Sunday, 19 February 2017

*🗡पुन्हा जन्माला यावे शिवराय🗡*

*साहित्य काव्यगंध आयोजित*
*शिवजयंती विषेश काव्य स्पर्धेसाठी*


*🗡पुन्हा जन्माला यावे शिवराय🗡*


सह्याद्रीच्या कडेकपारी
आवाज घुमतो हाय,
एकच ध्यास आम्हाला
पुन्हा यावे जन्माला शिवराय...//धृ//


वाढला अन्याय इथे
वाढला अत्याचार इथे,
यावे शिवराय बघण्याला
वाढला दुराचार इथे,
भेदुन सह्याद्री रांगाना
आवाज घुमत जाय
एकच ध्यास आम्हाला
पुन्हा जन्माला यावे शिवराय...//1//


निर्माण व्हाव्या आई जिजाऊ
लाखो जन्मतील शुरवीर,
उदरात घडवतील संस्कार
आणि न्यायास मिळेल सुर,
ये मर्दां त्या छातीचा
तु कोथळा काढून पाह्य,
एकच ध्यास आम्हाला
पुन्हा यावे जन्माला शिवराय...//2//


गुलामगिरी ती चिरडून टाका
व्हावे स्वावलंबी आता,
छत्रपती शिवरायप्रमाणे
करावे स्वराज्य स्थापन आता,
वाचा फोडा न्यायासाठी
सहन करू नका अन्याय,
एकच ध्यास आम्हाला
पुन्हा यावे जन्माला शिवराय...//3//


इज्जत करणे आया बहीणींची
असे होते महान ते राजे,
लज्जा वाटते आजच्या पिढीची
काय घडते आहे इथे राजे,
थांबवण्या या कालचक्राला
कोण देईल सांगा अभिप्राय,
एकच ध्यास आम्हाला
पुन्हा यावे जन्माला शिवराय...//4//


स्वप्न उद्याचे पाहू उज्वल
राहू स्वागताला तयार,
येणार आहे जन्मास पुन्हा
शिवछत्रपती घेऊनी तलवार,
रक्त पेटवा श्वास पेटवा
बदलत मग नितीमत्ता जाय
एकच ध्यास आम्हाला
पुन्हा यावे जन्माला शिवराय...//5//


✍🏻गजेंद्र..
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद...

No comments:

Post a Comment