*करावे तसे भरावे रे*
करावे तसे भरावे रे..........२
आपलेच पाप मोजावे रेsss
करावे तसे भरावे रे..........२//धृ//
जे काही करशील इथेच भरशील
हे तूझ्या तू ध्यानात ठेव...
भ्रष्टाचाराचं नको खाण जीवाला
कष्टाचं पोटभर जेव...
दुःखच स्वतः भोगावे रेsss
करावे तसे भरावे रे..........//१//
स्वधर्म तू जाण पेटू दे रान
नको पाहू अन्याय डोळ्यानं...
टपलाय शिकारी देण्या घाव जिव्हारी
विणलय जाळं कोळ्यानं......
त्याआधीच पुण्य पेरावे रेsss
करावे तसे भरावे रे............२//२//
एकटाच असशील पापाचा भागी
कुणी नाही देणार साथ...
सोडून पापाच्या मृगजलाळा
धर सत्याची तू वाट
सत्य उराशी धरावे रेsss
करावे तसे भरावे रे......२//३//
करावे तसे भरावे रे..........२
आपलेच पाप मोजावे रेsss
करावे तसे भरावे रे..........२
No comments:
Post a Comment