Tuesday, 28 February 2017

प्रित माझी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💐💐गझल💐💐
*वृत्त:- मनोरमा*

*लगावली:-गालगागा गालगागा*


प्रित माझी गात आहे
लांब कोणी जात आहे.....//धृ//

रात राणी गंध ओला
प्रेम माझे देत आहे.....//11//

सांजवेळी वार झाला
घाव सारे कात आहे....//2//

प्रेम गाणी  शांत आता
मोल सारे त्यात आहे....//3//

साथ देण्या ये पुन्हा तुच
सुर माझे गात गात आहे...//4//

श्वास राजी प्रित होण्या
आज कारे शांत आहे...//5//

घेत असते माग सारे
तीच तुझी भ्रांत आहे....//6//

....✍🏻
गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment