Tuesday, 21 July 2020

[25/6/2017, 3:36 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: गावाकडचे काल्पनिक चित्र डोळ्यासमोर ठेवून या हास्यकवितेची निमिर्ती झाली आहे याचा वास्तविक जीवनाचा काही एक सबंध नाही आणि आलाच तर तो केवळ योगायोग समजावा....

*स्पर्धेसाठी हास्यकविता*


_______पाण्यावरचं भांडण_______



पाणी थोडं थोडं सांडा दोघी हळूहळू भांडा

लई जोर लावून इथं गोळा करू नका तांडा

पाणी थोडं थोडं सांडा दोघी हळूहळू भांडा...//धृ//


एकीनं धरल्या झिंज्या दुसरीनं मारला पंज्या

लई वाढलं हे भांडण हाका मारीत गेला संज्या

एक म्हणे भवाने तुझा उखळात करते कांडा

पाणी थोडं थोडं सांडा दोघी हळहळू भांडा...//१//


एकीचा वाढला पारा म्हणाली हिला मारा

दुसरीनं धरून हाताला फिरवलं न गरागरा

धपकन् पडली खाली झाला कि तिचा वांधा

पाणी थोडं थोडं सांडा दोघी हळूहळू भांडा...//२//


भांडता भांडता एकीचा शेंबूड आला सळकन्

पाहिलं इकडं तिकडं न् ओढून घेतला फरकन्

शेणात भरवून एकमेकीला मारत होत्या धोंडा

पाणी थोडं थोडं सांडा दोघी हळूहळू भांडा...//३//


चर्चा समद्या गावात सारं गाव झाला गोळा

तोवर दोघींनी केला एकीमेकीचा चोळामोळा

गावचा पाटील म्हणाला भांडण चावडीत मांडा

पाणी थोडं थोडं सांडा दोघी हळूहळू भांडा...//४//


गजेंद्र

ढवळापुरीकर

स्वराजनगर औरंगाबाद

मो.९६२३७१४०११

●●●●●●●●●●●●●●●●●●●●
[27/6/2017, 11:09 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: एकदा एक घुंघरू
तुटून खाली पडलं,
अन् खळखळ सगळी घुंघरं
अस्ताव्यस्त विखरली.
अन् तमासगिरणीचा तमाशा झाला.
सगळी लोकं हातात येईल ते
फेकून मारू लागली.
कुणी दगड उचलले,
कुणी अंड्डे टमाटे घेतले,
अन् चहुबाजूने मारा सुरू केला.
कुणीही ऐकत नव्हते,
तमाशा मालक हात जोडून,
विनवणी करीत होता.
पण ऐकतील ती माणसं कुठली.
हि तर वासनेच्या आहारी,
गेलेली लांडगी होती.
यांना हलणारी कंबर हवी होती.
तिच्या चेह-यावरची,
नखरेली अदा हवी होती.
पण हि पोटासाठी नाचायची.
खुप शिकून नौकरी करण्याची,
तिची तिच्या कुटूंबियांची औकात नव्हती.
म्हणुनच काय तिनं हा,
नाचण्याचा बाजार मांडला होता.
अन् आपली अदा,
आपलं मोहक रूप,
येत असलेला सुंदर नाच,
चेह-यावरचे हावभाव,
ती या बाजारात रोजच विकत होती.
आणि कुटुंब चालवून,
आपला उदरनिर्वाह करत होती.
पण खरे नाचत होते ते,
तेच पैसा देत होते
आणि आपला नाच विकत होते.
खरा तमाशा करत होते तर तेच.
अन् सांगू पाहत होते या समाजाला,
आम्हीच आहोत हिजड्या जातीचे.
शांत बसून आम्ही राहू शकत नाही.
आणि आमचा दबदबा,
आम्ही कमी होऊ देऊ शकत नाही.
तमासगिरीन तमाशा करायची,
आपल्या जीवाचा अन् सगळे बंध
झुगारून ती नाचायची,
यांच्या पैशाचं मोल फिटेपर्यंत.
पण हाच समाज तीला हिणवायचा.
दिवसा ढवळ्या या समाजात.
अन रात्री मात्र तीच्या तालावर नाचयचा,
हैवानाची जात ही मन भरेपर्यंत,
तीला लुटायची रात्रीच्या अंधारात.
एकदाच काय घुंघरू तुटलं तर....
यांनी या समाजकंटकानी तीला,
रक्तबंबाळ केलं.
पण ती हरली नाही डगमगली नाही.
पुन्हा उठून उभी राहिली.
या भामट्यासमोर नाचण्यासाठी.
पुन्हा एकदा घुंघरू तयार तुटण्यासाठी.
आणि ही तमासगिरीनही तयार,
पुन्हा एकदा रक्तबंबाळ होण्यासाठी....!
पुन्हा एकदा रक्तबंबाळ होण्यासाठी....!


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.9623714011
[27/6/2017, 11:43 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: ____तमासगिरीन___


एकदा नाचता नाचता,

तमासगिरनीच्या पायातून

एक घुंघरू तुटून खाली पडलं,

अन् खळखळ सगळी घुंघरं

अस्ताव्यस्त विखरली.

अन् तमासगिरणीचा तमाशा झाला.

सगळी लोकं हातात येईल ते

फेकून मारू लागली.

कुणी दगड उचलले,

कुणी अंड्डे टमाटे घेतले,

अन् चहुबाजूने मारा सुरू केला.

कुणीही ऐकत नव्हते,

तमाशा मालक हात जोडून,

विनवणी करीत होता.

पण ऐकतील ती माणसं कुठली.

हि तर वासनेच्या आहारी,

गेलेली लांडगी होती.

यांना हलणारी कंबर हवी होती.

तिच्या चेह-यावरची,

नखरेली अदा हवी होती.

पण हि पोटासाठी नाचायची.

खुप शिकून नौकरी करण्याची,

तिची तिच्या कुटूंबियांची औकात नव्हती.

म्हणुनच काय तिनं हा,

नाचण्याचा बाजार मांडला होता.

अन् आपली अदा,

आपलं मोहक रूप,

येत असलेला सुंदर नाच,

चेह-यावरचे हावभाव,

ती या बाजारात रोजच विकत होती.

आणि कुटुंब चालवून,

आपला उदरनिर्वाह करत होती.

पण खरे नाचत होते ते,

तेच पैसा देत होते

आणि आपला नाच विकत होते.

खरा तमाशा करत होते तर तेच.

अन् सांगू पाहत होते या समाजाला,

आम्हीच आहोत हिजड्या जातीचे.

शांत बसून आम्ही राहू शकत नाही.

आणि आमचा दबदबा,

आम्ही कमी होऊ देऊ शकत नाही.

तमासगिरीन तमाशा करायची,

आपल्या जीवाचा अन् सगळे बंध

झुगारून ती नाचायची,

यांच्या पैशाचं मोल फिटेपर्यंत.

पण हाच समाज तीला हिणवायचा.

दिवसा ढवळ्या या समाजात.

अन रात्री मात्र तीच्या तालावर नाचयचा,

हैवानाची जात ही मन भरेपर्यंत,

तीला लुटायची रात्रीच्या अंधारात.

एकदाच काय घुंघरू तुटलं तर....

यांनी या समाजकंटकानी तीला,

रक्तबंबाळ केलं.

पण ती हरली नाही डगमगली नाही.

पुन्हा उठून उभी राहिली.

या भामट्यासमोर नाचण्यासाठी.

पुन्हा एकदा घुंघरू तयार तुटण्यासाठी.

आणि ही तमासगिरीनही तयार,

पुन्हा एकदा रक्तबंबाळ होण्यासाठी....!

पुन्हा एकदा रक्तबंबाळ होण्यासाठी....!



गजेंद्र

ढवळापुरीकर

स्वराजनगर औरंगाबाद

मो.9623714011
[29/6/2017, 8:00 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: स्पर्धेसाठी

विषय:-शेतकरी

शेतामधली माती माझी
सोन्या चांदीला पिकवी
शेतकरी राबतो दिनरात
ओळख मेहनतीला हवी....!

गजेंद्र
ढस्वराजनगर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
[1/7/2017, 1:49 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: आपले आयुष्य मुला बाळांशिवाय अपुर्ण आहे...!
जर एखाद्याला मुलबाळ नाहीच आहे तर त्याच्या आयुष्याला काय किमंत आहे..!
तर काहीच नाही
माझ्या मुलांमुळे माझं जीवन सुखी झालं त्यास जगण्याची दिशा मिळाली...!
आणि या जीवनास अर्थ आला.
माझा एकुलता एक मुलगा दोन आठवड्यापासून आजारी  आहे. रात्री तो झोपलेला असताना त्याच्या चेह-यावर नजर पडली....!
हातामधे सलाईन चालू होती....एकटक पाहता पाहता ओठांतून काही ओळी पूटपूटल्या...

आणि गीत बनून समोर आल्या.....

बावीस चरण असलेली ही दिर्घ कविता आपल्या सर्वांसाठी.....

💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

____बाळा तुझ्या जन्मामुळे____

बाळा तुझ्या जन्मामुळे
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले
कुस्करलेल्या फुलाप्रमाणे
आयुष्य होते माझे गळाले
बाळा तुझ्या जन्मामुळे....//धृ//

चाहूल तुझ्या येण्याची कळाली जेव्हा
मनात खोलवर आशा रूजली तेव्हा
मन आनंदाने फुलले, फुलले हिंदोळे
बाळा तुझ्या जन्मामुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//१//

स्वागताची तयारी तुझ्या केली रे मी
दुःखाची पोकळी बाळा भरली रे मी
तुझ्या येण्यानं दुःखाचे ही केले सोहळे
बाळा तुझ्या जन्मामुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//३//

चेहरा बघता तुझा मी दुःख विरायचे
नाजूक कोमल हातानी घाव भरायचे
सुख माझे तेव्हा ओसंडून ओघळे
बाळा तुझ्या जन्मामुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//५//

आयुष्याला किमंत नव्हती माझ्या नजरेत
जगणे होते मुश्किल माझे या दुनियेत
वाईट चिंतणा-यांचे ही तुटले सापळे
बाळा तुझ्या जन्मा मुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//४//

गरीबीच्या संसाराला ही लागायची नजर
माझ्यासाठी कुणालाही ना फुटला पाझर
एकच तुम्ही प्राण माझा हे हृदय हळले
बाळा तुझ्या जन्मा मुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//५//

रहाटगाडा संसाराचा एकट्याने ओढला
तुझ्यामुळेच दुःखाचा मज विसर पडला
चिमुकल्या हाताने जेव्हा तु अश्रू पुसले
बाळा तुझ्या जन्मा मुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//६//

यायचे मनात तेव्हा हे जग सोडून जाणे
आयुष्य फुलले माझे तुझ्या जन्माने
जाता जाता अडखळली माझी पाऊले
बाळा तुझ्या जन्मा मुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//७//

हसू तुझ्या ओठांवरचे फुलविते माझे मन
गोड पापा तुझ्या ओठांचा अन् चिंब होते तन
थेंब तुझ्या प्रेमाचे बाळा नयनातून ओघळले
बाळा तुझ्या जन्मा मुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//८//

पहिल्या बाळाचे दुःख होते हृदयी साठवून
वेदनांचे हृदयावर माझ्या पडले पांघरुण
त्याचेच रूप तुझ्या मी अंतरी पाहिले
बाळा तुझ्या जन्मा मुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले....//९//

वडिलांचे जाणे अकाली काळजावरती वार
बहिणीचा ही अंत वाईट वाढला दुःखाचा आकार
येऊन तु लडिवाळा माझे दुःखाचे घाव भरले
बाळा तुझ्या जन्मा मुळे....
जगण्यास अर्थ माझ्या मिळाले.... //10//

पाऊला पाऊला वरती संकट होईल नीर्मिन
अश्रू अ


चठठ




गजेंद्र ढवळापुरीकर स्वराजनगर औरंगाबाद.....!

💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
[1/7/2017, 10:51 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

_____जिंदगी_____

एक दिन में अपनी ही
जिंदगी पे रो रहा था ।
चल रहा था अपनी धून में
दिल ठोकरो से भरा था।
              क्या था मकसद उनका
              जो हमसे प्यार करते थे।
              अपना कह कहकर हमें
              जिंदगी से हमें दुर करते थे।
हर वक्त दिल में एक ही
खयाल आया करते थे।
जिंदगी ठोकरो से भरी हैं
मुझसे आँसू दिखाया करता थे।
             सुकून नहीं था कही जीवन में
             दुख दर्द भरा हमपे ही हँसा करता।
             तकलीफ मिलती रही हर मोड़पर
             फिर भी मैं जिने के लिये आँहे भरता।
         

गजेंद्र
ढवलापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
[1/7/2017, 11:53 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*स्पर्धेसाठी कविता*
*विषय:- ओंजळ*

_____ओंजळ_____

ओंजळ पहिल्या कवितेची
कसे सांगू प्रिये तुला
भेटलेल्या पहिल्या भेटीची
*ओंजळ पहिल्या कवितेची....//धृ//*

भेट आपली पहिल्या नजरेतली
खाणा खुणा इशा-यांनी रंगून गेलेली
परसात वेलीवरच्या फुललेल्या फुलांची
कसे सांगू प्रिये तुला
भेटलेल्या पहिल्या भेटीची
*ओंजळ पहील्या कवितेची...//१//*

भेट आपली सखे पहिल्या प्रेमातली
तु अन् मी घेतलेल्या पहिल्या श्वासांतली
बेभान मज करणा-या स्वर्ग सुखाची
कसे सांगू प्रिये तुला
भेटलेल्या  पहिल्या भेटीची
*ओंजळ पहिल्या कवितेची....//३//*

भेट आपली गं पहिल्या मैत्रीतली
ए चलना अरे ऐकना या शब्दांतली
बहरावी सखे वेल ही सुगंध सुमनांची
कसे सांगू प्रिये तुला
भेटलेल्या पहिल्या भेटीची
*ओंजळ पहिल्या कवितेची....//५//*

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[1/7/2017, 11:56 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: स्पर्धेसाठी
*विषय- वृक्षारोपण*

वृक्षारोपणाची आहे संस्कृतीला जाण
करणे वृक्षारोपण आहे हा धर्म महान
नाशिवंत  शरीराला ही  श्वास मिळतो
थोडेसे  पुण्य  कराया जगतो हा प्राण

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
[2/7/2017, 10:49 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: स्पर्धेसाठी....


माणसा पाप पुण्य तुझ्यामधले तुच शोधुन बघ
माणुसकिच्या नात्यासाठी थोडं जगुण बघ...१

आईच्या उदरामधलं तिमीर शोधुन बघ
पोटात दिलेल्या श्वासांची फेड करून बघ....२

आधारवड असतो त्याचं स्वप्न शोधुन बघ
त्यानं केलेल्या कष्टाचं मोल करून बघ.... ३

बहीण बांधते राखी तिचा धागा होऊन बघ
काय असतो पाठीराखा तो अर्थ शोधून बघ....४

बंधुत्वाच्या नात्याला थोडं सुंदर करून बघ
बंधुभाव जपण्यासाठी बंधुत्व जागवून बघ....५

मित्र सखा दोस्त ही नाती समजून थोडी बघ
उरामधे जागणारे मित्रत्व उलगडून बघ....६

गुरूच्या शिकवणीला थोडा साज चढवून बघ
संस्कारांच्या गर्दिला हृदयात बसवून बघ....७

वाट चुकलेल्या वाटसरूला वाट दाखवून बघ
म्हातारपणाच्या लकव्यातून थोडं जाऊन बघ....८

मिळणा-या दुःखातून स्वतःला सावरून बघ
सुख मिळालं हृदयातून तर थोडं हसून बघ....९


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
[3/7/2017, 2:32 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: क्या छुपा है इस दिल में आओ तुम्हें दिखा दूँ।
नफरत करनेवालो तुम्हें मोहब्बत करना सिखा दूँ।   //धृ//
[4/7/2017, 11:07 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: साँस बहू में झगडे होते हैं किस कारण।
माँ का बेटा होना शायद यहीं हैं कारण।

आजतक खुदाने भी माँ को नहीं समजा।
इसिलीये अवतार लेते आरहे हैं भगवन।

माँ बाप बेटों के दुश्मन कभी नहीं होते।
[4/7/2017, 10:59 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *स्पर्धेसाठी*

विठू सावळा

विठ्ठला रे पांडुरंगा
सांग कुठे शोधु तुला।
दळण दळीतो
जनाईसंगे विठू सावळा।

तुझ्या पंढरपुरात देवा
संतांची मांदियाळी।
तुच सांग देवा आता
रुकमाई का सावळी।

आषाढी कार्तिकीला
जमतो भक्तांचा मेळा।
चंद्रभागेतीरी होतो
अद्वितीय सोहळा।

देवा लीन तुझ्या चरणी
झाला चोखामेळा।
संत कान्होपात्राने
तुझा रे धावा केला।

संत सखु संत जनाई
तुझेच अभंग ओव्या बोले।
तुझ्यासाठी पांडूरंगा
संत मीराचे हाल झाले।

सावळ्या विठ्ठला
ऐकिला तु संताचा धावा।
भक्तांसाठी विठूराया
युगे युगे विटेवरी उभा।


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
[6/7/2017, 9:25 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *स्पर्धेसाठी*
*विषय:- प्रोत्साहन*

प्रोत्साहन केल्यानेच माणुस
जिद्दीने संकटास सामोरा जातो,
आलेत जरी तुफान वादळ वारे
लढण्या संकटाशी झुंजार होतो...!


प्रोत्साहनाचे शब्द काळजाला
जेव्हा मनशांती देऊन जातात,
प्रत्येक इच्छा आकांक्षा मनाच्या
तेव्हा परीपुर्ण होऊन जातात....!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
[7/7/2017, 11:58 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *स्पर्धेसाठी*

------------सतर्क----------

चल इशारा आला सतर्कतेचा
ठाण मांडून बसू नकोस...
भेकडा सामोरा जा संकटाना
तुच तुझ्यावर हसू नकोस....//धृ//


दहशतवादी आतंकवादी
चालुन येत आहेत तुझ्यावर
मुर्खा सारखा पहारा तू
ठेऊन मग आहेस कूणावर....
फसवले रे दुश्मनांनी तुला
फसवेगीरीला अशा फसू नकोस
भेकडा सामोरा जा संकटाना
तुच तुझ्यावर हसू नकोस......//१//


भ्रष्टाचार चोरी व लुटमार
दबा धरून बसूनच आहे
लाचारी वाढली काय तुझी
म्हणून सुंभा तू खचूनच आहे
सतर्कतेचा इशारा देतो तुला
भुमीत संताच्या दिसू नकोस
भेकडा सामोरा जा संकटांना
तुच तुझ्यावर हसू नकोस......//२//


नियती नियत बदलार नाही
बदलायचे आता तुलाच आहे
भारतमातेच्या रक्षणासाठी
मार्ग स्वातंत्र्याचा खुलाच आहे
जगणे होईल सत्वर मानवा
लहान मोठा कुणा भासू नकोस
भेकडा सामोरा जा संकटांना
तुच तुझ्यावर हसू नकोस.......//३//


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
9623714011
[6/8/2017, 9:47 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *शब्दविद्या समूह आयोजित*
*चित्रकाव्य स्पर्धेसाठी*


   *मुलगीच वंशाचा दिवा*


चाले  ठुमकत  कळशी  घेऊन
चिमुरडा  जीव  हा  आनंदानं..!
पायांमधे पैंजण  वाजे  छुनछुन
पाय  अनवाणी  चालले  जोमानं.....!!१

हिरवळ नाही जराही चहुकडे
निसर्ग हा रोजच कोपतो आहे..!
काटा  बघा  तिच्या  पायांमधे
दुष्काळाचा नित्य टोचतो आहे.....!!२

बदलता  काळ  बदलतं  मन
गरिबीत या  होरपळे जीवन..!
तरीही  दुःख  नाही  मनावर
उमटले चेह-यावर आनंदाचे क्षण....!!३

शिकावं थोडसं चिमुरडी कडून
काम  क्रोध सारे  टाकावे गाडून..!
मिळालेल्या सुखात आनंदी व्हावं
उज्वल भविष्य येणारंच घडून......!!४

पैसा अडका धनदौलत काही नको
जगण्यास  थोडासा आत्मरंग हवा..!
मुलगा मुलगी आता समान माना
तरच मुलगी बनू शकते वंशाचा दिवा...!!५


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.९६२३७१४०११
----------------------------------------------------
[9/8/2017, 5:22 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ☉🔷☉🔷☉🔷☉🔷☉🔷☉🔷
*............निर्भया...........*

निर्भया तु हे जग सोडून गेलीस
पण निर्दयता अजून तिथेच आहे
*बलात्कार तोच जीवघेणा आणि*
*लचके तोडणारे ही तसेच आहे.....१*

तू गेल्यावर अनेक निर्भया जन्मल्या
तुझ्या सारख्याच झुंज देऊन गेल्या
*काही समोर आल्या आणि काही*
*बदनामी पोटी मन शांत करून गेल्या...२*

एकाकी असते झुंज मुलगी म्हणून
रोजच होते छेडछाड अबला समजून
*आणि जन्म होतो पुन्हा निर्भयाचा*
*आरोपी मजेत जगतो करून सवरून...३*

निर्भया आता तू स्वप्नात येत चल
अबला स्त्रियांना कणखर करत चल
*लढण्यासाठी खंबीर करून त्यांना*
*जगण्यात त्यांच्या आता श्वास भरत चल...४*

प्रत्येक स्त्री आज निर्भयाच आहे
जन्मताच तीला स्त्री नावाचं लेबल लागतं
*कुणासाठी बहीण असते कुणासाठी मुलगी*
*कुणासाठी तर उपभोगाचं खेळणं असतं...५*

कुणी भुरळ घालतो मैत्रीचे जाळे पसरून
कुणी शोधत फिरतो सावज रस्त्यावरून
*एकटी दुकटी पाहताच लचके तोडतात*
*नंतर तेच नराधम घेतात श्वास हिसकावून...६*

कोवळ्या कळ्यांना ही सोडेना कुणी
कुस्करलेल्या कळ्या जातात होरपळून
*म्हणून एकच सांगणे आहे सर्व निर्भयांना*
*चलताना हिमतीने पाऊल टाका जपून*
*चलताना हिमतीने पाऊल टाका जपून...७*


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
☉🔷☉🔷☉🔷☉🔷☉🔷☉🔷
[13/8/2017, 9:53 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: स्पर्धेसाठी


आई वरील कविता



आई....माझी
बालपणा पासून झिजते आहे
फक्त दुस-यासाठी
लहान असतानाच आई गेली
वडिलांची होती सावली
एक भाऊ एक बहीण होते थोरले
पण आयुष्यास आईच्या नाही पुरले
दोन होते धाकटे
त्यातला धाकटाच तिच्यासाठी सर्वकाही
कारण तोच माहेरपण
जगवू शकतो लग्नानंतर तीला होती ग्वाही
तीचं मन जिंकलं तेच घडलं
तिनं विश्वासानं होतं ठरवलेलं
आजही ती त्याला इसमत नाही की
तो तीला विसरत नाही
दोन दिवसांचे पाहुणपण थाटात करतो
नवी कोरी साठी नेसून सासरी पाठवतो
आज चाळीसपेक्षाही जास्त वर्ष होऊन गेली
पण आईच्या तोंडी त्याच्या विषयी
उणीदुणी बोलणी कधीच न आली
आजही आनंदाने जाते परत येते
धाकट्या भावाचे कौतुक चारचौघांत करते
अशी आई माझी आई वीना पोरकी
आम्हावर नजर मायेची ठेविली सारखी
पोरकेपणाची साक्षी होती स्वतः
म्हणून आम्हाला जपे
तळहातावरच्या फोडासारखी
[13/8/2017, 10:45 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
*स्पर्धेसाठी*



*फेरी क्रमांक ३*
*आई वरील कविता*



........मातृत्वाला सलाम.......



आई तुझ्या कर्तृत्वाला सलाम
आई तुझ्या अस्तित्वाला सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम.....//धृ//


आई मी पाहिलंय तुझं राबणं
आई मी पाहिलंय तुझं झिजणं
फक्त संसार मजबूत करण्यासाठी
आई तुझं कष्टांमधे घाम गाळणं
आई तुझ्या कष्टांना सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम......//१//


आई तु रात्र पाहिली ना दिवस
दुःख आम्हा कधी होऊ न दिलंस
मायेच्या पंखाखाली घेऊन आम्हा
आई संस्कारांचं जगणं दिलंस
आई तुझ्या त्या संस्कारांना सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम.....//२//


आई या जगात मी आलोच नसतो तर
हे अनमोल आयुष्य मिळालं नसतं
तुझ्या उपकारांची फेड करण्यासाठी
खरंच हे जीवन मला मिळालं नसतं
आई तुझ्या अनंत उपकारांना सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम......//३//


आई तुझं माझ्यावर खुप प्रेम आहे गं
काही चुक झाली तर माफ करशील ना
कदाचित या जन्मात नाही झालं माझ्याकडून
तर सेवा करण्यासाठी पुढचा जन्म देशील ना
आई तुझ्या स्त्री जन्माला सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम......//४//


आई मी जवळून पाहिलंय तुझं
आम्हा भावंडांसाठी खस्ता काढणं
पोटाला पोटभर मिळावं आमच्या
म्हणून दुस-यापुढे पदर पसरवणं
आई तुझ्या त्या करांना सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम......//५//


आई तु आहेस त्यागाची परममुर्ती
आणि वात्सल्याची तु वचनपुर्ती
कल्पद्रुमा प्रमाणे भक्कम होऊन
देतेस सर्वांच्या जीवनास गती
आई तुझ्या या जीवनाला सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम......//६//


आई ममतेचा खळखळ उगम तु
प्रेम भावना आत्मियतेचा संगम तु
दुस-यांसाठी जगता जगता
स्वतःचं अस्तित्वं ही हरलीस तु
तुझ्या त्या अस्तित्वाला सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम......//७//


आई तुझ्या कर्तृत्वाला सलाम
आई तुझ्या अस्तित्वाला सलाम
तुझ्या मुळेच हा जन्म मिळाला
आई तुझ्या मातृत्वाला सलाम
आई तुझ्या मातृत्वाला सलाम......




गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.9623714011
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
[15/8/2017, 9:39 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
              स्पर्धेसाठी कविता
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

     💐माझ्या मायभूमीचा इतिहास..💐

माझ्या मायभूमीला आहे असंख्य वेदनांची साक्ष,
ब्रिटिशांनी  मागे  तिला  बनवले  होते त्यांचे भक्ष,
बनावयाचे तिला जगाची महासत्ता हे एकच लक्ष्,म्हणून माझ्या मायभूमीवर लावायचा एकात्मतेचा वृक्ष…!1

माझ्या मायभूमीला आहे इतिहास महान संताचा,
फिरंग्यांशी  झुंज  देणार्या  लाखो  शुरवीरांचा,
किती सोसलेला घाव अंतरात लाख वेदनांचा,
म्हणून माझ्या मायभूमीला सांगायचा संदेश बंधुत्वाचा….!2

माझ्या मायभूमीला आतंकवादाने छळले किती,
लढता लढता हुतात्मे अन् अजरामर झाल्या छाती,
आता वाटते आहे बळवणार्या दहशतवादाची भीती,
म्हणून माझ्या मायभूमीला जपायची अनेक नाती,…!3

माझ्या मायभूमीचे उपकार इथे जपतो शेतकरी,
मरमर कष्ट करुनही खातो प्रेमाने चटणी-भाकरी,
त्यांच्यासाठी जवान इमानाने करतो सरहदीवर नौकरी,
म्हणून माझ्या मायभूमीला झटण्याची ओढ माझ्या अंतरी….!4

माझ्या मायभूमीचं आहे मानवाला एकच सांगणं,
माझं अस्तित्वं जपण्यासाठी तुम्ही एकदिलाने राहणं,
आतंक दहशत अत्याचार भ्रष्टाचार लुटमार बंद करणं,
म्हणून काळ्या दगडावरची रेघ आहे,भारताचं महासत्ता होणं…!5

______________✏📚कवी:-गजेंद्र
___________________औरंगाबाद
---------------मो:-9623714011
[15/8/2017, 11:02 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

स्वातंत्र्य दिन महाकाव्य स्पर्धेसाठी
दिं:-१५/८२०१७

स्वातंत्र्य मिळाले भारता
स्वातंत्र्य ही एकात्मता
स्वातंत्र्य हे मिळण्यासाठी
लढवय्या झाली हि जनता
स्वातंत्र्य मिळाले भारता
स्वातंत्र्य मिळाले भारता....//१//

लढले शिवाजी राजे
पंचक्रोशीत डंका वाजे
रक्ताच्या शाईने लिहिले
स्वराज्य व्हावे माझे
लढले शिवाजी राजे
लढले शिवाजी राजे....//२//

शिवशंभू महाराजे झाले
मुघलांना हैराण केले
अशा या शुरविराचे
सळाईने काढले डोळे
शिवशंभू महाराजे झाले
शिवशंभू महाराजे झाले.....//३//

पेशव्यांनी केला रणसंग्राम
मराठ्यांचा वाढला अभिमान
स्वराज्य टिकविण्यासाठी
मिळाले त्यांना कंठस्नान
पेशव्यांनी केला रणसंग्राम
पेशव्यांनीकेला रणसंग्राम.....//४//

मनीकर्णिका जन्मास आली
झाशीची महाराणी झाली
इंग्रजांना शह देण्यासाठी
लढवय्या बुद्धी तीने वापरली
मनीकर्णिका जन्मास आली
मनीकर्णिका जन्मास आली....//५//

राजगुरू सुखदेव भगतसिंग
यांनी फुंकले स्वातंत्र्याचे रणसिंग
उडवून गोरा आधिकारी
फासावर चढले नायक तीन
राजगुरू सुखदेव भगतसिंग
राजगुरू सुखदेव भगतसिंग....//६//

गांधी सुभाषचंद्र सावरकर
नेहरू टिळक अन् आगरकर
लढले हजारो वीर सैनिक
इंग्रज झाले हैराण भारतभर
गांधी सुभाषचंद्र सावरकर
गांधी सुभाषचंद्र सावरकर....//७//

स्वातंत्र्याने फुलली वसुंधरा
आनंदाने उधाण आले सागरा
बलिदान वीरांचे सफल झाल्याने
सुखसमृध्द झाली हि धरा
स्वातंत्र्याने फुलली वसुंधरा
स्वातंत्र्याने फुलली वसुंधरा.....//८//

स्वातंत्र्य मिळाले भारता
वीरांनी प्राणाचे त्याग करता
आज आनंद ओसंडे मुखावर
लोकशाहीचा श्वास भरता
स्वातंत्र्य मिळाले भारता
स्वातंत्र्य मिळाले भारता.....//९//


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.९६२३७१४०११
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
[18/8/2017, 2:26 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: लेखणीला  केली मी धार बहाल...!
नका सोडून जाऊ काव्य महाल...!😢

किती स्फुर्तीनं लिहिलं बाई...
काव्य आईच्या नात्यावरलं
परीक्षणातून बाद  ते झालं
वेडं पिसाट  मन  गहिवरलं
बाई उरले फक्त शब्दांचे जहाल...
नका सोडून जाऊ काव्य महाल....!😢

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.9623714011
[20/8/2017, 7:13 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡

*शब्द विद्या समूह आयोजित*

*स्पर्धेसाठी*

*फेरी क्र.४*

*विषय:-विरहा वरील कविता*



---------अरे विरह विरह---------
         (अष्टाक्षरी रचना)



अरे विरह विरह
    छळतो दुःखाचा दाह
         एकटेच जगताना
                वाहे अश्रूंचा प्रवाह.....//१

अरे विरह विरह
     दोन मनांचा वियोग
          प्रेमातली व्याकुळता
               आहे जहाल प्रयोग.....//२

अरे विरह विरह
    दोन जीवांना फटके
         दुर दुर राहण्याचे
              बसे आयुष्या चटके.....//३

अरे विरह विरह
     होई दुःखाचा उगम
          दोन प्रेमीयुगुलाचा
                आहे अधुरा संगम.....//४

अरे विरह विरह
    काढे दुरावा खंजर
         कमी नसते वेदना
              वाढे दुःखाचा डोंगर.....//५

अरे विरह विरह
    जीवा बसतो आघात
         लई हरामी दुनिया
             करी अबोला दोघांत.....//६
 
अरे विरह विरह
    आहे जशा पायवाटा
          जरा सांभाळूनी चला
               उडे प्रेमात फुफाटा.....//७

अरे विरह विरह
     दोन आयुष्य संपते
          प्रेमीयुगाचा संसार
               घेऊन नौका डुंबते.....//८

अरे विरह विरह
    नसतो प्रेमाला अंत
        फक्त दोघांच्या मनाला
              राहे कायमची खंत.....//९

अरे विरह विरह
    होते मन हे व्याकुळं
        रातंदिसं जागताना
             मन उदास बकुळं.......//१०

अरे विरह विरह
    हृदयी टोचतो काटा
         कसे शोधावे साजणी
             मिळे विरहाच्या वाटा......//११

अरे विरह विरह
    होते जीवा फरफट
         किती छळते यातना
               होते मनी घुसमट......//१२

अरे विरह विरह
   आहे अधुरं जगणं
        दोन पवित्र मनाचे
            होई मिलन कठीणं.......//१३



कोड क्र.150

♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡
[28/8/2017, 11:49 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: स्पर्धेसाठी वात्रटिका

पक्षांतर करतात माणसं
जेव्हा डाळ शिजत नाही
दुस-याचे ओले पाहून
रान यांचं भिजत नाही...!

घामाघुम होतात कार्यकर्ते
जेव्हा प्रचार चालू असतो
अंधारात मात्र फोडाफोडी
आणि पक्षांतर वळू पाहतो....!

गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.9623714011
[31/8/2017, 8:00 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: चांदणी चारोळी इ संग्रहासाठी

(प्रत्येक ओळीत बारा अक्षरे)
👇🏻👇🏻
चांदणे पसरले या नभामधी
रातराणी फुलली दरवळली
चहुकडे सुगंधी फुलामधुनी
निशा तारकांनी धुंद बहरली...!

(प्रत्येक ओळीत दहा अक्षरे)
👇🏻👇🏻
चांदण्यांनी अंबर सजले
सजल्या बघना दाही दिशा
अनवट वाटा सगळ्याच
दुर होऊन फुलेल आशा...!

(प्रत्येक ओळीत अकरा अक्षरे)
👇🏻👇🏻
होरपळून निघते दुनिया
चांदणे विद्रोहाचे पसरते
आकलन शक्ती संपते अन्
श्वास क्रोधाचे नभी तरंगते...!

(प्रत्येक ओळीत आठ अक्षरे)
👇🏻👇🏻
तारकांचे   तारांगण
नभातून    उजळले
तुझ्या नी माझ्या प्रेमाचे
ऋतूरंग    बहरले....!!


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो.9623714011
[1/9/2017, 12:00 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: शब्दविद्या समूह आयोजित

स्पर्धेसाठी

फेरी क्रमांक पाच [५]

विषय:-बापा वरील कविता


~~~~*निर्दयी बाप माझा*~~~~



निर्दयी होता बाप माझा
सांगू कुणा कुणा
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//धृ//

बालपण माझं कोमेजून गेलं
बापाच्या धाकातं निसटून गेलं
बंधनात नियमांच्या कैद झालं
तरीही जीवन हे जगणं आलं
का दिल्या बापाने अघोरी
मला असह्यणा-या वेदना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//१//

बालपण आठवून आजही रडतो
झालेल्या चुकांना शोधत फिरतो
असा दिवस ना मला आठवतो
पाठीवरून बाप प्रेमाने हात फिरवतो
अजूनही नाही बुझलेल्या
त्यांनी मज मारलेल्या खुणा
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//२//

आठवतो आजही माझा तो बाप
पाठीवर पडता त्यांची एक थाप
ओली व्हायची चड्डी लागायची धाप
उडायचा भितीने अंगाचा थरकाप
राग वाढत जाई त्यांचा जशा
वाढत जाई माझ्या याचना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//३//

बालपण माझं होतं स्तब्ध
ओठही माझे राही निशब्द
कळले न मजला माझे प्रारब्ध
अश्रूत वाहिले झाले स्तब्ध
वाढणा-या वयाबरोबर
वाढत गेल्या मी भोगलेल्या यातना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//४//

एकटेपणा माझ्या जीवनी आला
विरहामधे मग जगू लागला
माझ्यातील कवीचा जन्म झाला
शब्दातून दुःख मांडू लागला
बापाने दिलेल्या आजही
मी विसरू शकलो ना वेदना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//५//

गुटखा खाण्याची होती सवय
विडी दारूची भयंकर सवय
दारुची नशा करायची दशा
यातंच बिघडले शरीराचे अवयव
आजारपणाने गेला बाप माझा
वाहे अश्रूत माझ्या भावना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....// ६//

जाण्याने त्यांच्या मी मुक्त झालो
आनंदाने मग हसू खेळू लागलो
इकडून तिकडे बागडलो विहरलो
सुखाचा उसासा मी भरू लागलो
तोवर आनंदाला माझ्या कुठलीच
उरली नव्हती मैत्रीला हाक ना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा.....//७//

बालपणास डसला बनून सापं
तरीही वाटते हवा होता बापं
पोरकेपणाचा नको होता शापं
का रे देवा हिरावून नेलास बापं
भुकेला मी त्यांच्या प्रेमाचा
भुकेला माझा हा प्राण ना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//८//

देवा बापास माझ्या का निष्ठूर केले
अंतिम क्षणाला सारे विपरीत घडले
मी का नव्हतो जवळ मज कुठे होते नेले
तोंडातून रक्त पडले जेव्हा प्राण गेले
आठवणीत त्यांच्या मन माझं
आजही करते आहे साधना
दरारा त्यांचा आठवला की
डोळ्यांत अश्रू दाटे पुन्हा पुन्हा....//९//




कोड क्रमांक 2050
[3/9/2017, 3:36 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *~~~~~~~~~~~~~~~*
*दुःख सारेच वेदनांचे*
*मी झेलतो अजूनही*
*सांगू कसे संखे तुला*
*जखम सलते अजूनही*
*~~~~~~~~~~~~~~~*

*गजेंद्र*
*ढवळापुरीकर*
*स्वराजनगर औरंगाबाद*
*मो:-9623714011*
[3/9/2017, 3:39 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *•~~~~~~~~~~~~~~~•*
*पाण्यात विणा धरती*
*करते लाही लाही*
*निसर्गाची दशा पाहून*
*सलते जखम अजूनही*
*•~~~~~~~~~~~~~~~•*

*गजेंद्र*
*ढवळापुरीकर*
*स्वराजनगर औरंगाबाद*
*मो:-9623714011*
[3/9/2017, 3:45 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: *°~~~~~~~~~~~~~~~°
*सखये वाट पाहून तुझी*
*घायाळ हे मन आजही*
*दे पुरावा मज प्रेमाचा*
*सलते जखम अजूनही*
*°~~~~~~~~~~~~~~~~~*
*गजेंद्र*
*ढवळापुरीकर*
*स्वराजनगर औरंगाबाद*
*मो:-9623714011*
[3/9/2017, 11:45 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: स्पर्धेसाठी पाळणा


बाळा जो जो रे लडिवाळा
आज आनंदी आनंद झाला
खोहरांच्या घरी पाळणा हलला
बाळा जो जो रे लडिवाळा.......!1

चला वाटू साखर पान
नाव ठेवू नवेली छान
चिमुकल्या हाताचे गं
चिमुकले वरदान
पायांमधे वाजे गं घुंघरवाळा
बाळा जो जो रे लडिवाळा.......!2

शोभे चेतनराव पिता
बाळा उचलूनी घेता
शिन हलका होतो
नवेलीचे मुख पाहता
बाई रडून करी गं घर गोळा
बाळा जो जो रे लडिवाळा........!3

आईचे नाव समृद्धी
घरी नांदे रिद्धी सिद्धी
बाळाच्या जन्माने आली
अंगणी सुख समृद्धी
फुलला अंगणात गं फुलमळा
बाळा जो जो रे लडिवाळा........!4

आजी मिलनबाई खास
लेखणीचा मिळे सहवास
बाळा तुझ्यावरी ती
पाळणा लिहील झकास
होईल संस्कारांचा सुख सोहळा
बाळा जो जो रे लडिवाळा........!5

बाई आजोबा जगदिश
तुझे लाड गं करील
तुला कडेवरी उचलून
सारे गाव फिरवील
खुळखूळा वाजवून झुलवील झुला
बाळा जो जो रे लडिवाळा........!6


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:-9623714011
[4/9/2017, 12:38 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: हायकू.....

*विषय:-पाणी*


निसर्ग वाणी
समदे पाणी पाणी
चहुदिशांना..........!1

निसर्ग सारा
पाण्याने बहरतो
होऊन वारा.........!2

पाणी जीवन
करूया साठवण
समृद्धीसाठी........!3

पाणीच पाणी
गाऊ पाऊस गाणी
होऊ आनंदी........!4

पाण्यास जपा
होईल निसर्ग कृपा
जगण्यासाठी........!5

करा धरण
पाणी हेच जीवन
मानवतेचे............!6

सोपं जीवन
करा वृक्षारोपण
वाचेल पाणी........!7


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
[6/9/2017, 8:15 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: राडंच्या...
ही लालबुंद नजर
ठेव जरा खाली
समोर आयाबहीणी
तुझा सन्मान करत आहेत
तुझा चांगुलपणा पाहून
त्यांनी तुला निमंत्रित केलं होतं
पण सुकाळीच्या
तुझ्या वासणांध नजरेनं
बघ त्यांना कैद केलंय
तुझी तीच नजर
त्या फाडून काढतील......!
थांब तो दिवस दुर नाही.....!

तुझ्यातला राक्षस
जागा होण्या आधी
तुझ्यातली वासणा
भडकण्याआधी
त्या तुझा चेंदा करतील
तुझ्या प्रत्येक छिद्रात
लाल मिरचीची कुटलेली
पावडर भरतील
तुझी इजार पिवळी होईपर्यंत
साल्या हागेपर्यंत तुला मारतील....!
थांब तो दिवस दुर नाही......!

नंतर काय...
तुझं रक्ताळलेलं
अन् लाल झालेलं शरीर
त्याला काळं फासतील
गळ्यात चपलांचा हार
ढुंगणावर चाबकाचे
फटके मारतील
विवस्त्र करून तुझा
यथेच्छ सन्मान करतील
आणि गाढवावरून
तुझी धींड काढतील......!
थांब तो दिवस दुर नाही....!

एकटी दुकटी पाहून
तुझं अंग गरम होतंय
तिचे कणखर अंग नितंब
पाहून तुझं सळसळतंय
भडवीच्या तुझ्या घरात
बाई माणुस नाही का...?
तुझी मर्दांगी त्यांना दाखव
आणि घाल थैमान
रात्रीच्या अंधारात!
तुझं अर्धनग्न शरीर पडलेलं
असेल रस्त्याच्या कडेला....!
थांब तो दिवस दुर नाही........!

अत्याचार लुटमार
पांढराशुभ्र भ्रष्टाचार
अन् बलात्कार वाढलेत
यांनाही मोका पाहून
इंगा दाखवावा लागेल
इतकं बदडायचं की
बसायला ढुंगण ही
घाबरलं पाहिजे
कातडी निघेपर्यंत
रक्त सांडेपर्यंत
अंग यांचं कुरतडलं पाहिजे...!
थांब तो दिवस दुर नाही..........!
थांब तो दिवस दुर नाही..........!


कोड क्रमांक
[6/9/2017, 8:42 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: पुर्वीचे दिवस
जेव्हा पुन्हा आठवतात
चटका देतात
मनावर...!

हळूवार शांत
मन सलसलू लागतं
परेशान होतं
भेटायला...!

झाडाच्या सावलीत
बसायचो तासतांस दोघं
एकमेकांचा ओघं
हळवासा...!

फितूर नजरा
सखे टकमक बघायच्या
कधी हसायच्या
वेड्यापरी...!

धुंद बेधुंद
झालो आपण दोघेही
चोरून पाही
कुणीतरी...!

पुन्हा सखये
आपण करूया नवस
पुर्वीचे दिवस
भेटतील...!


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
[6/9/2017, 8:43 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: राडंच्या...
ही लालबुंद नजर
ठेव जरा खाली
समोर आयाबहीणी
तुझा सन्मान करत आहेत
तुझा चांगुलपणा पाहून
त्यांनी तुला निमंत्रित केलं होतं
पण सुकाळीच्या
तुझ्या वासणांध नजरेनं
बघ त्यांना कैद केलंय
तुझी तीच नजर
त्या फाडून काढतील......!
थांब तो दिवस दुर नाही.....!

तुझ्यातला राक्षस
जागा होण्या आधी
तुझ्यातली वासणा
भडकण्याआधी
त्या तुझा चेंदा करतील
तुझ्या प्रत्येक छिद्रात
लाल मिरचीची कुटलेली
पावडर भरतील
तुझी इजार पिवळी होईपर्यंत
साल्या हागेपर्यंत तुला मारतील....!
थांब तो दिवस दुर नाही......!

नंतर काय...
तुझं रक्ताळलेलं
अन् लाल झालेलं शरीर
त्याला काळं फासतील
गळ्यात चपलांचा हार
ढुंगणावर चाबकाचे
फटके मारतील
विवस्त्र करून तुझा
यथेच्छ सन्मान करतील
आणि गाढवावरून
तुझी धींड काढतील......!
थांब तो दिवस दुर नाही....!

एकटी दुकटी पाहून
तुझं अंग गरम होतंय
तिचे कणखर अंग नितंब
पाहून तुझं सळसळतंय
भडवीच्या तुझ्या घरात
बाई माणुस नाही का...?
तुझी मर्दांगी त्यांना दाखव
आणि घाल थैमान
रात्रीच्या अंधारात!
तुझं अर्धनग्न शरीर पडलेलं
असेल रस्त्याच्या कडेला....!
थांब तो दिवस दुर नाही........!

अत्याचार लुटमार
पांढराशुभ्र भ्रष्टाचार
अन् बलात्कार वाढलेत
यांनाही मोका पाहून
इंगा दाखवावा लागेल
इतकं बदडायचं की
बसायला ढुंगण ही
घाबरलं पाहिजे
कातडी निघेपर्यंत
रक्त सांडेपर्यंत
अंग यांचं कुरतडलं पाहिजे...!
थांब तो दिवस दुर नाही..........!
थांब तो दिवस दुर नाही..........!


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
[6/9/2017, 9:08 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: सकाळ व्हायची
तांबडे फुटायचे प्रकाशात
चहा हातात
मिळायची...!

आई उरकायची
घरातलं पारसं काम
जीवाचं रान
करायची...!

पुर्वीच्या दिवसात
[7/9/2017, 9:44 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *पुर्वीचे दिवस*


पुर्वीचे दिवस
हुंदडायचे बागडायचे खेळायचे
मनसोक्त लोळायचे
मातीमधे...!

पुर्वीचे दिवस
नदी किनारी लाटांवरती
नागमोडी घाटावरती
हुंदडणारे...!

पुर्वीचे दिवस
घुसमटायचा जेव्हा श्वास
व्हायचा आभास
प्रेमाचा....!

पुर्वीचे दिवस
अवखळ वा-यावरी झुलणारा
मनोमनी फुलणारा
गंधकेवडा...!

पुर्वीचे दिवस
आठवणीतला गोड फणस
आठवतो दिवसेंदिवस
प्रेमवेडा...!

पुर्वीचे दिवस
रातराणी फुलते गंधाळलेली
रात्र मंतरलेली
आठवते....!

पुर्वीचे दिवस
घात  प्रतिघात आघात
भुलवणारी रात
असायची....!

गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
[8/9/2017, 9:56 AM] गजेंद्र ढवळापुरीकर: *विद्रोही विचारांचा खुन*


कुविचारांना ठेचाययचे
मातीमधे गाडायचे...!
विद्रोही लेखणीने आता
मनामनातील मत्सर मिटवायचे...!
गधड्या लोकांच्या
दुष्ट प्रवृत्तीला
मुळापासून उपटायचे
विद्रोही लेखणीने
सगळे रान पेटवायचे...!
पुन्हा कुण्या लेखणीचा
जाऊ नये बळी
म्हणून हत्यार लेखणीचे
धारदार करायचे....!
मुसक्या आवळून
नीच विकृतीच्या
उखळात बांधून ठेचायचे...!
पानसरे,
कुलबुर्गी,
दाभोळकर,
गौरी लंकेश यांच्यावर
गोळीबार करणा-या
नराधमांना
रक्ताळेपर्यंत कुटायचे...!
आणि
या विकृत चामडीला
कुत्र्यास खावया टाकायचे...!
रोज निघतात मोर्चे
दहशतीस मिटवाया
पण याच मोर्चांना
आता बळकट करायचे...!
विद्रोही लेखणीतून
भेद भाव दोष मत्सर ठेचायचे
विद्रोही लेखणीचा
खुन करू पाहणा-या
समाजकंटकाना
खड्डयात बांधून गाडायचे
आणि पुरोगामी विचारांचे
ठसेच ठसे
चहुकडे उमटवायचे...!
ठसेच ठसे
चहुकडे उमटवायचे...!


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
[9/9/2017, 12:44 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: लेखणी माझी देखणी
समूह आयोजित स्पर्धेसाठी


विषय:कोण होतास तू/कोण होतीस तू


सांग साजणी अशी कोण होतीस तू
हृदया घेऊन सखे निघून गेलीस तू
सांग साजणी अशी कोण होतीस तू..//धृ//

आणाभाका प्रेमाच्या देऊन प्रिये
तहान भूक हिरावून तु गेलीस सये
वैरीनी असा जहरी प्रहार केलास तू
सांग साजणी अशी कोण होतीस तू..//१//

वांझोट्या प्रेमाला मी का पडलो फसी
विद्रोही बनवून सखे तुला झाली खुशी
विरहिणी माझा का बळी घेतलास तू
सांग साजणी अशी कोण होतीस तू..//२//
[10/9/2017, 11:24 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: लेखणी माझी देखणी
समूह आयोजित स्पर्धेसाठी


विषय:कोण होतास तू/कोण होतीस तू


सांग साजणी अशी कोण होतीस तू
हृदया घेऊन सखे निघून गेलीस तू
सांग साजणी अशी कोण होतीस तू..//धृ//

आणाभाका प्रेमाच्या देऊन प्रिये
तहान भूक हिरावून तु गेलीस सये
वैरीनी असा जहरी प्रहार केलास तू
सांग साजणी अशी कोण होतीस तू..//१//

वांझोट्या प्रेमाला मी का पडलो फसी
विद्रोही बनवून सखे तुला झाली खुशी
विरहिणी माझा का बळी घेतलास तू
सांग साजणी अशी कोण होतीस तू..//२//

सांग साजणी अशी कोण होतीस तू
हृदया घेऊन सखे निघून गेलीस तू
सांग साजणी अशी कोण होतीस तू...


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
[11/9/2017, 1:20 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: चल नाभिका चल नाभिका
अहमदनगरला चल नाभिका...
भगिनीस तुझ्या न्याय देण्या
अहमदनगरला चल नाभिका...//धृ//

नाजूक पोरं तुझ्या समाजाची
पडली रं बळी बघ वासनेची
पिडीत भगिनीस न्याय देण्या
अहमदनगरला चल नाभिका....//१//

समाजात बदल आता तू कर
परीवर्तनाची मशाल हाती धर
एकजूटने बंधूत्वाचा लढा देण्या
अहमदनगरला चल नाभिका....//२//

मागास असण्याचा सोडं समज
दाखव जगाला या तुझी रे धमक
गुलामगिरीचा विळखा तोडण्या
अहमदनगरला चल नाभिका....//३//

चल नाभिका चल नाभिका
अहमदनगरला चल नाभिका
भगिनीस तुझ्या न्याय देण्या
अहमदनगरला चल नाभिका...


गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
[11/9/2017, 5:10 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: शब्द विद्या
समूह आयोजित


स्पर्धेसाठी
काव्यफेरी क्रमांक ६
विषय:विद्रोही कविता


*थांब तो दिवस दुर नाही..!*


राडंच्या...
ही लालबुंद नजर
ठेव जरा खाली
समोर आयाबहीणी
तुझा सन्मान करत आहेत
तुझा चांगुलपणा पाहून
त्यांनी तुला निमंत्रित केलं होतं
पण सुकाळीच्या
तुझ्या वासणांध नजरेनं
बघ त्यांना कैद केलंय
तुझी तीच नजर
त्या फाडून काढतील......!

*थांब तो दिवस दुर नाही.....!!*

तुझ्यातला राक्षस
जागा होण्या आधी
तुझ्यातली वासणा
भडकण्याआधी
त्या तुझा चेंदा करतील
तुझ्या प्रत्येक छिद्रात
लाल मिरचीची कुटलेली
पावडर भरतील
तुझी इजार पिवळी होईपर्यंत
साल्या हागेपर्यंत तुला मारतील....!

*थांब तो दिवस दुर नाही......!!*

नंतर काय...
तुझं रक्ताळलेलं
अन् लाल झालेलं शरीर
त्याला काळं फासतील
गळ्यात चपलांचा हार
ढुंगणावर चाबकाचे
फटके मारतील
विवस्त्र करून तुझा
यथेच्छ सन्मान करतील
आणि गाढवावरून
तुझी धींड काढतील......!

*थांब तो दिवस दुर नाही....!!*

एकटी दुकटी पाहून
तुझं अंग गरम होतंय
तिचे कणखर अंग नितंब
पाहून तुझं सळसळतंय
भडवीच्या तुझ्या घरात
बाई माणुस नाही का...?
तुझी मर्दांगी त्यांना दाखव
आणि घाल थैमान
रात्रीच्या अंधारात!
तुझं अर्धनग्न शरीर पडलेलं
असेल रस्त्याच्या कडेला....!

*थांब तो दिवस दुर नाही........!!*

अत्याचार लुटमार
पांढराशुभ्र भ्रष्टाचार
अन् बलात्कार वाढलेत
यांनाही मोका पाहून
इंगा दाखवावा लागेल
इतकं बदडायचं की
बसायला ढुंगण ही
घाबरलं पाहिजे
कातडी निघेपर्यंत
रक्त सांडेपर्यंत
अंग यांचं कुरतडलं पाहिजे...!

*थांब तो दिवस दुर नाही..........!!*

अंधश्रद्धेला देऊन जागा
मनात कुविचारांचा त्रागा
अंधश्रद्धा फेटाळून लावणा-या
सुविचारांचे गळे कापा
बस हेच जमलं तुला नास्तिका
पण...कर तुझं कर्तव्य
आम्ही ही राहू तयार
लेखणीला धार देऊन
तुझं पितळ उघडं पाडायला
पुरतं जमिनीत गाडायला
चारचौघांच्या गर्दीमधे
शरीर तुझं नागडं करायला....!

*थांब तो दिवस दुर नाही.........!!*

एक दिवस पुरोगामी विचार
नसानसात भिनलेले दिसतील
जिकडे पहावे तिकडे
विद्रोही लेखणीचे आवाज उठतील
तेव्हा पळता भुई थोडी होईल
तुझ्या सगळ्याच भेगातून
घाणेरडे नासके पाणी येईल
तुझा इंगा थंड करायला
लेखणी आमची सज्ज होईल
आज लेखणीचा आवाज
बंद करतोस तू
उद्या तुझेच तुला मंद करतील
तुझ्या षंडपणाचे तेव्हा
चहूकडे ठसे उमटतील....!

*थांब तो दिवस दुर नाही......!!*
*थांब तो दिवस दुर नाही......!!*


कोड क्रमांक....2050
[11/9/2017, 5:15 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: गुरे वासरे
रानात जाती चराया
पोट भराया
डोंगरी...!

रान सारे
हिरवे गार लहरे
तन बहरे
डोंगरी...!
[11/9/2017, 10:02 PM] गजेंद्र ढवळापुरीकर: ■■■■■■■■■■■■■■

*~~~भुली हुई यादें~~~*

याद हैं ओ लम्हें
जो साथ बिताये थे।
ओ दिन भी क्या थे
जो साथ गुजारे थे।
*~~~~याद हैं ओ लम्हें~~~~*

आज भुल गई यादें
और टूट गये वादें।
अगर पता होते मुझे
ओ सारे तेरे इरादें।
*~~~~याद हैं ओ लम्हें~~~~*

दिल में बसाया प्यार तेरा
आँखो में सजाया बसेरा
ओ भुली हुई यादें तुम्हारी
दिल तोड़ रही हैं हमारा।
*~~~~याद हैं ओ लम्हें~~~~*

काट रही जुदाई हमें
चुभन सी हो रहीं दिल में।
अरमान सारे धुआं बनकर
उड रहें हैं साहिल में।
*~~~~याद हैं ओ लम्हें~~~~*

गजेंद्र
स्वराजनगर
औरंगाबाद
मो:९६२३७१४०११

■■■■■■■■■■■■■■

No comments:

Post a Comment