Tuesday, 28 February 2017

निरजा माझी भाग्याची

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*स्पर्धेसाठी*

*निरजा रचना निरजाच्या वाढदिवसानिमित्त*


*विषय:- निरजा माझी भाग्याची*



निरजा माझी भाग्याची
कौतुके लाडाची
आमची
तुमची
लाडकी प्रेमळ
सुख भरल्या पाऊलांची.....!1


लेक लाडकी बापाची
तुपात साखर
गोडाची
ओंजळ
भरून सुखाची
ओढ लावते प्रेमाची......!2


दुधाची वरच्या सायीची
घट्ट बनवता
लोणी
वाणी
होते गोड
लेक लक्ष्मी सासरची......!3


लेक सावली घराची
दोन परीवाराची
मायेची
लाडाची
वंशवेल कुळाची
वाढत जाते जीवनाची......!4


शोभा माहेर सासरची
अंतरात मनाची
स्वप्नांची
भावनांची
करताना सोबत
साथ मिळो आपल्याची....!5

वंशवेल मांडवात कुळाची
वाढत जाईल
लेकीमुळे
बहरेल
घरकुल आपले
आशा वेड्या मनामनाची



.....✍🏻
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment