Tuesday, 21 July 2020

[02/05, 21:24] Gjendra: *आम्ही सारस्वत समूह*
*आयोजित स्पर्धेसाठी*

*विषय:अधुरी कहाणी*
(अभंग रचना)

अधुरी कहाणी। माझ्या जीवनाची।
लाट सागराची। होऊ पाहे।।

मुरझली फुले। पहा संसाराची।
धुरा ममतेची। नसे हाती।।

अधुरी कहाणी। माझ्या आयुष्याची।
ओंजळ प्रेमाची। रीती असे।।

स्वप्न पूर्ण व्हावे। आपल्या दोघांचे।
मनोमनी साचे। बहरावे।।

उंबरठा माझा। ओलांडुनी राणी
अधुरी कहाणी। पूर्ण करी।।

जळत्या मशाली। ठेवा पेटवूनी।
गर्व हा हरूनी। जावो देवा।।

तुझ्या विन माझी। अधुरी कहाणी।
डोळा येई पाणी। रात्रंदिन।।

काळरात्र अशी। माझ्या जीवनाची।
ओल जखमांची। सदोदित।।

सुख दुःख पाहे। वेडी ती दिवाणी
अधुरी कहाणी। पूर्ण व्हावी।।


©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[02/05, 23:24] Gjendra: *गर्जा महाराष्ट्र माझा*

एक तुतारी बोलते
गर्जा महाराष्ट्र माझा
तलवारीची म्यान बोलते
गर्जा महाराष्ट्र माझा..!

हिरवे हिरवे रान बोलते
गर्जा महाराष्ट्र माझा,
शेतीतील धान बोलते
गर्जा महाराष्ट्र माझा..!

चंद्र आणि सूर्य बोलते
गर्जा महाराष्ट्र माझा,
निळे हे आकाश बोलते
गर्जा महाराष्ट्र माझा..!

तरु वेली झाड बोलते
गर्जा महाराष्ट्र माझा,
फळे आणि फुले बोलती
गर्जा महाराष्ट्र माझा..!

वीर इथला जवान बोले
गर्जा महाराष्ट्र माझा,
निधडी त्याची छाती बोलते
गर्जा महाराष्ट्र माझा..!

माता भगिनी बोलती
गर्जा महाराष्ट्र माझा,
शूर त्यांचे पुत्र बोलती
गर्जा महाराष्ट्र माझा..!

वादकांचे बोल बोलती
गर्जा महाराष्ट्र माझा,
गायकांचे स्वर बोलती
गर्जा महाराष्ट्र माझा..!

शेतकरी गर्वाने बोलतो
गर्जा महाराष्ट्र माझा,
प्रत्येक इथे मानव बोलतो
गर्जा महाराष्ट्र माझा..!


©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद.
[04/05, 16:51] Gjendra: *प्रतिभावान साहित्य समूह आयोजित*
*आजचा उपक्रम*
*विषय: चॉकलेटचा बंगला*


चॉकलेटचा बंगला
बांधला छान छान,
त्यात आई बाबा
आणि मी एक सान..!

लई लई मज्जा
तिथे येते कि राव,
तुम्ही पण या हो
खाऊ नका भाव..!

छोटीशी ओसरी
समोर मी केली,
बसायला छान छान
पाटं सजविली..!

चॉकलेटचा बंगला
दिमाखात सजला,
फुलांचा तिथे मी
छान बाग ही लावला..!

समोर काळ्या मातीत
बियाणे लावीयली,
छोटी छोटी झाडे
अन् विहीर पण केली..!

चॉकलेटचा बंगला
बांधून हो झाला,
चला कि गडयांनो
आता तिथे खेळायळा..!


©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२४७१४०११ औरंगाबाद
[04/05, 18:00] Gjendra: *आयुष्याला सावरावे*

सुखात दुःखाला विसरताना
गोड क्षणांना वेचून घ्यावे,
उरलेल्या त्या आठवणींनी
थोडेसे आयुष्याला सावरावे..!

वेदनांचा भार सगळा आता
स्वत:वरती उचलून घ्यावा,
भोगताना या सुख दुःखाना
दुसऱ्याला ही आधार द्यावा..!

सुख दुःखाच्या तुफान लाटा
आयुष्याला छळती फार,
वर्दळीच्या त्या निखारी वाटा
दुःखी मनावर सोडती धार..!

जग सारे हे तहानलेले आहे
भुकेले असते हो प्रेमाविना,
भेटतील जीवनात खूप सारे
आयुष्य आपुले हे सावरताना..!

घरकुल सगळ्यांचे सुंदर असते
सुख दुःखाच्या लाटा येती जाती,
आयुष्याचे खडतर मार्ग चालता
अग्नीच्या निखारे हि फुले होती..!

©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[05/05, 03:52] Gjendra: आम्ही सारस्वत समूह
आयोजित स्पर्धेसाठी

विषय: जरा ऐकून घे
(काव्यांजली रचना)


प्रिये सखे,
जरा ऐकून घे,
फिर माघे,
हृदयात..!

स्वप्नात तू,
नेहमीच माझ्या असते,
हृदयात स्मरते,
माझिया..!

वेड्या मना,
प्रेमाचा नाद खुळा,
जीव भोळा,
होतसे..!

प्रेम वेडे,
नसते कधीच मित्रा,
वेड्यांची जत्रा,
असते.!

प्रेम फुले,
बहरत जाती आयुष्य,
प्रेमाचे भाष्य,
खुलते..!

माझ्या मना,
जरा ऐकून घे,
आपण दोघे,
प्रेमवेडे..!

एक वचन,
प्रेमाचे ठेवते भान,
करी सन्मान,
भावनांचा..!

©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[05/05, 16:54] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय- दीप*

दीप ज्ञानाचा,
दीप प्रकाशाचा,
दीप परिवर्तनाचा..!

दीप समानतेचा,
दीप शांततेचा,
दीप कर्तव्याचा..!

दीप नाविन्याचा,
दीप शालीनतेचा,
दीप मानवतेचा..!

दीप ममतेचा,
दीप वात्सल्याचा,
दीप प्रेमाचा..!

दीप क्षमतेचा
दीप शौर्याचा,
दीप ध्येर्याचा..!

दीप शक्तीचा
दीप भक्तीचा
दीप अस्तिवाचा...!


©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११,औरंगाबाद
[06/05, 13:53] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय: जय शिवराय*


माता जिजाईची। पुण्याई ती थोर।
शहाजींचे पोर। जन्मा येई।।

अन्याय पाहुनी। नवस बोलीयला।
पुत्र दे पोटाला। हे शिवाई।

चहूकडे फार। दुराचार झाला।
यातना डोळ्याला। होत राही।।

मोगल निजाम। माजुनिया गेले।
मातेने पाहिले। स्वलोचणी।

टेकविला माथा। शिवाई चरणी।
पुत्राची मागणी। करू पाहें।।

पावन मातीत। जन्मे शिवराय।
दुधावर साय। देखीयली।।

शहाजी पुत्राने। हल्ला चढविला।
किल्ला लढविला। स्वराष्ट्राचा।।

थोर असे माझे। जय शिवराय।
वर्णू आता काय। गाथा त्यांची।।


©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११,औरंगाबाद
[07/05, 22:28] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:नमो बुद्धाय*


नमो बुद्धाय
नमो बुद्धाय.
वंदावी वंदना
नमो बुद्धाय..!

ही त्यागमूर्ती
ही ईश्वरमूर्ती,
देवतांची कृती
नमो बुद्धाय..!

करूनी याचना
ईश्वरा प्रार्थना
करूया वंदना
नमो बुद्धाय..!

जाई ईश्वरा शरण
धम्म धर्म धारण,
करूया पारायण
नमो बुद्धाय..!

त्याग संसाराचा
महा पामराचा,
शोक सागराचा
नमो बुद्धाय..!

©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो९६२४७१४०११ औरंगाबाद
[08/05, 22:33] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:माझी लेखणी*



धार अस्तित्वाची
माझ्या लेखणीला,
महत्त्व लेखणीचे
माझ्या अस्तित्वाला..!

प्राण बनली आहे
माझा ही लेखणी,
जीवन गाणे माझे
गाते हीच लेखणी..!

श्वास माझा तिच्यात
भिनतोय दिवसेंदिवस,
एकरूप आम्ही दोघे
होतोय दिवसेंदिवस..!

आर्त भावनांचे माझ्या
गाठोडे ही लेखणी,
बांधुनी माझे शब्द
त्यात ठेवते लेखणी..!

सुचता अनमोल शब्द
माझी चालते लेखणी,
वहीच्या पाणावरती
जाते उमटत लेखणी..!

वंदनिय माझी सदा
बहरत राहो लेखणी,
हृदयात सदोदित माझ्या
अंकुरत राहो लेखणी..!


©️गजेंद्र ढवळापुरीकर
९६२३७१४०११ औरंगाबाद
[09/05, 16:36] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय: पैसा*

मित्र वाटतो रे पैसा
कधी मज दुष्मन जैसा,
त्याच्याच जिवावरी
मी उड्या मारी कैसा..!

पैशाने वाढते किंमत
पैशांने येते रे हिंमत,
पैशाच्या या मोहापायी
कधी होई पहा अंत..!

पैशाने जवळ ही नाती
आपोआप बघा येती,
पैसा हा संपुनी जाता
नाती दूर दूरच दुरावती..!

चोरी लबाडीचा तो
पैसा असतो काळा,
तोच वाचवण्यासाठी
सरकार खेळतं शाळा..!

पैशात नको रे मोजू
माणसा अनमोल नाती,
पैशाच्या हव्यासापायी
जखमा खोल खोल होती..!


©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[09/05, 19:01] Gjendra: *गरिबी*

गरिबी हृदयात माझ्या अजून जळते आहे,
आठराविश्वे दारिद्र्याची झळ मिळते आहे..!

शृंगार करावा किमतीचा सद्यस्थिती ऐसी नाही,
काटे निखारी गरिबीचे नित्य टोचते आहे..!

खावे रोज पाचीपक्वान्न नाही असे घर माझे
शिळ्या भाकरीची मज किंमत कळते आहे..!

राहणे पत्र्याच्या खोलीत पेहराव ही साधासा,
बंगल्याच्या आवरातले ते सुख दिसते आहे..!

पायात नाही पायताने भर उन्हात राबताना,
गरिबीची रुतणारी सल आर्त सलते आहे..!

या पाखरांनो उडत घर सांभाळून घ्या माझे,
दुःख गरिबीचे आपल्या पाचवीला पुंजले आहे..!

गरिबीच्या संसारामधे आधार माणुसकीचा,
किंमत धनाची आज अविरत कळते आहे..!


©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२४७१४०११ औरंगाबाद
[10/05, 11:21] Gjendra: *कवितेच्या जगात साहित्य समूह*
*आयोजित उपक्रमासाठी*

*विषय: आता विसाव्याचे क्षण*


आता विसाव्याचे क्षण
परतून येणार नाहीत,
झाडाखाली थांबलेले
दिवस कळणार नाही..!

शांत भावनांचा विसावा
हृदयात थांबून राही,
विरह वेदनेचा छळ
मनात कोंडून राही..!

विसावा मिळेल अशी
आशा मनात आहे,
तुझ्या भावनांचे प्रेम
हृदयाच्या कणात आहे..!

तुझं आणि माझं नातं
दोघांवर अवलंबून आहे.
एकत्र घालवलेले क्षण
माझ्या मनात दाटून आहे..!

एकमेकांना देऊ आपण
आता विसाव्याचे क्षण,
दोघांच्या अंतरात पाहिजे
काळजी घेणारे सुंदर मन..!


©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[10/05, 12:18] Gjendra: *साहित्य संस्कृती समूह*
*आयोजित स्पर्धेसाठी*

*विषय: तूझं माझं जमेना*


विरह आला दोघांमध्ये
आणि प्रेम गेलं विकोपाला,
तुझं माझं जमेना म्हणून
सोडण्याचा निर्णय झाला..!

एकच स्वप्न पाहिले होते
हसत खेळत जगायचे,
दुर्गुण सोडून दोघांनीही
मन एकमेकांचे जपायचे..!

हवे प्रेमाचे क्षण काही
आयुष्य हे घालवाया
साथी नसेल मनासारखा
अर्थ नाही जीवन जगाया..!

सोडून रुसवे फुगवे सारे
हात घालू काळजाला,
प्रतिमा ठेऊ जपून हृदयी
दूर करण्या या विरहाला..!

सल्ले मसलत खूप झाले
तुझं माझं काही जमेना,
क्षणात येऊन जाई दुरावा
प्रेमांकुर अधुरे तुझ्या विना..!



©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[10/05, 13:35] Gjendra: *प्रतिभावान साहित्य समूह*
*आयोजित उपक्रमासाठी*


*विषय: आई*


आई आहे सुंदर
या विश्वाचे रूप,
माया आणि ममतेने
मायाळू असे खूप..!

आई वात्सल्याची
खळखळती धारा
देवानांनी हेवा वाटे
असा प्रेम निवारा..!

आई या जगाची
अतूट आहे वेल,
वाढत राही सदा
दैवाचा हा खेळ..!

आई आहे अमृत
आहे गोडी मधाची,
किती चाखावी चव
या चविष्ट अमृताची..!

आई पान्हा सुखाचा
ओठांवरती फुटावा,
जन्मोजन्मी माझी
आई ची घडो सेवा..!


©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[10/05, 19:56] Gjendra: *आम्ही सारस्वत समूह*
*आयोजित स्पर्धेसाठी*

*विषय: आई तुझे रूप*


आई तुझे रूप
अथांग सागर,
भरुनी वाहते
मायेची घागर..!

वात्सल्य ममता
तुझ्या हृदयात,
माझ्या सुखासाठी
घाव काळजात..!

आई विना देव
बनला भिखारी,
आई प्रेमासाठी
पुंडलिक वारी..!

आई तुझे प्रेम
करुणा शीतल
माझ्या दुःखात
चांदणं शिंपल..!

जन्म मानवाचा
आईचा आहेर,
आहे रे माणसा
जगाचे माहेर..!

नाते ममत्वाचे
आईचे लेकरू
दया क्षमा शांती
भासते वासरू..!

कसे उतराई
होऊ मी सांगना,
तुझे उपकार
फिटता फिटेना..!


©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२४७१४०११ औरंगाबाद

No comments:

Post a Comment