Thursday, 16 February 2017

बंध प्रेमाचे अतुट.



*विषय :- बंध प्रेमाचे अतुट*


*चाल:- तेरा मेरा प्यार अमर*(असली नकली)


बंध अतुट प्रेमाचे
तुझ्या नि माझ्या प्रितीचे,
प्रिये सजणी सखये
नाते जपले तु माझे,
बंध अतुट प्रेमाचे
तुझ्या नि माझ्या प्रितीचे.........//धृ//


मन हे माझे बावरे
वेड्या मना सावर रे,
धुंद आनंदी मनास
थोडा विसावा तु दे रे,
स्वप्न माझे तुझ्या ठायी
वेडा झालो तुझ्या पायी,
नशा ही वेड्या प्रेमाची
माझ्या नयनातुन वाही,
बंध अतुट प्रेमाचे
तुझ्या नि माझ्या प्रितीचे........//1//


अंतरात माझ्या तुचं
कसे सावरू स्वतःला,
स्वच्छ आपल्या प्रेमात
विसरलो गं स्वतःला,
होई आनंदी जीवन
सखे जुळले बंधन,
वारा वाहतो सौख्याचा
निरुपम झाले हे तन,
बंध अतुट प्रेमाचे
तुझ्या नि माझ्या प्रितीचे........//2//


रंग चढला संसारी
साथ तुझी मला प्यारी,
श्वास माझे हे अर्पण
सखे तुझ्या प्रितीवरी,
श्वास माझे तुजसाठी
अश्रू हृदयी हे दाटी
प्राण झुरावा माझा हा
तुला सुख देण्यासाठी
बंध अतुट प्रेमाचे
तुझ्या नि माझ्या प्रितीचे........//3//



गजेंद्र..
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.9623714011





No comments:

Post a Comment