Thursday, 2 April 2026

👇मी जातीनं वारीकं👇

💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝


👇मी जातीनं वारीकं👇


मी जातीनं हाय वारीकं
माझा नाही रे अपमानं...!
मी काढीतो रे मळं
पोटा मिळाया घास दोनं......||धृ||


श्रीमंत येतो आणि
गरिबही येतो
मी केलेल्या कष्टाचं
फळ देऊनीया जातो
विनंती बांधवांनो नका
होऊ कुणास अधीन
मी काढीतो रे मळं
पोटा मिळाया घास दोनं...........||1||


चेहरा करीतो सुंदर
क्रीम पावडर लावूनं
भल्या भल्यांचाही
कान हातात धरूनं
समाज उंच वाढायला
ही मोठी शिकवणं
मी काढीतो रे मळं
पोटा मिळाया घास दोनं...........||2||


मिळाली वागणूक हीन
तरी नाही लाचारी
माझ्या रक्तात भीनली
आहे जातीची खुमारी
नाही होणार मी वटकनं
आज करीतो हे प्रणं
मी काढीतो रे मळं
पोटा मिळाया घास दोन............||3||



--------------✍🏻गजेंद्र(गजानन)
             ढवळापुरीकर औरंगाबाद






No comments:

Post a Comment