🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
*स्पर्धेसाठी*
*.........अस्तित्व.........*
माझ्या अस्तित्वाला
तुझ्या अस्तित्वाची जोड हवी
अंधारलेल्या या जगात
आपली बांधिलकी गोड हवी...१
माझं अस्तित्व तुझ्याशिवाय
जसा आकाशात एकटा चंद्र
तुझं माझं एक असणं नेहमी
जसा भासावा तो पुनवेचा चंद्र...२
माझं अस्तित्व टिकवण्यासाठी
मी आणलेल्या मधुकरीत तु खुश असावं
नसावा हेवा तुला दागदागिण्यांचा
तुझं अस्तित्व माझ्यात भिणलेलं दिसावं..३
फक्त प्रमेश्वराची असावी मेहर
जीवनाला या मी यशस्वी करेन
तमा न बाळगता येणा-या संकटाची
आयुष्यास आपल्या समाधानी करेन..४
जपले जावे ऋणानुबंध नात्यांचे
टिकावं अस्तित्व आपल्या संसाराचं
जोखीम उचलत राहिन सुखदुःखात
दुर ठेविन घर जोखड वादळाचं......५
अस्तित्व पुसटसे होण्याआधी माझे
हे आयुष्य हे जीवन संपले जावे
पण नाते पुर्णत्वाकडे जाण्याआधी
अस्तित्व तुझे माझे टिकले जावे.....६
...✍
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
No comments:
Post a Comment