Tuesday, 21 July 2020

[12/10/2019, 09:14] Gjendra: *तुझे प्रेम*

जेव्हा आपलं जवळचं कुणी
आपल्या पासून दुर जातं
याहून दुर्दैव दुसरं काय असेल मोठं...!
हलकिसी चाहूल देऊन
मनात जागा निर्माण करून
सांगा कसे वाटतं जाताना सोडून...!
अस्वस्थ आहे माझे मन
या मनातील प्रत्येक क्षण
आणि क्षणाक्षणात दडलेय तुझे प्रेम...!

©®
गजेंद्र ढवळापुरीकर..
मो:9623714011
[06/01, 10:45] Gjendra: *ते क्षण तुला आठवतील*

तुझ्या माझ्या मिलनाचे ते क्षण तुला आठवतील,
आणि प्रेमाचे हे रक्षणकर्ते हृदयामध्ये साठवतील..!

चोर पावलांनी जेव्हा मी यायचो तुला भेटायला,
भेट तर व्हायचीच पण..तू लागायची खेटायला,
येवो कितीही लाख संकटे प्रेम अपुले मिरवतील,
आणि प्रेमाचे हे रक्षणकर्ते हृदयामध्ये साठवतील..!

चोखंदळ हसरा खोडकर होता माझा स्वभाव,
यातून फुलत उमलत गेले माझ्या प्रीतीचे भाव,
तीर दोघांच्याही नजरेचे नजरेलाच भिडवतील,
आणि प्रेमाचे हे रक्षणकर्ते हृदयामध्ये साठवतील..!

क्षण प्रीतीचे गोड ते आज आठवतील का तुला,
एकमेकांसवे खेळलो दोघं सुंदर स्वप्नांचा झुला,
गेलो कितीही दूर आपण भेट आपली घडवतील,
आणि हे प्रेमाचे रक्षणकर्ते हृदयामध्ये साठवतील..!

आठवणी साऱ्या प्रेमाच्या जपल्या आहे मनात,
शोधत आहे तुला आजही इथल्या कणाकणात,
प्रीतीचे धुंद वारे कदाचित अजूनही भेटवतील,
आणि हे प्रेमाचे रक्षणकर्ते हृदयामध्ये साठवतील..!

येताच आठवण मनातल्या चिघळून जाई जखमा
तू दिलेल्या वचनांच्या तेव्हा मज आठवती सीमा,
जगलेल्या त्या आठवणी सरणावरती झोपवतील,
आणि हे प्रेमाचे रक्षणकर्ते हृदयामध्ये साठवतील..!

गजेंद्र ..
दि.६/१/२०२० सोमवार
मो:९६२३७१४०११
[07/01, 18:26] Gjendra: *अनोळखी पत्र मिळालं*

ती दूर निघून गेली माझ्या आयुष्यातुन
माझं मोहरलेलं आयुष्य अर्धवट सोडून
तेव्हा असं वाटलं नातं आमचं संपलं
आणि फुललेलं आयुष्य माझं थांबलं
किती सुंदर होतं जगणं आमचं गोड
त्यावर कसा कुठून दिसून आला फोड
प्रेमाच्या त्या परिभाषेत सारं काही कळालं
जेव्हा एक दिवस अनोळखी पत्र मिळालं....!

मी मात्र जगतोय तिच्या आठवणीत रडत
विरहाच्या धगधगत्या अग्नीत जळत
तिने फुलवलेल्या प्रेमाच्या बागेत
बागेतल्या त्या प्रत्येक वृक्षांच्या छायेत
तिथेच बसून ती येण्याची वाट पाहणं
तासनतास तिच्यासाठी झुरत राहणं
तिच्याखातर आयुष्य प्रत्येक क्षण जळालं
जेव्हा एक दिवस अनोळखी पत्र मिळालं....!

तिला पाहताच हरवून स्वतःला बसलो
पहिल्याच नजरेत प्रेमात तिच्या फसलो
आजही आठवतो तो दिवस झुरलेला
प्रत्येक क्षण तिच्यासाठी होता उरलेला
मांडीवर डोकं ठेवून पडलेलो असायचो
तिच्याच आठवणीत बुडलेलो दिसायचो
आठवात तिच्या मन खोलवर बुडालं
जेव्हा एक दिवस अनोळखी पत्र मिळालं....!

पहिली भेट पहिलं प्रेम पहिलीच हि कथा
तिच्यासवे जुळल्या होत्या प्रितीच्या वाटा
प्रेमाचे गोड धुके पांघरले अंगा खांद्यावर
अश्रूंच्या धारा ओघळल्या ती निघून गेल्यावर
तिचे जाणे आजही डोळ्यांत अश्रू देऊन जाते
खुश रहावी ती जीवनात ओठांवर मागणे येते
मी पणाचं ओझं माझं आपसूक गळालं
जेव्हा एक दिवस अनोळखी पत्र मिळालं....!

प्रेमाचे दुष्मन आडवे येत राहती वाटेत
आमचं धगधगतं प्रेम नेहमी राहिलं पेटत
श्वास माझा तिचा होता तिचा श्वास माझा
तुटून गेला श्वास अचानक ती झाली वजा
प्राणांहून ही जास्त माझ्या ती होती प्यारी
समोर येताच ती हृदयात वाजे तुतारी
तिच्या प्रेमात मन माझं आकंठ होतं बुडालं
जेव्हा एक दिवस अनोळखी पत्र मिळालं....!

न भेटता ती गेली मनात आले संशय
जिंकूनही हरलो प्रेमात हा कसला विजय
स्वप्नातलं हसरं रूप नेहमी मज आठवतं
सोडून ती गेल्यानं पुन्हा पुन्हा पेटवतं
निखारे आयुष्यात दोघांच्या कुणी हे टाकले
लैला मजनुचे प्रेम आमचे आज आहे बाटले
रहस्य तिच्या जाण्याचं खुप उशिरा कळालं
जेव्हा एक दिवस अनोळखी पत्र मिळालं....!

तिच्या आठवणीत असेल मी रोज सतावतं
तिचं निघून जाणं मज का तीळतीळ रडवतं
बोहल्यावर चढण्याची स्वप्ने धुळीस गेली
माझ्या एकनिष्ठ प्रेमाची का झाली होळी
श्वासांना या आता जगण्याची हिम्मत नाही
विरह दिला तिने माझ्या प्रेमाला किंम्मत नाही
कळलं तिचं प्रेम का माझ्यावरून उडालं
जेव्हा एक दिवस अनोळखी पत्र मिळालं....!

रंग उडालेल्या प्रेमाचा असतो काय भरवसा
हजारो डाके त्यावर पडत राहती भरदिवसा
सुखावलेला मुरला चेहरा कसे सांगू आता
निष्ठावंत रहा एकाशी एवढंच सांगेन जाता जाता
श्वास थांबो प्राण जावो माझा येऊ नको परत
हजारो वर्षे सरणावरती तुजसाठी राहो झुरत
बहरलेलं उमललेलं फुललेलं ते प्रेम जळालं
जेव्हा एक दिवस अनोळखी पत्र मिळालं....!

पत्रावरती कुठलंच नाव नव्हतं गाव नव्हतं
त्यावर लिहिलेलं अक्षर मात्र तीचंच होतं
तिने लिहिली होती सोडून जाण्याची गाथा
मज कळली होती तिच्या हृदयाची व्यथा
दुःख हेच होतं ती सांगून बोलून नाही गेली
हृदय दुःखाचे मजकडे खोलून नाही गेली
होतं नव्हतं सारं क्षणात दुर दूर पळालं
जेव्हा एक दिवस अनोळखी पत्र मिळालं....!
जेव्हा एक दिवस अनोळखी पत्र मिळालं....!


गजेंद्र ..
ढवळापुरीकर
दि:-७/१/२०२० मंगळवार
मो:९६२४७१४०११
[10/01, 10:34] Gjendra: *एक अंतिम सत्य*


अंतिम सत्य प्रेमाचे अजूनही उलगडले नाही
तिने नाही म्हणावे असे काहीच घडलेले नाही...!

दुरावा वाढला आहे दोघांमधला जरी
मैत्रीत गुंतत गेली आहे दोन मने खरी
प्रेम खऱ्या व खोट्या भावनेत गडगडले नाही
तिने नाही म्हणावे असे काहीच घडलेले नाही...!

तिचे वागणे बोलणे पाहून असे वाटते
अजूनही शक्यता प्रेमाची मनी दाटते
एकमेकांशी अजून का तनमन जडलेले नाही
तिने नाही म्हणावे असे काहीच घडलेले नाही...!

बहरतील क्षण की संपेल इथे सारं काही
एक अंतिम सत्य प्रेमाचे देईल का ग्वाही
होईल स्वप्न पूर्ण माझे स्वप्न असे पडलेले नाही
तिने नाही म्हणावे असे काहीच घडलेले नाही...!


गजेंद्र ...
ढवळपुरीकर
दि:१०/१/२०२० शुक्रवार
मो:९६२३७१४०११
[03/02, 10:21] Gjendra: शब्दसुमने आयोजित प्रातिनिधिक  काव्यसंग्रहासाठी 

विषय :- उज्वल भविष्य {अभंग}

उज्वल भविष्य | आपल्याच हाती ||
उजळावी ज्योती | आयुष्याची ||

करावे चिंतन | नमन भगवंता ||
तुच रे अनंता | सर्व ठायी ||

ज्योत आयुष्याची | तेवत ठेवावी ||
आसनस्त व्हावी | काळजात ||

भाग्याची दोरखंड | बांधावी मनात ||
मन चिरशांत | ठेवूनिया ||

उजळावे भाग्य | सदैव संकटी ||
कर जसे कटी | विठ्ठलाचे ||

संकटाना देवा | मिळो नित्य माती ||
व्हावी दृढ नाती | मानवाची ||

करावे जे भोग | याच जीवनात ||
फेड करी हात | जीव मात्र ||

करू एक प्रण | संदेह नको मनी
मधाळ ठेवू वाणी | मुखामधे ||

रात्री संकटाची | जाईल निघून |
पतित पावन | व्हावे मन ||

उज्वल भविष्य | एकच मनी ध्यास ||
यावा क्षण खास | आयुष्यात ||

..✍
गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
[27/02, 19:10] Gjendra: *महाराष्ट्र शुरांचा घडविला*

कसून कंबर एकच नंबर
डंका त्रिखंडी वाजविला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//धृ//

बालपणीच संस्कार केले होते जिजाईनं
ढाल आशीर्वादाची ठेवली होती शिवाईनं
बालपनीच जिंकला तोरण किल्ला
जमवुनी मावळा
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//१//

नातं जुळलं मातीशी अवघा दख्खन पाठीशी
बाराबलुतेदारांची गाठ बांधली हो नाळीशी
मान करून ताठ भल्याभल्यांची वाट
लावून सिंह तो गर्जला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//२//

रक्त शिवबाचे उसळे खुडण्या अन्यायी कुसळे
स्वराज्याच्या रक्षणाला राजे शोभले भोसले
निजाम हरला मुघल जिरला
भगवा झेंडा फडकला
माझ्या शिवबा राजानं
महाराष्ट्र शुरांचा घडविला...//३//

गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
[27/02, 19:13] Gjendra: *साई तुम्हारी पूजा हम*


साई तुम्हारी पूजा हम करते है प्यार से
भुले भटके इंसाको जोडो संसार से
जोडो संसार से..
साई तुम्हारा पूजा हम
साई तुम्हारा पूजा हम...//धृ//

दुनिया मे कितने लोगोने तुम्हे स्वीकार किया
कुछ अधर्मीयोने तुमपर जाणलेवा वार किया
नहला दो साई सबको
नहला दो साई सबको
भक्ती की धार से
भुले भटके इंसाको जोडो संसार से
जोडो संसार से..
साई तुम्हारा पूजा हम
साई तुम्हारा पूजा हम...//१//

हम सबका है ये वादा सदा भक्ती तुम्हारी करे
अपनी कृपादृष्टी रखना हम सांस खुशी से भरे
मैं धुल तुम्हारे चरण की
मैं धुल तुम्हारे चरणो की
छोडो मजधार से
भुले भटके इंसाको जोडो संसार से
जोडो संसार से..
साई तुम्हारा पूजा हम
साई तुम्हारा पूजा हम...//२//

गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
दि.१६/२/२०२० शनिवार
[27/02, 20:05] Gjendra: *मानवा तू बुद्धिमानी*

मानवा तू बुद्धीमानि
तुझ्याकडे आहे वाणी
या वाणीने माणसा रे
गा तू मानवतेची गाणी
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
मनातली तू जळमटे काढ....//धृ//

तुझा जन्म आहे पुण्यासाठी
जन्मला तू मानवापोटी
सत्कर्माने होतील वेड्या
साधुसंताच्या गाठीभेटी
ऐकण्या पुण्याची कहाणी
नको करुस तू आणकाणी
जाईल निघूनी हा आत्मा
आणि फिरेल वेड्यावाणी
सत्कर्माच्या झाडाची
ती वाईट फळे पाड
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
मनातली तू जळमटे काढ..//१//

जर जाशील व्यसनांच्या आहारी
मन होईल हे व्याभिचारी
जीवनी टपून तुझ्या बसला रे
तुझ्या प्राणांचा तो शिकारी
बरी नाही तुझी मनमानी
व्यसन घालील रे मोहिनी
तुझ्या निरोगी शरीराला
घालता विळखा होशील निकामी
उघड डोळे सामोरी पहा रे
तुझा सजलेला आहे माड
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
मनातली तू जळमटे काढ..//२//

आहे मानव मानवापरी रहा
गोरगरिबांची कर तू सेवा
तुझ्यातल्या राक्षसी वृत्तीला
बाहेर ठेवुनी जरा पहा
लक्ष लक्ष पेटतील ज्योती
उजळुनी निघतील मोती
मनातल्या व्यभिचाराला
जाळुनीया निखारे जाती
संगतीने साधुसंताच्या
स्वर्गाची उघडतील कवाडं
तुझ्या ज्ञानामध्ये होईल वाढ
मनातली तू जळमटे काढ..//३//

गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
दि.४/३/२०१९..
[08/06, 20:23] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*

*विषय:दोन शब्दांची कविता*


तुझे माझे
दृढ संबंध,
यावर लिहू
एक निबंध..

भावना दाबून
ठेव  मनात
थोडेसे  प्रेम
त्या क्षणांत..

हिरे मोती
तूच जसा,
प्रेमाचा गंध
गर्द कसा..

सोन पाऊली
ये  हळुवार,
सुख तुझे
गोड  धार..

विरह नको
आता पुन्हा,
माफ कर
माझा गुन्हा..


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[08/06, 21:39] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*


*विषय: श्री गुरुदेव दत्त*


गाणगापूरी आहे
दत्तगुरू आसन,
तेथूनच चाले हो
गुरुदेवांचे शासन..

दत्त गुरू माझे
औदुंबरी ते वसे,
मी लिन चरणांशी
देव चहूकडे दिसे..

श्री गुरुदेव दत्तांचा
आहे महिमा मोठा,
गाणगापूरी नाही
कुणी दिन कुणी छोटा..

श्री गुरुदेव दत्तांची
कृपा आहे सर्वांवरी,
त्यासाठी तू मानवा
मार्ग भक्तीचा धरी..

दत्तांच्या चरणांशी
उजळो माझे  दैव,
मी सदा रहावे देवा
तुझ्या सेवेशी सदैव...


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[08/06, 22:26] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*


*विषय: इन्सानियत*


हे अमीरों के परमेश्वर
हम गरीबों की ले ले खबर।
यहाँ नहीं है इन्सानियत
लूट रहा हैं जहाँ तेरे बगर।

आँखों मे छुपा है भगवन
ये कैसा है दर्द का समंदर।
आँसू नही दिखते हमारे तुम्हें
क्यों खपा हो तुम इंसानपर।

इन्सानियत का ये रास्ता
दिखाया है हमे बारंबार।
तेरे इशारोंपर जी रहा है
भगवन सारा यह संसार।

हाथों में कर्म लिये इन्सान
संभल रहा है तेरी धरोहर।
दया क्षमा और शांतिप्रिय
भावनाएँ सदा निगाहोंपर।

भोग में डुबनेवाला इन्सान
खत्म हो जायें इस धरतीपर।
दुखसुख की किलकारियाँ
सदा रखें अपनी सराखोंपर।


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*

No comments:

Post a Comment