Friday, 24 February 2017

*मन कृतज्ञतेने भरते*

⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵

*मन कृतज्ञतेने भरते*

साधुसंताची संगत लाभली
जीवन हे सुखी जाहले इथे
*तयांची सेवा करता हृदयातुनी*
*मन मत्सर गाळून कृतज्ञतेने भरते.....!1*


सावलीत राहूनी गुरूजनांच्या
आज्ञा पाळत वडिलध-यांच्या
*ज्ञानमार्गाने हे आयुष्य फुलत जाते*
*मन अज्ञान सोडून कृतज्ञतेने भरते....!2*


साथी मिळता येथे सगे सोयरे
संकटकाळी येते सुखाचे उबारे
*आयुष्य जगत असताना प्रेम मिळते*
*मन हेवेदावे सोडून कृतज्ञतेने भरते.....!3*


मित्र-मैत्रीणींच्या मैफिलीत जातो
सुख आणि समाधान घेऊन येतो
*नवचैतन्य निर्माण होते त्या ठिकाणी*
*मन शांत होऊन माझे कृतज्ञतेने भरते....!4*



*....✍🏻गजेंद्र*
*ढवळापुरीकर...*
*स्वराजनगर औरंगाबाद*
⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵

No comments:

Post a Comment