Sunday, 19 February 2017

*छत्रपती शिवाजी*

*स्पर्धेसाठी*


*छत्रपती शिवाजी*(अष्टाक्षरी)



माझा शिव छत्रपती
पुन्हा जन्मेल का सांगा,
अत्याचार दुराचार
पुन्हा संपेल का सांगा...........!1


शिवबांची किर्ती थोर
आई मिळाली जिजाई,
रक्षिण्यास स्वराज्य हे
देई आशिष शिवाई.............!2


लाख मिळाले सोबती
शुर मराठी मावळे,
छाती चिरून उरती
शुर प्रतापी मावळे.............!3


मान राखली शिवबा
धन्य तुझे उपकार,
देण्या आशिष आम्हास
तळपू दे तलवार.................!4


छत्रपती शिवराय
पुन्हा यावे ते जन्माला,
कुळ उद्धार करण्या
रक्त हे उसळण्याला..............!5


एक राजा सह्याद्रीचा
माझा छत्रपती राजा,
झेंडा भगवा घेऊन
लढे छत्रपती माझा...............!6


शिवराय होते तेव्हा
तळपली तलवार,
निघता ती म्यानातुन
होई मुघल बेजार..................!7


विडा उचलला राजे
तुम्ही स्वराज्य रक्षिणे
बळ यावे बाहुमध्ये
आहे दुश्वार जगणे.................!8

आया आणि बहीणींचे
रक्त सांडले हे इथे,
वार ते झेलण्या आता
राजे नाही कोणी इथे..............!9


पुन्हा जन्मावी जिजाऊ
अन् घडवावे शिवाला,
करू प्रतिज्ञा ती पुन्हा
वाढवू या स्वराज्यला.............!10



✍🏻गजेंद्र...
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद....

No comments:

Post a Comment