Friday, 12 May 2017

मंगलाष्टके


🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

*स्पर्धेसाठी*

*मंगलाष्टके*

आले व-हाड आले आप्तसगे सोयरे
मानपानासाठी मातापिता दिनरात झुरे
सज्ज बघा माझी छकुली ही चंचल परी
करण्या विवाह आज चढणार बोहल्यावरी

*कुर्यात सदा मंगलम शुभंभवतू सावधान...१*

दोन जीवांचे मिलन मिलाप दोन परीवारांचा
आणि मानपान होतो सग्या सोय-यांचा
देऊन शुभ आशिर्वाद करतील मनोकामना
संसार होवो सुखाचा हिच इश्वर चरणी प्रार्थना

*कुर्यात सदा मंगलम शुभंभवतू सावधान...२*

वाढत जावो संसारवेल नांदो सुख समृद्धी
दोन कुळाची आप्त सग्यांची व्हावी दृढ नाती
संपुर्ण जीवन तुमचे जावो सुख सलोख्याने
फुलावी दोन मने या विवाह सोहळ्याने

*कुर्यात सदा मंगलम शुभंभवतू सावधान...३*

सोडूनी माहेरा नववधू ओलांडीते सासरचा उंबरा
येतो अर्थ जीवनाला होतो इथे मानव जन्म पुरा
पाहते स्वप्न सुखी संसाराचे जोडीदारा सवे
सुखी जीवनाची सुत्र सुख मिळावे नवे नवे

*कुर्यात सदा मंगलम शुभंभवतू सावधान...४*

सगेसोयरे अन् सवंगडी देती शुभेच्छा वधुवरा
करती गुनगाण सोहळ्याचे चेहरा दिसे हासरा
नमन करूनी देवदेवतांना सप्तपदी चाला
शुभेच्छा देऊन एकमेकां गळा पुष्पहार घाला

*कुर्यात सदा मंगलम शुभंभवतू सावधान...५*

इच्छा एकच मनी ठेवा होवो संसार सुखाचा
दान कुंकवाचे दिले हा अनमोल ठेवा सौभाग्याचा
प्रेम आदर सन्मान करा थोरा मोठ्यांचा
नमन भगवंता तुजला असुदे आशिर्वाद तुझा

*कुर्यात सदा मंगलम शुभंभवतू सावधान...६*

वाजंत्री वाजते सुरात नववधूचा प्रवेश घरात
सुरसनईचा मंजुळ ध्वनी ढोलताशे वाजे सुरात
मनमोहनारी वाणी मंगल सुरांची मधुर गाणी
बांधा तोरणमाळा मिलनाच्या बहरेल सुंदर कहाणी

*कुर्यात सदा मंगलम शुभंभवतू सावधान...७*

आली घडी मिलनाची नववधूच्या गृहप्रवेशाची
झाली तयारी पाठवणीची गळाभेट मातापित्याची
वाजंत्री वाजते ठेक्यात आज निघाली लेक सासरी
झाली पाहुणी दोन दिवसाची पोरी हुंदका आवरी

*कुर्यात सदा मंगलम शुभंभवतू सावधान....८*


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

No comments:

Post a Comment