Thursday, 6 April 2017

मर्द मराठा

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*शिवकाव्य स्पर्धेसाठी*


*मर्द मराठा*


*फाडून छाती मर्दा तू इतिहास घडविला रे*
*मर्द मराठ्यांचा तू अभिमान वाढविला रे..//धृ//*

गुलामगिरीच्या विळख्यात
अडकलेला मानव होता
करणे सुटका जुल्मातूनं
असा शिवबाचा महिमा होता
*फौज जमवूनी तरूणांची तू तोरणा लढविला रे*
*मर्द मराठ्यांचा तू अभिमान वाढविला रे...//१//*

कळस गाठला अत्याचाराने
भरडू लागले गरीबांचे जीवन
डोळ्यांत रक्त उतरले अन्
हिनवू लागले शिवबाला हे मन
*ऐकूनी गाथा शुरविरांची तू हल्ला चढविला रे*
*मर्द मराठ्यांचा तू अभिमान वाढविला रे...//२//*

आई जिजाऊ ने जन्मीला
शुरविर हा पुत्र घडविला
स्वातंत्र्याचा पहिला रक्षक हा
शिवछत्रपतीचा लौकिक लाभला
*मातृभूमीच्या रक्षणाचा तू विडा उचलला रे*
*मर्द मराठ्यांचा तू अभिमान वाढविला रे...//३//*

अंबर म्हणाले या धरतीला
शिवछत्रपती तुज पुत्र लाभला
वाली गोर गरीबांचा हा
थोर मनाचा क्षत्रिय लाभला
*सळसळणा-या रक्तांचा तू संग्राम पेटविला रे*
*मर्द मराठ्यांचा तू अभिमान वाढविला रे...//४//*

धन्य ती कुस जिजाऊची
जिने राजे शिवराय घडविले
तोरण बांधून स्वराज्याचे
निर्माण स्वराज्य केले
*स्वातंत्र्याच्या रक्षणाणाला शिवरत्न लाभला रे*
*मर्द मराठ्यांचा तू अभिमान वाढविला रे...//५//*


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


https://www.facebook.com/visharadkVishu/

No comments:

Post a Comment