Monday, 27 February 2017

माय मराठी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*स्पर्धेसाठी*

*विषय :- माय मराठी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महि माय मराठी
मला तीचा अभिमान,
*मह्या महाराष्ट्र धरतीची*
*हाये ती शान.....!1*

आपुसक येती व्हटावर
मन थिरकणारे बोल,
*सुगंध येतो मातीचा*
*मनी मराठीची ओल...!2*

सुर छेडते ही मराठी
सरगम होतसे नशिली
*हिच्या शब्दांची रंगत*
*मी ताईला सुरात पाहिली...!3*

माय मराठीची गोडी
राहो समद्यांच्या मनी
*हृदयी शिरावी ती तेव्हा*
*व्हावे माय मराठीचे ऋणी...!4*


......✍🏻
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment