🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
*स्पर्धेसाठी*
*विषय:- आई*
आई तुझ्या कर्तृत्वाला सलाम
आई तुझ्या अस्तित्वाला सलाम
*तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला*
*आई तुझ्या मातृत्वाला सलाम...//धृ//*
आई मी पाहिलंय तुझं राबणं
आई मी पाहिलंय तुझं झिजणं
फक्त संसार मजबुत करण्यासाठी
आई तुझं कष्टांमधून घाम गाळणं
*आई तुझ्या त्या कष्टांना सलाम*
*तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला,*
*आई तुझ्या मातृत्वाला सलाम....//१//*
आई तू रात्र पाहिली ना दिवस
दुःख आम्हा कधी होऊ न दिलंस
मायेच्या पंखाखाली घेऊन आम्हा
आई संस्कारांचं जगणं दिलंस
*आई तुझ्या संस्कारांना सलाम*
*तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला*
*आई तुझ्या मातृत्वाला सलाम....//२//*
आई या जगात मी आलोच नसतो तर
हे अनमोल आयुष्य मिळालं नसतं
तुझ्या उपकारांची फेड करण्या
खरंच हे जीवन मला मिळालं नसतं
*आई तुझ्या उपकारांना सलाम*
*तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला*
*आई तुझ्या मातृत्वाला सलाम....//३//*
आई तुझं माझ्यावर खुप प्रेम अहे गं
काही चुक झाली तर माफ करशील ना
कदाचित या जन्मात नाही झालं माझ्याडून
तर सेवा करण्यासाठी पुढचा जन्म देशिल ना
*आई तुझ्या स्त्री जन्माला सलाम*
*तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला*
*आई तुझ्या मातृत्वाला सलाम...//४//*
आई मी पाहिलंय तुझं जगणं
आम्हां भावंडांसाठी खस्ता काढणं
पोटाला पोटभर मिळावं आमच्या
म्हणून दुस-यापूढे पदर पसरवणं
आई आमच्यासाठीच जगलीस तू
तुझं तर अस्तित्वही हरलीस तु
*आई तुझ्या अस्तित्वाला सलाम*
*तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला*
*आई तुझ्या मातृत्वाला सलाम....//५//*
....✍
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
https://www.facebook.com/visharadkVishu/
*स्पर्धेसाठी*
*विषय:- आई*
आई तुझ्या कर्तृत्वाला सलाम
आई तुझ्या अस्तित्वाला सलाम
*तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला*
*आई तुझ्या मातृत्वाला सलाम...//धृ//*
आई मी पाहिलंय तुझं राबणं
आई मी पाहिलंय तुझं झिजणं
फक्त संसार मजबुत करण्यासाठी
आई तुझं कष्टांमधून घाम गाळणं
*आई तुझ्या त्या कष्टांना सलाम*
*तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला,*
*आई तुझ्या मातृत्वाला सलाम....//१//*
आई तू रात्र पाहिली ना दिवस
दुःख आम्हा कधी होऊ न दिलंस
मायेच्या पंखाखाली घेऊन आम्हा
आई संस्कारांचं जगणं दिलंस
*आई तुझ्या संस्कारांना सलाम*
*तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला*
*आई तुझ्या मातृत्वाला सलाम....//२//*
आई या जगात मी आलोच नसतो तर
हे अनमोल आयुष्य मिळालं नसतं
तुझ्या उपकारांची फेड करण्या
खरंच हे जीवन मला मिळालं नसतं
*आई तुझ्या उपकारांना सलाम*
*तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला*
*आई तुझ्या मातृत्वाला सलाम....//३//*
आई तुझं माझ्यावर खुप प्रेम अहे गं
काही चुक झाली तर माफ करशील ना
कदाचित या जन्मात नाही झालं माझ्याडून
तर सेवा करण्यासाठी पुढचा जन्म देशिल ना
*आई तुझ्या स्त्री जन्माला सलाम*
*तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला*
*आई तुझ्या मातृत्वाला सलाम...//४//*
आई मी पाहिलंय तुझं जगणं
आम्हां भावंडांसाठी खस्ता काढणं
पोटाला पोटभर मिळावं आमच्या
म्हणून दुस-यापूढे पदर पसरवणं
आई आमच्यासाठीच जगलीस तू
तुझं तर अस्तित्वही हरलीस तु
*आई तुझ्या अस्तित्वाला सलाम*
*तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला*
*आई तुझ्या मातृत्वाला सलाम....//५//*
....✍
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
https://www.facebook.com/visharadkVishu/
No comments:
Post a Comment