*स्पर्धेसाठी पोवाडा*
स्वराज्य आले मोडकळीला
जनता घाबरले दरा-याला
मुघलांचा सम्राट
आदिलशहाला जी जी जी जी हो....
अशा या काळ रात्रीला
आई जिजाई होती चितेंला
कुणी तरी यावे रक्षणाला
अन् मारावे मुघलाला जी जी जीहो...
अशा येळंला तोफ कडाडे
चौघडे धडाडे तुता-या किंकाळीने
आई जिजाई नवस बोले शिवाईला
एक पुत्र द्यावा मजला जी जी जी हो....
शिवाई पावली नवसासं
घडला दैदिप्यमान चमत्कार...!
पुणे जिल्ह्यात जुन्नर गावात
शिवनेरी किल्यात आई जिजाईच्या पोटी जन्म झाला जी जी जी जी हो....
सोहळा शिवजन्माचा
आनंदी आनंद सगळ्यांचा
करी उत्सव साजरा जन्माचा
नाव ठेविले शिवबा जी जी जी हो....
शिवबा आले वयात
रामकृष्णाची महती ऐकत
होई बुद्धी तल्लख आणि मग
आई जिजाऊ घडीव संस्कार जी जी जी हो...
शिकले तलवार चालवायला
पट्टा शिकले फिरवाया
भालाफेक लागले उत्तम कराया
आईने आणि दादोजी कोंडदेवाने
घडवला उत्तम लढवय्या जी जी जी हो...
जमविले मग दोनचार मावळे
केले स्वराज्यास मुघलातून वेगळे
आई जिजाऊ देई शिक्षण निराळे
तिकडे मुघलसम्राट तळमळे जी जी जी हो....
असा घडला राजा रयतेचा
जिव की प्राण लोकांचा
नव्हता गर्व आभिमान त्याचा
झळकला जंगी शिवराय माझा जी जी जी हो...
✍🏻गजेंद्र..
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद...
स्वराज्य आले मोडकळीला
जनता घाबरले दरा-याला
मुघलांचा सम्राट
आदिलशहाला जी जी जी जी हो....
अशा या काळ रात्रीला
आई जिजाई होती चितेंला
कुणी तरी यावे रक्षणाला
अन् मारावे मुघलाला जी जी जीहो...
अशा येळंला तोफ कडाडे
चौघडे धडाडे तुता-या किंकाळीने
आई जिजाई नवस बोले शिवाईला
एक पुत्र द्यावा मजला जी जी जी हो....
शिवाई पावली नवसासं
घडला दैदिप्यमान चमत्कार...!
पुणे जिल्ह्यात जुन्नर गावात
शिवनेरी किल्यात आई जिजाईच्या पोटी जन्म झाला जी जी जी जी हो....
सोहळा शिवजन्माचा
आनंदी आनंद सगळ्यांचा
करी उत्सव साजरा जन्माचा
नाव ठेविले शिवबा जी जी जी हो....
शिवबा आले वयात
रामकृष्णाची महती ऐकत
होई बुद्धी तल्लख आणि मग
आई जिजाऊ घडीव संस्कार जी जी जी हो...
शिकले तलवार चालवायला
पट्टा शिकले फिरवाया
भालाफेक लागले उत्तम कराया
आईने आणि दादोजी कोंडदेवाने
घडवला उत्तम लढवय्या जी जी जी हो...
जमविले मग दोनचार मावळे
केले स्वराज्यास मुघलातून वेगळे
आई जिजाऊ देई शिक्षण निराळे
तिकडे मुघलसम्राट तळमळे जी जी जी हो....
असा घडला राजा रयतेचा
जिव की प्राण लोकांचा
नव्हता गर्व आभिमान त्याचा
झळकला जंगी शिवराय माझा जी जी जी हो...
✍🏻गजेंद्र..
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद...
No comments:
Post a Comment