[11/05, 11:28] Gjendra: *प्रतिभावान साहित्य समूह*
*आयोजित उपक्रम*
*विषय: एक कप चहा*
सकाळी सकाळी हवा
फक्त एक कप चहा,
दिवसभराच्या कामासाठी
तंदृस्त ताजेतवाने व्हा..!
एक कप चहाने मिळते
व्हिटॅमिन या शरीराला,
आळस दुर पळून जातो
माणूस जागतो कराराला..!
एक कप चहा पिऊन
मस्तक होते हलके,
ताण तणाव दूर होतो
अन् हृदय स्पंदन धडके..!
एक कप चहा घेऊन
कात सोडी हे शरीर,
नव्याने लागे कामाला
नसते कसली फिकीर...!
एक कप चहाला आहे
प्रेम प्रकरणात महत्त्व,
प्रेमयुगुल जपत राहते
प्रेमामधले महान सत्व..!
एक कप चहा करतो
चार चौघामधे मानसन्मान,
कसाही असो गोड फिका
ठेवत राही अतिथिंची जाण..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[12/05, 11:22] Gjendra: *कवितेच्या जगात समहू*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:माणुसपणाला थारा द्या*
जीवन हे क्षणभंगूर आहे
अहंपणाला वारा द्या,
एकदाच मिळतो मानव जन्म
माणुसपणाला थारा द्या..!
पापाच्या जीर्ण यादीमधला
खोडून टाका वैरभाव,
आपण असतो कारणीभूत
जिथे असतो दुजाभाव..!
सुख दुःखाचे येणे जाणे
हा नियतीचा खेळ सारा,
लाचारीचे सोडा रे जगणे
समजून घ्या दैवाचा इशारा..!
माणसाने जन्माला यावे
माणूसपण समजूनी घ्यावे,
उपकार करा दुसऱ्यावरती
द्या सोडूनी सारे हेवे दावे..!
श्वास आज आहे उद्या नाही
कालचक्र हे फिरत राहते,
माणूसपणाला थारा द्या हो
तेव्हा आयुष्याचे महत्त्व कळते..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[12/05, 11:45] Gjendra: *प्रतिभावान साहित्य समूह* *आयोजित उपक्रमासाठी*
*विषय: माझे बाबा*
बाबा माझे खासच होते
खासच त्यांचा रूबाब होता,
साऱ्या गावामध्ये माझा
बापच एक नबाब होता..!
घरामध्ये बाबांचा असे
मनमुरादपणाने वावर,
आम्ही मात्र जगायचो
दडपण ठेऊन स्वतःवर..!
क्रोध असायचा वरवरचा
हृदय मात्र कोमल होते,
कळलाच नाही बाबा मजला
हे एकच मोठे नवल होते..!
कारण ही बघा तसेच आहे
बाबा एकविस वर्षांपूर्वीच गेला,
इथेच ठेऊन राग लोभ मोह
या अनंतात विलीन झाला..!
सोडून संसार अर्ध्यावरती
बाबा तुम्ही निघूनी गेलात,
आईची तर सोडुनी साथ
पोरके आम्हा करूनी गेलात..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[13/05, 07:04] Gjendra: *प्रतिभावान साहित्य समूह*
*आयोजित उपक्रमासाठी*
*विषय: मी प्रतिभावान*
मी आहे प्रतिभावान कवितेच्या जगी
मन मला म्हणतं असं बोलू नको उगी
अगोदर वाचन लेखन अभ्यास कर
कारण असे कवी खूप आहेत या जगी..!
वाचन आणि अभ्यास केल्यानंतर
उजळेल तुझ्या प्रतिभेची शक्ती,
नुसते शब्दाला शब्द जोडून वेड्या
कवितेच्या जगात मिळत नाही मुक्ती..!
तुझं मन मोकळं होत असेल खरं पण
जगाला तुझं लिखाण आवडायला हवं,
तू लिहिलेल्या कविता लेख कथांमधून
तूझ्या प्रतिभेचं दर्शन आधी घडायला हवं..!
मी नाही प्रतिभावान कळलंय मजला
कारण अजून खूप शिकायचे आहे मला,
कवितेच्या या अथांग महासागरामध्ये
एक दिवस चिंब चिंब व्हायचे आहे मला..!
नुसतं लिहीत राहणं त्याला किंमत नाही
अभ्यासपूर्ण घडत रहावं त्यातून काही,
प्रतिभा तुझी उजळेल खरी एक दिवस
मन देईल प्रतिभावान असण्याची ग्वाही..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[13/05, 10:40] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय: नाते* (पिरॅमिड रचना)
हे
नाते
*चंचल*
तुझे माझे
*आहे प्रबळ*
नित्याचा वाहतो
*हा झरा खळखळ..!*
घे
आज
*हृदयी*
आहे जाण
*लाव समई*
जागुदे भावना
*वाजवून सनई*
दे
श्वास
*थोडासा*
घेऊनिया
*एक उसासा*
स्वप्नात जागतो
*नवा नवा दिलासा*
हा
रंग
*बावरा*
खास दिसे
*रूप सुंदरा*
आपल्या नात्यांचा
*अनुपम सोयरा*
ये
जरा
*लाडात*
या प्रीतीच्या
*सोनसागरात*
सोड मोह माया
*जाई नाते अंबरात*
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[13/05, 14:00] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रमासाठी*
*विषय:अलांकर*
अलंकार शृंगाराची किमया
शोभा वाढवते शरीराची,
दागिने नसणे जवळ आपल्या
जशी रिकामी झोळी फकिराची..!
स्त्रीया करती जेव्हा शृंगार
नथ बुगडी पैंजण मंगळसूत्र
दिसतो अलंकारीक पणा मुखावर
त्यांची जवळीक वाढत जाते मात्र..!
अलंकार आहे शोभा गळ्याची
उत्सव समारंभ आणि सोहळ्याची,
अशी अनेक अलंकाराची महत्व
जपून ठेवावी आपल्या हृदयाशी..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[14/05, 18:43] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित सुशिला आतूच्या* *वाढदिवसानिमित्ताने कविता*
सांगना आतु तू एवढी कशी चांगली
तुझ्यामुळे माझी गं लेखणी झिंगली
तू करतेस सर्वांशी मनमोकळा संवाद
तू चंचल मनाची यास काही ना अपवाद
या मंचावर सर्वांशी तुझी गट्टी जमली
तुझ्यामुळे माझी गं लेखणी झिंगली..!
लिखाण तुझं आतु असतं बहारदार
प्रत्येक वाक्ये सजती करूनी शृंगार
या लेखनप्रवासात सारेजण गुंगली
तुझ्यामुळे माझी गं लेखणी झिंगली..!
भेट व्हावी तुझी एकदा आहे मनी आस
तुझ्या आशिर्वादाने लेखणी घेईल श्वास
मान माझी तुजपुढे शत शत नमली
तुझ्यामुळे माझी गं लेखणी झिंगली..!
मार्गदर्शन लाभो तुझं आहे माझी कामना
लेखणीला मिळो बळ हिच एक याचना
आतु माझी खास ही गोष्ट मनी बिंबली
तुझ्यामुळे माझी गं लेखणी झिंगली..!
स्मितहास्य असो सदा तुझ्या मुखकमळी
बहरो नित्य तुझ्या स्पर्शाने काव्याच्या ओळी
आशिर्वादाने तुझ्या कविता ओथंबली
तुझ्यामुळे माझी गं लेखणी झिंगली..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[14/05, 22:21] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय: स्वराज्य रक्षक संभाजी महाराज*
*स्वराज्य रक्षक संभाजी*
छत्रपती संभाजी महाराज
होते शुरवीर महापराक्रमी,
मुगलांची घौडदौड रोखून
पळताभुई थोडी केली त्यांनी..!
स्वराज्य हे वाचविण्यासाठी
केला मोठा महासंग्राम,
अन् फडकविले या भूमीवरती
शौर्याने भगव्याचे निशाण..!
छत्रपती संभाजी महाराज
सिंहाचा छावा कणखर,
शिवबांचे राज्य चालविण्या
त्यांनी कसली होती कंबर..!
शत्रू होते घरात तरीही
ना डगमगले संभाजी राजे,
तुटून पडता दुष्मणावरती
तलवार सपसप ती वाजे..!
एकच हा वीर मराठ्यांचा
नाव जगात आजही गाजते,
न झाला न होणार कधी ही
छत्रपती संभाजी तुतारी बोलते..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[16/05, 20:10] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*माझी आवडती व्यक्ती*
*माझी आई*
आई आई सांगना तू
एवढी सहनशील कशी,
मी पाहिलंय कितीदा तुला
तू रहायचीस गं उपाशी..!
आई आमच्यासाठी तू
किती किती उपसलेस कष्ट,
तुझ्या अपार मेहनतीची
गाथा होऊ देणार नाही नष्ट..!
आई तुझं झिजणं कठीण
होतं गं बाबांच्या मृत्यूनंतर,
श्वास असो तुझ्या चरणांशी
तुला कधीच नाही देणार अंतर..!
पदराखाली झाकून जेव्हा
तू आणायचीस शिळंपातं,
अमृताहूनी ते गोड आई
जसं पाची पकव्वान्न होतं..!
आठवतात होऊन गेलेल्या
जेव्हा त्या जुन्या आठवणी,
आपसूकच आई माझ्या गं
डोळ्यात दाटून येते पाणी..!
आई तुझ्या चरणांशी माझा
देह सदा झुकूनी असो
देवापेक्षाही श्वासात माझ्या
तुझे अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसो..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[16/05, 20:44] Gjendra: *प्रतिभावान साहित्य समूह*
*आयोजित आजचा उपक्रम*
*विषय:राजा राणीचा संसार*
किती चांगला किती चांगला
फुलला राजा राणीचा संसार..!
झाल्या भेटी जुळल्या गाठी
नाव प्रीतीचे आले या ओठी
प्रीत मनीची करीतसे संचार,
फुलला राजा राणीचा संसार..!
पतिपत्नीचे मिलन ते घडते
वेल वंशाची ती गगनी चढते
दैव प्रीतीची ऐकतसे पुकार,
फुलला राजा राणीचा संसार..!
एकमेकांच्या साथीने पावन
फुलून अलवार येते सहजीवन
हा आयुष्याचा उजळला अंधार
फुलला राजा राणीचा संसार..!
स्वमधुर स्वरांची ती येते वाणी
प्रेमगीत गातात राजा नी राणी
प्रेम जुळते हे अपूर्व अपरंपार
फुलला राजा राणीचा संसार..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[16/05, 21:39] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:कहाणी जिवाभावाची*
माझी आवडती व्यक्ती
माझा जवळचा मित्र होती,
आज मिळाला उजाळा
आठवणी त्या छळून जाती..!
सकाळी उठल्यापासून
आम्ही असायचो सोबत,
इकडून तिकडे तिकडून इकडे
वेड्या सारखे रमतगमत..!
खाणे पिणे सोबत होते
सगळं काही रोखठोक,
कधी तो माझ्यावर आणि
कधी मी त्याच्यावर मारी जोक..!
माझ्या आवडीची गोष्ट
तो गोड मानून घ्यायचा,
माझ्या होकाराला तोच
नेहमी हो ला हो द्यायचा..!
आज माहीत नाही तो
कुठे आणि कसा असेल,
त्याचा तो प्रेमळ चेहरा
देव जाणे कधी दिसेल..!
देवा खुश ठेव त्याला नेहमी
हीच तुझ्या चरणी याचना,
एकदा भेट व्हावी आयुष्यात
तुझ्याकडे हात जोडून प्रार्थना..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[17/05, 11:29] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:दीपमाळ*
वंशाचा दिप घरात माझा
जन्मास आला होऊन राजा..
त्याच्या स्वागताला सारा परिवार
मांडून घेई विधिवत पूजा..!
घरात नविन वाजेल पाऊल
आनंदाचा खुशीचा क्षण येईल,
सान थोर मंडळी चहूकडे
वंश वेलीला उजाळा देईल..!
मुलगा असो वा असो मुलगी
वंशवेल जाईल ती गगनावरी,
वाढून सुंदर तिचा वृक्ष होईल
गोड गोमटे फळे येतील सारी..!
अशी दीपमाळ वंशाची माझ्या
जन्मोजन्मी वाढत राहो,
हृदयास अंकुर सतत फुटावे
वेल नात्यांची उमलत जावो..!
©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[17/05, 18:02] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय: जरा बोलावसं वाटतं*
तुझ्या चिंब भावनांचा
मी घेतलाय कानोसा,
उंबरठ्यावर सदा उभी
देत घेत प्रेमाचा वसा.
अश्रू निघतात जेव्हा
माझ्या डोळ्यामधुनी,
जरा बोलावसं वाटतं
तुला नजरेमधे ठेवुनी.
एक आस आहे मनी
तुझ्या प्रेमात पडायची
नित्य प्राणास माझ्या
श्वासात श्वास भरायची.
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[17/05, 20:48] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मचं*
*आयोजित उपक्रम*
*विषय : कुंकू*
कुंकू हे सौभाग्यवतीचं दान
तिला सौभाग्याचे वरदान,
सतीच्या पावितत्र्याचं सदा
तिच्या मुखी असे गुणगान..!
चारचौघांच्या साक्षीने येते
सोडून मतापित्याचे घरदार,
कुंकू लावूनिया भाळावरती
एकनिष्ठ करी पतीचा संसार..!
कुंकू हे प्रतीक सुवाशिणीचं
आहे शालीनतेचा महान वसा,
दिसते रूपसूंदरी कुंकूवाने
आहे पावित्र्याचा स्वच्छ आरसा..!
असे छान लाल रंग कुंकवाचा
दिसते खुलून सौंदर्य तिचे,
कुंकवाच्या रक्षणासाठी बघा
ठोठावते दार हिमतीने स्वर्गाचे..!
देवालाही वेठीस धरण्याचे
असे असते महान तिचे पुण्य,
तिला जन्मास घालून धरतींवर
ईश्वर ही बघा इथे होतो धन्य..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[17/05, 21:46] Gjendra: *कवितेच्या जगात समूह*
*आयोजित उपक्रम*
*विषय:गोकुळावाणी माझं घर*
माझं घर गोकुळावाणी
आहे प्रेमाची निशाणी
जिवलग नातलग सारे
गातात प्रीतीची गाणी...
माझं घर गोकुळावाणी..!
घरात माझ्या हसरे तारे
सदा वाहती आनंदी वारे,
वाहे सुखाची नदी भरूनी
खळखळ जसे झऱ्याचे पाणी
माझं घर गोकुळावाणी..!
आई आजी आणिक बाबा
सुख दुःखात पाठीशी उभा
क्षण सुखाचे उमटतील रानी
गळ्यात सुमधुर भिनते गाणी
माझं घर गोकुळावाणी..!
साथ एकमेकांची मिळते
घर त्याने आनंदात असते
नाम मुखी रामकृष्ण वाणी
करीत असता दिवेलागणी
घर माझं गोकुळावाणी..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
*आयोजित उपक्रम*
*विषय: एक कप चहा*
सकाळी सकाळी हवा
फक्त एक कप चहा,
दिवसभराच्या कामासाठी
तंदृस्त ताजेतवाने व्हा..!
एक कप चहाने मिळते
व्हिटॅमिन या शरीराला,
आळस दुर पळून जातो
माणूस जागतो कराराला..!
एक कप चहा पिऊन
मस्तक होते हलके,
ताण तणाव दूर होतो
अन् हृदय स्पंदन धडके..!
एक कप चहा घेऊन
कात सोडी हे शरीर,
नव्याने लागे कामाला
नसते कसली फिकीर...!
एक कप चहाला आहे
प्रेम प्रकरणात महत्त्व,
प्रेमयुगुल जपत राहते
प्रेमामधले महान सत्व..!
एक कप चहा करतो
चार चौघामधे मानसन्मान,
कसाही असो गोड फिका
ठेवत राही अतिथिंची जाण..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[12/05, 11:22] Gjendra: *कवितेच्या जगात समहू*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:माणुसपणाला थारा द्या*
जीवन हे क्षणभंगूर आहे
अहंपणाला वारा द्या,
एकदाच मिळतो मानव जन्म
माणुसपणाला थारा द्या..!
पापाच्या जीर्ण यादीमधला
खोडून टाका वैरभाव,
आपण असतो कारणीभूत
जिथे असतो दुजाभाव..!
सुख दुःखाचे येणे जाणे
हा नियतीचा खेळ सारा,
लाचारीचे सोडा रे जगणे
समजून घ्या दैवाचा इशारा..!
माणसाने जन्माला यावे
माणूसपण समजूनी घ्यावे,
उपकार करा दुसऱ्यावरती
द्या सोडूनी सारे हेवे दावे..!
श्वास आज आहे उद्या नाही
कालचक्र हे फिरत राहते,
माणूसपणाला थारा द्या हो
तेव्हा आयुष्याचे महत्त्व कळते..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[12/05, 11:45] Gjendra: *प्रतिभावान साहित्य समूह* *आयोजित उपक्रमासाठी*
*विषय: माझे बाबा*
बाबा माझे खासच होते
खासच त्यांचा रूबाब होता,
साऱ्या गावामध्ये माझा
बापच एक नबाब होता..!
घरामध्ये बाबांचा असे
मनमुरादपणाने वावर,
आम्ही मात्र जगायचो
दडपण ठेऊन स्वतःवर..!
क्रोध असायचा वरवरचा
हृदय मात्र कोमल होते,
कळलाच नाही बाबा मजला
हे एकच मोठे नवल होते..!
कारण ही बघा तसेच आहे
बाबा एकविस वर्षांपूर्वीच गेला,
इथेच ठेऊन राग लोभ मोह
या अनंतात विलीन झाला..!
सोडून संसार अर्ध्यावरती
बाबा तुम्ही निघूनी गेलात,
आईची तर सोडुनी साथ
पोरके आम्हा करूनी गेलात..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[13/05, 07:04] Gjendra: *प्रतिभावान साहित्य समूह*
*आयोजित उपक्रमासाठी*
*विषय: मी प्रतिभावान*
मी आहे प्रतिभावान कवितेच्या जगी
मन मला म्हणतं असं बोलू नको उगी
अगोदर वाचन लेखन अभ्यास कर
कारण असे कवी खूप आहेत या जगी..!
वाचन आणि अभ्यास केल्यानंतर
उजळेल तुझ्या प्रतिभेची शक्ती,
नुसते शब्दाला शब्द जोडून वेड्या
कवितेच्या जगात मिळत नाही मुक्ती..!
तुझं मन मोकळं होत असेल खरं पण
जगाला तुझं लिखाण आवडायला हवं,
तू लिहिलेल्या कविता लेख कथांमधून
तूझ्या प्रतिभेचं दर्शन आधी घडायला हवं..!
मी नाही प्रतिभावान कळलंय मजला
कारण अजून खूप शिकायचे आहे मला,
कवितेच्या या अथांग महासागरामध्ये
एक दिवस चिंब चिंब व्हायचे आहे मला..!
नुसतं लिहीत राहणं त्याला किंमत नाही
अभ्यासपूर्ण घडत रहावं त्यातून काही,
प्रतिभा तुझी उजळेल खरी एक दिवस
मन देईल प्रतिभावान असण्याची ग्वाही..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[13/05, 10:40] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय: नाते* (पिरॅमिड रचना)
हे
नाते
*चंचल*
तुझे माझे
*आहे प्रबळ*
नित्याचा वाहतो
*हा झरा खळखळ..!*
घे
आज
*हृदयी*
आहे जाण
*लाव समई*
जागुदे भावना
*वाजवून सनई*
दे
श्वास
*थोडासा*
घेऊनिया
*एक उसासा*
स्वप्नात जागतो
*नवा नवा दिलासा*
हा
रंग
*बावरा*
खास दिसे
*रूप सुंदरा*
आपल्या नात्यांचा
*अनुपम सोयरा*
ये
जरा
*लाडात*
या प्रीतीच्या
*सोनसागरात*
सोड मोह माया
*जाई नाते अंबरात*
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[13/05, 14:00] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रमासाठी*
*विषय:अलांकर*
अलंकार शृंगाराची किमया
शोभा वाढवते शरीराची,
दागिने नसणे जवळ आपल्या
जशी रिकामी झोळी फकिराची..!
स्त्रीया करती जेव्हा शृंगार
नथ बुगडी पैंजण मंगळसूत्र
दिसतो अलंकारीक पणा मुखावर
त्यांची जवळीक वाढत जाते मात्र..!
अलंकार आहे शोभा गळ्याची
उत्सव समारंभ आणि सोहळ्याची,
अशी अनेक अलंकाराची महत्व
जपून ठेवावी आपल्या हृदयाशी..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[14/05, 18:43] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित सुशिला आतूच्या* *वाढदिवसानिमित्ताने कविता*
सांगना आतु तू एवढी कशी चांगली
तुझ्यामुळे माझी गं लेखणी झिंगली
तू करतेस सर्वांशी मनमोकळा संवाद
तू चंचल मनाची यास काही ना अपवाद
या मंचावर सर्वांशी तुझी गट्टी जमली
तुझ्यामुळे माझी गं लेखणी झिंगली..!
लिखाण तुझं आतु असतं बहारदार
प्रत्येक वाक्ये सजती करूनी शृंगार
या लेखनप्रवासात सारेजण गुंगली
तुझ्यामुळे माझी गं लेखणी झिंगली..!
भेट व्हावी तुझी एकदा आहे मनी आस
तुझ्या आशिर्वादाने लेखणी घेईल श्वास
मान माझी तुजपुढे शत शत नमली
तुझ्यामुळे माझी गं लेखणी झिंगली..!
मार्गदर्शन लाभो तुझं आहे माझी कामना
लेखणीला मिळो बळ हिच एक याचना
आतु माझी खास ही गोष्ट मनी बिंबली
तुझ्यामुळे माझी गं लेखणी झिंगली..!
स्मितहास्य असो सदा तुझ्या मुखकमळी
बहरो नित्य तुझ्या स्पर्शाने काव्याच्या ओळी
आशिर्वादाने तुझ्या कविता ओथंबली
तुझ्यामुळे माझी गं लेखणी झिंगली..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[14/05, 22:21] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय: स्वराज्य रक्षक संभाजी महाराज*
*स्वराज्य रक्षक संभाजी*
छत्रपती संभाजी महाराज
होते शुरवीर महापराक्रमी,
मुगलांची घौडदौड रोखून
पळताभुई थोडी केली त्यांनी..!
स्वराज्य हे वाचविण्यासाठी
केला मोठा महासंग्राम,
अन् फडकविले या भूमीवरती
शौर्याने भगव्याचे निशाण..!
छत्रपती संभाजी महाराज
सिंहाचा छावा कणखर,
शिवबांचे राज्य चालविण्या
त्यांनी कसली होती कंबर..!
शत्रू होते घरात तरीही
ना डगमगले संभाजी राजे,
तुटून पडता दुष्मणावरती
तलवार सपसप ती वाजे..!
एकच हा वीर मराठ्यांचा
नाव जगात आजही गाजते,
न झाला न होणार कधी ही
छत्रपती संभाजी तुतारी बोलते..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[16/05, 20:10] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*माझी आवडती व्यक्ती*
*माझी आई*
आई आई सांगना तू
एवढी सहनशील कशी,
मी पाहिलंय कितीदा तुला
तू रहायचीस गं उपाशी..!
आई आमच्यासाठी तू
किती किती उपसलेस कष्ट,
तुझ्या अपार मेहनतीची
गाथा होऊ देणार नाही नष्ट..!
आई तुझं झिजणं कठीण
होतं गं बाबांच्या मृत्यूनंतर,
श्वास असो तुझ्या चरणांशी
तुला कधीच नाही देणार अंतर..!
पदराखाली झाकून जेव्हा
तू आणायचीस शिळंपातं,
अमृताहूनी ते गोड आई
जसं पाची पकव्वान्न होतं..!
आठवतात होऊन गेलेल्या
जेव्हा त्या जुन्या आठवणी,
आपसूकच आई माझ्या गं
डोळ्यात दाटून येते पाणी..!
आई तुझ्या चरणांशी माझा
देह सदा झुकूनी असो
देवापेक्षाही श्वासात माझ्या
तुझे अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसो..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[16/05, 20:44] Gjendra: *प्रतिभावान साहित्य समूह*
*आयोजित आजचा उपक्रम*
*विषय:राजा राणीचा संसार*
किती चांगला किती चांगला
फुलला राजा राणीचा संसार..!
झाल्या भेटी जुळल्या गाठी
नाव प्रीतीचे आले या ओठी
प्रीत मनीची करीतसे संचार,
फुलला राजा राणीचा संसार..!
पतिपत्नीचे मिलन ते घडते
वेल वंशाची ती गगनी चढते
दैव प्रीतीची ऐकतसे पुकार,
फुलला राजा राणीचा संसार..!
एकमेकांच्या साथीने पावन
फुलून अलवार येते सहजीवन
हा आयुष्याचा उजळला अंधार
फुलला राजा राणीचा संसार..!
स्वमधुर स्वरांची ती येते वाणी
प्रेमगीत गातात राजा नी राणी
प्रेम जुळते हे अपूर्व अपरंपार
फुलला राजा राणीचा संसार..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[16/05, 21:39] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:कहाणी जिवाभावाची*
माझी आवडती व्यक्ती
माझा जवळचा मित्र होती,
आज मिळाला उजाळा
आठवणी त्या छळून जाती..!
सकाळी उठल्यापासून
आम्ही असायचो सोबत,
इकडून तिकडे तिकडून इकडे
वेड्या सारखे रमतगमत..!
खाणे पिणे सोबत होते
सगळं काही रोखठोक,
कधी तो माझ्यावर आणि
कधी मी त्याच्यावर मारी जोक..!
माझ्या आवडीची गोष्ट
तो गोड मानून घ्यायचा,
माझ्या होकाराला तोच
नेहमी हो ला हो द्यायचा..!
आज माहीत नाही तो
कुठे आणि कसा असेल,
त्याचा तो प्रेमळ चेहरा
देव जाणे कधी दिसेल..!
देवा खुश ठेव त्याला नेहमी
हीच तुझ्या चरणी याचना,
एकदा भेट व्हावी आयुष्यात
तुझ्याकडे हात जोडून प्रार्थना..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[17/05, 11:29] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:दीपमाळ*
वंशाचा दिप घरात माझा
जन्मास आला होऊन राजा..
त्याच्या स्वागताला सारा परिवार
मांडून घेई विधिवत पूजा..!
घरात नविन वाजेल पाऊल
आनंदाचा खुशीचा क्षण येईल,
सान थोर मंडळी चहूकडे
वंश वेलीला उजाळा देईल..!
मुलगा असो वा असो मुलगी
वंशवेल जाईल ती गगनावरी,
वाढून सुंदर तिचा वृक्ष होईल
गोड गोमटे फळे येतील सारी..!
अशी दीपमाळ वंशाची माझ्या
जन्मोजन्मी वाढत राहो,
हृदयास अंकुर सतत फुटावे
वेल नात्यांची उमलत जावो..!
©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[17/05, 18:02] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय: जरा बोलावसं वाटतं*
तुझ्या चिंब भावनांचा
मी घेतलाय कानोसा,
उंबरठ्यावर सदा उभी
देत घेत प्रेमाचा वसा.
अश्रू निघतात जेव्हा
माझ्या डोळ्यामधुनी,
जरा बोलावसं वाटतं
तुला नजरेमधे ठेवुनी.
एक आस आहे मनी
तुझ्या प्रेमात पडायची
नित्य प्राणास माझ्या
श्वासात श्वास भरायची.
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[17/05, 20:48] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मचं*
*आयोजित उपक्रम*
*विषय : कुंकू*
कुंकू हे सौभाग्यवतीचं दान
तिला सौभाग्याचे वरदान,
सतीच्या पावितत्र्याचं सदा
तिच्या मुखी असे गुणगान..!
चारचौघांच्या साक्षीने येते
सोडून मतापित्याचे घरदार,
कुंकू लावूनिया भाळावरती
एकनिष्ठ करी पतीचा संसार..!
कुंकू हे प्रतीक सुवाशिणीचं
आहे शालीनतेचा महान वसा,
दिसते रूपसूंदरी कुंकूवाने
आहे पावित्र्याचा स्वच्छ आरसा..!
असे छान लाल रंग कुंकवाचा
दिसते खुलून सौंदर्य तिचे,
कुंकवाच्या रक्षणासाठी बघा
ठोठावते दार हिमतीने स्वर्गाचे..!
देवालाही वेठीस धरण्याचे
असे असते महान तिचे पुण्य,
तिला जन्मास घालून धरतींवर
ईश्वर ही बघा इथे होतो धन्य..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[17/05, 21:46] Gjendra: *कवितेच्या जगात समूह*
*आयोजित उपक्रम*
*विषय:गोकुळावाणी माझं घर*
माझं घर गोकुळावाणी
आहे प्रेमाची निशाणी
जिवलग नातलग सारे
गातात प्रीतीची गाणी...
माझं घर गोकुळावाणी..!
घरात माझ्या हसरे तारे
सदा वाहती आनंदी वारे,
वाहे सुखाची नदी भरूनी
खळखळ जसे झऱ्याचे पाणी
माझं घर गोकुळावाणी..!
आई आजी आणिक बाबा
सुख दुःखात पाठीशी उभा
क्षण सुखाचे उमटतील रानी
गळ्यात सुमधुर भिनते गाणी
माझं घर गोकुळावाणी..!
साथ एकमेकांची मिळते
घर त्याने आनंदात असते
नाम मुखी रामकृष्ण वाणी
करीत असता दिवेलागणी
घर माझं गोकुळावाणी..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
No comments:
Post a Comment