🔴 *आईचे उपकार*🔵
अरे मुर्खा
बघ त्या आईकडे,
नऊमहिने पोटात वाढवून तिने,
तुला जन्म दिला...!
आणि लहानाचे मोठे करण्यासाठी,
मरणयातना भोगल्या...!
ते उपकार विसरलास कारे,
पई पई साठवून तिने,
तुझे शिक्षण केले हट्ट पुरवले...!
पोटाला चिमटे देऊन,
वेळप्रसंगी उपाशी पोटी राहून,
तुला स्वावलंबी केले,
ते काय म्हातारपणी लाथाडण्यासाठी...!
लग्न करून तिने तुला दोनाचे चार केले,
बायकोचे आणि तुझे हट्ट पुरवता पुरवता,
तुला आरामदायी आणि स्वतःला घायाळ केले...!
आज बघ ती थकलिये,
हात पाय गुडघ्याने पार झुकलिये,
तरी कष्ट पिच्छा सोडवेना...!
दोन घासाच्या भुकेसाठी तडफड तीची,
रोज मरमर करताना जीव मुठीत घेते ती,
आता गरज आहे तीला विश्रांतीची...!
चल तिचे पांग फेडुया,
तीला थोडासा विसावा देऊया,
ती नाही म्हंटलीतरी,
आपण आपले कर्तव्य करूया...!
रोज होणारी परवड तिची,
मलाही आता बघवेणा,
मनातुन रडताना माझे अश्रू,
आज मलाच दोषी ठरवत आहे,
मलाही वाटतं जितका तु दोषी आहेस,
तितकाच मी पण नाही का..?
तु जे केलं आहेस तेच मी केलंय,
स्वतःचे बघता बघता,
हे मन आईला विसरून गेलंय,
स्वार्थी अहंकारी होता होता,
आईचे उपकार विसरून गेलंय...!
नको हे जगणं,
आईला सतत झिजताना पाहणे,
मनावर वार करून जाते,
तिच्या कष्टाचे चिज झाले पण...,
माझ्या जन्माचे सार्थक ना झाले...!
आईच्या उपकारच्या ओझ्याखाली,
अडकवलेले हे पाषाणी हृदय,
खरंच मृदू होईल का...?
तिच्या जन्माचे सार्थक करायला,
माझे तिच्या पोटी येणे,
हे आनंदयुक्त विश्व पाहणे,
इथले मनसोक्त केलेले सर्व कर्म,
तिच्या उपकारांचे देणे लागत नाही का..?
मला इथे जगताना आता एकच करायचे आहे,
तिचे उबगलेले जीवन परत फुलावयाचे आहे...!
आणि माझ्या जन्मावर उधळलेले तिचे एकेक क्षण,
तिला परत करताना देवाकडे,
हे आयुष्य पुन्हा मागायचे आहे...!
ऋण फेडण्यासाठी,
तिचे अणगणित उपकार फेडण्यासाठी,
या जन्मांचे सार्थक करण्यासाठी..!
या जन्मांचे सार्थक करण्यासाठी...!!
गजेंद्र...
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद..
9623714011/7798520126
🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤