*स्पर्धेसाठी*
*विषय:- गोफण*
*कारभारनी तांबडं फुटलं*
*गोफण खोसतो कमरला,*
पाखरांची सुरू लगबग
चल मी जातो राखणीला........!1
*कणसं भरलीत दाण्यानं*
*पाखरांचा बघ थयथयाट*
गोफण फिरवता मी जोरानं
पाखरं धरतील घरची वाट.......!2
*नभात रंगल्या कवायती*
*गोफण धरते नेम अचुक*
पाखरं येता माझ्या पिकावरी
जीवाची होते राणी धाकधूक.....!3
*डोक्यावर पाटी घेऊन माझी*
*तुरूतुरू चाले कारभारीन*
गोफण घेऊन उपाशी पोटी
राखतोया धनी शाळूचे रान.......!4
*होता येळ न्याहारीची*
*ठेवता गोफण जरा खाली*
दोनच घास घालतो पोटी
तिकडं पाखरांच्या हालचाली......!5
*सनसन करीत फिरते गोफण*
*सुसाट भेदीते दुरवरचे रान*
राखीतो शेती भाबडा शेतकरी
जगवितो अख्या देशाचे प्राण.......!6
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद....
*विषय:- गोफण*
*कारभारनी तांबडं फुटलं*
*गोफण खोसतो कमरला,*
पाखरांची सुरू लगबग
चल मी जातो राखणीला........!1
*कणसं भरलीत दाण्यानं*
*पाखरांचा बघ थयथयाट*
गोफण फिरवता मी जोरानं
पाखरं धरतील घरची वाट.......!2
*नभात रंगल्या कवायती*
*गोफण धरते नेम अचुक*
पाखरं येता माझ्या पिकावरी
जीवाची होते राणी धाकधूक.....!3
*डोक्यावर पाटी घेऊन माझी*
*तुरूतुरू चाले कारभारीन*
गोफण घेऊन उपाशी पोटी
राखतोया धनी शाळूचे रान.......!4
*होता येळ न्याहारीची*
*ठेवता गोफण जरा खाली*
दोनच घास घालतो पोटी
तिकडं पाखरांच्या हालचाली......!5
*सनसन करीत फिरते गोफण*
*सुसाट भेदीते दुरवरचे रान*
राखीतो शेती भाबडा शेतकरी
जगवितो अख्या देशाचे प्राण.......!6
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद....
No comments:
Post a Comment