Tuesday, 28 March 2017

🎁🎁मी तर वेडा कवितेचा🎁🎁

🎁🎁मी तर वेडा कवितेचा🎁🎁

कोणी माना अथवा न माना
मी तर वेडा आहे कवितेचा
श्वास ही माझा हळहळणारा
प्रवाह खळाळणार्या सरीतेचा...!1

झुंजूमुंजू होते नी मला कळते
चल सुरांशी माझे नाते जुळते
शब्द शब्द जोडूनी मी थोडेशे
कविता नव्याने माझी जन्मते...!3

ताला सुरांनी सजवून थोडी
बहरून गेली ही कविता वेडी
सप्तरंगी तालासुरांची तीला
नकळत लागून जाते गोडी....!5

शब्दच हळवे उदयास येता
विरहातून येई जन्मास कविता
गोंजारीले मी शब्दास माझ्या
भावनेतुनी ही तरळते कविता....!7

...✍गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.9623714011

श्वास

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

*कवी कट्टा वरील प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी*

*🌷🌷श्वास 🌷🌷*


परत एकदा मनाने श्वास भरला
तुझ्यासाठी हृदयाने कात टाकला
*विसरलो होतो हे जीवन जगायला*
*तुझ्यामुळे जगण्याचा ध्यास घेतला..//धृ//*


चहूबाजूंनी संकटाचे वेढे किती
म्हणून मला जगण्याची वाटे भीती
*तुझ्या मिठी मधला आभास वाटला*
*तुझ्या मुळे जगण्याचा ध्यास घेतला..//१//*


संपलेले जीवन जगावे वाटले
हृदयावर प्रेमाचे धुके दाटले
*मन फुलवणारा सहवास वाटला*
*तुझ्यामळे जगण्याचा ध्यास घेतला..//२//*


जगत होतो कसाही मी वेड्यापरी
तुझ्यामुळे सुख उजळले अंतरी
*हृदयाने तुझ्यावरी विश्वास टाकला*
*तुझ्यामुळे जगण्याचा ध्यास घेतला..//३//*


सावरले तुझ्या मुळे माझे हे जीवन
अंतरी फुलले गं आशेचे किरण
*भाव चेह-यावर तुझा निरागस वाटला*
*तुझ्यामुळे जगण्याचा ध्यास घेतला..//४//*


जगेन आनंदाने मी हर एक दिवस
बहरेल तुझे माझे प्रेम दिवसेंदिवस
*प्रेम तुझ्यावर करण्याचा नाज वाटला*
*तुझ्यामुळे जगण्याचा ध्यास घेतला..//५//*



..✍
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

श्वास

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

*कवी कट्टा वरील प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी*

*🌷🌷श्वास 🌷🌷*


परत एकदा मनाने श्वास भरला
तुझ्यासाठी हृदयाने कात टाकला
*विसरलो होतो हे जीवन जगायला*
*तुझ्यामुळे जगण्याचा ध्यास घेतला..//धृ//*


चहूबाजूंनी संकटाचे वेढे किती
म्हणून मला जगण्याची वाटे भीती
*तुझ्या मिठी मधला आभास वाटला*
*तुझ्या मुळे जगण्याचा ध्यास घेतला..//१//*


संपलेले जीवन जगावे वाटले
हृदयावर प्रेमाचे धुके दाटले
*मन फुलवणारा सहवास वाटला*
*तुझ्यामळे जगण्याचा ध्यास घेतला..//२//*


जगत होतो कसाही मी वेड्यापरी
तुझ्यामुळे सुख उजळले अंतरी
*हृदयाने तुझ्यावरी विश्वास टाकला*
*तुझ्यामुळे जगण्याचा ध्यास घेतला..//३//*


सावरले तुझ्या मुळे माझे हे जीवन
अंतरी फुलले गं आशेचे किरण
*भाव चेह-यावर तुझा निरागस वाटला*
*तुझ्यामुळे जगण्याचा ध्यास घेतला..//४//*


जगेन आनंदाने मी हर एक दिवस
बहरेल तुझे माझे प्रेम दिवसेंदिवस
*प्रेम तुझ्यावर करण्याचा नाज वाटला*
*तुझ्यामुळे जगण्याचा ध्यास घेतला..//५//*



..✍
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

🌼अरे जगणं जगणं 🌼

🌼अरे जगणं जगणं 🌼


अरे जगणं जगणं
आहे जिवंत मरणं
जातो दिसामागं दिसं
मी रचितो सरणं
               अरे जगणं जगणं
               आहे जिवंत मरणं...।।धृ।।

कसा टोला दारिद्र्याचा
कुणी मारला नशीबाला
घाव एका मागं एक दिले
दुःख झाले या ह्रदयाला
                रोज कुढंत जगणं
                कसं येईना मरणं
जातो दिसामागं दिस
मी रचितो सरणं
               अरे जगणं जगणं
               आहे जिवंत मरणं...।।1।।

घडा पाप आणि पुण्याचा
कुणी भरलेला पाहिला
पाप पुण्य किती करावे
दिसले असते ना माणसाला
                पाप पुण्याला शरणं
                जाते मानवाचे मनं
जातो दिसामागं दिसं
मी रचितो सरणं
                अरे जगणं जगणं
                आहे जिवंत मरणं...।।2।।

किती झगडावे गरिबीशी
घास येईना रे तोंडाशी
काम करुन दिवस रातं
झोपे हा उपाशी पोटाशी
                देवा सुखाची भरुणं
                एक घासाची दे वैरणं
जातो दिसामागं दिसं
मी रचितो सरणं
                अरे जगणं जगणं
                आहे जिवंत मरणं...।।3।।

नाही उधाण आनंदला
प्राण मुठीत मी पाळला
रोज जगावे मरून तरी
नाही स्पर्श सुखाचा जीवनाला
                 अरे जिवनाचं लोढणं
                 कसं ठेवावं बाधुणं
जातो दिसामागं दिसं
मी रचितो सरणं
                अरे जगणं जगणं
                आहे जिवंत मरणं...।।4।।

लई आबाळ जिवनाची
झाली आयुष्य जगताना
किती आठवु आठवणी
अश्रु डोळ्यांचे पुसताना
               झालं जगणं कठिनं
               आत्मा रडतो पाहूनं
जातो दिसामागं दिसं
मी रचितो सरणं
                अरे जगणं जगणं
                आहे जिवंत मरणं...।।5।।

झरा नियतीचा का आटला
प्राण हा ह्रदयात फाटला
देवा उघड तिसरे नयन
श्वास माझा  कंठी साठला
                   घे रे हळुच काढूनं
                   आत्मा या देहातुनं
जातो दिसामागं दिसं
मी रचितो सरणं
                 अरे जगणं जगणं
                 आहे जिवंत मरणं...।।6।।

रंग विखुरले जीवनाचे
कोणी तुडवले पायदळी
कंप कंप सुटे देहाला
मागते मरण प्रितभोळी
                 त्याग जीवनाचा करुनं
                 श्वास ठेविन रोखुणं
जातो दिसामागं दिसं
मी रचितो सरणं
                अरे जगणं जगणं
                आहे जिवंत मरणं...।।7।।


कवि:- गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो :-9623714011

https://m.facebook.com/story.php?story_fbid=285239861896988&id=142474532840189

गगन भरारी

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

*स्पर्धेसाठी*
*विषय:-गगन भरारी*

दुरदृष्टीची घे गगन भरारी
आंधळा विश्वास नको कुणावरी
*हे जग लई बेक्कार आहे*
*इथं निर्णय असावा सुविचारी....!१*

आपले विचार मांडताना
नसावे दडपण या मनावरी
*खुलेआम बोलावे वागावे*
*स्वच्छ असावा भाव अंतरी......!२*

गगनभेदी असावी हि नजर
घेण्या उड्डाण उंच शिखरावरी
*संकटे पेलत जाताना व्हावा*
*भास अंतरातल्या मृदू गाभारी....!३*

जन्म सार्थ व्हावा इथे जन्मल्यावर
वाजावी शौर्याची आर्ततुतारी
*चल उचल पाऊल आता*
*घेणे आहे तुज उंच गगन भरारी.....!४*

जाळायची आहे वृत्ती तुला
राग द्वेष मद मत्सर अंहकारी
*चल मानवा चल गड्या*
*घेऊया सगळे मिळून उंच भरारी....!५*

...✍
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

*🦋तुलाच सर्वस्व मानिले🦋*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*🦋तुलाच सर्वस्व मानिले🦋*



तुजसाठी जगणे सखया
या हृदयाने जाणिले,
*झाले मनावर आघात जरी*
*तुलाच सर्वस्व मानिले......//धृ//*


स्पंदने या हृदयाची
वाढली रे तुझ्यामुळे,
श्वास माझे तुजसाठी
का फुलती मज ना कळे
*तुझे न भेटने एकच खंत*
*श्वास माझे हे त्रासले.....//१//*


सखया मन हे बावरे होई
तुजविण आता खरे नाही
जगायचे का एकटे होऊनी
सजणा छळणे बरे नाही
*घेतले मी दुःख मनाशी*
*वेदनांना त्यात मी ओतिले...//२//*


काळोख झाला प्रेमामधे
राहिला ना त्यात उबारा
शोधू कसे मी प्रिया तुजला
विरह छळतो बनुन निखारा
*प्रकाशवेड्या माझ्या प्रेमाला*
*तुझ्या प्रेमाने का अंधारीले....//३//*


होऊनी यात्री तु प्रेमाचा
येशिल कारे जीवनी माझ्या
उदासीन या आयुष्याला
जाशील कारे रंगवूनी राज्या
*सुगंध भरूनी जावे सखया*
*एवढेच स्वप्न मी पाहिले.....//४//*


..✍
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://m.facebook.com/story.php?story_fbid=286080428479598&id=142474532840189

उज्वल भविष्य

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

*विषय :- उज्वल भविष्य {अभंग}*

उज्वल भविष्य | आपल्याच हाती ||
उजळावी ज्योती | आयुष्याची ||

करावे चिंतन | नमन भगवंता ||
तुच रे अनंता | सर्व ठायी ||

ज्योत आयुष्याची | तेवत ठेवावी ||
आसनस्त व्हावी | काळजात ||

भाग्याची दोरखंड | बांधावी मनात ||
मन चिरशांत | ठेवूनिया ||

उजळावे भाग्य | सदैव संकटी ||
कर जसे कटी | विठ्ठलाचे ||

संकटाना देवा | मिळो नित्य माती ||
व्हावी दृढ नाती | मानवाची ||

करावे जे भोग | याच जीवनात ||
फेड करी हात | जीव मात्र ||

करू एक प्रण | संदेह नको मनी
मधाळ ठेवू वाणी | मुखामधे ||

रात्री संकटाची | जाईल निघून |
पतित पावन | व्हावे मन ||

उज्वल भविष्य | एकच मनी ध्यास ||
यावा क्षण खास | आयुष्यात ||


..✍
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

https://m.facebook.com/story.php?story_fbid=288191538268487&id=142474532840189

Wednesday, 22 March 2017

तुलाच सर्वस्व मानिले

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तुजसाठी जगणे सखया
या हृदयाने जाणिले,
*झाले मनावर आघात जरी*
*तुलाच सर्वस्व मानिले......//धृ//*

स्पंदने या हृदयाची
वाढली रे तुझ्यामुळे,
श्वास माझे तुजसाठी
का फुलती मज ना कळे
*तुझे न भेटने एकच खंत*
*श्वास माझे हे त्रासले.....//१//*

सखया मन हे बावरे होई
तुजविण आता खरे नाही
जगायचे का एकटे होऊनी
सजणा छळणे बरे नाही
*घेतले मी दुःख मनाशी*
*वेदनांना त्यात मी ओतिले...//२//*

काळोख झाला प्रेमामधे
राहिला ना त्यात उबारा
शोधू कसे मी प्रिया तुजला
विरह छळतो बनुन निखारा
*प्रकाशवेड्या माझ्या प्रेमाला*
*तुझ्या प्रेमाने का अंधारीले....//३//*

होऊनी यात्री तु प्रेमाचा
येशिल कारे जीवनी माझ्या
उदासीन या आयुष्याला
जाशील कारे रंगवूनी राज्या
*सुगंध भरूनी जावे सखया*
*एवढेच स्वप्न मी पाहिले.....//४//*

..✍
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Monday, 20 March 2017

झुरतो मी दिनरात

🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇

🎻🎻🎻झुरतो मी दिनरात🎻🎻🎻

झुरतो सखये मी दिनरात पाहु किती तुझी वाट
*या हृदयाचे बहरते गीत तुझ्या नी माझ्या अंतरात.//धृ//*

तु ज्योती हो दिप मी होईन
तु हो किनारा लाट मी होईन
*खळाळणा-या पाण्याचाही तरंग उठे तिमीरात.//1//*

तु हो नयन इशारा मी होईन
तु हो हृदय गाभारा मी होईन
*चंद्र आणि चांदण्या जश्या चमकती अंबरात.//3//*

झुरतो सखये मी दिनरात पाहू किती तुझी वाट
*या हृदयाचे बहरते गीत तुझ्या नी माझ्या अंतरात*

...✍
*गजेंद्र*
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद

🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇

मी चिमणी बोलतेय..!

🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊

*विषयावरून कविता*
*विषय:-चिमणी*

मी चिमणी बोलतेय...!
कुणी ऐकतंय का...?
*हाल आमचे कोण बघतंय...?*
*मी चिमणी बोलतेय.......!//धृ//*

सांगा ना ती हिरवळ कुठंय
चिवचिवतं आमचं जगणं कुठंय..!
माझे सवंगडी मित्र मैत्रिणी
आणि माझा परीवार हरवलाय...!
*पाउलखुणा त्यांच्या मी शोधतेय...!*
*मी चिमणी बोलतेय...!//१//*

चहुबाजूने सिमेंटचे जंगल झाले
आमचे आयुष्य अमंगल झाले..!
टपो-या कणसांवर बसणे ही
आणि फिरणे ही सिंगल झाले..!
*एकत्र उडणारे थवे शोधतेय..*
*मी चिमणी बोलतेय...!//२//*

कुठेही प्यायला पाणी असायचे
टिपुन घ्यायला दाने दिसायचे...!
जिकडे-तिकडे बसायला झाडावर
तेव्हा झाडेच झाडे असायचे...!
*थकले उडून विश्रांतीला गारवा शोधतेय..*
*मी चिमणी बोलतेय...//३//*

आज पाणी कुठेही लटकतंय
गच्ची माळ्यावर ठेवलेलं दिसतंय..!
पण भुकेने आत्मा तडफडतोय
रोज थोडं थोडं मन खचतंय...!
*खायला आता थोडंसं अन्न मागतेय..*
*मी चिमणी बोलतेय....!//४//*

एकच सांगते ऐकाल का माझं
झाडे लावा झाडे जगवा एवढंच सांगते
पाऊस पडेल हिरवळ उगवेल
जगणे सर्वांचे सुखी होईल मन सांगते
*ऐका मी जीव तोडून सांगतेय..*
*मी चिमणी बोलतेय.....!//५//*

पडलाच पाऊस तर आम्हांस
अन्न पाणी आणि चारा मिळेल...!
जगायला कारण आणि थोडासा
या सृष्टीचा सुंदर उबारा मिळेल...!
*चला घरट्यासाठी झाड शोधतेय..*
*मी चिमणी बोलतेय.....!//६//*

...✍
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद...

🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊

Friday, 17 March 2017

दादा वहिनी

🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖
*स्पर्धेसाठी*
*विषय:-दादा वहिनीची जोडी*

✍दादा वहिनी🖎

दादा  हाकतो हाकतो
उभ्या संसाराची गाडी
सा-या जगामधे भारी
दादा वहिनीची जोडी.....!1
             दोर प्रपंचाचा नवा
             चारी हाताने बांधवा
             दादा वहिनीच्या घरा
             हि-या मोत्याने सजवा.....!2
सुख नांदते अंगणी
बोले वहिनी वहिनी
दादा माझा तुम्हांवरी
भाळे आनंदी होऊनी.....!3
             नवी कोरी ही पैठणी
             घेई दादा मनातूनी
             त्याच्या घामाचा सदरा
             तुझ्या प्रेमाची मोहिनी.....!4
वेल सुखी संसाराची
वाढो आभाळ भरून
अश्रू ओल्या भावनांचे
राहो उरात दाटून.....!5
              दादा वहिनीचा वाडा
              जसा सोनियाचा भासे
              स्वप्न सुखी संसाराचे
              मनी चिरंतन दिसे.....!6
दादा प्रेमाचा सागर
माया उबारा वहिनी
दोन्ही घराची इज्जत
दादा तुझी अर्धांगिनी....!7
              वाटे सासरी माहेरी
              दादा वहिनी लाडकी
              नाळ संसारी जपते
              पोर लोकाची परकी.....!8
नांदो सुखाने दोघंही
येवो जीवनी बहारं
दादा वहिनीची जोडी
शिव पार्वती समोर.....!9

...✍
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖

Wednesday, 8 March 2017

स्त्री शक्तीचा जागर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙎🏻स्त्री शक्तीचा जागर🙎🏻*


जागरूक स्त्री शक्तीचा स्त्री एक अदभुत शक्ती
कधी झालीस चंडीका कधी महाकाली
*सपुंर्ण ब्रम्हांडात तिची अगणित रूपे*
*कधी सिता झालीस तर कधी आम्रपाली...1*


विनाश करण्या दुष्टदुर्जनांचा या लोकी
कधी दुर्गा झालीस कधी महाशक्ती
*देवांनाही विश्वरूप दाखविण्या तू माते*
*कधी झालीस सावित्री कधी महासती...2*


नारायणाची लक्ष्मी तू आहेस शंकराची पार्वती
पाच पांडवांची माता तू कौरवांची गांधारी
*करतो नमन स्त्री जन्मा तुला हात जोडूनी*
*कधी श्रीकृष्णाची भगिनी तू पांडवांची सैरंध्री..3*


नाही बाहुंत दम जरी या आज तू नसे अबला
भरभक्कम पणे मजबूत आज असे गं सबला
*कर दोन्ही महाकालीचे जसी झांसीची राणी*
*कधी झाली महायोध्दा कधी प्रेमळ वाणी..4*


लढलीस मर्द मराठा होऊन जन्मविला महायोध्दा
देऊन शिक्षण लढवय्याचे घडविला सदयोध्दा
*रणरागिनीची धमक तुझ्यात तू विरांची माता*
*कधी झाली गुरू तू कधी झाली विधाता..5*


उचल शस्र लढायला तुझी वेळ आली आहे
नसानसातुन तुझ्या विरांगणाचे रक्त वाहे
*शत्रू होताच बेसावध कर संयमाने वार तू*
*कधी दिनाची छाया तू निराधारांचा आधार तू..6*


परमेश्वराचा अंश तू सृष्टी अधूरी तुझ्या विणा
वंशाची वेल तूच गं आणि माणुसकीचा कणा
*भडके ज्वाला तुझ्यामुळे हो क्षमणारी आग तू*
*कर प्रयत्न शर्थीचे आणि हो जगण्याचा भाग तू..7*


..✍गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Monday, 6 March 2017

कामगार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*काव्यधारा समूह वरील स्पर्धेसाठी*

*विषय:-कामगार*


मी कामगार कामगारं
हाती दारिद्र्याचा दोरं
काम रात्रंदिन नशिबाला
सुखदुःखाला चढउतारं....
           *मी कामगार कामगारं*    
           *मी कामगार कामगारं.....//धृ//*


कधी बरासी खंदिल्या
कधी फोडिले दगडाला
दोन वेळेच्या भुकेसाठी
मी तारीले संसाराला.....!
          *होतो गरीबीचा उद्धारं....!*
          *मी कामगार कामगारं....//1//*

कधी तन शेतात काढतो
बारे   पिकात  मी  धरीतो
रान रहावे हिरवे गार तुमचे
म्हणून रोजंदारी करतो....!
         *दोन पैशाचा होतो आधारं*
         *मी कामगार कामगार.....//2//*


कधी तोडीला मी उस
कधी वेचीला कापुस
द्याया घराला घरपण
मी हो विकीला हापुस...!
         *नाही झालो कधी लाचारं*
         *मी कामगार कामगार.....//3//*


रोज मिळेल ते कामं करीन
कुटूंबाचे मी पोटं भरीन
होऊ नये त्यांचे हाल
म्हणून दिनरात मी कष्टं करीन..!
          *त्यांच्यासाठी मी जगणारं*
          *मी कामगार कामगारं....//4//*

देवा एकच मागणे तुला
राहु दे सुखात दीनाला
रोजंदारी का होईना
काम मिळू दे हाताला...!
          *हृदयी राहो तुझाच आदरं*
          *मी कामगार कामगारं.....//5//*


.....✍🏻
गजेंद्र ढ
वळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Wednesday, 1 March 2017

प्रित माझी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*वृत्त:- मनोरमा*

*लगावली:-गालगागा गालगागा*


प्रित माझी गात आहे
लांब कोणी जात आहे.....//धृ//

रात राणी गंध ओला
प्रेम या श्वासात आहे.....//11//

सांजवेळी वार झाला
घाव सारे कात आहे....//2//

प्रेम गाणी  शांत आता
मोल सारे त्यात आहे....//3//

साथ देण्या येत जावे
प्राण वेडी रात आहे......//4//

श्वास राजी प्रित होण्या
आज कारे शांत आहे...//5//

घेत असते माग सारे
तीच माझी भ्रांत आहे....//6//

....✍🏻
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖