Sunday, 2 April 2017

हृदय बंधन

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

       *🌳🌳हृदय बंधन🌳🌳*

तुला हृदयात सखये मी ठेवून पाहिले
हृदय बंधनात तुला मी जोडून पाहिले....

घाव एकावरी एक केले मी सहन
अंतरात माझ्या तुला मी घेऊन पाहिले....

अश्रू ओल्या भावनांचे केले जतन
उबारे श्वासांचे तुला मी देऊन पाहिले.......

लाख वेदना ठेविल्या मनी साठवून
सुखाच्या सागरात तुलामी नेऊन पाहिले...

आठवाचे गाभारे मी भरले साजणी
आठवणींच्या गर्तेत तुला मी शोधुन पाहिले...

श्वास माझे तुझ्यासाठी ठेविले जपून
उसने श्वास तुजला मी मागून पाहिले...

एक विनंती आहे सजणी सुखी तु रहा
तुझ्या सुखासाठीच मी जगून पाहिले....

..✍
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
https://www.facebook.com/visharadkVishu/

No comments:

Post a Comment