनिय बांध्याला
रोजच शोधायचे आहे..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[11/11/2017, 11:15 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.३०

अबोल माझ्या मनाचे अंतर
निखळ तुझ्या मैत्रीचे फास,
कसे समजावू मज कळेना
तुझे असणे प्रिये माझा श्वास..


©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[11/11/2017, 11:17 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.३१

ओलसर भावनांना माझ्या
तुझ्या अबोल मनाची जोड,
अंतर मिटावे दोघांमधले
व्हावा शेवट प्रेमाचा गोड..


©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[11/11/2017, 11:19 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.३२

झुरतो सखये मी दिनरात
माझे सुटत आहे गं प्राण,
येणा पिलू परतूनी आता
मज उरले ना काही त्राण..


©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[12/11/2017, 1:11 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.३३

मनातले  अबोल अंतर हे
भावविभोर  करती वेदना,
चोखंदळ प्रिये तुझे नखरे
घायाळ करते माझ्या मना..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 12:13 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.३४

प्रेमात असती संकटे अनेक
जीवन डोळे वटारून पाही,
मने दुभंगतात किती जणांची
नकळत जाते राहून काही..


©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 12:15 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.३५

उदात्त मनाचे कोण आहे
वेड्या जरा तू शोधून पाही,
आपले तेच शोधताना
नकळत जाते राहून काही..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 12:19 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.३६

आणाभाका घेतल्या प्रेमाच्या
तरी नकळत काही राहून गेले,
ऋणानुबंध नवे जपता जपता
जुणे आपले सारे निसटून गेले..


©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 12:22 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.३६

झाले मन हे दुःखी माझे
मलाच कसे उमगले नाही,
नकळत काही राहून जाते
मन फुल कधी फुलले नाही..


©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 12:25 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.३७

आले कळून तेव्हा
मन श्वास घेत होते,
तुझ्या मन हे रमणे
माझेच भाग्य होते..


©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 12:30 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.३८

झगमगाट या दुनियेचा
कधीच रूचत नसतो,
अन् कळून जाते तेव्हा
आपलेच आपण असतो..


©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 12:32 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.३९

मन माझे हळवे होते
पाहिले रितीरीवाज जेव्हा,
पाळायचे असते बंधन
हे कळून जाते तेव्हा..



©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 12:35 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.४०

निसटत्या क्षणांचा भार हलका
मन हे आठवांत बुडते जेव्हा,
माझ्यावर बसले असंख्य घाव
मज नियती कळून येते तेव्हा..


©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध समूह
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 2:48 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.४२

भास होतो मज प्रेमाचा
अन् कळून येते तेव्हा,
मी तुझ्या नी तू माझ्या
मिठीत अलगद् येते जेव्हा..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 2:53 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.४३

जुण्या आठवणींचा अचानक
गुंता होतो जीवनात जेव्हा,
निसटल्या भावनांचा मज
अर्थ अर्थ कळून जातो तेव्हा..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 2:55 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.४४

नकळत प्रेमात पडणे
हा गुन्हा नसतोच ना,
अन कळून येते तेव्हा
प्रेम आनंद असतोच ना..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 2:59 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.४५

पाश तुटावे अहंकाराचे
गर्वाचे घर खाली होते तेव्हा,
मी पणा ही ढासळत जातो
अहम मनातून गळतो जेव्हा..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 3:01 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.४६

आजकाल लोकांमधे खुपच
मी पण वाढत चालले आहे,
अन् कळून मनास येते तेव्हा
आपलेच परके झाले आहे..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 3:04 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.४७

दुधाचा धर्म आई पाळते
पोट मुलाचे भरते जेव्हा,
अथांग असते तिची माया
हा अर्थ कळून येते तेव्हा..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 3:10 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.४८

कोणास ही देऊ नये कधी
आपल्या जीवनामधे जागा,
कारण नंतर कळून येते तेव्हा
आपला आपल्यावर नसतो ताबा..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[13/11/2017, 3:31 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.४९

आकाशात चमकती चांदण्या
शोभतो नभात मग चांदवा,
अन् कळून जाते दोघांनाही
प्रेमात रंगरेला रास नवा..


©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 1:45 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.५०

पुन्हा नव्याने शब्दांना
शब्द शब्द जोडायचे आहे,
साहित्याच्या या विश्वात
नवीन पैलू पाडायचे आहे..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 1:49 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.५१

पहिल्या प्रेमाची नशा
अनभवू पुन्हा नव्याने,
चल साजणी प्रितीचा
दिप हा पेटवू नव्याने..



©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 2:03 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.५२

साजणी हे नयन तुझे
पुन्हा नव्याने छळती,
त्याच भयंकर वारांनी
हृदय माझे गं जळती..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 2:08 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.५३

तुझी माझी साथ
जर मधेच तुटली,
भेटू पुन्हा नव्याने
जर  मने जुळली..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 3:07 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.५४

पुन्हा नव्याने मी जन्मावे
या मातीवर प्रेम करावे,
जगणे मरणे कोणा टळते
श्वास नव्याने मी भरावे..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 5:50 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.५५

चल ना साजणा आता
खेळ मांडू रे दोघांचा,
पुन्हा नव्याने आपला
संसार थाटूया प्रेमाचा..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 5:52 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 5:53 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.५६

ओलेचिंब झाले हे मन
जसे चांदण्याचे शिंपण,
तुझ्या नी माझ्या प्रेमाला
जाती धर्माचे का कुंपण..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 5:55 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.५७

जुने रितीरीवाज तोडू
नवे नियम बंधन जोडू,
पुन्हा नव्याने आपण
भेद भाव नी पंथ मोडू..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 5:57 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.५८

पुन्हा नव्यानेच प्रेमाचे
घरटे तोडणारे जन्मले,
प्रियकर प्रेयसीचे नाते
जुळण्या आधीच संपले..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 6:01 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.५९

रातराणी फुलली गंधाळली
प्रेमाला आलाया बहर नवा,
पुन्हा नव्याने साजणी आता
प्रेमास देऊया गं कलर नवा..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 6:03 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.६०

पुन्हा नव्याने उम्मेदीने
पुन्हा परत जन्मा यावे,
शोध घेत आपल्यांचा
मरून पुन्हा मी जन्मावे..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 6:06 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.६१

धुंद बहरतो रंग हिरवा
निसर्गाला दान लाभले,
प्रेमाचेही तसेच काही
सुखत्वाचे वरदान लाभले..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 6:24 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.६२

पुन्हा नव्याने दरवळतो
प्रेमामधला सुगंध नवा,
सांगू कसे साजणी तुला
प्रितगंध तुझा मज हवा..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 6:26 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.६३

पुन्हा नव्याने जाऊ आपण
जाती धर्मांना एक कराया,
साथ हवी आहे एकात्मतेची
वर्ण भेदांना वेगळे कराया..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 6:28 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.६४

पाश तुझ्या प्रेमाचे
मज बांधुन टाकती,
पुन्हा नव्याने सजणी
टक लावूनी पाहती..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 6:31 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.६५

पुन्हा नव्याने प्रेयसीला
द्यावी तनमनात जागा,
प्रेम करणे शिकवून तीला
बांधावा प्रेमाचा धागा..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 6:33 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.६६

वसंताची चाहुल येता
मन हे बहरायला येते,
वचनात कटीबद्ध होता
पुन्हा नव्याने मन जन्मते..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 11:31 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.६७

ओसाड या वातावरणात
लेखणीने कात टाकावी,
लिखाणातून पुन्हा नव्याने
सर्वांची लेखणी उभरावी..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 11:31 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.६८

ओसरतील जुने हे दिवस
क्षण सुखाचे परत येतील,
लेखणीची क्षमता दाखवाया
पुन्हा नव्याने जन्म घेतील..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[14/11/2017, 11:31 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.६९

धागा तुटतो नाजुक
जेव्हा प्रेम संपत जाते,
पुन्हा नव्याने भेटीची
ओढ मनाला लागते..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[15/11/2017, 7:54 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.७०

पुन्हा नव्याने सोनेरी
सुर्य नभी उगवला आहे,
चमकवीत दाहीदिशा
प्रकाशमय झाला आहे..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[15/11/2017, 7:54 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.७१

पुन्हा नव्याने माणसं
निघालीत कामावर,
घाई गडबड सगळी
मन नाही था-यावर..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[15/11/2017, 7:54 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.७२

शाळेची मौज भारी
परत घ्यावी वाटते,
पुन्हा नव्याने मला
शाळेत जावे वाटते..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[15/11/2017, 7:57 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.७३

नभी उजळला प्रकाश
सुर्य किरनांची झळक,
पुन्हा नव्याने दिसतेय
आकाश स्वच्छ ठळक..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[15/11/2017, 12:49 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[15/11/2017, 12:51 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.७४

तुला आपलेसे करताना
प्रेम केले मी गुन्हा नाही,
तुझे दुर दुर राहण्याने
एकदा फसेल पुन्हा नाही..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[15/11/2017, 12:53 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.७५

प्रेम करणे जर गुन्हा आहे
तर तो मी पुन्हा करणार,
तुझ्या नयनांच्या जादूगिरीत
सखये मी हळूच फसणार..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[15/11/2017, 12:54 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.७६

गुन्हा प्रेमातच होतो
हलका नी फुलकासा,
जर तो नाही करावा
कोण होईल आपलासा..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[15/11/2017, 12:56 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.७७

सखे प्रेमाला रंग चढू दे
हातून या गुन्हा होऊ दे,
तुझ्यात एकरूप होताना
गुन्हा पुन्हा पुन्हा होऊ दे..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[15/11/2017, 1:00 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.७८

लाडी गोडी करून सख्या
तू मला सुखी अन शांत केले,
प्रेमाची नशा लावून वेडी
माझे जगणे आबाद केले..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[15/11/2017, 1:01 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.७९

धनाचा पुजारी नेहमीच
प्रेमाच्या विरोधात असतो,
गुन्हा प्रेमाचा घडवण्यात
त्याचा वाटा मोठा असतो..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[16/11/2017, 1:31 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.८०

पायवाटा त्या चालताना
जुण्या आठवणी जागल्या,
सखये तुझ्या प्रेमाखातर
माझ्या प्रित खुणा पांगल्या..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[16/11/2017, 1:33 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.८१

पायवाटा तुझ्या सवे
चाललो गं आजवरी,
मग सांगणा प्रिये अशी
रूसली का मजवरी..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[16/11/2017, 1:36 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.८२

पायवाटा त्या नव्याने
फुलल्या बघ साजणी,
चालूया दोघे मिळुन
मी राजा अन् तू राणी..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[16/11/2017, 1:38 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.८३

ओठावरचा गंध मावळला
सुर्यही आता दुरवरी गेला,
पायवाटा या चालू नव्याने
बघ प्रितीचा मारवा बहरला..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[16/11/2017, 5:21 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
रूबाई क्र.८४

हम क्या कहें उन्हें
ओ बेवफाई कर जाते हैं।
हरदम हरवक्त हमें
तन्हाई मे छोड जाते है।

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[16/11/2017, 5:24 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
रूबाई क्र.८५

बेवफाई करनेवालो
प्यार करना छोड दो।
नफरत की दिवारे
दिल से तोड दो।

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[16/11/2017, 5:29 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
रुबाई क्र.८६

जल रहा हैं आशियाना
दो प्यार करनेवालों का।
ढल जातें हैं गम के आँसू
वक्त बेवफाई करनेवालों का।


©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[16/11/2017, 5:58 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.८८

एक पाऊल तू टाक ना
एक पाऊल मी टाकतो,
जुणे दुःख विसरून सारे
हृदयात या वास करतो..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[16/11/2017, 5:58 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.८७

पायवाटा चालू सजणे
हातात घेऊनी हात,
प्रेमवाटा त्या जुण्या
आणू नव्याने बहरात..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[16/11/2017, 5:58 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.८९

सोडूनी रूसवा फुगवा
साथ देतो मी नव्याने,
पाऊल वाटा चालताना
मन सखे झाले दिवाने..


©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[17/11/2017, 11:42 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[17/11/2017, 11:46 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.९०

जीवन बहरणारी बाग
प्रेमाने आनंदात जगा,
गर्व अहंकार पैलतीरी
सोडूनी सर्वजण वागा..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[17/11/2017, 11:48 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.९१

जीवनाच्या या बागेमधे
सुख दुःख मी बघीतले,
बहरताना माझे जीवन
मोहमायेत का अडकले..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[17/11/2017, 11:50 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.९२

सोहळे लाख मी बघीतले
बघीतले नाही भेदभावाला,
म्हणून बहरत ठेवीन मी
जीवनाच्या या सुंदर बागेला..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[17/11/2017, 11:52 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.९३

जीवनाचे महत्व कळते ज्याला
तोच लाख संकटाना तोंड देतो,
वासनेच्या जंगलात फसलेला
कधीच न जीवनबाग बहरवतो..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[17/11/2017, 11:54 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.९४

डाव मोडलेला आयुष्याचा
परत पुन्हा मांडायचा आहे,
थांबलेल्या या जीवनाला
फुलवून संसार थाटायचा आहे..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[17/11/2017, 11:56 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.९५

जीवना जीवना थांब रे
एक श्वास हलका होऊ दे,
मुरझलेल्या जीवनाला
बहरून पुन्हा एकदा फुलू दे..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[17/11/2017, 11:57 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.९६

दोन घडीचा डाव असतो
हे बहरलेले सुंदर जीवन,
जप मानवा त्यास प्रेमाने
अनमोल असते हे जीवन..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[17/11/2017, 11:59 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.९७

आजवर केल्यास चुका
थोडे समजून आता वाग,
नकोस धरू कधी वाममार्ग
जीवन ही बहरणारी बाग..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[17/11/2017, 12:02 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.९८

राहशील कधी या मनात
वाट पाहून मी थकलोय रे,
जीवनाची बहरणारी बाग
तुजसाठी जपून राहिलोय रे..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[17/11/2017, 12:04 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.१००

दुस-यास दिलेले वचन
पाळायला बांधिल असावे,
जीवनात बहरलेले क्षण
जीवनबागेत पेरायला हवे..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[17/11/2017, 12:06 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
चारोळी क्र.१०१

शांत पहूडलो मी होतो
स्वप्नात होती चांदरात,
आली अवखळ वयात
जीवन बहरणारी बाग..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
मो:9623714011
*〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
[20/11/2017, 10:26 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
चारोळी क्र.१०५

थांबणा प्रिये जराशी
त्या तिथल्या वळणावर,
पुन्हा भेट होते न होते
माझी पाऊले सरणावर..


®©
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य सभूह प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[20/11/2017, 10:26 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
चारोळी क्र.१०६

खुणावते सखी मजला
भेटण्या सख्या येशिल का?
विरहात जगते मी तुझ्या
फुंकर मारूनी जाशिल का?

®©
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य सभूह प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[20/11/2017, 10:27 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
चारोळी क्र.

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य सभूह प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[20/11/2017, 10:29 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
चारोळी क्र.१०२

घर आपले दोघांचे
इतक्यात तिसरा नको,
सुखाचे क्षण जगू थोडे
ऐन दिवाळीत दसरा नको..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य सभूह प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[20/11/2017, 10:31 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
चारोळी क्र.१०३

रास रंगलेला हा
राधाकृष्णाचा,
चहूबाजुंनी वेढा
पडला गौळणींचा..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य सभूह प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[20/11/2017, 10:33 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
चारोळी क्र.१०४

अशे वाटते आज
तूच जवळ असावी,
आठवणींत माझ्या
फक्त तूच बसावी..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य सभूह प्रशासक
साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान
औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[9/12/2017, 12:37 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
चारोळी क्र.१०७

वेड्या मना सावर रे
हळूहळू तू बावर रे,
नळकत माझ्या मनी
दाखव तुझा वावर रे..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य सभूह प्रशासक
सा. का. प्र. औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[9/12/2017, 12:37 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
चारोळी क्र.

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य सभूह प्रशासक
सा. का. प्र. औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[9/12/2017, 12:47 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
चारोळी क्र.१०८

घरटे त्या पाखराने
विणले कलाकारीने,
वेड्या मना तु माझ्या
भुललास अदाकारीने..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य सभूह प्रशासक
सा. का. प्र. औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[9/12/2017, 12:49 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
चारोळी क्र.१०९

मादक तुझी नजर
भलता करते कहर,
घायाळ जाई करूनी
तुझ्या प्रेमाची लहर..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य सभूह प्रशासक
सा. का. प्र. औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[9/12/2017, 12:56 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
चारोळी क्र.११०

लावण्य तुझे सखये
सुंदर बहरात आले,
वेड्या मनावर कसे
शहारे जीवनात आले

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य सभूह प्रशासक
सा. का. प्र.औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[9/12/2017, 2:51 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
चारोळी क्र.१११

तेल टाकणे बरे नव्हे
समजून घे वेड्या मना,
कधी न जमले कलयुगी
सावरणे इथे जना..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य सभूह प्रशासक
सा. का. प्र. औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[9/12/2017, 2:51 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
चारोळी क्र.११२

इकडचे तिकडे करणे
खुप वाईट सवय आहे,
वेड्या मना सांग इथे
सत्यालाच का भय आहे..

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
मुख्य सभूह प्रशासक
सा. का. प्र. औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[8/5, 7:05 PM] सागरराजे निंबाळकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
लेखणी माझी देखणी
आयोजित स्पर्धेसाठी

विषय:मिठी सैल झाली

साथ तुझी भुलवणारी,
सांगणा किती मैल गेली,
उभा मी अनुभवण्या सखे
तरीही तुझी मिठी सैल झाली..//धृ//

नव्हते आपल्यात तिसरे कुणी,
ओळख ही होती पहिलीच जुणी,
प्रिये हातात हात बाहुपाशात,
न देताच कशी वेळ निघून गेली,
उभा मी अनुभवण्या सखे,
तरीही तुझी मिठी सैल झाली..//१//

चेह-यावरचे ते भाव गं तुझे,
खुलून फुलून दिसते गं ताजे,
आठवणींच्या या गदारोळात,
हाय नजर तुझी खेळ झाली,
उभा मी अनुभवण्या सखे,
तरीही तुझी मिठी सैल झाली..//२//

तुझ्या हृदयी मी नव्हतो कधीच,
कळले होते मज प्रिये आधीच,
प्रित आपली बहरण्या अगोदरच,
मुरझणारी दुःखी वेल झाली,
उभा मी अनुभवण्या सखे,
तरीही तुझी मिठी सैल झाली..//३//

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[8/5, 7:05 PM] सागरराजे निंबाळकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
लेखणी माझी देखणी
आयोजित स्पर्धेसाठी

विषय:भार कशाला आभाराचे

कर्तव्याची धार असते संसाराच्या गाडीला,
संसाराची शोभा नवरा बायकोच्या जोडीला,
झिजतात एकमेकांसाठी पाऊल दोघांचे,
मगयोगदान माझेच मोठे म्हणत,
भार कशाला आभाराचे..१

नवरा रोजच कामावर जाऊन कष्टात झिजतो,
घराच्या उदरनिर्वाहासाठी हाल अपेष्टा सोसतो,
कधी उपाशीपोटी कधी अर्ध्या भाकरीसाठी,
तीळतीळ तुटत असते ठोके त्याच्या हृदयाचे,
मग योगदान माझेच मोठे म्हणत,
भार कशाला आभाराचे..२

बायको सकाळी पाच पासून झिजते संसारासाठी,
धुणी भांडी स्वयंपाक करत जगते पिलांसाठी,
उरतो कुठे मग वेळ स्वतःसाठी बसत नाही मेळ,
उसासे भरत जगण्याचे भान नसते श्वासांचे,
मग योगदान माझेच मोठे म्हणत,
भार कशाला आभाराचे..३

योगदान मोठे असते दोघांचे दोघे जाणुन घ्या,
असते घरही दोघांचे मतभेद प्रेमाने सोडून घ्या,
एकमेकांसाठी जगणे सुखदुःखामधे झुरणे,
पुण्यकर्म लाभेल दोघांना जपले नाते या जन्माचे,
मग योगदान माझेच मोठे म्हणत,
भार कशाला आभाराचे..४

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[8/5, 7:05 PM] सागरराजे निंबाळकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
लेखणी माझी देखणी
आयोजित स्पर्धेसाठी

विषय:मोबाईल स्तोत्र

मोबाईलमस्तोत्रं विश्वःप्रथमगोत्रम।
         न अतिथी न गुरूम न लोकम न मित्रम।।१।।

न माता न पिता न पुत्री न पुत्रम।
        सकलसृष्टीम प्रथमदेवं मोबाईलस्तोत्रम।।२।।

करीशे पुजा मोबाईलस्य सदासर्वदा नेटंम।
        रिचार्जम नेटींग एसएमएस चँटीगसर्वम।।३।।

नेटमडिस्कनेटींग वार्ता न बोलीतःमनक्रोधम।
      व्हाॅटसप फेसबुकंम अपडेटंममोबाईलस्तोत्रम।।४।।

नवितंमगेमं प्लेस्टोरंम डाऊनलोडिंग करतंम।
         मोबाईलदेवःपुजंमअर्चम मनभावंमनित्यंम।।५।।

अक्षदाफुलंम हळदीकुमकुमप्रीतःवाहम।
          नित्यंमचार्जंम लावितःदेखीतनयनंम।।६।।

माहनेटपॅकंम मारीतः प्रेमवार्तालापंम।
        जयदेवंम मोबाईलंम नतमस्तकंमत्वादेहंम।।७।।

इती मोबाईलस्तोत्रंम संपुर्णंम
     ॐ शांती:शांती:शांती:

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[8/5, 7:05 PM] सागरराजे निंबाळकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
लेखणी माझी देखणी
आयोजित स्पर्धेसाठी

विषय:माझा न मी राहिलो

अबोल मुक भावनांनी का सखे मी वेडावलो,
चिंब भिजता तुझ्यामधे माझा न मी राहिलो..//धृ//

पावसाची सर यावी मिठी तुझी घट्ट व्हावी,
अंतरातल्या स्पर्शाने लहरणारी बट व्हावी,
आर्त तुझ्या काळजात सुगंधापरी गंधाळलो,
सुख वेडे शोधताना माझा न मी राहिलो..//१

हृदय माझे होई बावरे प्रेमाचे आहे दुर गाव रे,
वाट प्रितीची चालताना शिकलो अनेक डाव रे,
भेद मनीचा खोलताना धुंद वेडा मी जाहलो,
भाव तुझे हृदयी भरता माझा न मी राहिलो..//२//

वसंताची चाहूल लागता कोकिळ गान कानी येता,
नवप्रीतीला फुटे पालवी तुझे माझे मिलन होता,
हात तुझा हाती माझ्या येता अंग अंग शहारलो,
आठवीत मधुगंध चुबंनाचा माझा न मी राहिलो..//३//

नभ हे तारकांनी भरले श्वास माझे तुझ्यात हरले,
बचैन होता प्राण माझा क्षण सुखाचे बहरून आले,
एकरूप होता तनमनाने दोघे भरून सुख पावलो,
चिंब भिजता तुझ्यामधे माझा न मी राहिलो..//४//

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[8/5, 7:05 PM] सागरराजे निंबाळकर: 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
लेखणी माझी देखणी
आयोजित स्पर्धेसाठी

विषय:दिवस गुलाबी थंडीचे

संगित जुळले भावनांचे
तुझ्या माझ्या मिलनाचे,
आठवते मला साजणी
ते दिवस गुलाबी थंडीचे..//धृ//

उमलणा-या त्या सुखांना
फुलणा-या त्या क्षणांना,
अलगद् वेचले मी सखये
गंधाळणारे भाव मनीचे,
आठवते मला साजणी
ते दिवस गुलाबी थंडीचे..//१//

श्वास माझा तुझ्यात रूतला
जीव ही सखे तुझ्यात गुंतला,
प्रणयाची वेळ जवळी येता
बहरले क्षण हे प्रीतीचे
आठवते मला साजणी
ते दिवस गुलाबी थंडीचे..//२//

मन बहकते तुझ्या स्पर्शाने
उमलते गं प्रेम त्या हर्षाने
रंगलेले डाव तुझे नी माझे
सुमधुर मंतरलेल्या गोडीचे
आठवते मला साजणी
ते दिवस गुलाबी थंडीचे..//३//

©®
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
[11/08/2018, 23:36] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: काव्यस्पंदन समूह आयोजित
काव्याजंली प्रकार

विषय:ओळख

पुर्वीचे दिवस
तुझ्या माझ्या ओळखीचे
हृदयात ठेवायचे
साठवून...,

ओळख प्रेमातली
रानात वनांत पांगलेली
जपून ठेवली
श्वासात...

ओळख साजणीची
पहिल्या भेटीतल्या श्वासांची
आस प्रीतीची
माझ्यात...

आसुसलेल्या प्रेमाला
आठवण प्रेमाच्या शब्दांची
ओळख प्रारब्धाची
समयाला...

आपली ओळख
भास वेडावते हृदयास
भेटीसाठी सावकाश
आतुरलो...

©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
दि.११|८|२०१८५४
[14/08/2018, 07:58] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*

*विषय:मरावे परी अवयवरूपी उरावे*


मरावे परी इथे अवयवरूपी उरावे
एखाद्याला जीवदान देऊनी जावे,
झाले जरी निकामी शरीर आपुले
दुस-या शरीरात तरी त्याला पहावे..१

देहदान ठरले आहे हो सर्वश्रेष्ठ दान
दुस-याच्या देहात बघा मिळतो सन्मान,
तिथे नाही मिळत गरीब श्रीमंत भेदभाव
विसरला जातो आहे मानापमान..२

शरीर आहे माती मातीतच जाणार
मातीमधेच असंख्य किडे लागणार,
त्यापेक्षा मेल्यावर अवयव दान करून बघा
या देहाचा इथे नक्कीच उद्धार होणार..३

मरण कोणालाच टळले नाही भुतलावर
एक ना एक दिवस सगळ्यांना मिळणार,
माणुसकी धर्म-कर्म जात-पात नी भेदभाव
अवयव दानानंतर काहीच नाही उरणार..४

देहास जाळण्या पुरण्यापेक्षा दान करा
गुदमरलेल्या एखाद्या तनात श्वास भरा
मिळेल पुण्य उद्धार होईल या जीवनाचा
मरणानंतर ही या जगात अवयवरूपी उरा..५

©® गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर  औरंगाबाद
मो:9623714011
दि.14/8/2018 मंगळवार
[14/08/2018, 23:37] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *स्पर्धेसाठी*
*विषय:चित्रकाव्य*

उंच झुले बाई झोका
मज मिळे एक मोका,
उंच आभाळी जाया गं
घेते बाई एक झोका..!

येता गं नागपंचमी
झाडा झाडावर झोका,
खेळ खेळती मैत्रीणी
मोह माहेरच्या सुखा..!

झुले आषाढ श्रावण
माहेराच्या पंगतीला,
मेळा जमतो मैत्रीचा
एकमेकी संगतीला..!

म्हणू गाणे पंचमीचे
तुझ्या माझ्या संगतीचे
भेटीसाठी जीवलगा
नाते जुळे गमतीचे..!

सण आहे हा भाग्याचा
युगे युगे येत राहो,
नाते हे जन्मोजन्मीचे
सख्या रे झुलत राहो..!

©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१४|८|२०१८ मंगळवार
[15/08/2018, 17:01] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *काव्यप्रज्ञाजंली समूह*
*आयोजित स्पर्धेसाठी*

*फेरी क्रमांक ७*
*विषय:देशभक्तीपर काव्य*

*शिर्षक*
*माझा भारत महान*

आहे भारत महान माझा
करतो हात जोडूनी प्रणाम,
स्वातंत्र्य मिळवण्या भारता
लाखो विरांचे गेले बलिदान..

जुलूमशाही फिरंग्यांची
दिवसेंदिवस वाढायची,
रंजल्या गांजल्या सर्वांची
देहं खितपत पडायची..

सोसवेना वीरांना अत्याचार
बघवत नव्हता दुराचार,
रक्त लागले उसळायला
सज्ज झाले करण्या वार..

फौज जमली एकत्र विरांची
कुटनितीची लढवली शक्कल,
एकावरती एक केले वार
इंग्रजांची पडली गहाण अक्कल..

स्वातंत्र्य करण्या भारत देशा
लढे अनेक होऊ लागले,
स्वतंत्र भारताच्या इतिहासात
आज विरांचे गुणगान गाऊ लागले..

DPASG:1139
[17/08/2018, 21:35] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *......महान थे अटलजी......*

महान थे अटलजी उन्हें कैसे भूला दूँ।
मिले शांती उन्हें ऐसे मैं दिप जला दूँ ।

राजकारणी थे बड़े नेता महान भारत के।
धरती भी चुम ले ऐसी भोलीभाली सुरत के।

चमकीला तारा थे अटलजी न बुझेगा कभी।
युग युग बित जाएंगे नाम गुजेंगा फीर भी।

अटलजी के जाने से हर शख्स दुख में रो रहा।
कतरा कतरा प्यार का आँसुओ में बह रहा।

देश से अंधेरा हटानेवाला कवी ऐसा खो गया।
खुद अंधेरे में रहने हमेशा के लिये सो गया।

©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१७|८|२०१८ शुक्रवार
[17/08/2018, 23:11] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *काव्यस्पंदन समूह आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:माझी आज्जी (अष्टाक्षरी)*


*......माझी आजी.....*


आजी आजोबांची दासी
होता जन्म वनवासी,
मामाकडे वाढताना
नाळ तुटे माहेराशी..

आई वडील ते गेले
स्वर्गवासी दोघे झाले,
माझ्या आजीच्या का देवा
दुःख नशिबाशी आले..

बालपणी आजी माझी
देवा पोरकी जाहली,
पुढे नव-याने तिला
जीवघेणी सजा दिली..

आजी कधी ना हरली
दुःख वेदना भोगली,
संसाराच्या वेलीवरी
चार फुले उमलली..

दोन मुलं दोन मुली
जन्म घेऊनिया आली,
दुःख यातनांची देवा
हळूहळू माती झाली..

अशी होती साधीभोळी
देवा कारे माझी आजी,
तिच्या जाण्यामुळे आता
जड डोईवरी ओझी..

©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१७|८|२०१८ शुक्रवार
[18/08/2018, 09:22] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *...कधी कधी का असे वाटते..*

कधी कधी असे का वाटते
नको हे जीवन मनी दाटते,
कधी कधी असे का वाटते...//धृ//

रोज छळणा-या यातना
सहन किती कराव्या सांगणा,
अश्रू सदा हे नयनी वाहते
नको हे जीवन मनी दाटते
कधी कधी असे का वाटते...//१//

जगणे मरणे देवा घरचे
दुःख दिलेस दुःखा वरचे,
क्षणोक्षणी हे हृदय साहते
नको हे जीवन मनी दाटते
कधी कधी असे का वाटते...//२//

जीवन असावे सुखी क्षणात
दुःख नसावे या आयुष्यात,
ते भोगताना हे मन फाटते
नको हे जीवन मनी दाटते
कधी कधी असे का वाटते...//३//

सोडून सगळे निघूनिया जावे
दुःखास काडीमोड देऊन जावे
दुःखात सुखाचे जीवन बाटते
नको हे जीवन मनी दाटते
कधी कधी असे का वाटते...//४//

©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४११
दि.१८|८|२०१८ शनिवार
[18/08/2018, 15:01] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *.....रंग दे तिरंगा.....*

करके मन अपना चंगा
लहराता फिरू मैं तिरंगा।
हाथों में लेकर कई रंग
चल रंग दे अपना तिरंगा।

जवानों सिमा पर तुम
लड़ते हो बाजी लगाकर।
हम अपनी घरों बैठते हैं
हाथों में मेहँदी सजाकर।

आओ सब कसम खाले
जान की बाजी लगा देंगे।
अपने दिल में तिरंगा हम
लहू के शाही से भीगा देंगे।

दुश्मन लाख बुराई करले
तिरंगा दिल में लहरायेंगे।
उठा कर शस्त्र अच्छाइ का
तिरंगे को रोशन कर देंगे।

तिरंगा पहचान हैं हमारी
तिरंगा हैं जान से बढ़कर।
ऐसा तीर लगाये दुश्मन पर
तिरंगे को साँस मैं भरकर

रंग दो तिरंगा हमारा ये
चलो जवानों आगे बढो।
पल पल इन आँखों से
तिरंगे के गुनगान पढो।

तिरंगा हमारी साँसो मे
फुत्कार भरे आजादी के।
रंग दे तिरंगा प्यार हमारा
झंडे लहराये आबादी के।

©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१८|८|२०१८ शनिवार
[18/08/2018, 16:16] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *......हि जुळलेली बंधने.....*

हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची,
पाहिलेली स्वप्ने हृदयात साठवायची..
हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची..//धृ//

आसुसलेल्या होत्या माझ्या भावना
श्रावणात भिजलेल्या ओल्या वेदना
परसात चंदनाच्या सुगंधी वेल जपायची
हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची..//१//

चिंब होते नाते तुझ्याशी जोडलेले
जुळवतो साजणी गं प्रेम तोडलेले
नकळत साठवलेली स्वप्ने बघायची
हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची..//२//

अश्रूंत भिजलेल्या माझ्या दुःखांना
अलवार जपले मी सा-या सुखांना
नकळत मिळालेली दुःखे सोसायची
हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची..//३//

  ©®गजेंद्र
        ढवळापुरीकर
 स्वराजनगर औरंगाबाद
   मो:९६२३७१४०११
दि.१८|८|२०१८ शनिवार
[19/08/2018, 19:44] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: घे भरारी समूह
आयोजित स्पर्धेसाठी

विषय:श्रावण
(अष्टाक्षरी)


येता श्रावण महिना
तन झुराया लागते,
पावसाच्या धारा संगे
मन भिजाया लागते..

ऋतू पावसाळा येता
खुले रंग श्रावणाचा,
नदी नाल्यात चालतो
खेळ चिंब पावसाचा..

श्रावणाच्या सरी ओल्या
माझ्या मनात दाटल्या,
थेंब थेंब बरसूनी
चारी बाजूंला दाटल्या..

बिंब दिसते सुर्याचे
श्रावणाच्या या जलात,
बाग प्रीतीची फुलते
गर्द हिरव्या रानात..

येतो श्रावण घेऊन
रिमझीम सालोसाल,
श्रावणाच्या सरी येता
हिरवळ रानोमाळ..

येई उनाड हा वारा
संगे पावसाच्या धारा,
येता श्रावण महिना
मोडे कोवळा कोसेरा..

श्रावणाच्या जलधारा
वाहे खट्याळ चंचल,
खडकात खळखळ
होई मनास नवल..

तण उगते मातीत
जाळीदार मलमल,
गंध येतो माळराना
होई मन उतावीळ..

येता श्रावण जवळी
हाळ्या मारी बुलबुल,
साद ऐकुनी पावसाची
वारा वाहे झुळझुळ..

आहे मधाळ श्रावण
मनोहर पावसाळी,
कधी हलकीच येते
माझ्या कानात आरोळी..

चहूंकडे आसमंती
इंद्रधनू रे सजला,
असा वेडा नटखट
मज श्रावण वाटला..

©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१९|८|२०१८ रविवार
[03/09/2018, 21:00] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: काव्यस्पंदन समूह
आयोजित स्पर्धेसाठी

विषय:दहि हंडी
(द्रोण काव्य रचना)


*शिर्षक:दह्याची हंडी*

बांधली ऊंचावरी
दह्याची ती हंडी
घेते उसळी
खुप थंडी
एकच
बंडी
ही.

करू गोपालकाला
बघा  नटखट
हा नंदलाला
करू म्हणे
उजाळा
नभी
या.

एकावरी एक रे
चढे ते गोपाल
करती खुप
हालचाल
पडती
खाली
रे

ही कृष्णजन्माष्टमी
उत्सव पावन
पवित्र जगी
आहे सण
चला रे
जन
हो.

चालल्या गोपगोपी
दह्याच्या हंडीला
घेऊन अंदाज
फोडायला
बघाना
झुला
तो.

©गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.०३|०९|२०१८ सोमवार
[05/09/2018, 10:56] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: मनसोक्त साहित्य समूह
आयोजित स्पर्धेसाठी

विषय:देई जीवना आकार

शिर्षक:

गुरू आणि शिष्यांची जोडी आहे महान,
गुरू वाटी ज्ञान शिष्य घेई आत्मज्ञान..

घडवून संस्कार गुरू देई जीवना आकार,
गुण करी आत्मसात तो शिष्य तारंतार..

तांबजलेल्या लोखंडा परिस देई चकाकी,
तैसे गुरू शिष्यांमधे भरी चीर झकाकी..

आयुष्याच्या सुरूवातीला जीवन सुंदर होतं,
जेव्हा ब्रम्हज्ञान घेण्याचं पंखात बळ येतं..

साक्षरता अडाणीपणात घडवते जन्मांतर,
तिथे गुरूचे ज्ञान वाहत असते निरंतर..

शिष्य असे टवाळी जसा जळता निखारा,
गुरू देत आकार बनवी चकाकणारा तारा..

शिष्यांच्या जीवनाचा गुरू रचितो पाया,
असते अमाप ही खळखळ वाहणारी माया..

©गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.०५|०९|२०१८बुधवार
[08/09/2018, 09:00] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: घे भरारी समूह
आयोजित स्पर्धेसाठी

पर्व दुसरे
फेरी क्रमांक 5

शिर्षक: आई (अभंग प्रकार)

आई या विश्वाचे। आहे एक रूप।
मायाळू ते खुप। कसे सांगू..।।१।।

आईची पुण्याई। विश्वाचे दर्शन।
मनाचे दर्पण ।स्वच्छ असे..।।२।।

आईची करूणा। जगी सर्व श्रेष्ठ।
आप्त सगे जेष्ठ। सारे काही..।।३।।

मायेचा सागर।आई माझी असे।
मन तीज भजे। सदोदित..।।४।।

संस्कार देऊनी। घडविते मुर्ती।
देते मज स्फुर्ती। पांडुरंगा..।।५।।

धागा एकनिष्ठ। बांधुनिया आई।
ऋण माझ्या डोई। जन्मोजन्मी..।।६।।

वात्सल्याची खाण।आई माझी देवा।
ममतेचा मेवा।तिच्या ठायी..।।७।।

आई विना देव। जन्माचा भिकारी।
करीतो चाकरी। विश्वासाठी..।।८।।

सारे हे ब्रम्हांड। आईचे रूपडे।
घालीतो साकडे। मुक्तीसाठी..।।९।।

 गजेंद्र
[16/09/2018, 19:06] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *शिर्षक:माझ्या अस्तित्वाच्या खुणा*

शोधत आहे मी,
'माझ्या अस्तित्वाच्या खुणा'
विखुरलेल्या,जळमटलेल्या,
आयुष्याच्या वळणावर..!
विस्फोटक भावनांचे उद्रेक
तिथे शांत बसु देत नाही...
अश्रूंचे वादळ उठवते मनात घालमेल
का ? कुणास ठाऊक
अस्तित्वं खुणावत राहते
सिद्ध करण्यासाठी लढा अस्तित्वाचा अस्तित्वाशी..!
मने गुरफटलेली असतात एकमेकांशी
जाणिवा जपण्यासाठी
विस्फारलेले डोळे शोधत असतात
सावज करण्यासाठी एखादी शिकार..!
मी मनास समजावत राहतो मात्र
आपलं अस्तित्वं
टिकवण्यासाठी
जपण्यासाठी
मनावर होत जाणारे आघात विसरून
विडंबन करण्यासाठी जीवनाच्या पलटाचे..!
मात्र अस्तित्वं
शांत करतं मनात उठलेलं वादळ
तेव्हा जीवन नावाच्या पुस्तकातले
एक एक पान उलटून
मी शोधत असतो
माझ्या अस्तित्वाच्या खुणा...!!

©गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
दि.१५|९|२०१८ वार शनिवार
[16/09/2018, 21:11] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *.........तु आणि मी...... ..*

तु आणि मी श्रावणातला पाऊस
सोडून सखे गं नको मला जाऊस
तु आणि मी श्रावणातला पाऊस
                 तु आणि मी...//धृ//

श्रावण फुले गं हा जरा जरासा
नात्यास आपल्या मिळतो खुलासा
धुंद होऊनी अशी वेडे नको पाहूस
सोडून सखे गं नको मला जाऊस
                  तु आणि मी..//१//

धारा पावसाच्या बरसे रिमझीम
वाजली गं तुझ्या माझ्या प्रेमाची धून
ओढून हृदयासी प्रिये नको घेऊस
सोडून सखे गं नको मला जाऊस
                   तू आणि मी..//२//

आले कितीही संकट प्रेमावरी गं
ठेवीन तुला जपून माझ्या उरी गं
श्वास तुझ्या प्रेमाचा नको घेऊस
सोडून सखे गं नको मला जाऊस
                   तू आणि मी..//३//

अल्लड श्रावण हा अल्लड प्रेम
स्वागताला बरसे तुझ्या पावसाचे थेंब
खेळ माझ्या भावनांचा नको होऊ देऊस
सोडून सखे गं नको मला जाऊस
                  तू आणि मी..//४//

©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.२७|८|२०१८ सोमवार
[25/6/2017, 3:36 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: गावाकडचे काल्पनिक चित्र डोळ्यासमोर ठेवून या हास्यकवितेची निमिर्ती झाली आहे याचा वास्तविक जीवनाचा काही एक सबंध नाही आणि आलाच तर तो केवळ योगायोग समजावा....

*स्पर्धेसाठी हास्यकविता*


_______पाण्यावरचं भांडण_______



पाणी थोडं थोडं सांडा दोघी हळूहळू भांडा

लई जोर लावून इथं गोळा करू नका तांडा

पाणी थोडं थोडं सांडा दोघी हळूहळू भांडा...//धृ//


एकीनं धरल्या झिंज्या दुसरीनं मारला पंज्या

लई वाढलं हे भांडण हाका मारीत गेला संज्या

एक म्हणे भवाने तुझा उखळात करते कांडा

पाणी थोडं थोडं सांडा दोघी हळहळू भांडा...//१//


एकीचा वाढला पारा म्हणाली हिला मारा

दुसरीनं धरून हाताला फिरवलं न गरागरा

धपकन् पडली खाली झाला कि तिचा वांधा

पाणी थोडं थोडं सांडा दोघी हळूहळू भांडा...//२//


भांडता भांडता एकीचा शेंबूड आला सळकन्

पाहिलं इकडं तिकडं न् ओढून घेतला फरकन्

शेणात भरवून एकमेकीला मारत होत्या धोंडा

पाणी थोडं थोडं सांडा दोघी हळूहळू भांडा...//३//


चर्चा समद्या गावात सारं गाव झाला गोळा

तोवर दोघींनी केला एकीमेकीचा चोळामोळा

गावचा पाटील म्हणाला भांडण चावडीत मांडा

पाणी थोडं थोडं सांडा दोघी हळूहळू भांडा...//४//


गजेंद्र

ढवळापुरीकर

स्वराजनगर औरंगाबाद

मो.९६२३७१४०११

●●●●●●●●●●●●●●●●●●●●
[27/6/2017, 11:09 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: एकदा एक घुंघरू
तुटून खाली पडलं,
अन् खळखळ सगळी घुंघरं
अस्ताव्यस्त विखरली.
अन् तमासगिरणीचा तमाशा झाला.
सगळी लोकं हातात येईल ते
फेकून मारू लागली.
कुणी दगड उचलले,
कुणी अंड्डे टमाटे घेतले,
अन् चहुबाजूने मारा सुरू केला.
कुणीही ऐकत नव्हते,
तमाशा मालक हात जोडून,
विनवणी करीत होता.
पण ऐकतील ती माणसं कुठली.
हि तर वासनेच्या आहारी,
गेलेली लांडगी होती.
यांना हलणारी कंबर हवी होती.
तिच्या चेह-यावरची,
नखरेली अदा हवी होती.
पण हि पोटासाठी नाचायची.
खुप शिकून नौकरी करण्याची,
तिची तिच्या कुटूंबियांची औकात नव्हती.
म्हणुनच काय तिनं हा,
नाचण्याचा बाजार मांडला होता.
अन् आपली अदा,
आपलं मोहक रूप,
येत असलेला सुंदर नाच,
चेह-यावरचे हावभाव,
ती या बाजारात रोजच विकत होती.
आणि कुटुंब चालवून,
आपला उदरनिर्वाह करत होती.
पण खरे नाचत होते ते,
तेच पैसा देत होते
आणि आपला नाच विकत होते.
खरा तमाशा करत होते तर तेच.
अन् सांगू पाहत होते या समाजाला,
आम्हीच आहोत हिजड्या जातीचे.
शांत बसून आम्ही राहू शकत नाही.
आणि आमचा दबदबा,
आम्ही कमी होऊ देऊ शकत नाही.
तमासगिरीन तमाशा करायची,
आपल्या जीवाचा अन् सगळे बंध
झुगारून ती नाचायची,
यांच्या पैशाचं मोल फिटेपर्यंत.
पण हाच समाज तीला हिणवायचा.
दिवसा ढवळ्या या समाजात.
अन रात्री मात्र तीच्या तालावर नाचयचा,
हैवानाची जात ही मन भरेपर्यंत,
तीला लुटायची रात्रीच्या अंधारात.
एकदाच काय घुंघरू तुटलं तर....
यांनी या समाजकंटकानी तीला,
रक्तबंबाळ केलं.
पण ती हरली नाही डगमगली नाही.
पुन्हा उठून उभी राहिली.
या भामट्यासमोर नाचण्यासाठी.
पुन्हा एकदा घुंघरू तयार तुटण्यासाठी.
आणि ही तमासगिरीनही तयार,
पुन्हा एकदा रक्तबंबाळ होण्यासाठी....!
पुन्हा एकदा रक्तबंबाळ होण्यासाठी....!


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.9623714011
[27/6/2017, 11:43 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: ____तमासगिरीन___


एकदा नाचता नाचता,

तमासगिरनीच्या पायातून

एक घुंघरू तुटून खाली पडलं,

अन् खळखळ सगळी घुंघरं

अस्ताव्यस्त विखरली.

अन् तमासगिरणीचा तमाशा झाला.

सगळी लोकं हातात येईल ते

फेकून मारू लागली.

कुणी दगड उचलले,

कुणी अंड्डे टमाटे घेतले,

अन् चहुबाजूने मारा सुरू केला.

कुणीही ऐकत नव्हते,

तमाशा मालक हात जोडून,

विनवणी करीत होता.

पण ऐकतील ती माणसं कुठली.

हि तर वासनेच्या आहारी,

गेलेली लांडगी होती.

यांना हलणारी कंबर हवी होती.

तिच्या चेह-यावरची,

नखरेली अदा हवी होती.

पण हि पोटासाठी नाचायची.

खुप शिकून नौकरी करण्याची,

तिची तिच्या कुटूंबियांची औकात नव्हती.

म्हणुनच काय तिनं हा,

नाचण्याचा बाजार मांडला होता.

अन् आपली अदा,

आपलं मोहक रूप,

येत असलेला सुंदर नाच,

चेह-यावरचे हावभाव,

ती या बाजारात रोजच विकत होती.

आणि कुटुंब चालवून,

आपला उदरनिर्वाह करत होती.

पण खरे नाचत होते ते,

तेच पैसा देत होते

आणि आपला नाच विकत होते.

खरा तमाशा करत होते तर तेच.

अन् सांगू पाहत होते या समाजाला,

आम्हीच आहोत हिजड्या जातीचे.

शांत बसून आम्ही राहू शकत नाही.

आणि आमचा दबदबा,

आम्ही कमी होऊ देऊ शकत नाही.

तमासगिरीन तमाशा करायची,

आपल्या जीवाचा अन् सगळे बंध

झुगारून ती नाचायची,

यांच्या पैशाचं मोल फिटेपर्यंत.

पण हाच समाज तीला हिणवायचा.

दिवसा ढवळ्या या समाजात.

अन रात्री मात्र तीच्या तालावर नाचयचा,

हैवानाची जात ही मन भरेपर्यंत,

तीला लुटायची रात्रीच्या अंधारात.

एकदाच काय घुंघरू तुटलं तर....

यांनी या समाजकंटकानी तीला,

रक्तबंबाळ केलं.

पण ती हरली नाही डगमगली नाही.

पुन्हा उठून उभी राहिली.

या भामट्यासमोर नाचण्यासाठी.

पुन्हा एकदा घुंघरू तयार तुटण्यासाठी.

आणि ही तमासगिरीनही तयार,

पुन्हा एकदा रक्तबंबाळ होण्यासाठी....!

पुन्हा एकदा रक्तबंबाळ होण्यासाठी....!



गजेंद्र

ढवळापुरीकर

स्वराजनगर औरंगाबाद

मो.9623714011
[29/6/2017, 8:00 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: स्पर्धेसाठी

विषय:-शेतकरी

शेतामधली माती माझी
सोन्या चांदीला पिकवी
शेतकरी राबतो दिनरात
ओळख मेहनतीला हवी....!

गजेंद्र
ढस्वराजनगर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
[1/7/2017, 1:49 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: आपले आयुष्य मुला बाळांशिवाय अपुर्ण आहे...!
जर एखाद्याला मुलबाळ नाहीच आहे तर त्याच्या आयुष्याला काय किमंत आहे..!
तर काहीच नाही
माझ्या मुलांमुळे माझं जीवन सुखी झालं त्यास जगण्याची दिशा मिळाली...!
आणि या जीवनास अर्थ आला.
माझा एकुलता एक मुलगा दोन आठवड्यापासून आजारी  आहे. रात्री तो झोपलेला असताना त्याच्या चेह-यावर नजर पडली....!
हातामधे सलाईन चालू होती....एकटक पाहता पाहता ओठांतून काही ओळी पूटपूटल्या...

आणि गीत बनून समोर आल्या.....

बावीस चरण असलेली ही दिर्घ कविता आपल्या सर्वांसाठी.....

💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

____बाळा तुझ्या जन्मामुळे____

बाळा तुझ्या जन्मामुळे
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले
कुस्करलेल्या फुलाप्रमाणे
आयुष्य होते माझे गळाले
बाळा तुझ्या जन्मामुळे....//धृ//

चाहूल तुझ्या येण्याची कळाली जेव्हा
मनात खोलवर आशा रूजली तेव्हा
मन आनंदाने फुलले, फुलले हिंदोळे
बाळा तुझ्या जन्मामुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//१//

स्वागताची तयारी तुझ्या केली रे मी
दुःखाची पोकळी बाळा भरली रे मी
तुझ्या येण्यानं दुःखाचे ही केले सोहळे
बाळा तुझ्या जन्मामुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//३//

चेहरा बघता तुझा मी दुःख विरायचे
नाजूक कोमल हातानी घाव भरायचे
सुख माझे तेव्हा ओसंडून ओघळे
बाळा तुझ्या जन्मामुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//५//

आयुष्याला किमंत नव्हती माझ्या नजरेत
जगणे होते मुश्किल माझे या दुनियेत
वाईट चिंतणा-यांचे ही तुटले सापळे
बाळा तुझ्या जन्मा मुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//४//

गरीबीच्या संसाराला ही लागायची नजर
माझ्यासाठी कुणालाही ना फुटला पाझर
एकच तुम्ही प्राण माझा हे हृदय हळले
बाळा तुझ्या जन्मा मुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//५//

रहाटगाडा संसाराचा एकट्याने ओढला
तुझ्यामुळेच दुःखाचा मज विसर पडला
चिमुकल्या हाताने जेव्हा तु अश्रू पुसले
बाळा तुझ्या जन्मा मुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//६//

यायचे मनात तेव्हा हे जग सोडून जाणे
आयुष्य फुलले माझे तुझ्या जन्माने
जाता जाता अडखळली माझी पाऊले
बाळा तुझ्या जन्मा मुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//७//

हसू तुझ्या ओठांवरचे फुलविते माझे मन
गोड पापा तुझ्या ओठांचा अन् चिंब होते तन
थेंब तुझ्या प्रेमाचे बाळा नयनातून ओघळले
बाळा तुझ्या जन्मा मुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//८//

पहिल्या बाळाचे दुःख होते हृदयी साठवून
वेदनांचे हृदयावर माझ्या पडले पांघरुण
त्याचेच रूप तुझ्या मी अंतरी पाहिले
बाळा तुझ्या जन्मा मुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//९//

वडिलांचे जाणे अकाली काळजावरती वार
बहिणीचा ही अंत वाईट वाढला दुःखाचा आकार
येऊन तु लडिवाळा माझे दुःखाचे घाव भरले
बाळा तुझ्या जन्मा मुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले.... //10//

पाऊला पाऊला वरती संकट होईल नीर्मिन
अश्रू अ


चठठ




गजेंद्र ढवळापुरीकर स्वराजनगर औरंगाबाद.....!

💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
[1/7/2017, 10:51 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

_____जिंदगी_____

एक दिन में अपनी ही
जिंदगी पे रो रहा था ।
चल रहा था अपनी धून में
दिल ठोकरो से भरा था।
              क्या था मकसद उनका
              जो हमसे प्यार करते थे।
              अपना कह कहकर हमें
              जिंदगी से हमें दुर करते थे।
हर वक्त दिल में एक ही
खयाल आया करते थे।
जिंदगी ठोकरो से भरी हैं
मुझसे आँसू दिखाया करता थे।
             सुकून नहीं था कही जीवन में
             दुख दर्द भरा हमपे ही हँसा करता।
             तकलीफ मिलती रही हर मोड़पर
             फिर भी मैं जिने के लिये आँहे भरता।
         

गजेंद्र
ढवलापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
[1/7/2017, 11:53 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*स्पर्धेसाठी कविता*
*विषय:- ओंजळ*

_____ओंजळ_____

ओंजळ पहिल्या कवितेची
कसे सांगू प्रिये तुला
भेटलेल्या पहिल्या भेटीची
*ओंजळ पहिल्या कवितेची....//धृ//*

भेट आपली पहिल्या नजरेतली
खाणा खुणा इशा-यांनी रंगून गेलेली
परसात वेलीवरच्या फुललेल्या फुलांची
कसे सांगू प्रिये तुला
भेटलेल्या पहिल्या भेटीची
*ओंजळ पहील्या कवितेची...//१//*

भेट आपली सखे पहिल्या प्रेमातली
तु अन् मी घेतलेल्या पहिल्या श्वासांतली
बेभान मज करणा-या स्वर्ग सुखाची
कसे सांगू प्रिये तुला
भेटलेल्या  पहिल्या भेटीची
*ओंजळ पहिल्या कवितेची....//३//*

भेट आपली गं पहिल्या मैत्रीतली
ए चलना अरे ऐकना या शब्दांतली
बहरावी सखे वेल ही सुगंध सुमनांची
कसे सांगू प्रिये तुला
भेटलेल्या पहिल्या भेटीची
*ओंजळ पहिल्या कवितेची....//५//*

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[1/7/2017, 11:56 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: स्पर्धेसाठी
*विषय- वृक्षारोपण*

वृक्षारोपणाची आहे संस्कृतीला जाण
करणे वृक्षारोपण आहे हा धर्म महान
नाशिवंत  शरीराला ही  श्वास मिळतो
थोडेसे  पुण्य  कराया जगतो हा प्राण

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
[2/7/2017, 10:49 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: स्पर्धेसाठी....


माणसा पाप पुण्य तुझ्यामधले तुच शोधुन बघ
माणुसकिच्या नात्यासाठी थोडं जगुण बघ...१

आईच्या उदरामधलं तिमीर शोधुन बघ
पोटात दिलेल्या श्वासांची फेड करून बघ....२

आधारवड असतो त्याचं स्वप्न शोधुन बघ
त्यानं केलेल्या कष्टाचं मोल करून बघ.... ३

बहीण बांधते राखी तिचा धागा होऊन बघ
काय असतो पाठीराखा तो अर्थ शोधून बघ....४

बंधुत्वाच्या नात्याला थोडं सुंदर करून बघ
बंधुभाव जपण्यासाठी बंधुत्व जागवून बघ....५

मित्र सखा दोस्त ही नाती समजून थोडी बघ
उरामधे जागणारे मित्रत्व उलगडून बघ....६

गुरूच्या शिकवणीला थोडा साज चढवून बघ
संस्कारांच्या गर्दिला हृदयात बसवून बघ....७

वाट चुकलेल्या वाटसरूला वाट दाखवून बघ
म्हातारपणाच्या लकव्यातून थोडं जाऊन बघ....८

मिळणा-या दुःखातून स्वतःला सावरून बघ
सुख मिळालं हृदयातून तर थोडं हसून बघ....९


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
[3/7/2017, 2:32 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: क्या छुपा है इस दिल में आओ तुम्हें दिखा दूँ।
नफरत करनेवालो तुम्हें मोहब्बत करना सिखा दूँ।   //धृ//
[4/7/2017, 11:07 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: साँस बहू में झगडे होते हैं किस कारण।
माँ का बेटा होना शायद यहीं हैं कारण।

आजतक खुदाने भी माँ को नहीं समजा।
इसिलीये अवतार लेते आरहे हैं भगवन।

माँ बाप बेटों के दुश्मन कभी नहीं होते।
[4/7/2017, 10:59 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *स्पर्धेसाठी*

विठू सावळा

विठ्ठला रे पांडुरंगा
सांग कुठे शोधु तुला।
दळण दळीतो
जनाईसंगे विठू सावळा।

तुझ्या पंढरपुरात देवा
संतांची मांदियाळी।
तुच सांग देवा आता
रुकमाई का सावळी।

आषाढी कार्तिकीला
जमतो भक्तांचा मेळा।
चंद्रभागेतीरी होतो
अद्वितीय सोहळा।

देवा लीन तुझ्या चरणी
झाला चोखामेळा।
संत कान्होपात्राने
तुझा रे धावा केला।

संत सखु संत जनाई
तुझेच अभंग ओव्या बोले।
तुझ्यासाठी पांडूरंगा
संत मीराचे हाल झाले।

सावळ्या विठ्ठला
ऐकिला तु संताचा धावा।
भक्तांसाठी विठूराया
युगे युगे विटेवरी उभा।


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
[6/7/2017, 9:25 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *स्पर्धेसाठी*
*विषय:- प्रोत्साहन*

प्रोत्साहन केल्यानेच माणुस
जिद्दीने संकटास सामोरा जातो,
आलेत जरी तुफान वादळ वारे
लढण्या संकटाशी झुंजार होतो...!


प्रोत्साहनाचे शब्द काळजाला
जेव्हा मनशांती देऊन जातात,
प्रत्येक इच्छा आकांक्षा मनाच्या
तेव्हा परीपुर्ण होऊन जातात....!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
[7/7/2017, 11:58 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *स्पर्धेसाठी*

------------सतर्क----------

चल इशारा आला सतर्कतेचा
ठाण मांडून बसू नकोस...
भेकडा सामोरा जा संकटाना
तुच तुझ्यावर हसू नकोस....//धृ//


दहशतवादी आतंकवादी
चालुन येत आहेत तुझ्यावर
मुर्खा सारखा पहारा तू
ठेऊन मग आहेस कूणावर....
फसवले रे दुश्मनांनी तुला
फसवेगीरीला अशा फसू नकोस
भेकडा सामोरा जा संकटाना
तुच तुझ्यावर हसू नकोस......//१//


भ्रष्टाचार चोरी व लुटमार
दबा धरून बसूनच आहे
लाचारी वाढली काय तुझी
म्हणून सुंभा तू खचूनच आहे
सतर्कतेचा इशारा देतो तुला
भुमीत संताच्या दिसू नकोस
भेकडा सामोरा जा संकटांना
तुच तुझ्यावर हसू नकोस......//२//


नियती नियत बदलार नाही
बदलायचे आता तुलाच आहे
भारतमातेच्या रक्षणासाठी
मार्ग स्वातंत्र्याचा खुलाच आहे
जगणे होईल सत्वर मानवा
लहान मोठा कुणा भासू नकोस
भेकडा सामोरा जा संकटांना
तुच तुझ्यावर हसू नकोस.......//३//


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
[6/8/2017, 9:47 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *शब्दविद्या समूह आयोजित*
*चित्रकाव्य स्पर्धेसाठी*


   *मुलगीच वंशाचा दिवा*


चाले  ठुमकत  कळशी  घेऊन
चिमुरडा  जीव  हा  आनंदानं..!
पायांमधे पैंजण  वाजे  छुनछुन
पाय  अनवाणी  चालले  जोमानं.....!!१

हिरवळ नाही जराही चहुकडे
निसर्ग हा रोजच कोपतो आहे..!
काटा  बघा  तिच्या  पायांमधे
दुष्काळाचा नित्य टोचतो आहे.....!!२

बदलता  काळ  बदलतं  मन
गरिबीत या  होरपळे जीवन..!
तरीही  दुःख  नाही  मनावर
उमटले चेह-यावर आनंदाचे क्षण....!!३

शिकावं थोडसं चिमुरडी कडून
काम  क्रोध सारे  टाकावे गाडून..!
मिळालेल्या सुखात आनंदी व्हावं
उज्वल भविष्य येणारंच घडून......!!४

पैसा अडका धनदौलत काही नको
जगण्यास  थोडासा आत्मरंग हवा..!
मुलगा मुलगी आता समान माना
तरच मुलगी बनू शकते वंशाचा दिवा...!!५


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.९६२३७१४०११
----------------------------------------------------
[9/8/2017, 5:22 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ☉🔷☉🔷☉🔷☉🔷☉🔷☉🔷
*............निर्भया...........*

निर्भया तु हे जग सोडून गेलीस
पण निर्दयता अजून तिथेच आहे
*बलात्कार तोच जीवघेणा आणि*
*लचके तोडणारे ही तसेच आहे.....१*

तू गेल्यावर अनेक निर्भया जन्मल्या
तुझ्या सारख्याच झुंज देऊन गेल्या
*काही समोर आल्या आणि काही*
*बदनामी पोटी मन शांत करून गेल्या...२*

एकाकी असते झुंज मुलगी म्हणून
रोजच होते छेडछाड अबला समजून
*आणि जन्म होतो पुन्हा निर्भयाचा*
*आरोपी मजेत जगतो करून सवरून...३*

निर्भया आता तू स्वप्नात येत चल
अबला स्त्रियांना कणखर करत चल
*लढण्यासाठी खंबीर करून त्यांना*
*जगण्यात त्यांच्या आता श्वास भरत चल...४*

प्रत्येक स्त्री आज निर्भयाच आहे
जन्मताच तीला स्त्री नावाचं लेबल लागतं
*कुणासाठी बहीण असते कुणासाठी मुलगी*
*कुणासाठी तर उपभोगाचं खेळणं असतं...५*

कुणी भुरळ घालतो मैत्रीचे जाळे पसरून
कुणी शोधत फिरतो सावज रस्त्यावरून
*एकटी दुकटी पाहताच लचके तोडतात*
*नंतर तेच नराधम घेतात श्वास हिसकावून...६*

कोवळ्या कळ्यांना ही सोडेना कुणी
कुस्करलेल्या कळ्या जातात होरपळून
*म्हणून एकच सांगणे आहे सर्व निर्भयांना*
*चलताना हिमतीने पाऊल टाका जपून*
*चलताना हिमतीने पाऊल टाका जपून...७*


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
☉🔷☉🔷☉🔷☉🔷☉🔷☉🔷
[13/8/2017, 9:53 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: स्पर्धेसाठी


आई वरील कविता



आई....माझी
बालपणा पासून झिजते आहे
फक्त दुस-यासाठी
लहान असतानाच आई गेली
वडिलांची होती सावली
एक भाऊ एक बहीण होते थोरले
पण आयुष्यास आईच्या नाही पुरले
दोन होते धाकटे
त्यातला धाकटाच तिच्यासाठी सर्वकाही
कारण तोच माहेरपण
जगवू शकतो लग्नानंतर तीला होती ग्वाही
तीचं मन जिंकलं तेच घडलं
तिनं विश्वासानं होतं ठरवलेलं
आजही ती त्याला इसमत नाही की
तो तीला विसरत नाही
दोन दिवसांचे पाहुणपण थाटात करतो
नवी कोरी साठी नेसून सासरी पाठवतो
आज चाळीसपेक्षाही जास्त वर्ष होऊन गेली
पण आईच्या तोंडी त्याच्या विषयी
उणीदुणी बोलणी कधीच न आली
आजही आनंदाने जाते परत येते
धाकट्या भावाचे कौतुक चारचौघांत करते
अशी आई माझी आई वीना पोरकी
आम्हावर नजर मायेची ठेविली सारखी
पोरकेपणाची साक्षी होती स्वतः
म्हणून आम्हाला जपे
तळहातावरच्या फोडासारखी
[13/8/2017, 10:45 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*स्पर्धेसाठी*



*फेरी क्रमांक ३*
*आई वरील कविता*



........मातृत्वाला सलाम.......



आई तुझ्या कर्तृत्वाला सलाम
आई तुझ्या अस्तित्वाला सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम.....//धृ//


आई मी पाहिलंय तुझं राबणं
आई मी पाहिलंय तुझं झिजणं
फक्त संसार मजबूत करण्यासाठी
आई तुझं कष्टांमधे घाम गाळणं
आई तुझ्या कष्टांना सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम......//१//


आई तु रात्र पाहिली ना दिवस
दुःख आम्हा कधी होऊ न दिलंस
मायेच्या पंखाखाली घेऊन आम्हा
आई संस्कारांचं जगणं दिलंस
आई तुझ्या त्या संस्कारांना सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम.....//२//


आई या जगात मी आलोच नसतो तर
हे अनमोल आयुष्य मिळालं नसतं
तुझ्या उपकारांची फेड करण्यासाठी
खरंच हे जीवन मला मिळालं नसतं
आई तुझ्या अनंत उपकारांना सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम......//३//


आई तुझं माझ्यावर खुप प्रेम आहे गं
काही चुक झाली तर माफ करशील ना
कदाचित या जन्मात नाही झालं माझ्याकडून
तर सेवा करण्यासाठी पुढचा जन्म देशील ना
आई तुझ्या स्त्री जन्माला सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम......//४//


आई मी जवळून पाहिलंय तुझं
आम्हा भावंडांसाठी खस्ता काढणं
पोटाला पोटभर मिळावं आमच्या
म्हणून दुस-यापुढे पदर पसरवणं
आई तुझ्या त्या करांना सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम......//५//


आई तु आहेस त्यागाची परममुर्ती
आणि वात्सल्याची तु वचनपुर्ती
कल्पद्रुमा प्रमाणे भक्कम होऊन
देतेस सर्वांच्या जीवनास गती
आई तुझ्या या जीवनाला सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम......//६//


आई ममतेचा खळखळ उगम तु
प्रेम भावना आत्मियतेचा संगम तु
दुस-यांसाठी जगता जगता
स्वतःचं अस्तित्वं ही हरलीस तु
तुझ्या त्या अस्तित्वाला सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम......//७//


आई तुझ्या कर्तृत्वाला सलाम
आई तुझ्या अस्तित्वाला सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम
आई तुझ्या मातृत्वाला सलाम......




गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.9623714011
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[15/8/2017, 9:39 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
              स्पर्धेसाठी कविता
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

     💐माझ्या मायभूमीचा इतिहास..💐

माझ्या मायभूमीला आहे असंख्य वेदनांची साक्ष,
ब्रिटिशांनी  मागे  तिला  बनवले  होते त्यांचे भक्ष,
बनावयाचे तिला जगाची महासत्ता हे एकच लक्ष्,म्हणून माझ्या मायभूमीवर लावायचा एकात्मतेचा वृक्ष…!1

माझ्या मायभूमीला आहे इतिहास महान संताचा,
फिरंग्यांशी  झुंज  देणार्या  लाखो  शुरवीरांचा,
किती सोसलेला घाव अंतरात लाख वेदनांचा,
म्हणून माझ्या मायभूमीला सांगायचा संदेश बंधुत्वाचा….!2

माझ्या मायभूमीला आतंकवादाने छळले किती,
लढता लढता हुतात्मे अन् अजरामर झाल्या छाती,
आता वाटते आहे बळवणार्या दहशतवादाची भीती,
म्हणून माझ्या मायभूमीला जपायची अनेक नाती,…!3

माझ्या मायभूमीचे उपकार इथे जपतो शेतकरी,
मरमर कष्ट करुनही खातो प्रेमाने चटणी-भाकरी,
त्यांच्यासाठी जवान इमानाने करतो सरहदीवर नौकरी,
म्हणून माझ्या मायभूमीला झटण्याची ओढ माझ्या अंतरी….!4

माझ्या मायभूमीचं आहे मानवाला एकच सांगणं,
माझं अस्तित्वं जपण्यासाठी तुम्ही एकदिलाने राहणं,
आतंक दहशत अत्याचार भ्रष्टाचार लुटमार बंद करणं,
म्हणून काळ्या दगडावरची रेघ आहे,भारताचं महासत्ता होणं…!5

______________✏📚कवी:-गजेंद्र
___________________औरंगाबाद
---------------मो:-9623714011
[15/8/2017, 11:02 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

स्वातंत्र्य दिन महाकाव्य स्पर्धेसाठी
दिं:-१५/८२०१७

स्वातंत्र्य मिळाले भारता
स्वातंत्र्य ही एकात्मता
स्वातंत्र्य हे मिळण्यासाठी
लढवय्या झाली हि जनता
स्वातंत्र्य मिळाले भारता
स्वातंत्र्य मिळाले भारता....//१//

लढले शिवाजी राजे
पंचक्रोशीत डंका वाजे
रक्ताच्या शाईने लिहिले
स्वराज्य व्हावे माझे
लढले शिवाजी राजे
लढले शिवाजी राजे....//२//

शिवशंभू महाराजे झाले
मुघलांना हैराण केले
अशा या शुरविराचे
सळाईने काढले डोळे
शिवशंभू महाराजे झाले
शिवशंभू महाराजे झाले.....//३//

पेशव्यांनी केला रणसंग्राम
मराठ्यांचा वाढला अभिमान
स्वराज्य टिकविण्यासाठी
मिळाले त्यांना कंठस्नान
पेशव्यांनी केला रणसंग्राम
पेशव्यांनीकेला रणसंग्राम.....//४//

मनीकर्णिका जन्मास आली
झाशीची महाराणी झाली
इंग्रजांना शह देण्यासाठी
लढवय्या बुद्धी तीने वापरली
मनीकर्णिका जन्मास आली
मनीकर्णिका जन्मास आली....//५//

राजगुरू सुखदेव भगतसिंग
यांनी फुंकले स्वातंत्र्याचे रणसिंग
उडवून गोरा आधिकारी
फासावर चढले नायक तीन
राजगुरू सुखदेव भगतसिंग
राजगुरू सुखदेव भगतसिंग....//६//

गांधी सुभाषचंद्र सावरकर
नेहरू टिळक अन् आगरकर
लढले हजारो वीर सैनिक
इंग्रज झाले हैराण भारतभर
गांधी सुभाषचंद्र सावरकर
गांधी सुभाषचंद्र सावरकर....//७//

स्वातंत्र्याने फुलली वसुंधरा
आनंदाने उधाण आले सागरा
बलिदान वीरांचे सफल झाल्याने
सुखसमृध्द झाली हि धरा
स्वातंत्र्याने फुलली वसुंधरा
स्वातंत्र्याने फुलली वसुंधरा.....//८//

स्वातंत्र्य मिळाले भारता
वीरांनी प्राणाचे त्याग करता
आज आनंद ओसंडे मुखावर
लोकशाहीचा श्वास भरता
स्वातंत्र्य मिळाले भारता
स्वातंत्र्य मिळाले भारता.....//९//


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.९६२३७१४०११
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
[18/8/2017, 2:26 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: लेखणीला  केली मी धार बहाल...!
नका सोडून जाऊ काव्य महाल...!😢

किती स्फुर्तीनं लिहिलं बाई...
काव्य आईच्या नात्यावरलं
परीक्षणातून बाद  ते झालं
वेडं पिसाट  मन  गहिवरलं
बाई उरले फक्त शब्दांचे जहाल...
नका सोडून जाऊ काव्य महाल....!😢

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.9623714011
[20/8/2017, 7:13 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡

*शब्द विद्या समूह आयोजित*

*स्पर्धेसाठी*

*फेरी क्र.४*

*विषय:-विरहा वरील कविता*



---------अरे विरह विरह---------
         (अष्टाक्षरी रचना)



अरे विरह विरह
    छळतो दुःखाचा दाह
         एकटेच जगताना
                वाहे अश्रूंचा प्रवाह.....//१

अरे विरह विरह
     दोन मनांचा वियोग
          प्रेमातली व्याकुळता
               आहे जहाल प्रयोग.....//२

अरे विरह विरह
    दोन जीवांना फटके
         दुर दुर राहण्याचे
              बसे आयुष्या चटके.....//३

अरे विरह विरह
     होई दुःखाचा उगम
          दोन प्रेमीयुगुलाचा
                आहे अधुरा संगम.....//४

अरे विरह विरह
    काढे दुरावा खंजर
         कमी नसते वेदना
              वाढे दुःखाचा डोंगर.....//५

अरे विरह विरह
    जीवा बसतो आघात
         लई हरामी दुनिया
             करी अबोला दोघांत.....//६
 
अरे विरह विरह
    आहे जशा पायवाटा
          जरा सांभाळूनी चला
               उडे प्रेमात फुफाटा.....//७

अरे विरह विरह
     दोन आयुष्य संपते
          प्रेमीयुगाचा संसार
               घेऊन नौका डुंबते.....//८

अरे विरह विरह
    नसतो प्रेमाला अंत
        फक्त दोघांच्या मनाला
              राहे कायमची खंत.....//९

अरे विरह विरह
    होते मन हे व्याकुळं
        रातंदिसं जागताना
             मन उदास बकुळं.......//१०

अरे विरह विरह
    हृदयी टोचतो काटा
         कसे शोधावे साजणी
             मिळे विरहाच्या वाटा......//११

अरे विरह विरह
    होते जीवा फरफट
         किती छळते यातना
               होते मनी घुसमट......//१२

अरे विरह विरह
   आहे अधुरं जगणं
        दोन पवित्र मनाचे
            होई मिलन कठीणं.......//१३



कोड क्र.150

♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡
[28/8/2017, 11:49 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: स्पर्धेसाठी वात्रटिका

पक्षांतर करतात माणसं
जेव्हा डाळ शिजत नाही
दुस-याचे ओले पाहून
रान यांचं भिजत नाही...!

घामाघुम होतात कार्यकर्ते
जेव्हा प्रचार चालू असतो
अंधारात मात्र फोडाफोडी
आणि पक्षांतर वळू पाहतो....!

गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.9623714011
[31/8/2017, 8:00 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: चांदणी चारोळी इ संग्रहासाठी

(प्रत्येक ओळीत बारा अक्षरे)
👇🏻👇🏻
चांदणे पसरले या नभामधी
रातराणी फुलली दरवळली
चहुकडे सुगंधी फुलामधुनी
निशा तारकांनी धुंद बहरली...!

(प्रत्येक ओळीत दहा अक्षरे)
👇🏻👇🏻
चांदण्यांनी अंबर सजले
सजल्या बघना दाही दिशा
अनवट वाटा सगळ्याच
दुर होऊन फुलेल आशा...!

(प्रत्येक ओळीत अकरा अक्षरे)
👇🏻👇🏻
होरपळून निघते दुनिया
चांदणे विद्रोहाचे पसरते
आकलन शक्ती संपते अन्
श्वास क्रोधाचे नभी तरंगते...!

(प्रत्येक ओळीत आठ अक्षरे)
👇🏻👇🏻
तारकांचे   तारांगण
नभातून    उजळले
तुझ्या नी माझ्या प्रेमाचे
ऋतूरंग    बहरले....!!


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.9623714011
[1/9/2017, 12:00 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: शब्दविद्या समूह आयोजित

स्पर्धेसाठी

फेरी क्रमांक पाच [५]

विषय:-बापा वरील कविता


~~~~*निर्दयी बाप माझा*~~~~



निर्दयी होता बाप माझा
सांगू कुणा कुणा
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//धृ//

बालपण माझं कोमेजून गेलं
बापाच्या धाकातं निसटून गेलं
बंधनात नियमांच्या कैद झालं
तरीही जीवन हे जगणं आलं
का दिल्या बापाने अघोरी
मला असह्यणा-या वेदना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//१//

बालपण आठवून आजही रडतो
झालेल्या चुकांना शोधत फिरतो
असा दिवस ना मला आठवतो
पाठीवरून बाप प्रेमाने हात फिरवतो
अजूनही नाही बुझलेल्या
त्यांनी मज मारलेल्या खुणा
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//२//

आठवतो आजही माझा तो बाप
पाठीवर पडता त्यांची एक थाप
ओली व्हायची चड्डी लागायची धाप
उडायचा भितीने अंगाचा थरकाप
राग वाढत जाई त्यांचा जशा
वाढत जाई माझ्या याचना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//३//

बालपण माझं होतं स्तब्ध
ओठही माझे राही निशब्द
कळले न मजला माझे प्रारब्ध
अश्रूत वाहिले झाले स्तब्ध
वाढणा-या वयाबरोबर
वाढत गेल्या मी भोगलेल्या यातना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//४//

एकटेपणा माझ्या जीवनी आला
विरहामधे मग जगू लागला
माझ्यातील कवीचा जन्म झाला
शब्दातून दुःख मांडू लागला
बापाने दिलेल्या आजही
मी विसरू शकलो ना वेदना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//५//

गुटखा खाण्याची होती सवय
विडी दारूची भयंकर सवय
दारुची नशा करायची दशा
यातंच बिघडले शरीराचे अवयव
आजारपणाने गेला बाप माझा
वाहे अश्रूत माझ्या भावना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....// ६//

जाण्याने त्यांच्या मी मुक्त झालो
आनंदाने मग हसू खेळू लागलो
इकडून तिकडे बागडलो विहरलो
सुखाचा उसासा मी भरू लागलो
तोवर आनंदाला माझ्या कुठलीच
उरली नव्हती मैत्रीला हाक ना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा.....//७//

बालपणास डसला बनून सापं
तरीही वाटते हवा होता बापं
पोरकेपणाचा नको होता शापं
का रे देवा हिरावून नेलास बापं
भुकेला मी त्यांच्या प्रेमाचा
भुकेला माझा हा प्राण ना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//८//

देवा बापास माझ्या का निष्ठूर केले
अंतिम क्षणाला सारे विपरीत घडले
मी का नव्हतो जवळ मज कुठे होते नेले
तोंडातून रक्त पडले जेव्हा प्राण गेले
आठवणीत त्यांच्या मन माझं
आजही करते आहे साधना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//९//




कोड क्रमांक 2050
[3/9/2017, 3:36 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *~~~~~~~~~~~~~~~*
*दुःख सारेच वेदनांचे*
*मी झेलतो अजूनही*
*सांगू कसे संखे तुला*
*जखम सलते अजूनही*
*~~~~~~~~~~~~~~~*

*गजेंद्र*
*ढवळापुरीकर*
*स्वराजनगर औरंगाबाद*
*मो:-9623714011*
[3/9/2017, 3:39 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *•~~~~~~~~~~~~~~~•*
*पाण्यात विणा धरती*
*करते लाही लाही*
*निसर्गाची दशा पाहून*
*सलते जखम अजूनही*
*•~~~~~~~~~~~~~~~•*

*गजेंद्र*
*ढवळापुरीकर*
*स्वराजनगर औरंगाबाद*
*मो:-9623714011*
[3/9/2017, 3:45 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *°~~~~~~~~~~~~~~~°
*सखये वाट पाहून तुझी*
*घायाळ हे मन आजही*
*दे पुरावा मज प्रेमाचा*
*सलते जखम अजूनही*
*°~~~~~~~~~~~~~~~~~*
*गजेंद्र*
*ढवळापुरीकर*
*स्वराजनगर औरंगाबाद*
*मो:-9623714011*
[3/9/2017, 11:45 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: स्पर्धेसाठी पाळणा


बाळा जो जो रे लडिवाळा
आज आनंदी आनंद झाला
खोहरांच्या घरी पाळणा हलला
बाळा जो जो रे लडिवाळा.......!1

चला वाटू साखर पान
नाव ठेवू नवेली छान
चिमुकल्या हाताचे गं
चिमुकले वरदान
पायांमधे वाजे गं घुंघरवाळा
बाळा जो जो रे लडिवाळा.......!2

शोभे चेतनराव पिता
बाळा उचलूनी घेता
शिन हलका होतो
नवेलीचे मुख पाहता
बाई रडून करी गं घर गोळा
बाळा जो जो रे लडिवाळा........!3

आईचे नाव समृद्धी
घरी नांदे रिद्धी सिद्धी
बाळाच्या जन्माने आली
अंगणी सुख समृद्धी
फुलला अंगणात गं फुलमळा
बाळा जो जो रे लडिवाळा........!4

आजी मिलनबाई खास
लेखणीचा मिळे सहवास
बाळा तुझ्यावरी ती
पाळणा लिहील झकास
होईल संस्कारांचा सुख सोहळा
बाळा जो जो रे लडिवाळा........!5

बाई आजोबा जगदिश
तुझे लाड गं करील
तुला कडेवरी उचलून
सारे गाव फिरवील
खुळखूळा वाजवून झुलवील झुला
बाळा जो जो रे लडिवाळा........!6


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:-9623714011
[4/9/2017, 12:38 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: हायकू.....

*विषय:-पाणी*


निसर्ग वाणी
समदे पाणी पाणी
चहुदिशांना..........!1

निसर्ग सारा
पाण्याने बहरतो
होऊन वारा.........!2

पाणी जीवन
करूया साठवण
समृद्धीसाठी........!3

पाणीच पाणी
गाऊ पाऊस गाणी
होऊ आनंदी........!4

पाण्यास जपा
होईल निसर्ग कृपा
जगण्यासाठी........!5

करा धरण
पाणी हेच जीवन
मानवतेचे............!6

सोपं जीवन
करा वृक्षारोपण
वाचेल पाणी........!7


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
[6/9/2017, 8:15 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: राडंच्या...
ही लालबुंद नजर
ठेव जरा खाली
समोर आयाबहीणी
तुझा सन्मान करत आहेत
तुझा चांगुलपणा पाहून
त्यांनी तुला निमंत्रित केलं होतं
पण सुकाळीच्या
तुझ्या वासणांध नजरेनं
बघ त्यांना कैद केलंय
तुझी तीच नजर
त्या फाडून काढतील......!
थांब तो दिवस दुर नाही.....!

तुझ्यातला राक्षस
जागा होण्या आधी
तुझ्यातली वासणा
भडकण्याआधी
त्या तुझा चेंदा करतील
तुझ्या प्रत्येक छिद्रात
लाल मिरचीची कुटलेली
पावडर भरतील
तुझी इजार पिवळी होईपर्यंत
साल्या हागेपर्यंत तुला मारतील....!
थांब तो दिवस दुर नाही......!

नंतर काय...
तुझं रक्ताळलेलं
अन् लाल झालेलं शरीर
त्याला काळं फासतील
गळ्यात चपलांचा हार
ढुंगणावर चाबकाचे
फटके मारतील
विवस्त्र करून तुझा
यथेच्छ सन्मान करतील
आणि गाढवावरून
तुझी धींड काढतील......!
थांब तो दिवस दुर नाही....!

एकटी दुकटी पाहून
तुझं अंग गरम होतंय
तिचे कणखर अंग नितंब
पाहून तुझं सळसळतंय
भडवीच्या तुझ्या घरात
बाई माणुस नाही का...?
तुझी मर्दांगी त्यांना दाखव
आणि घाल थैमान
रात्रीच्या अंधारात!
तुझं अर्धनग्न शरीर पडलेलं
असेल रस्त्याच्या कडेला....!
थांब तो दिवस दुर नाही........!

अत्याचार लुटमार
पांढराशुभ्र भ्रष्टाचार
अन् बलात्कार वाढलेत
यांनाही मोका पाहून
इंगा दाखवावा लागेल
इतकं बदडायचं की
बसायला ढुंगण ही
घाबरलं पाहिजे
कातडी निघेपर्यंत
रक्त सांडेपर्यंत
अंग यांचं कुरतडलं पाहिजे...!
थांब तो दिवस दुर नाही..........!
थांब तो दिवस दुर नाही..........!


कोड क्रमांक
[6/9/2017, 8:42 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: पुर्वीचे दिवस
जेव्हा पुन्हा आठवतात
चटका देतात
मनावर...!

हळूवार शांत
मन सलसलू लागतं
परेशान होतं
भेटायला...!

झाडाच्या सावलीत
बसायचो तासतांस दोघं
एकमेकांचा ओघं
हळवासा...!

फितूर नजरा
सखे टकमक बघायच्या
कधी हसायच्या
वेड्यापरी...!

धुंद बेधुंद
झालो आपण दोघेही
चोरून पाही
कुणीतरी...!

पुन्हा सखये
आपण करूया नवस
पुर्वीचे दिवस
भेटतील...!


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
[6/9/2017, 8:43 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: राडंच्या...
ही लालबुंद नजर
ठेव जरा खाली
समोर आयाबहीणी
तुझा सन्मान करत आहेत
तुझा चांगुलपणा पाहून
त्यांनी तुला निमंत्रित केलं होतं
पण सुकाळीच्या
तुझ्या वासणांध नजरेनं
बघ त्यांना कैद केलंय
तुझी तीच नजर
त्या फाडून काढतील......!
थांब तो दिवस दुर नाही.....!

तुझ्यातला राक्षस
जागा होण्या आधी
तुझ्यातली वासणा
भडकण्याआधी
त्या तुझा चेंदा करतील
तुझ्या प्रत्येक छिद्रात
लाल मिरचीची कुटलेली
पावडर भरतील
तुझी इजार पिवळी होईपर्यंत
साल्या हागेपर्यंत तुला मारतील....!
थांब तो दिवस दुर नाही......!

नंतर काय...
तुझं रक्ताळलेलं
अन् लाल झालेलं शरीर
त्याला काळं फासतील
गळ्यात चपलांचा हार
ढुंगणावर चाबकाचे
फटके मारतील
विवस्त्र करून तुझा
यथेच्छ सन्मान करतील
आणि गाढवावरून
तुझी धींड काढतील......!
थांब तो दिवस दुर नाही....!

एकटी दुकटी पाहून
तुझं अंग गरम होतंय
तिचे कणखर अंग नितंब
पाहून तुझं सळसळतंय
भडवीच्या तुझ्या घरात
बाई माणुस नाही का...?
तुझी मर्दांगी त्यांना दाखव
आणि घाल थैमान
रात्रीच्या अंधारात!
तुझं अर्धनग्न शरीर पडलेलं
असेल रस्त्याच्या कडेला....!
थांब तो दिवस दुर नाही........!

अत्याचार लुटमार
पांढराशुभ्र भ्रष्टाचार
अन् बलात्कार वाढलेत
यांनाही मोका पाहून
इंगा दाखवावा लागेल
इतकं बदडायचं की
बसायला ढुंगण ही
घाबरलं पाहिजे
कातडी निघेपर्यंत
रक्त सांडेपर्यंत
अंग यांचं कुरतडलं पाहिजे...!
थांब तो दिवस दुर नाही..........!
थांब तो दिवस दुर नाही..........!


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
[6/9/2017, 9:08 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: सकाळ व्हायची
तांबडे फुटायचे प्रकाशात
चहा हातात
मिळायची...!

आई उरकायची
घरातलं पारसं काम
जीवाचं रान
करायची...!

पुर्वीच्या दिवसात
[7/9/2017, 9:44 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *पुर्वीचे दिवस*


पुर्वीचे दिवस
हुंदडायचे बागडायचे खेळायचे
मनसोक्त लोळायचे
मातीमधे...!

पुर्वीचे दिवस
नदी किनारी लाटांवरती
नागमोडी घाटावरती
हुंदडणारे...!

पुर्वीचे दिवस
घुसमटायचा जेव्हा श्वास
व्हायचा आभास
प्रेमाचा....!

पुर्वीचे दिवस
अवखळ वा-यावरी झुलणारा
मनोमनी फुलणारा
गंधकेवडा...!

पुर्वीचे दिवस
आठवणीतला गोड फणस
आठवतो दिवसेंदिवस
प्रेमवेडा...!

पुर्वीचे दिवस
रातराणी फुलते गंधाळलेली
रात्र मंतरलेली
आठवते....!

पुर्वीचे दिवस
घात  प्रतिघात आघात
भुलवणारी रात
असायची....!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
[8/9/2017, 9:56 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *विद्रोही विचारांचा खुन*


कुविचारांना ठेचाययचे
मातीमधे गाडायचे...!
विद्रोही लेखणीने आता
मनामनातील मत्सर मिटवायचे...!
गधड्या लोकांच्या
दुष्ट प्रवृत्तीला
मुळापासून उपटायचे
विद्रोही लेखणीने
सगळे रान पेटवायचे...!
पुन्हा कुण्या लेखणीचा
जाऊ नये बळी
म्हणून हत्यार लेखणीचे
धारदार करायचे....!
मुसक्या आवळून
नीच विकृतीच्या
उखळात बांधून ठेचायचे...!
पानसरे,
कुलबुर्गी,
दाभोळकर,
गौरी लंकेश यांच्यावर
गोळीबार करणा-या
नराधमांना
रक्ताळेपर्यंत कुटायचे...!
आणि
या विकृत चामडीला
कुत्र्यास खावया टाकायचे...!
रोज निघतात मोर्चे
दहशतीस मिटवाया
पण याच मोर्चांना
आता बळकट करायचे...!
विद्रोही लेखणीतून
भेद भाव दोष मत्सर ठेचायचे
विद्रोही लेखणीचा
खुन करू पाहणा-या
समाजकंटकाना
खड्डयात बांधून गाडायचे
आणि पुरोगामी विचारांचे
ठसेच ठसे
चहुकडे उमटवायचे...!
ठसेच ठसे
चहुकडे उमटवायचे...!


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
[9/9/2017, 12:44 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: लेखणी माझी देखणी
समूह आयोजित स्पर्धेसाठी


विषय:कोण होतास तू/कोण होतीस तू


सांग साजणी अशी कोण होतीस तू
हृदया घेऊन सखे निघून गेलीस तू
सांग साजणी अशी कोण होतीस तू..//धृ//

आणाभाका प्रेमाच्या देऊन प्रिये
तहान भूक हिरावून तु गेलीस सये
वैरीनी असा जहरी प्रहार केलास तू
सांग साजणी अशी कोण होतीस तू..//१//

वांझोट्या प्रेमाला मी का पडलो फसी
विद्रोही बनवून सखे तुला झाली खुशी
विरहिणी माझा का बळी घेतलास तू
सांग साजणी अशी कोण होतीस तू..//२//
[10/9/2017, 11:24 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: लेखणी माझी देखणी
समूह आयोजित स्पर्धेसाठी


विषय:कोण होतास तू/कोण होतीस तू


सांग साजणी अशी कोण होतीस तू
हृदया घेऊन सखे निघून गेलीस तू
सांग साजणी अशी कोण होतीस तू..//धृ//

आणाभाका प्रेमाच्या देऊन प्रिये
तहान भूक हिरावून तु गेलीस सये
वैरीनी असा जहरी प्रहार केलास तू
सांग साजणी अशी कोण होतीस तू..//१//

वांझोट्या प्रेमाला मी का पडलो फसी
विद्रोही बनवून सखे तुला झाली खुशी
विरहिणी माझा का बळी घेतलास तू
सांग साजणी अशी कोण होतीस तू..//२//

सांग साजणी अशी कोण होतीस तू
हृदया घेऊन सखे निघून गेलीस तू
सांग साजणी अशी कोण होतीस तू...


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
[11/9/2017, 1:20 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: चल नाभिका चल नाभिका
अहमदनगरला चल नाभिका...
भगिनीस तुझ्या न्याय देण्या
अहमदनगरला चल नाभिका...//धृ//

नाजूक पोरं तुझ्या समाजाची
पडली रं बळी बघ वासनेची
पिडीत भगिनीस न्याय देण्या
अहमदनगरला चल नाभिका....//१//

समाजात बदल आता तू कर
परीवर्तनाची मशाल हाती धर
एकजूटने बंधूत्वाचा लढा देण्या
अहमदनगरला चल नाभिका....//२//

मागास असण्याचा सोडं समज
दाखव जगाला या तुझी रे धमक
गुलामगिरीचा विळखा तोडण्या
अहमदनगरला चल नाभिका....//३//

चल नाभिका चल नाभिका
अहमदनगरला चल नाभिका
भगिनीस तुझ्या न्याय देण्या
अहमदनगरला चल नाभिका...


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
[11/9/2017, 5:10 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: शब्द विद्या
समूह आयोजित


स्पर्धेसाठी
काव्यफेरी क्रमांक ६
विषय:विद्रोही कविता


*थांब तो दिवस दुर नाही..!*


राडंच्या...
ही लालबुंद नजर
ठेव जरा खाली
समोर आयाबहीणी
तुझा सन्मान करत आहेत
तुझा चांगुलपणा पाहून
त्यांनी तुला निमंत्रित केलं होतं
पण सुकाळीच्या
तुझ्या वासणांध नजरेनं
बघ त्यांना कैद केलंय
तुझी तीच नजर
त्या फाडून काढतील......!

*थांब तो दिवस दुर नाही.....!!*

तुझ्यातला राक्षस
जागा होण्या आधी
तुझ्यातली वासणा
भडकण्याआधी
त्या तुझा चेंदा करतील
तुझ्या प्रत्येक छिद्रात
लाल मिरचीची कुटलेली
पावडर भरतील
तुझी इजार पिवळी होईपर्यंत
साल्या हागेपर्यंत तुला मारतील....!

*थांब तो दिवस दुर नाही......!!*

नंतर काय...
तुझं रक्ताळलेलं
अन् लाल झालेलं शरीर
त्याला काळं फासतील
गळ्यात चपलांचा हार
ढुंगणावर चाबकाचे
फटके मारतील
विवस्त्र करून तुझा
यथेच्छ सन्मान करतील
आणि गाढवावरून
तुझी धींड काढतील......!

*थांब तो दिवस दुर नाही....!!*

एकटी दुकटी पाहून
तुझं अंग गरम होतंय
तिचे कणखर अंग नितंब
पाहून तुझं सळसळतंय
भडवीच्या तुझ्या घरात
बाई माणुस नाही का...?
तुझी मर्दांगी त्यांना दाखव
आणि घाल थैमान
रात्रीच्या अंधारात!
तुझं अर्धनग्न शरीर पडलेलं
असेल रस्त्याच्या कडेला....!

*थांब तो दिवस दुर नाही........!!*

अत्याचार लुटमार
पांढराशुभ्र भ्रष्टाचार
अन् बलात्कार वाढलेत
यांनाही मोका पाहून
इंगा दाखवावा लागेल
इतकं बदडायचं की
बसायला ढुंगण ही
घाबरलं पाहिजे
कातडी निघेपर्यंत
रक्त सांडेपर्यंत
अंग यांचं कुरतडलं पाहिजे...!

*थांब तो दिवस दुर नाही..........!!*

अंधश्रद्धेला देऊन जागा
मनात कुविचारांचा त्रागा
अंधश्रद्धा फेटाळून लावणा-या
सुविचारांचे गळे कापा
बस हेच जमलं तुला नास्तिका
पण...कर तुझं कर्तव्य
आम्ही ही राहू तयार
लेखणीला धार देऊन
तुझं पितळ उघडं पाडायला
पुरतं जमिनीत गाडायला
चारचौघांच्या गर्दीमधे
शरीर तुझं नागडं करायला....!

*थांब तो दिवस दुर नाही.........!!*

एक दिवस पुरोगामी विचार
नसानसात भिनलेले दिसतील
जिकडे पहावे तिकडे
विद्रोही लेखणीचे आवाज उठतील
तेव्हा पळता भुई थोडी होईल
तुझ्या सगळ्याच भेगातून
घाणेरडे नासके पाणी येईल
तुझा इंगा थंड करायला
लेखणी आमची सज्ज होईल
आज लेखणीचा आवाज
बंद करतोस तू
उद्या तुझेच तुला मंद करतील
तुझ्या षंडपणाचे तेव्हा
चहूकडे ठसे उमटतील....!

*थांब तो दिवस दुर नाही......!!*
*थांब तो दिवस दुर नाही......!!*


कोड क्रमांक....2050
[11/9/2017, 5:15 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: गुरे वासरे
रानात जाती चराया
पोट भराया
डोंगरी...!

रान सारे
हिरवे गार लहरे
तन बहरे
डोंगरी...!
[11/9/2017, 10:02 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ■■■■■■■■■■■■■■

*~~~भुली हुई यादें~~~*

याद हैं ओ लम्हें
जो साथ बिताये थे।
ओ दिन भी क्या थे
जो साथ गुजारे थे।
*~~~~याद हैं ओ लम्हें~~~~*

आज भुल गई यादें
और टूट गये वादें।
अगर पता होते मुझे
ओ सारे तेरे इरादें।
*~~~~याद हैं ओ लम्हें~~~~*

दिल में बसाया प्यार तेरा
आँखो में सजाया बसेरा
ओ भुली हुई यादें तुम्हारी
दिल तोड़ रही हैं हमारा।
*~~~~याद हैं ओ लम्हें~~~~*

काट रही जुदाई हमें
चुभन सी हो रहीं दिल में।
अरमान सारे धुआं बनकर
उड रहें हैं साहिल में।
*~~~~याद हैं ओ लम्हें~~~~*

गजेंद्र
स्वराजनगर
औरंगाबाद
मो:९६२३७१४०११

■■■■■■■■■■■■■■