Friday, 12 May 2017

ग्रामीण संस्कृती


🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵
*स्पर्धेसाठी*

*.........ग्रामीण संस्कृती.......*


*ग्रामीण संस्कृती बद्दल किती सांगू*
*एकदिलाने एकमताने सारे नांदू....//धृ//*

सकाळ होता सडा रांगोळी करती गृहिणी
सार्वजनिक नळावर पिण्यास भरती पाणी
*अजब असते इथल्या घरकामाची जादू*
*एकदिलाने एकमताने सारे नांदू...//१//*

घरामधील माणसे पहाटेच जाती शेताला
घामाचाही गंध त्यांचा दरवळतो मातीला
*कष्टाचा आनंद सगळा दुनियेला वाटू*
*एकदिलाने एकमताने सारे  नांदू...//२//*

साडी चोळी साज शृंगार करती गृहिणी
धोतर सदरा वेषात दिसे पुरूष शोभूनी
*स्त्री पुरुष समानतेची तोरणे बांधू*
*एकदिलाने एकमताने सारे नांदू..//३//*

सणवार साजरे करतो आम्ही बंधूभावाने
थोरा मोठ्याचां सन्मान करतो आम्ही आदराने
*नात्यामधल्या गोडव्यांचा सुगंध वाटू*
*एकदिलाने एकमताने सारे नांदू..//४//*

गावाकडची माती आमची ग्रामीण संस्कृती
साह्य करणे एकमेकांना हिच खरी महती
*ऋणानुबंध एकोप्याचे आदराने बांधू*
*एकदिलाने एकमताने सारे नांदू..//५//*

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद...
🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵

No comments:

Post a Comment