संसयाचं भुत
बसतं मानगुटीवर
अन् होऊ लागतात
असंख्य कुचंबना.......!
किती बी ठेवा
झाकुन आपल्या मनातलं
येतं वर जव्हा
होते पळता भुई थोडी....!
नार नखरेली बगा
दावते हजार नखरं
तिच्या भातुकलीच्या खेळात
लाख जाती बकरं.....!
घर करून मनात
बसते उरात जव्हा
सगळंच जातं मोहात
क्षणभर सुखा पायी.....!
लखलखणारं जीवन
मग बनतं मसणवटा
परत कधीच येत न्हाई
किती बी करा आटापिटा.....!
गजेंद्र ढवळापुरीकर स्वराजनगर औ.बाद...
No comments:
Post a Comment