Tuesday, 21 July 2020

[26/03, 23:18] Gjendra: *चांद्रमौळी घरटे तुझे गं*


असे चांद्रमौळी घरटे तुझे गं
निळया आकाशी शोभून दिसे गं,
मिळो चंदनाचा सुवास थोडा
कौतिक सांगू कोणा कसे गं...!

पंख पसरूनी उड तू आकाशी
आभाळ कवेत घेण्या जरासे,
लडिवाळा परी तू लाड करूनी
मिठीत येणा गं टाकीत उसासे...!

वाटसरू दिवाना सखे मी होईन
घरट्यात तुझ्या गं घेईन विसावा,
चंद्राची कला तू अप्सरा देखणी गं
ओठी असू दे प्रीतीचा ओलावा...!

प्रीतीचे पारडे जरा जड व्हावे
तुझ्या इच्छे खातर पुरून उरावे
आशा आकांक्षा हृदयी जपून
जाळूनी टाकावे हे सारे दुरावे...!

लावण्यवती ही रात्र अंधारी
बहरून आली गं बघ रातराणी,
श्वास श्वासात जरा मिसळूनी
फुलून गेली गं सखे फुलराणी...!

©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२६/३/२०२० गुरुवार
[27/03, 10:10] Gjendra: *हृदयी तुझ्या मज जागा थोडी दे*


भाळी चंदनाचा टिळा लावूनी घे
हृदयी तुझ्या मज जागा थोडी दे..//धृ//

रंगवली मी तुझीच स्वप्ने
तुजसाठी मन वेडे दिवाने,
चंद्र चांदणीच्या प्रेमाची गोडी दे
हृदयी तुझ्या मज जागा थोडी दे..//१//

गहाळ झाले जरी मन माझे
आठवात माझ्या श्वास तुझे,
वाचविण्या प्राण जराशी उडी घे
हृदयी तुझ्या मज जागा थोडी दे..//२//

जन्मोजन्मी तुझी राहो आस
सजविन मी स्वप्नांची आरास,
मिलनाची वेड्या अपूर्व घडी दे
हृदयी तुझ्या मज जागा थोडी दे..//३//

जोवर धरती नी अंबर असे
तुजवीन हृदयी कोणी न वसे
पाझरू दे मनास प्रेमास वाढू दे
हृदयी तुझ्या मज जागा थोडी दे..//४//

©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२७/३/२०२० शुक्रवार
[27/03, 12:44] Gjendra: *आयुष्याचे उत्तर शोधू*

भाकरीचे  दोन  घास
द्याहो तुम्ही गरीबांस,
देश आहे लॉकडाऊन
बळ भरावे या पंखास..!

काम झाले आहे बंद
पैसा येईल कुठून हाती,
बांधून तोंड काय खावे
भरावी का पोटात माती..!

हातावरचे जगतील कसे
जिवंत ठेवा हात बिचारे,
उद्या तुमच्या उद्योगाची
भरभराट करतील सारे..!

आज त्यांच्या पोटी घाला
थोडे शिळे थोडे ताजे,
संकटाची बिकट घडी ही
तुम्हीच त्यांचे शिवबा राजे..!

एकमेकांना साथ द्या हो
मदतीचा ही हात द्या हो,
आज वाटा हजार थोडे
उद्या लाखोंने घर भरा हो...!

जगलो वाचलो राहिलो तर
भेटू नव्याने आपण सारे,
या आयुष्याचे उत्तर शोधू
येवोत हजार वादळ वारे...!

©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२७/३/२०२० शुक्रवार
[27/03, 19:34] Gjendra: *कधी तुझ्याकडून कधी माझ्याकडून*


पाप वाढत आहे जगातं
वासनेच्या खेळात बुडून,
कधी झाले ते तुझ्याकडून
कधी झाले ते माझ्याकडून..!

धरतीवरी हे ओझेच वाढे
संकट राही उभे तिच्यापुढे,
लोक हो वाचवा या धरेला
सोडवा आता हे नवीन कोडे,
जगा नव्याने द्या पाप सोडून,
कधी झाले ते तुझ्याकडून
कधी झाले ते माझ्याकडून..!

चक्रीवादळ आले सुनामी
अनेक राष्ट्र झाले बेकामी,
जपानलाही बसला तडाखा
हादरली ती अमेरिका ही,
नियतीने दिला डाव मोडून,
कधी झाले ते तुझ्याकडून
कधी झाले ते माझ्याकडून..!

पक्षाकडूनी बर्ड फ्लू आला
कधी तो स्वाईन फ्लू बळावला,
आता नव्याने कोरोना आला
सगळ्यांसाठी जीवघेणा झाला,
विनाशाकडे वाट जाई चालून,
कधी झाले ते तुझ्याकडून
कधी झाले ते माझ्याकडून..!

बुडतीचे हे पाय डोहाकडे
नका पाहु आता मोहाकडे,
रोगराई मुक्त होण्यासाठी
अजूनही कराहो पुण्य थोडे,
या देहाची जाईल माती होऊन
कधी झाले ते तुझ्याकडून
कधी झाले ते माझ्याकडून..!

©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२७/३/२०२० शुक्रवार
[30/03, 21:16] Gjendra: *आओ मिटा दे दुरिया*

हम जिसे अपना समजते हैं,
उसी पर सबकुछ लुटा देते हैं।
अक्सर वही तो पराये होते हैं,
जो हमे ही धोखा दे जाते है।

आखीर कसूर किसका होता हैं,
जो देखा वही लबो पे आता हैं।
कोन किसिके लिये हरदम रोता हैं,
वही उगता हैं जो बोया जाता हैं।

हर कदम जिसे हम ढुंढते रहे,
कुछ ही पल ओ दिल मे रहे।
ये संसार भी झुठा लगने लगा,
जबतक दुखो को हम सहते रहे।

आईने को देखकर ऐसा लगा,
जीने की चाह खत्म हो रही।
चेहरे पे उमडते दुखो के साये,
धडकन दिलो की बढती रही।

आसमा भी रो रहा प्यार मे,
होटो की महकती खुशबू से।
आओ हम मीटा दे दुरिया,
दोनो मे चल रही गुफ्तगु से।

©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२८/३/२०२० शनिवार
[01/04, 02:18] Gjendra: *आँखों देखी बातें*


सारा जहाँ हँसे हमपर
पर तुम नहीं हँसना।
प्यार के जाल में फँसे हजारो।
पर तुम नहीं फँसना।

कीमत अपनो की यहाँ
आजकल करता है कौन।
कोई करे न करे इफाजत
पर तुम जरूर करना।

रास्ते सिमट गये सारे
बदलाव कही और नहीं।
बदले चाहे जमाना
पर तुम नही बदलना।

छेडे हर कोई यहाँ
अपनी ही माँ बहन को।
कोई करे न करे फतराव
पर तुम जरूर करना।

आँखों देखी बातों को
नजरअंदाज कभी न करना।
कोई करे न करे विश्वास
पर तुम कभी न हरना।

©️गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:३१/३/२०२० बुधवार
[03/04, 11:59] Gjendra: *दावू कसे दयाघना*

कुणी कुणाचा नाही
नाही माझा कोणी,
दावू कसे दयाघना
मी डोळ्यांतले पाणी //धृ//

दुःख कळाले जेव्हा
गहिवरले हृदय तेव्हा,
सुखाची ती घडी रे
तू पाठवशील केव्हा,
वात्सल्य ममतेसाठी
हळहळते ही वाणी,
दावू कसे दयाघना
मी डोळ्यांतले पाणी //१//

जन्म घेऊनी धरेवरी
दुष्कर्म या शीरावरी,
माहीत असूनी केले
पापे अनेक या भूवरी,
धगधगत्या ज्वालामधे
जळतो हर एक ज्ञानी,
दावू कसे दयाघना
मी डोळ्यांतले पाणी //२//

मी पामर या जगी
ज्ञानाविना अभागी
दुष्कर्म हे गाठीला
मन रडते हे दुर्भागी
असंगाच्या संगतीने
काया होई निकामी
दावू कसे दयाघना
मी डोळ्यांतले पाणी //३//

संतांच्या सत्संगाने
घडो मन सत्कर्माने
पापे जळून सारी
कर्म करावे धर्माने
हात जोडुन ही विनंती
भगवंता तुझ्या चरणी
दावू कसे दयाघना
मी डोळ्यांतले पाणी //४//

©️गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:३/४/२०२० शुक्रवार
[03/04, 13:29] Gjendra: *मरते दम तक*


भरोसा दिलाकर अपनेपन का।
साथ तोड दिया है तुने जनम का।..//धृ//

पग पग निहारे बिरहा का रासता।
कैसे बताऊँ मेरे दिल की दासता।
द्वार खोल दिया है जैसे मरन का।
साथ तोड दिया है तुने जनम का।..//१//

जुबाँ पर तेरा प्यार हमेशा रहे।
चल दूँ अंगारों पर तू जो कहे।
उठाके परदा अब लाज शरम का।
साथ तोड दिया है तुने जनम का।..//२//

आखरी साँस में तेरा ही नाम हो।
नशीले घोंट का हर एक जाम हो।
प्याला फेक दिया अच्छे करम का।
साथ तोड दिया है तुने जनम का।..//३//

भर दो झोली द प्यार से मेरी।
अरमान जगा के आस तोडो न मेरी।
खुशियों से दामन भरो मेरे चमन का।
साथ तोड दिया है तुने जनम का।..//४//

बिरहा की दीवार तोड़ के प्यारे।
आओ दिल में समा जाओ हमारे।
दास बन जाऊँ मैं तेरी चरण का।
साथ तोड दिया है तुने जनम का।..//५//

सादगी तुम्हारी मुझे रोज रुलाये।
जान मेरी बार बार तुझे बुलाये।
आस्था से मेरी परदा उठाओ भरम का।
साथ तोड दिया है तुने जनम का..//६//

कह दे तू जो बात हृदय से स्वीकारू।
मरते दम तक तुझे दिल से पुकारू।
आंतर आत्मा जागा है मेरे धरम का।
साथ तोड दिया है तुने जनम का..//७//


©️गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:३/४/२०२० शुक्रवार
[03/04, 13:30] Gjendra: *दावू कसे दयाघना*

कुणी कुणाचा नाही
नाही माझा कोणी,
दावू कसे दयाघना
मी डोळ्यांतले पाणी //धृ//

दुःख कळाले जेव्हा
गहिवरले हृदय तेव्हा,
सुखाची ती घडी रे
तू पाठवशील केव्हा,
वात्सल्य ममतेसाठी
हळहळते ही वाणी,
दावू कसे दयाघना
मी डोळ्यांतले पाणी //१//

जन्म घेऊनी धरेवरी
दुष्कर्म या शीरावरी,
माहीत असूनी केले
पापे अनेक या भूवरी,
धगधगत्या ज्वालामधे
जळतो हर एक ज्ञानी,
दावू कसे दयाघना
मी डोळ्यांतले पाणी //२//

मी पामर या जगी
ज्ञानाविना अभागी
दुष्कर्म हे गाठीला
मन रडते हे दुर्भागी
असंगाच्या संगतीने
काया होई निकामी
दावू कसे दयाघना
मी डोळ्यांतले पाणी //३//

संतांच्या सत्संगाने
घडो मन सत्कर्माने
पापे जळून सारी
कर्म करावे धर्माने
हात जोडुन ही विनंती
भगवंता तुझ्या चरणी
दावू कसे दयाघना
मी डोळ्यांतले पाणी //४//

©️गजेंद्र
मो:९६२३७१४०११
[04/04, 20:05] Gjendra: *चले जाव चले जाव कोरोना*


हम भी है होश में,
सरकार भी होश में।
भारत भूमी का हर आदमी,
सारे सारे है होश में।
इक इक दिया जलाके हम,
करते है कामना।
चले जाव चले जाव कोरोना।
चले जाव चले जाव कोरोना।

हम मिलके एकता से,
अपनी नेकता से।
लड़ेंगे कोरोनासे,
मिलकर महानता से।
साथ दो विश्व का,
कर्म करो धर्म का।
जल जल जायेगा,
मिट्टी में मिल जायेगा।
कहती है धरती माँ।
चले जाव चले जाव कोरोना।
चले जाव चले जाव कोरोना।

हमे घर मे है रहना,
बाहर नहीं निकलना।
लढके कोरोनासे,
अपने देश को बचाना।
संकटो की है घडी,
आपदा है आन पडी।
चैन हो आराम हो,
सबका सुखी धाम हो
यही है हमारी भावना
चले जाव चले जाव कोरोना।
चले जाव चले जाव कोरोना।

यह विषाणू जहरीला,
खेले मृत्यू की लीला।
संसर्ग बढ़ता जाता है,
गर हाथ मुह हो खुला।
हर आदमी है बड़ा,
आगे मृत्यू है खड़ा।
मूल्यवान हमारी जान,
खुद की हो पहचान
साथ एक दूसरे की छोडोना
चले जाव चले जाव कोरोना।
चले जाव चले जाव कोरोना।

©️गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:४/४/२०२० शनिवार
[04/04, 21:22] Gjendra: *अंधाराला घाबरायचं का*

अंधाराला घाबरायचं का
लाईट तर काही काळापूर्वी आली
गोडेतेल वात लावून
प्रकाश देणाऱ्या पणत्या होत्या
मशाली होत्या कंदील होते
घासलेट टाकून पेटवायच्या
छोट्या छोट्या चिमण्या होत्या
आणि लाईट
सदाच तुम्हाला साथ देत नाही
काही सेकंदासाठी सर्वांच्या
घरी जात असेलच ना
मग नाही का तुम्ही मोबाईल टॉर्च
किंवा मेणबत्ती कडे धाव घेत
देव हाथ जोडण्यापुरता
नतमस्तक होण्यापुरता
किंवा मानण्यापुरता
मर्यादीत असला तरी देवाचं
अस्तित्व संपत नाही
नका घालवू वीज
नका पेटवू दिवे नका लावू मेणबत्त्या
पण तुम्ही ज्या देवाला ज्या गुरूला
ज्यांना कोणाला मानता
त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दिवे लावा...!


©️ गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:४/४/२०२० शनिवार
[05/04, 10:13] Gjendra: *उभार मानवतेच्या गुढ्या तू*


जळू दे गर्व अहंकार
हे मानवरूपी प्राण्या,
भगवंत ही पाठीशी असतो
छाया आशीर्वादाची देण्या..!

आकस्मिक होते युद्ध
नजरेमधल्या कामबाणात,
तरीही स्वच्छ ठेव हेतू
डोळ्यांच्या अभिमानात...!

सूर्य मावळून पुन्हा
नव्याने उगवायचा असतो,
काम क्रोधाच्या लक्तरांना
भास निती भेदाचा असतो..!

शीतलता त्या चंद्राची
त्याची योग्यता ठरवते,
अवगुण तुझे जळून जाता
योग्य उपाधी तुलाही मिळते..!

घरटे पक्षाचे ही असते
त्याला अनमोल आणि प्यारे,
मानवा तु ही जाणून घे
धर्म कर्म कर्तव्याचे वारे...!

काम क्रोध लोभ मत्सर
आता जाळून टाक गड्या तू,
आशा आकांक्षा अन प्रेमाने
उभार मानवतेच्या गुढ्या तू...!

©️गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:५/४/२०२० रविवार
[06/04, 12:21] Gjendra: *दुःखात कुणी नाही*

वेदना तुझ्या मी
पाहिल्या त्या जेव्हा,
तो झालेला त्रास
मज असह्य होता...!

भाव होते गहिरे ते
डोळ्यात दिसणारे,
शमवून दुःखाना
हळूच पाहिले मी..!

आकांत पसरलेला
चहूंदिशांना फक्त,
भावनांचा ओघळ
तर कुठेच नव्हता..!

अंदाज बांधून मी
शोध घेऊ पाहिला,
तिने थांबविले मज
त्या उंबरठ्यातच...!

असंख्य होते दुःख
पण हसू चेहऱ्यावर,
बांध तो आसवांचा
पापण्यांच्या कडाशी..!

तेव्हा जाणिले मी
दुःख आर्त एकटीचे,
भोगायचे होते
तिला एकटीला...!

दुःख आपुले ते
असावे हृदयांती,
इतरांशी वाटणे ते
नसे योग्यतेचे..!

भाव अगम्य राही
हृदयात तळाशी,
आव दुःख जाणण्याचा
करू नये खोटा..!

भ्रम असे मैत्रिमधे
आपुले सर्वकाही,
ते सुखात वाटेकरी
दुःखात कुणी नाही...!


©गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:६/४/२०२० सोमवार
[07/04, 15:26] Gjendra: *कळतो जन्म सार भेटताना*


वणवा पाहिला भुकेचा पेटताना,
पोटात साठलेला घास गोठताना..!

मस्तावलेले पाहिले चेहरे खोटे,
स्वप्नास आमच्या अग्नीत लोटताना..!

सांगू कुणा आता दुःखात जगणे हे
भावना छळाच्या डोळ्यांत पेलताना..!

आपुले तेवढे एक सत्य वाटते,
बाकी दिसे मनाचे अर्थ जळताना..!

शोधू द्या मनाचे सुखदुःख प्रत्येकी,
कळतो जन्म त्याला सार भेटताना..!

©️गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:७/४/२०२० मंगळवार
[08/04, 17:43] Gjendra: *सदिच्छा रचना*

*दोन शब्द*

दोन शब्द कर्तुत्वाचे
भावबंध जागृतीचे,
धर्म कर्म नैतिकता
आश्वासन मातृत्वाचे..!

उपासना की कामना
विद्वानांची आराधना,
दोन शब्दांची लाघवी
हाती असावी साधना..!

दोन शब्द मनी शांत
प्राण वाही अंतरात,
आत्मा होई सावधान
शांत निल आसमात..!

मंत्रशुद्ध साधनेने
कात सोडी हे शरीर,
दोन शब्द भावनांचे
वेध घेई हे तिमिर..!

कडुगोड स्वभावाचे
थरकाप चोहीकडे,
दोन शब्द सांडतील
फुलपानी सोनसडे..!

© गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:८/४/२०२० बुधवार

No comments:

Post a Comment