Thursday, 29 December 2016

🌷हे जीवन सुंदर आहे 🌷

हे जीवन सुदंर आहे मानवा
हे जीवन सुदंर आहे,
दुःखाचा डोंगर आहे इथे
तर सुखाचा सागर आहे,
हे जीवन सुदंर आहे मानवा
हे जीवन सुदंर आहे......||धृ||

इथे जन्म मिळतो जगण्यासाठी,
अन् प्रेम होते मिळण्यासाठी ,
घे  मजा  तु आयुष्याची,
आनंद जीवनात भरण्यासाठी,
असंख्य मनांचा वावर इथे
अनेक मनांचा जागर आहे,
दुःखाचा डोंगर आहे इथे
तर सुखाचा सागर आहे,
हे जीवन सुदंर आहे मानवा
हे जीवन सुदंर आहे,....||१||

इथे मिञ बनतात मैञिसाठी,
अन् प्रेम बहरते प्रेमासाठी,
सुर गवसतो जगण्याला अन् ,
गीत बनतो जीवनासाठी,
दोन जीवांचा ससांर आहे
इथे प्रेमाला बहर आहे,
दुःखाचा डोंगर आहे इथे
तर सुखाचा सागर आहे,
हे जीवन सुदंर आहे मानव
हे जीवन सुदंर आहे,.....||२||

इथे मानव लढतो हक्कासाठी,
रोज झगडतो सन्मानासाठी,
कष्टांना वाव मिळतो इथे,
लढा सुरु होतो मानपानासाठी,
सुदंर ही धरती आहे,
सुदंर बघा हे अंबर आहे,
दुःखाचा डोंगर आहे इथे
तर सुखाचा सागर आहे,
हे जीवन सुदंर आहे मानवा
हे जीवन सुदंर आहे……||३||

                                 कवि
                           गजेंद्र काळे
                         9623714011

Wednesday, 28 December 2016

शेती आणि शेतकरी

व्यथा शेतक-यांच्या या
दावणीला बांधलेल्या,
कष्टांच्या या व्यथा बघा
वेशीवर टांगलेल्या........!..... (1)

अन्याय सरकारचा
होतो दिवसेंदिवस,
भाव मिळेना पिकांना
किती करावे नवस.......!...... (2)

झिजतो रोज मातीत
तरी पदरी निराशा,
यावे सुख दारी त्यांच्या
आहे मनी हिच आशा....!..... (3)

शेती करी दिन रात
वितभर पोटासाठी,
आशा करी वेडा जीव
भाव येण्या पिकासाठी....!.... (4)

धनधान्य कमावतो
वाहूनं घामाच्या धारा,
उभे पिक तो राखितो
सोसूनं पाऊस वारा.....!.....(5)

सा-या जगाचा आधार
हा पोशिंदा शेतकरी,
जेव्हा कसतो हा शेती
तेव्हा मिळते भाकरी......!.... (6)

अख्खे कुटुंब राबते
तन पिकात काढतो
शेती नांगरण्या सारी
बैलं औतास जुंपीतो....!...... (7)

कधी निसर्ग कोपतो
फळ कष्टाचे घेऊन,
पावसाच्या पुरामंदी
जातो वेदना देऊन.....!..... (8)

धरित्रीच्या कुशीमंदी
सारं जीवन अर्पितो
कोपलेल्या निसर्गाला
दान दैवाचे मागतो......!....(9)

हळहळ ह्रदयाला
वाहलेल्या पिकामुळं
किती सोसावा आघात
निसर्गाच्या घावामुळं.....!..... (10)

सुखी राहो बळीराजा
देवा एकच मागणं,
सुख येवो घरामंदी
सार्थ होऊ दे जगणं.....!..... (11)


-----------------गजेंद्र काळे
                 9623714011
                   (संभाजीनगर)






























मन

              *मन*

*मन ह्रदयाच्या खोल गाभा-यात*
*मन लुप्त होऊन राही अंतःकरनात*
*मन क्षणात इथुन तिथे सैरभैर*
*उडून जाते चौफेर दाही दिशांत*

*मन अथांग सागराच्या लाटा*
*मन अस्वस्थ करणा-या वाटा*
*मन अवखळ चंचल जरी हे*
*फुटतो त्यास दुःखाचा फाटा*

*मन श्वासांवरी उठलेला तरंग* 
*मन आयुष्यास मिळालेला रंग*
*मन भावनांचा अस्सल खेळ*
*जीवनास करतो सुखद मनरंग*

*मन नवचैतन्याचा साठा जिवंत*
*मनाच्या अस्तित्वास कुठेच नाही अंत*
*मन आहे खरे पण दिसत नाही* 
*सर्वांना आहे हि मोठीच खंत*

*मन स्वच्छ सुंदर निर्मळ स्वरूप*
*मन कधी वादळ कधी शांत आहे खुप* 
*मन सौख्याचा ठाव घेत चोहीकडे* 
*भासे चिरंतन जळणारा सुगंधी धुप*

*मन हे कोमल कधी होते कणखर*
*मन दुःखात हळवे होते क्षणभर*
*मनाची काय अन् कशी सांगू व्यथा*
*मन पर्वताएवढे कधी होते राईभर*

*मन जागेवर राहून फिरून येते सारे विश्व*
*मन चौफेर उधळणारे जसे शुभ्र अश्व*
*मन चोखंदळ वा-यासारखे इकडून तिकडे*
*विहरताना सिद्ध करते आपले वर्चस्व*

*मन होतो झुला चहूकडे झुलणारा*
*मन घेतो कवडसा क्षणभर फुलणारा*
*मन हळव्या आठवात आठवणींना*
*हाक देतो नकळत श्वास खुलणारा*

*मन होई रिमझिम बरसणा-या धारा*
*मन कधी होई खट्याळ वाहणारा वारा*
*मन भावनांच्या गर्दीत फिरून येता*
*अलगद् फुलतो मनाचा मोर पिसारा*

*मनास नाही अंत मन आहे चंचल*
*मन होऊन उनाड जसे बनते नाखळ*
*मन नाशिवंत शरिराचा असे आत्मा*
*कधी होई ओलेचिंब कधी होई कातळ*
*कधी होई ओलेचिंब कधी होई कातळ*

______*कवी गजेंद्र काळे*
             *962371401*
      *स्वराज नगर बाळापुर रोड*
          *मुकूंदवाडी परिसर*
                *औरंगाबाद*