****************************
*स्पर्धेसाठी*
****************************
*माझा गाव*
सुंदरशा आठवणीचे कधी मिटते का नाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//धृ//
मधोमध गावाच्या आहे मंदिर
दर्शनास उघडे राही सदा मंदिर
दर्शनाला लांब लागे रांगच रांग
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//1//
अजूनही मनात तिथे स्थान मिळते
आठवणींचे भरून तिथे दान मिळते
साधा भोळा आहे माझ्या लोकांचा भाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//2//
राजकारणात आहे तिथे दुफळी
सत्कार्यात जमा होते गावची सारी मंडळी
एक धर्म एक जात तिथे नाही दुजाभाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//3//
रस्ते ही सुंदर आहे गावातले
छोटेसे सुंदर शहर ते मनातले
भेट देऊन गावाला जातो साहेब राव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//4//
गावा मधली सारी ती लहान मुलं
गुलाबाच्या झाडावरची जसी गोड फुलं
मायेने जखमेवरचा तिथे विरून जातो घाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//5//
आनंदाने नांदे माझा गाव सारा
तंटामुक्तीचा तिथे नाही रे पहारा
भांडण होईल गावामधे असा एक मला दाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//6//
सण होतात साजरे तिथे एकाचढ एक
रंगपंचमीला रंगांची नुसती फेकाफेक
दिवाळीला उजळून जातो माझा सारा गाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//7//
दिन दलितांची नाही तिथे कुचंबणा
एकच शिकवण तिथे सर्वांना आपले म्हणा
जन्मुन येईन तिथे पुन्हा मी एकडाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//8//
एक दिवस गावासाठी झिजेन मी
मरून ही मनात त्यांच्या उरेन मी
गेल्यावर मी मागे फक्त उरेल नाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//9//
सुंदरशा आठवणींचे कधी मिटते का नाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव...
*धन्यवाद.*
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर
औरंगाबाद
****************************
*स्पर्धेसाठी*
****************************
*माझा गाव*
सुंदरशा आठवणीचे कधी मिटते का नाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//धृ//
मधोमध गावाच्या आहे मंदिर
दर्शनास उघडे राही सदा मंदिर
दर्शनाला लांब लागे रांगच रांग
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//1//
अजूनही मनात तिथे स्थान मिळते
आठवणींचे भरून तिथे दान मिळते
साधा भोळा आहे माझ्या लोकांचा भाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//2//
राजकारणात आहे तिथे दुफळी
सत्कार्यात जमा होते गावची सारी मंडळी
एक धर्म एक जात तिथे नाही दुजाभाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//3//
रस्ते ही सुंदर आहे गावातले
छोटेसे सुंदर शहर ते मनातले
भेट देऊन गावाला जातो साहेब राव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//4//
गावा मधली सारी ती लहान मुलं
गुलाबाच्या झाडावरची जसी गोड फुलं
मायेने जखमेवरचा तिथे विरून जातो घाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//5//
आनंदाने नांदे माझा गाव सारा
तंटामुक्तीचा तिथे नाही रे पहारा
भांडण होईल गावामधे असा एक मला दाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//6//
सण होतात साजरे तिथे एकाचढ एक
रंगपंचमीला रंगांची नुसती फेकाफेक
दिवाळीला उजळून जातो माझा सारा गाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//7//
दिन दलितांची नाही तिथे कुचंबणा
एकच शिकवण तिथे सर्वांना आपले म्हणा
जन्मुन येईन तिथे पुन्हा मी एकडाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//8//
एक दिवस गावासाठी झिजेन मी
मरून ही मनात त्यांच्या उरेन मी
गेल्यावर मी मागे फक्त उरेल नाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..//9//
सुंदरशा आठवणींचे कधी मिटते का नाव
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव..
आठवणीत राहिल असा आहे माझा गाव...
*धन्यवाद.*
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर
औरंगाबाद
****************************
No comments:
Post a Comment