[31/05, 17:40] Gjendra: *⚜️शीर्षक: मी एक रानफुल⚜️*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
आनंदाने फुलणारं मी एक रानफुल
प्रीतीच्या रानामधे मज भेटते का हुल..//धृ//
प्राणवेडे जाहले फुलताना बावरले,
मन हे विरहातले अलगद सावरले,
सुखाच्या बागेतली लागते चाहूल,
प्रीतीच्या रानामधे मज भेटते का हुल..//धृ//
कळ्या फुलल्या माळ रानातल्या,
चांदण्या पाहिल्या निळ्या नभातल्या
आर्जवे तुझी मजला भासते का खूळ
प्रीतीच्या रानामधे मज भेटते का हुल..//धृ//
माळरानात फुलतो वाऱ्यावरी डुलतो
राज तुझे खोलतो नी उडतो बागडतो
हिरव्या रंगाची हिरवी पांघरतो झूल
प्रीतीच्या रानामधे मज भेटते का हुल..//धृ//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[01/06, 16:59] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: ये रे ये रे पावसा*
ये रे ये रे पावसा
कोसळ भरदिवसा,
उष्ण उन्हाच्या लाटा
मना देईना दिलासा..
ये रे ये रे पावसा
चिंब धारा घेऊन,
मन माझे तापलेले
जा थंडावा देऊन..
ये रे ये रे पावसा
घनघोर तू बरस,
वेड्या जीवाला आशा
आहे दिवसेंदिवस..
ये रे ये रे पावसा
घेऊन गोडवा मधाळ,
कर दूर तू अंधार
नभातला झाकोळ..
ये रे ये रे पावसा
जीव झाला लाही लाही,
तुझ्यासवे दे मला
चिंब भिजण्याची ग्वाही..
ये रे ये रे पावसा
घेऊन टपोरी धार,
आस काळ्या मातीला
तुझी लागली फार..
ये रे ये रे पावसा
उन्हं झालं रे घातक
तुझ्या येण्याची चाहूल
देऊन जातो चातक..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[02/06, 17:52] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय: सत्कर्म*(अभंग रचना)
ज्ञानाचा प्रसार । जावू दारोदारी ।
देवाचिये द्वारी । लोटांगणं ।।
सत्कर्माची झाडे । अंगणी लावावी ।
माळ ती जपावी । सदोदित ।।
संस्काराच्या बिया । ठेवाव्या पेरून ।
सुसंगती बेनं । सांभाळून ।।
देवाचिया साठी । जन्म इथे घ्यावा ।
दान धर्म द्यावा । गरिबांशी ।।
हाती सत्कर्माचे । गाठोडे बांधावे ।
ज्ञान ही वाटावे । येता जाता ।।
पंढरीच्या राया । घालितो साकडे ।
मागतो मी थोडे । ज्ञान तूला ।।
सत्कर्म वाटितो । थोडे पुण्यासाठी ।
तुझ्या भेटीगाठी । धन्य व्हाव्या ।।
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०१२ औरंगाबाद*
[02/06, 18:25] Gjendra: *फुलोरा कलेचे माहेरघर*
*आयोजित उपक्रम*
*विषय: वारी पंढरीची*
पांडुरंगा रे पांडुरंगा
पांडुरंगा रे पांडुरंगा
करितो वारी पंढरीची
करितो वारी पंढरीची..//धृ//
भूक माझी तुचं तहान ही तुचं
मन तुझ्या भक्तीत चिंब भिजं
ओढ हृदयाला माझ्या
तुझ्या भाव भक्तीची
करितो वारी पंढरीची
करितो वारी पंढरीची..//१//
चंद्रभागे तीरी स्नान करुनिया
हात जोडीतो तुला पंढरी राया
श्वास माझा तूच देवा
आस माझ्या देहाची
करितो वारी पंढरीची
करितो वारी पंढरीची..//२//
आषाढी कार्तिकी तुझी असे वारी
तुझे नाम घेत देवा फिरे दारोदारी
माझा भोळा भाव तू
साद ऐक रे अंतरीची
करितो वारी पंढरीची
करितो वारी पंढरीची..//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७२४९११ औरंगाबाद*
[02/06, 19:03] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: गोमाता*
गाय आमुची माता,
म्हणता जन्म हा धन्य होई,
तिच्या कृपेने जीवनी
आमच्या सुख धावूनी येई..
गाईमुळे मिळते आम्हां
दूध दही आणि लोणी तूप,
शरीर सदृढ दिसते सुंदर
उजळून निघे जीवनाचे रूप..
सांज सकाळी सदा करावी
मनो भावे पूजा सेवा,
गोमतेच्या रक्षणासाठी
मन आपुले चंचल ठेवा..
गोमातेच्या हत्या रोखा
रक्षण करा हो सदा सर्वदा,
नुसते माता म्हणण्याने
टळणार नाही येणारी विपदा..
गोमातेच्या पाळण्याने
भरून राहते सुखाची ओंजळ
दुःख हरूनी जाई आपले
फुलन येईल जीवनाचे कमळ..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[02/06, 20:00] Gjendra: *साहित्य संस्कृती समूह*
*आयोजित उपक्रम*
*विषय: मनी पिसारा फुलला*
येता रेशीमधार पावसाची
मनी पिसारा फुलला,
मन तुझ्यासवे साजणी गं
घेई हिंदोळ्यावर झुला..
पहिला पाऊस आला
मनी उठली आनंदाची लहर,
गार वारा स्पर्शून जाता
तनमनास माझ्या येई बहर..
तीच्यासवे फिरायला जाता
चहूकडे पसरली हिरवी छटा
मिठीत तिच्या मी सामावता
हळुवार उडती मनमोहक बटा,
मनी पिसारा या फुलताना
चौफेर उधळण सुगंधाची,
दिसते खुशीत उमललेली
प्रीत तिच्या नी माझ्या प्रेमाची..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[03/06, 20:55] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: गजरा*
केसांमध्ये गजरा
तू माळून घे पोरी,
तू तुझ्या मनाची राणी
नाही माझी शिरजोरी..
केसांमध्ये गजरा....//धृ//
तुझ्या काळ्या बटा या
मज दाविती नखरा,
मी आकर्षिला जातो गं
तुझ्या चावट नजरा..
अंग काळा पोशाख
त्यात दिसते गं गोरी
तू तुझ्या मनाची राणी
नाही माझी शिरजोरी..
केसांमध्ये गजरा....//१//
तुझ्या ओठांची लाली
मज करती घायाळ,
जसं उगवतं गं राणी
चिखला मधलं कमळ..
तुझ्या स्पर्शाने अंगात
भलतीच उठते शीरशिरी
तू तुझ्या मनाची राणी
नाही माझी शिरजोरी..
केसांमध्ये गजरा....//२//
तुझी साडी भरजरी
आणि ठिपक्यांची चोळी
या मनात रुतते गं
तुझी चाल मखमली..
हळूच करते गं साजणे
माझ्या दिल्लाची चोरी
तू तुझ्या मनाची राणी
नाही माझी शिरजोरी..
केसांमध्ये गजरा....//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२४७१४०११ औरंगाबाद*
[03/06, 21:13] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: पहिला पाऊस*
पहिला पहिला आहे पाऊस
मला सोडून तू नको जाऊस
वारा वाहे चहुकडे गार सारा
आशा प्रेमाची तू नको दावूस...
पहिला पाऊस पहिली सर
वेड्या जीवाला लाविते घोर,
मातीलाही येतसे गर्भारपण
जिव्हाळा पावसाचा वरचेवर..
झाडे वेली फुले बहरती सारे
पहिल्या पावसाने आनंदते वारे,
गर्द आठवांचे मळे फुलून येती
असे पहिल्या पावसाचे इशारे..
पहिल्या पावसाची ओढ मनास
लाटा तरंती जश्या वेड्या तनास,
पाझरती आठवांचे क्षण निराळे
पहिल्या पावसाचे ते रंग वेगळे..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[03/06, 23:58] Gjendra: *आम्ही सारस्वत साहित्य मंच*
*आयोजित हायकू स्पर्धेसाठी*
*विषय: पाऊस ज्याचा त्याचा*
नभी दंगला
पाऊस ज्याचा त्याचा
मनात साचा..
या सांजवेळी
वादळ सुरू जाहले
दुःख भोगले..
वारा पांगला
पाऊस हा क्षणांचा
जरा थांबला..
हा वेदनांचा
पाऊस ज्याचा त्याचा
मार्ग अश्रूंचा..
वादळासवे
थेंब टपोरे येती
गारा भासती..
येतो अवेळी
जणू वादळ वारा
अंगी शहारा..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[04/06, 20:43] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: पैंजण*
पायी छुनछुन वाजती पैंजण
तुझ्या प्रेमाचे हे नंदनवन,
फुलविते आठवणींचे वन
ओढ सख्याची घायाळ करते मन..
सावरा हो कुणी मनास या
बाहूंत सखयाच्या जाताना,
बावरला जीव भलता माझा
साद तयाची हळूच येताना..
पैंजणांचा नाद प्रेमाची आस
जवळ असावा त्याचा श्वास,
छुनछून करीत हृदयी शिरावा
सखया मिळावा तुझा सहवास..
शृंगार करते मी सजणासाठी
पायांत बांधते गं पैंजण छोटी,
केसांत माळूनी गजरा फुलांचा
सैल सोडिते सखयाची मिठी..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[05/06, 21:18] Gjendra: *फुलोरा कलेचे माहेर घर*
*आयोजित उपक्रम*
*विषय:मी तुळस तुझ्या अंगणाची*
तू तुळस माझ्या अंगणाची
वेल वाढणारी माझ्या संसाराची..
तू तुळस माझ्या अंगणाची..//धृ//
लावितो कुंकू मी तुझिया भाळी
आशीर्वाद देतो गं सांजसकाळी
हिरे मोती मानतो या जीवनाची
वेल वाढणारी माझ्या संसाराची..
तू तुळस माझ्या अंगणाची..//१//
फुले फुलतील वेलीला सुकुमार
तुझ्या मायेचा असेल तिथे पाझर
सौभाग्यखाण तुझी ती चंदनाची
वेल वाढणारी माझ्या संसाराची..
तू तुळस माझ्या अंगणाची..//२//
निळ्या अंबराच्या असावे छायेत
बांधून घे मज तू तुझ्या मायेत
सुखात बहरेल घडी मिलनाची
वेल वाढणारी माझ्या संसाराची..
तू तुळस माझ्या अंगणाची..//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३६१४०११ औरंगाबाद*
[05/06, 21:57] Gjendra: *फुलोरा कलेचे माहेर घर*
*आयोजित उपक्रम*
*विषय:मी तुळस तुझ्या अंगणाची*
तुळस एक हिंदू धर्मात मानलं जाणारं पावित्र्य, तुळस आपल्या अंगणातील वैभव, तुळस सुवासिनीचं पूजण्याचं एक आत्मिक नातं, तुळस म्हणजे सर्वांच्या अंगणातील एक दुवा जिचं दर्शन केल्यावर भगवंताचे दर्शन झाल्याचा भास होणं. रोज सकाळी अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ जाऊन दर्शन घेणं जुन्या जमान्यात खूप महत्त्वाचं मानलं जाई. आज तसं कोणी मानत नाही. मी अंघोळ करून कामावर जायला निघालो तर अंगणात आवाज आला." काय रे निघालास कामावर." मी माघे वळून पाहिलं कुणी नव्हते पण तुळशी वृंदवना जवळून आवाज आला,तास मी तुळशी वृंदावनजवळ गेलो. ती बोलत होती.
"किती हवाहवासा वाटणारा जमाना होता जुना, सकाळी उठल्यावर मला शेणामातीने सारवलं जायचं अंगणात छान रांगोळी काढून घरच्या सुवासींनी मला पूजायच्या. मला ही प्रसन्न वाटायचं मी रोज तिला सौभाग्याचं दान द्यायचे आशीर्वाद द्यायचे. आज मात्र सगळं बदललंय कोणी कोणाशी प्रेमाने बोलत नाही वागत नाही. जो तो फक्त स्वत:च्या भल्यासाठी दगवताना दिसतोय. गृहिणी ही आज एकलकोंडया झाल्या आहेत या वातावरण माझा श्वास घुसमटतोय. माझं तुला एकच सांगणं आहे. सगळे प्रमाणे एकमेकांशी वागा गुण्यागोविंदाने रहा. हा काळ बदलेल नवा येईल तुमचं नाव त्या काळात आदराने घेतील अशी कीर्ती जपा नाव जपा. चल मी येते तुझं कल्याण होवो..!"
आणि वाऱ्याची झुळूक आली मी भाणावर आलो पण तुळशीमातेचे बोलणे डोक्यातून जात नव्हते तेचतेच विचार मनात घुटमळत होते.मनात ठरवलं सगळ्यांशी प्रेमानं वागायचं बोलायचं सर्वांशी मिळून मिसळून रहायचं आणि एक ठाम निर्धार करून मी कामावर निघून गेलो.
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३६१४०११ औरंगाबाद*
[06/06, 20:55] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: पोशिंदा*
साऱ्या जगाचा पोशिंदा,
आहे शेतकरी राजा
नाव वाढे जगामंदी
त्याचा होई गाजावाजा..
घाम गाळीतो कष्टाने
साथ काळ्या आईची,
बीज पेरतो मातीत
कूस भरी धरतीची..
दान मागतो देवाला
पडू दे रे पावसाला
त्याच्या विन जीवनात
अर्थ नाही जगण्याला..
रातंदिस पोटासाठी
किती राबतो शेतात,
त्याच्या घामाच्या धाराही
वाही साऱ्या अंगात..
देवा शेतीमाती साठी
सुखी ठेव शेतकरी,
त्याच्या कुटुंबासाठी रे
रीती ओंजळ तू भरी..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[10/06, 10:03] Gjendra: *कवी संजीव प्रतिष्ठान साहित्य मंच*
*आयोजित ऑनलाईन स्पर्धेसाठी*
*शीर्षक*
*कसे सांगू राजे तुम्हाला*
कसे सांगू राजे तुम्हाला
तुमच्या राज्यात काय झाले
नरसंहार झाला भ्रष्टाचार झाला
आणि बलात्कार झाले....//धृ//
इथे जनता भयभीत झाली
तुमची भीती आता ना राहिली
तुमची भीती आता ना राहिली
इथे लूटमार झाली
अन लाखो संग्राम झाले..//१//
राजे तुमच्या जाण्यानंतर
घरभेदयांचे वाढले चलंतर
घरभेदयांचे वाढले चलंतर
घरभेदी दुष्मन झाले
अन् छुपे वार त्यांनी केले..//२//
आया बहिणींची अब्रू गेली
इथे जगण्याची पंचाईत झाली
इथे जगण्याची पंचाईत झाली
डोळे अश्रूंनी चिंब ओले
नाही पुसायला तुमचे हिंदोळे..//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[10/06, 11:30] Gjendra: ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*डोळे माझे माहेराच्या*
*वाटेला लागले*
दादा कधी येशील तु मला घ्यायाले,
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//धृ//
काय सांगू दादा तुला मी सासुरवाशीण,
लग्नाआधी होते मी रे जशी वाघीण,
कंटाळले दादा आता सासरच्या छळाले,
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//१//
पती माझा आडदांड नी सासू खट्याळ,
जीवनाची माझ्या होते आहे आबाळ,
दोन दिस घेऊनी जा मज तुझ्या घराले
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//२//
तू का आहे रे दादा वहिनीच्या मुठीत,
सासर आहे खास्ट मज ना सुख माहेरात,
सांग कसे सांगू दादा मी गाऱ्हाणे देवाले
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//३//
सासरी ना सुख दादा माहेर झाले परके,
जाऊ कोण्या दिशेला मी सारे सारखे,
ऐकू येते कारे कानी माझे हिंदोळे
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//४//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मी:९६२३७१४०११/औरंगाबाद*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
आनंदाने फुलणारं मी एक रानफुल
प्रीतीच्या रानामधे मज भेटते का हुल..//धृ//
प्राणवेडे जाहले फुलताना बावरले,
मन हे विरहातले अलगद सावरले,
सुखाच्या बागेतली लागते चाहूल,
प्रीतीच्या रानामधे मज भेटते का हुल..//धृ//
कळ्या फुलल्या माळ रानातल्या,
चांदण्या पाहिल्या निळ्या नभातल्या
आर्जवे तुझी मजला भासते का खूळ
प्रीतीच्या रानामधे मज भेटते का हुल..//धृ//
माळरानात फुलतो वाऱ्यावरी डुलतो
राज तुझे खोलतो नी उडतो बागडतो
हिरव्या रंगाची हिरवी पांघरतो झूल
प्रीतीच्या रानामधे मज भेटते का हुल..//धृ//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[01/06, 16:59] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: ये रे ये रे पावसा*
ये रे ये रे पावसा
कोसळ भरदिवसा,
उष्ण उन्हाच्या लाटा
मना देईना दिलासा..
ये रे ये रे पावसा
चिंब धारा घेऊन,
मन माझे तापलेले
जा थंडावा देऊन..
ये रे ये रे पावसा
घनघोर तू बरस,
वेड्या जीवाला आशा
आहे दिवसेंदिवस..
ये रे ये रे पावसा
घेऊन गोडवा मधाळ,
कर दूर तू अंधार
नभातला झाकोळ..
ये रे ये रे पावसा
जीव झाला लाही लाही,
तुझ्यासवे दे मला
चिंब भिजण्याची ग्वाही..
ये रे ये रे पावसा
घेऊन टपोरी धार,
आस काळ्या मातीला
तुझी लागली फार..
ये रे ये रे पावसा
उन्हं झालं रे घातक
तुझ्या येण्याची चाहूल
देऊन जातो चातक..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[02/06, 17:52] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय: सत्कर्म*(अभंग रचना)
ज्ञानाचा प्रसार । जावू दारोदारी ।
देवाचिये द्वारी । लोटांगणं ।।
सत्कर्माची झाडे । अंगणी लावावी ।
माळ ती जपावी । सदोदित ।।
संस्काराच्या बिया । ठेवाव्या पेरून ।
सुसंगती बेनं । सांभाळून ।।
देवाचिया साठी । जन्म इथे घ्यावा ।
दान धर्म द्यावा । गरिबांशी ।।
हाती सत्कर्माचे । गाठोडे बांधावे ।
ज्ञान ही वाटावे । येता जाता ।।
पंढरीच्या राया । घालितो साकडे ।
मागतो मी थोडे । ज्ञान तूला ।।
सत्कर्म वाटितो । थोडे पुण्यासाठी ।
तुझ्या भेटीगाठी । धन्य व्हाव्या ।।
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०१२ औरंगाबाद*
[02/06, 18:25] Gjendra: *फुलोरा कलेचे माहेरघर*
*आयोजित उपक्रम*
*विषय: वारी पंढरीची*
पांडुरंगा रे पांडुरंगा
पांडुरंगा रे पांडुरंगा
करितो वारी पंढरीची
करितो वारी पंढरीची..//धृ//
भूक माझी तुचं तहान ही तुचं
मन तुझ्या भक्तीत चिंब भिजं
ओढ हृदयाला माझ्या
तुझ्या भाव भक्तीची
करितो वारी पंढरीची
करितो वारी पंढरीची..//१//
चंद्रभागे तीरी स्नान करुनिया
हात जोडीतो तुला पंढरी राया
श्वास माझा तूच देवा
आस माझ्या देहाची
करितो वारी पंढरीची
करितो वारी पंढरीची..//२//
आषाढी कार्तिकी तुझी असे वारी
तुझे नाम घेत देवा फिरे दारोदारी
माझा भोळा भाव तू
साद ऐक रे अंतरीची
करितो वारी पंढरीची
करितो वारी पंढरीची..//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७२४९११ औरंगाबाद*
[02/06, 19:03] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: गोमाता*
गाय आमुची माता,
म्हणता जन्म हा धन्य होई,
तिच्या कृपेने जीवनी
आमच्या सुख धावूनी येई..
गाईमुळे मिळते आम्हां
दूध दही आणि लोणी तूप,
शरीर सदृढ दिसते सुंदर
उजळून निघे जीवनाचे रूप..
सांज सकाळी सदा करावी
मनो भावे पूजा सेवा,
गोमतेच्या रक्षणासाठी
मन आपुले चंचल ठेवा..
गोमातेच्या हत्या रोखा
रक्षण करा हो सदा सर्वदा,
नुसते माता म्हणण्याने
टळणार नाही येणारी विपदा..
गोमातेच्या पाळण्याने
भरून राहते सुखाची ओंजळ
दुःख हरूनी जाई आपले
फुलन येईल जीवनाचे कमळ..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[02/06, 20:00] Gjendra: *साहित्य संस्कृती समूह*
*आयोजित उपक्रम*
*विषय: मनी पिसारा फुलला*
येता रेशीमधार पावसाची
मनी पिसारा फुलला,
मन तुझ्यासवे साजणी गं
घेई हिंदोळ्यावर झुला..
पहिला पाऊस आला
मनी उठली आनंदाची लहर,
गार वारा स्पर्शून जाता
तनमनास माझ्या येई बहर..
तीच्यासवे फिरायला जाता
चहूकडे पसरली हिरवी छटा
मिठीत तिच्या मी सामावता
हळुवार उडती मनमोहक बटा,
मनी पिसारा या फुलताना
चौफेर उधळण सुगंधाची,
दिसते खुशीत उमललेली
प्रीत तिच्या नी माझ्या प्रेमाची..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[03/06, 20:55] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: गजरा*
केसांमध्ये गजरा
तू माळून घे पोरी,
तू तुझ्या मनाची राणी
नाही माझी शिरजोरी..
केसांमध्ये गजरा....//धृ//
तुझ्या काळ्या बटा या
मज दाविती नखरा,
मी आकर्षिला जातो गं
तुझ्या चावट नजरा..
अंग काळा पोशाख
त्यात दिसते गं गोरी
तू तुझ्या मनाची राणी
नाही माझी शिरजोरी..
केसांमध्ये गजरा....//१//
तुझ्या ओठांची लाली
मज करती घायाळ,
जसं उगवतं गं राणी
चिखला मधलं कमळ..
तुझ्या स्पर्शाने अंगात
भलतीच उठते शीरशिरी
तू तुझ्या मनाची राणी
नाही माझी शिरजोरी..
केसांमध्ये गजरा....//२//
तुझी साडी भरजरी
आणि ठिपक्यांची चोळी
या मनात रुतते गं
तुझी चाल मखमली..
हळूच करते गं साजणे
माझ्या दिल्लाची चोरी
तू तुझ्या मनाची राणी
नाही माझी शिरजोरी..
केसांमध्ये गजरा....//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२४७१४०११ औरंगाबाद*
[03/06, 21:13] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: पहिला पाऊस*
पहिला पहिला आहे पाऊस
मला सोडून तू नको जाऊस
वारा वाहे चहुकडे गार सारा
आशा प्रेमाची तू नको दावूस...
पहिला पाऊस पहिली सर
वेड्या जीवाला लाविते घोर,
मातीलाही येतसे गर्भारपण
जिव्हाळा पावसाचा वरचेवर..
झाडे वेली फुले बहरती सारे
पहिल्या पावसाने आनंदते वारे,
गर्द आठवांचे मळे फुलून येती
असे पहिल्या पावसाचे इशारे..
पहिल्या पावसाची ओढ मनास
लाटा तरंती जश्या वेड्या तनास,
पाझरती आठवांचे क्षण निराळे
पहिल्या पावसाचे ते रंग वेगळे..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[03/06, 23:58] Gjendra: *आम्ही सारस्वत साहित्य मंच*
*आयोजित हायकू स्पर्धेसाठी*
*विषय: पाऊस ज्याचा त्याचा*
नभी दंगला
पाऊस ज्याचा त्याचा
मनात साचा..
या सांजवेळी
वादळ सुरू जाहले
दुःख भोगले..
वारा पांगला
पाऊस हा क्षणांचा
जरा थांबला..
हा वेदनांचा
पाऊस ज्याचा त्याचा
मार्ग अश्रूंचा..
वादळासवे
थेंब टपोरे येती
गारा भासती..
येतो अवेळी
जणू वादळ वारा
अंगी शहारा..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[04/06, 20:43] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: पैंजण*
पायी छुनछुन वाजती पैंजण
तुझ्या प्रेमाचे हे नंदनवन,
फुलविते आठवणींचे वन
ओढ सख्याची घायाळ करते मन..
सावरा हो कुणी मनास या
बाहूंत सखयाच्या जाताना,
बावरला जीव भलता माझा
साद तयाची हळूच येताना..
पैंजणांचा नाद प्रेमाची आस
जवळ असावा त्याचा श्वास,
छुनछून करीत हृदयी शिरावा
सखया मिळावा तुझा सहवास..
शृंगार करते मी सजणासाठी
पायांत बांधते गं पैंजण छोटी,
केसांत माळूनी गजरा फुलांचा
सैल सोडिते सखयाची मिठी..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[05/06, 21:18] Gjendra: *फुलोरा कलेचे माहेर घर*
*आयोजित उपक्रम*
*विषय:मी तुळस तुझ्या अंगणाची*
तू तुळस माझ्या अंगणाची
वेल वाढणारी माझ्या संसाराची..
तू तुळस माझ्या अंगणाची..//धृ//
लावितो कुंकू मी तुझिया भाळी
आशीर्वाद देतो गं सांजसकाळी
हिरे मोती मानतो या जीवनाची
वेल वाढणारी माझ्या संसाराची..
तू तुळस माझ्या अंगणाची..//१//
फुले फुलतील वेलीला सुकुमार
तुझ्या मायेचा असेल तिथे पाझर
सौभाग्यखाण तुझी ती चंदनाची
वेल वाढणारी माझ्या संसाराची..
तू तुळस माझ्या अंगणाची..//२//
निळ्या अंबराच्या असावे छायेत
बांधून घे मज तू तुझ्या मायेत
सुखात बहरेल घडी मिलनाची
वेल वाढणारी माझ्या संसाराची..
तू तुळस माझ्या अंगणाची..//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३६१४०११ औरंगाबाद*
[05/06, 21:57] Gjendra: *फुलोरा कलेचे माहेर घर*
*आयोजित उपक्रम*
*विषय:मी तुळस तुझ्या अंगणाची*
तुळस एक हिंदू धर्मात मानलं जाणारं पावित्र्य, तुळस आपल्या अंगणातील वैभव, तुळस सुवासिनीचं पूजण्याचं एक आत्मिक नातं, तुळस म्हणजे सर्वांच्या अंगणातील एक दुवा जिचं दर्शन केल्यावर भगवंताचे दर्शन झाल्याचा भास होणं. रोज सकाळी अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ जाऊन दर्शन घेणं जुन्या जमान्यात खूप महत्त्वाचं मानलं जाई. आज तसं कोणी मानत नाही. मी अंघोळ करून कामावर जायला निघालो तर अंगणात आवाज आला." काय रे निघालास कामावर." मी माघे वळून पाहिलं कुणी नव्हते पण तुळशी वृंदवना जवळून आवाज आला,तास मी तुळशी वृंदावनजवळ गेलो. ती बोलत होती.
"किती हवाहवासा वाटणारा जमाना होता जुना, सकाळी उठल्यावर मला शेणामातीने सारवलं जायचं अंगणात छान रांगोळी काढून घरच्या सुवासींनी मला पूजायच्या. मला ही प्रसन्न वाटायचं मी रोज तिला सौभाग्याचं दान द्यायचे आशीर्वाद द्यायचे. आज मात्र सगळं बदललंय कोणी कोणाशी प्रेमाने बोलत नाही वागत नाही. जो तो फक्त स्वत:च्या भल्यासाठी दगवताना दिसतोय. गृहिणी ही आज एकलकोंडया झाल्या आहेत या वातावरण माझा श्वास घुसमटतोय. माझं तुला एकच सांगणं आहे. सगळे प्रमाणे एकमेकांशी वागा गुण्यागोविंदाने रहा. हा काळ बदलेल नवा येईल तुमचं नाव त्या काळात आदराने घेतील अशी कीर्ती जपा नाव जपा. चल मी येते तुझं कल्याण होवो..!"
आणि वाऱ्याची झुळूक आली मी भाणावर आलो पण तुळशीमातेचे बोलणे डोक्यातून जात नव्हते तेचतेच विचार मनात घुटमळत होते.मनात ठरवलं सगळ्यांशी प्रेमानं वागायचं बोलायचं सर्वांशी मिळून मिसळून रहायचं आणि एक ठाम निर्धार करून मी कामावर निघून गेलो.
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३६१४०११ औरंगाबाद*
[06/06, 20:55] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: पोशिंदा*
साऱ्या जगाचा पोशिंदा,
आहे शेतकरी राजा
नाव वाढे जगामंदी
त्याचा होई गाजावाजा..
घाम गाळीतो कष्टाने
साथ काळ्या आईची,
बीज पेरतो मातीत
कूस भरी धरतीची..
दान मागतो देवाला
पडू दे रे पावसाला
त्याच्या विन जीवनात
अर्थ नाही जगण्याला..
रातंदिस पोटासाठी
किती राबतो शेतात,
त्याच्या घामाच्या धाराही
वाही साऱ्या अंगात..
देवा शेतीमाती साठी
सुखी ठेव शेतकरी,
त्याच्या कुटुंबासाठी रे
रीती ओंजळ तू भरी..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[10/06, 10:03] Gjendra: *कवी संजीव प्रतिष्ठान साहित्य मंच*
*आयोजित ऑनलाईन स्पर्धेसाठी*
*शीर्षक*
*कसे सांगू राजे तुम्हाला*
कसे सांगू राजे तुम्हाला
तुमच्या राज्यात काय झाले
नरसंहार झाला भ्रष्टाचार झाला
आणि बलात्कार झाले....//धृ//
इथे जनता भयभीत झाली
तुमची भीती आता ना राहिली
तुमची भीती आता ना राहिली
इथे लूटमार झाली
अन लाखो संग्राम झाले..//१//
राजे तुमच्या जाण्यानंतर
घरभेदयांचे वाढले चलंतर
घरभेदयांचे वाढले चलंतर
घरभेदी दुष्मन झाले
अन् छुपे वार त्यांनी केले..//२//
आया बहिणींची अब्रू गेली
इथे जगण्याची पंचाईत झाली
इथे जगण्याची पंचाईत झाली
डोळे अश्रूंनी चिंब ओले
नाही पुसायला तुमचे हिंदोळे..//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[10/06, 11:30] Gjendra: ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*डोळे माझे माहेराच्या*
*वाटेला लागले*
दादा कधी येशील तु मला घ्यायाले,
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//धृ//
काय सांगू दादा तुला मी सासुरवाशीण,
लग्नाआधी होते मी रे जशी वाघीण,
कंटाळले दादा आता सासरच्या छळाले,
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//१//
पती माझा आडदांड नी सासू खट्याळ,
जीवनाची माझ्या होते आहे आबाळ,
दोन दिस घेऊनी जा मज तुझ्या घराले
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//२//
तू का आहे रे दादा वहिनीच्या मुठीत,
सासर आहे खास्ट मज ना सुख माहेरात,
सांग कसे सांगू दादा मी गाऱ्हाणे देवाले
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//३//
सासरी ना सुख दादा माहेर झाले परके,
जाऊ कोण्या दिशेला मी सारे सारखे,
ऐकू येते कारे कानी माझे हिंदोळे
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//४//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मी:९६२३७१४०११/औरंगाबाद*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
No comments:
Post a Comment