[09/06, 20:19] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: संत मीरा*
कृष्ण भक्तीत वेडी होती
वेडी होती संत मीरा,
घे जाणुनी वेड्या मुसाफिरा
घे जाणुनी वेड्या मुसाफिरा...
मिराच्या भजनात होई दंग,
तो भक्ती वत्सल पांडुरंग
मदतीस तिच्या धावे कृष्ण खरा
घे जाणुनी वेड्या मुसाफिरा...
जिकडे तिकडे तिला दिसे हरी
कणाकणात पाही ती मुरारी,
भक्तीचा छंद तिला वाटे बरा
घे जाणुनी वेड्या मुसाफिरा...
कृष्ण भजनात ती झाली वेडी
टाळ चिपळ्यासवे थोडी थोडी
कृष्णधुंदीत मिळे आनंद पुरा
घे जाणुनी वेड्या मुसाफिरा..
हरी तल्लीन आहे संत मीरा
दिसत नाही तिला विष प्याला
गजेंद्र म्हणे जीव झाला बावरा
घे जाणुनी वेड्या मुसाफिरा..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[09/06, 21:56] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: पत्रलेखन पोस्टबॉक्स*
गजेंद्र ढवळापुरीकर
प्लॉटनं.५२ सर्वे नं.५१
स्वराजनगर बाळापूर रोड
मुकुंदवाडी परिसर औरंगाबाद
पिन कोड: 431001
प्रति
विघ्न हर्ता गणपती बाप्पा
तुज कोटी कोटी प्रणाम.
पत्र लिहिण्यास कारण की..
या पृथ्वीवर खूप पाप वाढत आहे. सगळे म्हणतात या जगात देव आहे, आणि तू तर सर्व देवांच्या आधी पुजला जाणारा देव आहेस मग आम्ही गाऱ्हाणं तुझ्या समोरच मांडणार ना..!
देवा जरा डोळे उघडे या सृष्टीला, या धरतीला इथल्या गरीब आणि सामान्य माणसाला तुझी अतोनात गरज आहे. देवा इथली बरीच माणसं तुला मानतात, तुझी उपासना करतात. तुला पूजतात, तुझे उपवास करतात. तरी तू आम्हासारख्या गरिबांना पावत नाहीस.
देवा कृपा कर, पाऊस चांगला होऊ दे, धनधान्य पिकू दे, सर्वांना कशाची कमतरता भासू देऊ नकोस. आता तुझीच एक आस आहे. इथल्या पापाचा नाश करण्यासाठी तुला काहीतरी चमत्कार करावा लागेल. देवांचे अस्तित्व टिकवण्यासाठी या ब्रम्हांडात देव आहेत हे दाखवण्यासाठी तुला प्रकटावे लागेल. देवा आम्ही तुझी मनोभावे पूजा करू अर्चा करू उपासना करू तुला रोज प्रार्थना करू. तू तुझी कृपादृष्टी आम्हां गरिबांवर राहू दे, देवा तुझी कृपादृष्टी आम्हां गरिबांवर राहू दे..!
तुझाच एक भक्त
गजेंद्र ढवळापुरीकर
To
विघ्नहर्ता गणेश
मु.स्वर्ग पो. आभाळपुर
ता.जि.स्वर्गपूर
पिन कोड: xyz
[15/06, 22:35] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय : कवी विचार मंच ची साहित्य लेखणी*
*शीर्षक:लेखणी भावनांची*
कवी विचार मंच ची साहित्य लेखणी
धारदार टोकदार अविरत नी देखणी,
रोज साजरे होतात इथे वाढदिवस,
त्यानुसार ठरलेला स्पर्धा जल्लोष..
आयोजक नियोजक उभे स्वागताला
सर्व धन्यवाद देती समूह प्रशासकला..
कवी विचार मंचमुळे बहरतेंय लेखणी
कविता लेख कथा चारोळ्यांची मेजवानी..
परिक्षक ग्राफिक्सकार घेतात मेहनत
यामुळे येतेय सर्वांच्या लिहिण्यास किंमत….
अशी प्रसारतेय लेखणी इथे कवी मनांची
रोज प्रसवते शब्दांनी लेखनी भावनांची..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२४७१४०११/औरंगाबाद*
[17/06, 00:29] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: गार वारा*
निशब्द करतो जेव्हा
मज गार गार वारा,
थंडीची लाट पहुडते
अंगावर उमटतो शहारा..
धुंदी चढते जराशी
नाजूक असते काया,
शेकोटी पेटवताना
बरोबर दिसते छाया..
या निळ्या नभात गर्द
दाटून येतो हिवाळा,
उष्ण उन्हात मनाची
धग धग करते ज्वाळा..
गार वारा मनास माझ्या
स्पर्शून जातो जेव्हा,
हळूवार फुलते पाकळी
मन पाझरते हे तेव्हा..
हवा हवासा वाटतो
मज धुंदणारा गारवा,
उत्तुंग मनाच्या लहरी
मनी घुमून येई पारवा..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[18/06, 18:23] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय: ऋतू हिरवा*
*शीर्षक: ऋतू हिरवा*(अष्टाक्षरी रचना)
चहूकडे रानोमाळ
ऋतू दिसतो हिरवा
जातो अंगाला झोंबून
गार गार हा गारवा..//१//
निळे निळे हे आकाश
गर्द मेघ चहूकडे
ऋतू हिरवा दिवाना
मन आनंदले गडे..//२//
तीन ऋतूचा हा खेळ
तप्त असतो उन्हाळा
ओला चिंब पावसाळा
असे थंडीचा हिवाळा..//३//
पानावरी दवबिंदू
पाती गवताची डोले,
तिन्ही ऋतूंच्या महाली
खेळ निसर्गाचा चाले..//४//
साऱ्या विश्वात सुंदर
भासे धरती अंबर,
तीन ऋतूंचे सोहळे
धरतीचे धरोहर..//५//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दिनांक: १८ / ६ / २०२०*
*मो:९६२३७१४९११/औरंगाबाद*
[18/06, 19:21] Gjendra: *बाळ माझं झोक्यामंदी झोपलं*
(अंगाई गीत)
लाडी गोडी लावूनी निजवलं
बाळ माझं झोक्यामंदी झोपलं..//धृ//
कामधंदा बाई काही करू देईना
घरातला राडा मला आवरू देईना
चिमुकल्या जीवाने लई सतवलं
बाळ माझं झोक्यामंदी झोपलं..//१//
इकडे तिकडे फेकतो सारी खेळणी
दुडूदुडू धावतो बाई साऱ्या अंगणी
मागे मागे त्याने मला ही पळवलं
बाळ माझं झोक्यामंदी झोपलं..//२//
शांत कराया द्यावा किती झोका
चिमणी परी बांधला ग त्याचा खोपा
करता कौतुक त्याने खूप हसवलं
बाळ माझं झोक्यामंदी झोपलं..//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[18/06, 22:23] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय : अत्तर*
चंपा चमेली की जाई अबोली
आणायची कुप्पी कुठली,
सांगा राया हो बोला राया हो
मी अत्तराची कुप्पी कुठली..//धृ//
सुगंधी शयनाची आर्त श्वासांची
माझ्या मनात दरवळ भावनांची
अत्तर सुंगंधाने तुमच्या प्रेमाने
बहरून ही काया सजली
सांगा राया हो बोला राया हो
मी अत्तराची कुप्पी कुठली..//१//
गुलाब सुगंधाची मी आनंदाची
कुप्पी अत्तराची लाखमोलाची
घ्या समजून थोडे उमजून
मी यौवनाची आहे बिजली
सांगा राया हो बोला राया हो
मी अत्तराची कुप्पी कुठली..//२//
अत्तराचा फाया जरा ऐका राया
मोल पैशाचं हो न जावो वाया
घ्या ओढून जरासं बिलगून
तुमच्या कृपेने हि ज्वानी नटली
सांगा राया हो बोला राया हो
मी अत्तराची कुप्पी कुठली..//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दिनांक: २८/६/२०२०*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[19/06, 20:32] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: घन बरसले सुखाचे*
घन बरसले सुखाचे
अंकुर मातीत उगवला,
झेप त्याची नभाकडे
सूर्यप्रकाश पहायला..
मेघ गर्जनेत बरसे
मन माझे हे तरसे,
काळ्या आईच्या उपकार
सांगा विसरायचे कसे..
मेघांची गर्दी आकाशी
अंधधुंद बरसायला,
घना तू बरस ओथंबुनी
मन ओलेचिंब करायला..
नदी नाले ओढे खोडे
तुडूंब वाहतील भरून,
पक्षी वेली पाने फुले
जीव सारा जाई आनंदून..
फुलतील कोंब कळ्या
घना तुझ्या बरसण्यानं
होईल हिरवे शिवार अन्
पडीक ओसाड माळरान..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[21/06, 20:24] Gjendra: *अंकुर कलमांच महाराष्ट्र*
*आयोजित उपक्रम*
*विषय: मोठी होतात मुलं*
आईबापाच्या नात्याने
घडवले लेकरांना,
संस्कार देऊन बालपणी
बोलते केले त्यांना..
आई धुणीभांडी करायची
पोट लेकरांचे भरायची,
बाप मजुरीने जायचा
ओंजळ खाऊने भरायची..
खूप कष्ट करून त्यांनी
उभे केले मुलांना,
पण म्हातारपणी त्यांची
आठवण नाही फुलांना..
बाप चालता येत नाही तरी
राखण्याची करतो चाकरी,
अन् आई ही कचरा वेचून
अजूनही रांधते चटणी भाकरी..
कारणही तसंच आहे हो
*आता मोठी झालीत मुलं,*
आईबापांच्या नाळीची
खुडली गेलीत पाळंमुळं..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२१/६/२९२० रविवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[22/06, 12:37] Gjendra: *आजचा उपक्रम ५*
*विषय:इतुके पुरे मनाला*
*वेड्या मनाला मुक्त करूनी*
हवे इतुकेच तू घे समजुनी
वेड्या मनाला मुक्त करूनी..//धृ//
छाया सुखाची असू दे देवा
सर्वांवरी रे मज नाही हेवा
सुख दुःखाचा पाढा वाचूनी
वेड्या मनाला मुक्त करूनी..//१//
इतुके पुरे रे माझ्या मनाला
विरहाचे गीत सांगू कुणाला
हा प्राण माझा गेला थकुनी
वेड्या मनाला मुक्त करूनी..//२//
सजवूनी ठेवा तो रंगमहाल
येईल कधीही सुखाचा काळ
ध्यान लावून ठेवा ईश्वर चरणी
वेड्या मनाला मुक्त करूनी..//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[22/06, 18:09] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय: विश्वास*
विश्वास ठेवून माणसा वाग जरासे,
जीवन जगण्या मिळतील थोडे उसासे..
संदर्भ जोडून जीवनाशी प्रेम करावे,
दान प्रीतीचे वेड्या ओंजळीत भरावे..
असंख्य वेदनांचे काटे माझ्या जीवनी,
मेल्यावर शेवटी चटके आहेत सरणी..
प्रवास आयुष्याचा कधीही अचानक संपेल,
मृत्यूचा फास गुंतल्यावर श्वास तुटेल..
झाकोळ जीवनाचा हा मावळून जाता,
उमटून येईल वेड्या विश्वासाची साहर्ता..
पडता जीवनाला गर्द भावनांचा गराडा,
संपता ना संपेल दुःखाचा वेढा,
विश्वास तुझ्यावर माझा नित्तांत आहे,
प्रीतीचे प्रवाह खळखळ शांत वाहे..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.:२२/६/२०२० सोमवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[22/06, 18:33] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:नदी*
नदी वाहत असते
खळखळ खळखळ,
नाद मंजुळ स्वरांचा
झुळझुळ झुळझुळ..
कडे कपारी डोंगर
वाट यातून काढत,
काटे कुटे ओढे खोडे
दऱ्यातून ती वाहत..
लोंढे वाहत जातात
दर्या लाटांचा उसळे,
नदी प्रवाह सागरात
शांत जाऊन मिसळे..
नदी भागवी तहान
पशू प्राणी व पक्षांची,
काठावर वसलेल्या
उंच उंच या वृक्षांची..
जीव आनंदती सारे
ओढ नदी प्रवाहाची,
खळखळ वाहणाऱ्या
झुळझुळ प्रवासाची..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२२/६/२०२० सोमवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[24/06, 21:47] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:सहल*
एकदा गेली आमची
शाळेची सहल,
गाली आला होता
आनंदाचा वघळ..
गावापासून दूर
गेली म्हैसमाळला,
वरती राजा ढगांचा
होता फेसाळला..
उंच डोंगरावर होते
थंड हवेचे ठिकाण,
वर्दळ होती सर्वांची
चहूकडे हिरवळ छान..
खुलताबाद येथे मंदिर
झोपलेल्या हनुमंताचे,
रांगेत उभे राहूनच
पूर्ण केले वेध दर्शनाचे..
सहल वेरूळ येथे गेली
तिथे खूप मज्जा केली,
दगडात कोरलेले आहे
लेण्यांचे स्थान वैभवशाली..
मधेच आहे दौलताबादचा
मजबूत अवघड किल्ला
कोणत्याही राजाने
आजपर्यंत नाही जिंकला..
येताना गेलो बघायला
बीबीचा मकबरा
अकबराने बांधलेला
राणीचा आठवणीचा तुरा..
पानचक्की येथे मनोहर
कारंजे उडती पाण्याचे,
संगीताच्या तालावर
मोर नाचती माझ्या मनाचे..
बच्चे कंपनी घेऊन
मज्जा फिरण्याची सदा,
अशी आमची सहल
वर्षातून जाते एकदा,
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२४/६/२०२० सोमवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 14:38] Gjendra: *पुन्हा एका वाटेवर*
पुन्हा एका वाटेवर
भेटू तिथे एकदा,
हरवल्या आठवणी
मी आठवू कितीदा..
वळणे पार केली
सुखदुःखाची किती,
बहरलेल्या क्षणांची
मज वाटते भीती..
काळोख दाटलेला हा
मज खुणावतो पुन्हा,
अंतरंगात या घडला
तुझ्या विरहाचा गुन्हा..
वचने तू पाळणी ना
तिथे सखे भेटण्याची,
पुन्हा एका वाटेवर
माझ्यासवे चालण्याची..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि:२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 14:48] Gjendra: *गुलमोहर*
रस्त्याच्या दुतर्फा
फुलला गुलमोहर,
लाल पिवळ्या फुलांचा
धरती मातेला आहेर..
उंच वाढली झाडं
डेरेबाज घनदाट,
त्यामधून हि जाते
मोटर गाडीची वाट..
इवली इवली पाने
इवल्या इवल्या कळ्या,
हळूवार फुलत जाई
नाजूक साऱ्या पाकळ्या..
सडा फुलांचा पडला
खाली गुलमोहराचा,
वेचून घेता फुले सारी
क्षण यावा आनंदाचा..
गुलमोहराचे वैभव
आहेत सारी फुले,
वेड प्रेमाचेच जणू
चौफेर धुंदित डोले..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि:२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
*आयोजित उपक्रम*
*विषय: संत मीरा*
कृष्ण भक्तीत वेडी होती
वेडी होती संत मीरा,
घे जाणुनी वेड्या मुसाफिरा
घे जाणुनी वेड्या मुसाफिरा...
मिराच्या भजनात होई दंग,
तो भक्ती वत्सल पांडुरंग
मदतीस तिच्या धावे कृष्ण खरा
घे जाणुनी वेड्या मुसाफिरा...
जिकडे तिकडे तिला दिसे हरी
कणाकणात पाही ती मुरारी,
भक्तीचा छंद तिला वाटे बरा
घे जाणुनी वेड्या मुसाफिरा...
कृष्ण भजनात ती झाली वेडी
टाळ चिपळ्यासवे थोडी थोडी
कृष्णधुंदीत मिळे आनंद पुरा
घे जाणुनी वेड्या मुसाफिरा..
हरी तल्लीन आहे संत मीरा
दिसत नाही तिला विष प्याला
गजेंद्र म्हणे जीव झाला बावरा
घे जाणुनी वेड्या मुसाफिरा..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[09/06, 21:56] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: पत्रलेखन पोस्टबॉक्स*
गजेंद्र ढवळापुरीकर
प्लॉटनं.५२ सर्वे नं.५१
स्वराजनगर बाळापूर रोड
मुकुंदवाडी परिसर औरंगाबाद
पिन कोड: 431001
प्रति
विघ्न हर्ता गणपती बाप्पा
तुज कोटी कोटी प्रणाम.
पत्र लिहिण्यास कारण की..
या पृथ्वीवर खूप पाप वाढत आहे. सगळे म्हणतात या जगात देव आहे, आणि तू तर सर्व देवांच्या आधी पुजला जाणारा देव आहेस मग आम्ही गाऱ्हाणं तुझ्या समोरच मांडणार ना..!
देवा जरा डोळे उघडे या सृष्टीला, या धरतीला इथल्या गरीब आणि सामान्य माणसाला तुझी अतोनात गरज आहे. देवा इथली बरीच माणसं तुला मानतात, तुझी उपासना करतात. तुला पूजतात, तुझे उपवास करतात. तरी तू आम्हासारख्या गरिबांना पावत नाहीस.
देवा कृपा कर, पाऊस चांगला होऊ दे, धनधान्य पिकू दे, सर्वांना कशाची कमतरता भासू देऊ नकोस. आता तुझीच एक आस आहे. इथल्या पापाचा नाश करण्यासाठी तुला काहीतरी चमत्कार करावा लागेल. देवांचे अस्तित्व टिकवण्यासाठी या ब्रम्हांडात देव आहेत हे दाखवण्यासाठी तुला प्रकटावे लागेल. देवा आम्ही तुझी मनोभावे पूजा करू अर्चा करू उपासना करू तुला रोज प्रार्थना करू. तू तुझी कृपादृष्टी आम्हां गरिबांवर राहू दे, देवा तुझी कृपादृष्टी आम्हां गरिबांवर राहू दे..!
तुझाच एक भक्त
गजेंद्र ढवळापुरीकर
To
विघ्नहर्ता गणेश
मु.स्वर्ग पो. आभाळपुर
ता.जि.स्वर्गपूर
पिन कोड: xyz
[15/06, 22:35] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय : कवी विचार मंच ची साहित्य लेखणी*
*शीर्षक:लेखणी भावनांची*
कवी विचार मंच ची साहित्य लेखणी
धारदार टोकदार अविरत नी देखणी,
रोज साजरे होतात इथे वाढदिवस,
त्यानुसार ठरलेला स्पर्धा जल्लोष..
आयोजक नियोजक उभे स्वागताला
सर्व धन्यवाद देती समूह प्रशासकला..
कवी विचार मंचमुळे बहरतेंय लेखणी
कविता लेख कथा चारोळ्यांची मेजवानी..
परिक्षक ग्राफिक्सकार घेतात मेहनत
यामुळे येतेय सर्वांच्या लिहिण्यास किंमत….
अशी प्रसारतेय लेखणी इथे कवी मनांची
रोज प्रसवते शब्दांनी लेखनी भावनांची..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२४७१४०११/औरंगाबाद*
[17/06, 00:29] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: गार वारा*
निशब्द करतो जेव्हा
मज गार गार वारा,
थंडीची लाट पहुडते
अंगावर उमटतो शहारा..
धुंदी चढते जराशी
नाजूक असते काया,
शेकोटी पेटवताना
बरोबर दिसते छाया..
या निळ्या नभात गर्द
दाटून येतो हिवाळा,
उष्ण उन्हात मनाची
धग धग करते ज्वाळा..
गार वारा मनास माझ्या
स्पर्शून जातो जेव्हा,
हळूवार फुलते पाकळी
मन पाझरते हे तेव्हा..
हवा हवासा वाटतो
मज धुंदणारा गारवा,
उत्तुंग मनाच्या लहरी
मनी घुमून येई पारवा..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[18/06, 18:23] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय: ऋतू हिरवा*
*शीर्षक: ऋतू हिरवा*(अष्टाक्षरी रचना)
चहूकडे रानोमाळ
ऋतू दिसतो हिरवा
जातो अंगाला झोंबून
गार गार हा गारवा..//१//
निळे निळे हे आकाश
गर्द मेघ चहूकडे
ऋतू हिरवा दिवाना
मन आनंदले गडे..//२//
तीन ऋतूचा हा खेळ
तप्त असतो उन्हाळा
ओला चिंब पावसाळा
असे थंडीचा हिवाळा..//३//
पानावरी दवबिंदू
पाती गवताची डोले,
तिन्ही ऋतूंच्या महाली
खेळ निसर्गाचा चाले..//४//
साऱ्या विश्वात सुंदर
भासे धरती अंबर,
तीन ऋतूंचे सोहळे
धरतीचे धरोहर..//५//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दिनांक: १८ / ६ / २०२०*
*मो:९६२३७१४९११/औरंगाबाद*
[18/06, 19:21] Gjendra: *बाळ माझं झोक्यामंदी झोपलं*
(अंगाई गीत)
लाडी गोडी लावूनी निजवलं
बाळ माझं झोक्यामंदी झोपलं..//धृ//
कामधंदा बाई काही करू देईना
घरातला राडा मला आवरू देईना
चिमुकल्या जीवाने लई सतवलं
बाळ माझं झोक्यामंदी झोपलं..//१//
इकडे तिकडे फेकतो सारी खेळणी
दुडूदुडू धावतो बाई साऱ्या अंगणी
मागे मागे त्याने मला ही पळवलं
बाळ माझं झोक्यामंदी झोपलं..//२//
शांत कराया द्यावा किती झोका
चिमणी परी बांधला ग त्याचा खोपा
करता कौतुक त्याने खूप हसवलं
बाळ माझं झोक्यामंदी झोपलं..//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[18/06, 22:23] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय : अत्तर*
चंपा चमेली की जाई अबोली
आणायची कुप्पी कुठली,
सांगा राया हो बोला राया हो
मी अत्तराची कुप्पी कुठली..//धृ//
सुगंधी शयनाची आर्त श्वासांची
माझ्या मनात दरवळ भावनांची
अत्तर सुंगंधाने तुमच्या प्रेमाने
बहरून ही काया सजली
सांगा राया हो बोला राया हो
मी अत्तराची कुप्पी कुठली..//१//
गुलाब सुगंधाची मी आनंदाची
कुप्पी अत्तराची लाखमोलाची
घ्या समजून थोडे उमजून
मी यौवनाची आहे बिजली
सांगा राया हो बोला राया हो
मी अत्तराची कुप्पी कुठली..//२//
अत्तराचा फाया जरा ऐका राया
मोल पैशाचं हो न जावो वाया
घ्या ओढून जरासं बिलगून
तुमच्या कृपेने हि ज्वानी नटली
सांगा राया हो बोला राया हो
मी अत्तराची कुप्पी कुठली..//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दिनांक: २८/६/२०२०*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[19/06, 20:32] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: घन बरसले सुखाचे*
घन बरसले सुखाचे
अंकुर मातीत उगवला,
झेप त्याची नभाकडे
सूर्यप्रकाश पहायला..
मेघ गर्जनेत बरसे
मन माझे हे तरसे,
काळ्या आईच्या उपकार
सांगा विसरायचे कसे..
मेघांची गर्दी आकाशी
अंधधुंद बरसायला,
घना तू बरस ओथंबुनी
मन ओलेचिंब करायला..
नदी नाले ओढे खोडे
तुडूंब वाहतील भरून,
पक्षी वेली पाने फुले
जीव सारा जाई आनंदून..
फुलतील कोंब कळ्या
घना तुझ्या बरसण्यानं
होईल हिरवे शिवार अन्
पडीक ओसाड माळरान..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[21/06, 20:24] Gjendra: *अंकुर कलमांच महाराष्ट्र*
*आयोजित उपक्रम*
*विषय: मोठी होतात मुलं*
आईबापाच्या नात्याने
घडवले लेकरांना,
संस्कार देऊन बालपणी
बोलते केले त्यांना..
आई धुणीभांडी करायची
पोट लेकरांचे भरायची,
बाप मजुरीने जायचा
ओंजळ खाऊने भरायची..
खूप कष्ट करून त्यांनी
उभे केले मुलांना,
पण म्हातारपणी त्यांची
आठवण नाही फुलांना..
बाप चालता येत नाही तरी
राखण्याची करतो चाकरी,
अन् आई ही कचरा वेचून
अजूनही रांधते चटणी भाकरी..
कारणही तसंच आहे हो
*आता मोठी झालीत मुलं,*
आईबापांच्या नाळीची
खुडली गेलीत पाळंमुळं..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२१/६/२९२० रविवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[22/06, 12:37] Gjendra: *आजचा उपक्रम ५*
*विषय:इतुके पुरे मनाला*
*वेड्या मनाला मुक्त करूनी*
हवे इतुकेच तू घे समजुनी
वेड्या मनाला मुक्त करूनी..//धृ//
छाया सुखाची असू दे देवा
सर्वांवरी रे मज नाही हेवा
सुख दुःखाचा पाढा वाचूनी
वेड्या मनाला मुक्त करूनी..//१//
इतुके पुरे रे माझ्या मनाला
विरहाचे गीत सांगू कुणाला
हा प्राण माझा गेला थकुनी
वेड्या मनाला मुक्त करूनी..//२//
सजवूनी ठेवा तो रंगमहाल
येईल कधीही सुखाचा काळ
ध्यान लावून ठेवा ईश्वर चरणी
वेड्या मनाला मुक्त करूनी..//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[22/06, 18:09] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय: विश्वास*
विश्वास ठेवून माणसा वाग जरासे,
जीवन जगण्या मिळतील थोडे उसासे..
संदर्भ जोडून जीवनाशी प्रेम करावे,
दान प्रीतीचे वेड्या ओंजळीत भरावे..
असंख्य वेदनांचे काटे माझ्या जीवनी,
मेल्यावर शेवटी चटके आहेत सरणी..
प्रवास आयुष्याचा कधीही अचानक संपेल,
मृत्यूचा फास गुंतल्यावर श्वास तुटेल..
झाकोळ जीवनाचा हा मावळून जाता,
उमटून येईल वेड्या विश्वासाची साहर्ता..
पडता जीवनाला गर्द भावनांचा गराडा,
संपता ना संपेल दुःखाचा वेढा,
विश्वास तुझ्यावर माझा नित्तांत आहे,
प्रीतीचे प्रवाह खळखळ शांत वाहे..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.:२२/६/२०२० सोमवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[22/06, 18:33] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:नदी*
नदी वाहत असते
खळखळ खळखळ,
नाद मंजुळ स्वरांचा
झुळझुळ झुळझुळ..
कडे कपारी डोंगर
वाट यातून काढत,
काटे कुटे ओढे खोडे
दऱ्यातून ती वाहत..
लोंढे वाहत जातात
दर्या लाटांचा उसळे,
नदी प्रवाह सागरात
शांत जाऊन मिसळे..
नदी भागवी तहान
पशू प्राणी व पक्षांची,
काठावर वसलेल्या
उंच उंच या वृक्षांची..
जीव आनंदती सारे
ओढ नदी प्रवाहाची,
खळखळ वाहणाऱ्या
झुळझुळ प्रवासाची..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२२/६/२०२० सोमवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[24/06, 21:47] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:सहल*
एकदा गेली आमची
शाळेची सहल,
गाली आला होता
आनंदाचा वघळ..
गावापासून दूर
गेली म्हैसमाळला,
वरती राजा ढगांचा
होता फेसाळला..
उंच डोंगरावर होते
थंड हवेचे ठिकाण,
वर्दळ होती सर्वांची
चहूकडे हिरवळ छान..
खुलताबाद येथे मंदिर
झोपलेल्या हनुमंताचे,
रांगेत उभे राहूनच
पूर्ण केले वेध दर्शनाचे..
सहल वेरूळ येथे गेली
तिथे खूप मज्जा केली,
दगडात कोरलेले आहे
लेण्यांचे स्थान वैभवशाली..
मधेच आहे दौलताबादचा
मजबूत अवघड किल्ला
कोणत्याही राजाने
आजपर्यंत नाही जिंकला..
येताना गेलो बघायला
बीबीचा मकबरा
अकबराने बांधलेला
राणीचा आठवणीचा तुरा..
पानचक्की येथे मनोहर
कारंजे उडती पाण्याचे,
संगीताच्या तालावर
मोर नाचती माझ्या मनाचे..
बच्चे कंपनी घेऊन
मज्जा फिरण्याची सदा,
अशी आमची सहल
वर्षातून जाते एकदा,
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२४/६/२०२० सोमवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 14:38] Gjendra: *पुन्हा एका वाटेवर*
पुन्हा एका वाटेवर
भेटू तिथे एकदा,
हरवल्या आठवणी
मी आठवू कितीदा..
वळणे पार केली
सुखदुःखाची किती,
बहरलेल्या क्षणांची
मज वाटते भीती..
काळोख दाटलेला हा
मज खुणावतो पुन्हा,
अंतरंगात या घडला
तुझ्या विरहाचा गुन्हा..
वचने तू पाळणी ना
तिथे सखे भेटण्याची,
पुन्हा एका वाटेवर
माझ्यासवे चालण्याची..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि:२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 14:48] Gjendra: *गुलमोहर*
रस्त्याच्या दुतर्फा
फुलला गुलमोहर,
लाल पिवळ्या फुलांचा
धरती मातेला आहेर..
उंच वाढली झाडं
डेरेबाज घनदाट,
त्यामधून हि जाते
मोटर गाडीची वाट..
इवली इवली पाने
इवल्या इवल्या कळ्या,
हळूवार फुलत जाई
नाजूक साऱ्या पाकळ्या..
सडा फुलांचा पडला
खाली गुलमोहराचा,
वेचून घेता फुले सारी
क्षण यावा आनंदाचा..
गुलमोहराचे वैभव
आहेत सारी फुले,
वेड प्रेमाचेच जणू
चौफेर धुंदित डोले..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि:२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
No comments:
Post a Comment