Tuesday, 21 February 2017

दिलाचा राजा घरधनी माझा

🐥🐥🐥🐥🐥🐥🐥🐥🐥🐥🐥

*स्पर्धेसाठी*


*विषय:-दिलाचा राजा घरधनी माझा*


दिलाचा राजा घरधनी माझा
आज येणार बाई गं,
*वेड्या मनाचा पारवा तनाचा*
*आज उडणार बाई गं...........//धृ//*

नऊवारी लुगडं नेसून मी
वाट तयाची बघते गं,
साजण येणार कामावरून
नटून थटून बसते गं,
*सावज फसणार जाळ्यामधी*
*मी बावरून जाणार बाई गं*
*वेड्या मनाचा पारवा तनाचा*
*आज उडणार बाई गं............//1//*

स्वप्नामंदी बाई राजसानं
दैना माझी केली गं,
ज्वानीची लई दिवसानं
इच्छा पुरी झाली गं,
*इंद्रधनूच्या रंगासारखी मी*
*रंग खेळणार बाई गं*
*वेड्या मनाचा पारवा तनाचा*
*आज उडणार बाई गं.........//2//*


चोळी बाई दाटते अंगातं
साजण आला रंगातं
खानाखुना माझ्या पाहून
बावरा झाला प्रेमातं
*नजरेच्या या खेळानं गडी*
*होईना दिलदार बाई गं*
*वेड्या मनाचा पारवा तनाचा*
*आज उडणार बाई गं...........//3//*


दिलाचा राजा घरधनी माझा
आज येणार बाई गं
*वेड्या मनाचा पारवा तनाचा*
*आज उडणार बाई गं............*
*वेड्या मनाचा पारवा तनाचा*
*आज उडणार बाई गं............*



गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद

🐥🐥🐥🐥🐥🐥🐥🐥🐥🐥🐥

No comments:

Post a Comment