Friday, 24 February 2017

मन कृतज्ञतेने भरते

⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵

मन कृतज्ञतेने भरते


मन कृतज्ञतेने भरते
जेव्हा मन खरे काम करते
वाहवा ऐकून सा-यांची..
*माझे मन कृतज्ञतेने भरते......!1*


रूसवे फुगवे सोडून सारे
कोणी मैत्रीस हात पुढे करते
पाहून त्याची आत्मियता
*माझे मन कृतज्ञतेने भरते.......!2*


वाट चुकलेल्यास कोणी
खरा निर्भयतेचा रस्ता दाखवते
आपलेपणा हृदयात घेताना
*माझे मन कृतज्ञतेने भरते......!3*


उपकारांचे आभार मारताना
सच्चे पणाचे तिथे वारे वाहते
मदतीस येणारे हात बघताना
*माझे मन कृतज्ञतेने भरते.......!4*


गरिबांचे हित पाहणारे बघता
तन मन चिंब कृतार्थ होते
वेदनेचा मार्ग *आपला* म्हणताना
*माझे मन कृतज्ञतेने भरते.......!5*


........✍🏻

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद

⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵

No comments:

Post a Comment