Friday, 12 May 2017

अभिव्यक्ती


🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶
*स्पर्धेसाठी*

*.............अभिव्यक्ती...........*


मी किती भावनांना माझ्या दाबायचं
मनातलं मनातंच कसं साठवायचं
*सांगायचं तर कोणाला इथं*
*अजूनही स्वातंत्र्य आहे मला मिळवायचं*

मी माझं जीवन माझ्या पध्दतीनं
जगायचं म्हणतो थोडसं
*पण इथल्या समाजात वावरताना*
*मनापासून मनालाच तोडतो थोडंसं*

होईल का ख-या अर्थाने मन स्वातंत्र्य
मगच जगता येईल दिलखुलास मला
*अन दुर जाईल का इथलं पारतंत्र्य*
*अन वाटेल मनमोकळं माझ्या मनाला*

इथं काहीच नाही राहिले आपले
क्षणभर सुखाचा सगळेच करती हव्यास
*मलाही वाटतं आता हवा ऐश आराम*
*वेदना शमवताना पसरवत राहो सुवास*

खाल्लेलं अंगी लागू देईनात कोणी
अमाप आहे पैसा तरी हाव सुटत नाही
*रोजच बदलतात निर्णय जगण्याचे*
*सुखाच्या शोधात दुःख पचवता येत नाही*

माझे विचार मलाच पटवायचे म्हणतो
दलबदलू माझी त-हा सोडावी म्हणतो
*वेळ येते जेव्हा निर्णय घेण्याची*
*इकडे ना तिकडे मधेच घुसमटत बसतो*

स्वातंत्र्य आहे जरी आज आपणास
पण तळवे चाटणे अजून सुटलेले नाही
*पाहतो जेव्हा गरीबांना मागे पुढे फिरताना*
*जिव्हारी लागलेले घाव अजून बुझलेले नाही*

मन अभिव्यक्त करायला शिकायचं आहे
मनात दाबलेलं आता खोलायचं आहे
*राहून राहून एकच विचार सतावत असतो*
*जे येईल ओठावर तेच खरं खरं बोलायचं आहे*
*जे येईल ओठावर तेच खरं खरं बोलायचं आहे...*

...✍
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

No comments:

Post a Comment