Friday, 12 May 2017

पाळणा


👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵
*स्पर्धेसाठी*

*पाळणा*

*चला चला ग सयानो*
*चला चला ग चला*
*आली आली राजकुमारी*
*नाव ठेऊ गं चला.//धृ//*

नाव अंकिता छान
दिसे प्राजक्ताचे पान
छकुली गोड सानुली
करी कोकिळेचे गान
*परी माझी गोड बाई*
*करू नामकरण चला*
*आली आली राजकुमारी*
*नाव ठेऊ गं चला//१//*

नाजूक कोमल गाल
जसं चांदण शितल
नाव ठेवा आभा
डोळा लावूनी काजळ
*हलवा हलवा पाळणा*
*दोरी ओढू गं चला*
*आली आली राजकुमारी*
*नाव ठेऊ गं चला//२//*

आल्या किती बाया
नाव शोभे अनुसया
गालावरची खळी वाटे
नव प्रितीची छाया
*गोळा झाला गोतावळा*
*साखरपान वाटू गं चला*
*आली आली राजकुमारी*
*नाव ठेऊ गं चला//३//*

नाव शोभेल अवणी
जसं नितळ पाणी
घारीवाणी नजर
सांगे चातकाची वाणी
*करू गोल रिंगण बाई*
*फेरा धरू गं चला*
*आली आली राजकुमारी*
*नाव ठेऊ गं चला//४//*


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद...
9623714011
👶👶👶👶👶👶👶👶👶👶👶

No comments:

Post a Comment