[20/04, 15:14] Gjendra: *जगावे की मरावे*
तुझ्या सवे जगावे
की मरावे कळेना,
विरहातं प्रिये तुझ्या
डोळ्यात अश्रू थांबेना..!
तू दूर तिथे मी दूर इथे
हृदयात या हुरहूर होते,
सांगू कसे प्रीतीचे
सूर आज जुळेना….!
बंदिस्त झाल्या भावना
रात्र शापित तुझ्या विना
हे जीवन जगायला
साथ तुझी मिळेना...!
तिमिर भासते मला जग
हृदयात ही कैसी तगमग
सुकलेल्या डोळ्यांतून
अश्रू आता गळेना...!
©️गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२०/४/२०२० सोमवार
[21/04, 10:59] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय: स्त्रीचे सौभाग्य अलंकार*
*सौभाग्य अलंकार*
सखया तुजसाठी करते सोळाशृंगार,
तूच माझे सौभाग्य अन् तूच अलंकार..!
कुंकू भाळी टिळा कपाळी सजना,
सौंदर्याचा शोभतो साज दयाघना...!
मंगळसूत्र वाढवते शोभा गळ्याची,
गंठण चमचमती माणिकमोत्याची...!
लटकती मोत्याची कानी कर्णफुले,
जणू बांधली ती सोनसाखळी झुले...!
नथ सर्जाची साज सोन्याचा त्यावरी,
उतरली स्वर्गातूनी पहा सौंदर्याची परी..!
बांगड्या हिऱ्या मोत्याच्या हाती शोभती,
स्त्रीच्या सौभाग्यात चंद्र सूर्य लावीती...!
कंबरपट्टा सोनियाचा हिऱ्याचे नक्षीकाम,
कलाकुसरीत सुंदर अवतरले घनशाम...!
दंडात बांधिले सुबक देखणे बाजूबंद,
स्त्रीयांना नटण्याचा अविरत लागे छंद...!
पायी पैंजण छनछन वाजे घुंगरमाळा,
तसा सखयाचा खुणवी चावट चाळा...!
जोडवी साक्ष देतात पतिव्रता धर्माची
सोळाशृंगार करणे रीत जन्माजन्माची...!
सोळाशृंगार करूनी रुपवती दिसे नारी,
सौभाग्याचे अलंकार हे मदनाचे पुजारी...!
©️गजेंद्र
मो९६२३७१४०११
दि:२१/४/२०२० मंगळवार
[22/04, 21:36] Gjendra: *आजचा उपक्रम विषय*
*चित्रकाव्य*
*हे वनदेवी*
हे वनदेवी निसर्ग जननी
तुझ्यामुळेच हे जग आहे,
दिलेस तू सुखी आयुष्य
तरी मानवप्राणी ठग आहे..!
तुझाच नायनाट केला त्याने
संपविले तुझे सुखी जीवन,
तोडुनी तुझेच अवयव सारे
मिळविले त्याने अमाप धन..!
तुझ्यामुळेच हा श्वास चाले
नाही कळले त्यास रहस्य,
जेव्हा संपेल सारा निसर्ग
किती विदारक असेल दृश्य..!
कळ्या पाने फुले नी फळे
यांच्या सुंदरतेने नटतेस तू,
गळूनी जाता मोहर सारा
विवस्त्र अबला दिसतेस तू..!
एकच प्रार्थना करतो आज
हा वाचवू निसर्ग वाचवू धरा,
तूच वनदेवी तूच निसर्गदेवी
देशील विश्वास तूच जलधारा..!
©️गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
दि:२२/४/२०२० गुरुवार
[23/04, 15:39] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:सांजवेळ*
*सांजवेळ*
आयुष्याच्या सांजवेळी
घरट्यात ये परतुनी,
निस्वार्थ ठेवू भावना
झाले गेले ते विसरुनी..!
सोनेरी किरणे लेवून
दिनकर जाई मावळाया,
पुष्प सुंगधी सांजवेळी
घेऊनी ये तू उधळाया..!
आसमंत जातो रंगूनीया
सांजवेळ येता बहरूनी,
नितळ चांदणे आकाशी
उधळीत जाते रातराणी..!
तिमिरात दिसती अंधुक
सांजवेळी तुझ्या निराशा,
रातरणीच्या या सुगंधात
उमलाव्या आपल्या आशा..!
सांजवेळी दिनकराची
किरणे शांत पल्लवीत,
सोनेरी रंगाने आसमंत
उजळून दिसे प्रकाशीत..!
सांजवेळी नित्य व्हावी
शुभमकरोती प्रार्थना,
दिवे लागणीला असावी
भगवंत चरणी याचना..!
©️गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
दि२३/४/२०२० शुक्रवार
[24/04, 12:41] Gjendra: *टाक तोडुनी मोहपाश*
स्वप्नातल्या संख्या रे
तू येऊनी जा जरा,
अडकले मी विरहात
तू सोडव हा पहारा..!
वृंदावणी ति राधा
वाट पाहते हरीची,
डोळयात आसवे
घेई पहिल्या सरीची..!
कोसळूनी त्या पडल्या
हृदयावरती दामिनी,
जळून खाक झाल्या
साऱ्या तुझ्या आठवणी..!
गंगा यमुना वाहती
डोळ्यातूनी माझ्या
तुज भेटण्याची आहे
इच्छा अपूर्ण राज्या..!
दे वचन आज मला
येशील तू कधीतरी,
मिठीत घेण्या मजला
तोडशील ना दूरी..!
अलवार काळजाचे
तुकडे हजार झाले,
तुझ्या विना सख्यारे
जगणे अनिवार झाले..!
डोळ्यात वेदनांचे
पसरलेत वादळवारे,
लाचार भावनांना
पोळतील निखारे..!
येऊनी साजणा तू
टाक तोडूनी मोहपाश,
नित्य असु दे माझ्या
हृदयात तुझा वास..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो: ९६२४७१४०११
दि:२४/४/२०२० शुक्रवार
[24/04, 13:15] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय : मोबाईलचे फायदे*
*मोबाईलचा वापर*
मोबाईल आला आहे
जेव्हापासून सर्वांच्या हाती,
संवादाने जवळपास
आली आहे दूरवरची नाती..!
सुरवातीला होता अत्यंत
साध्या बटनाचा मोबाईल,
आता व्हाट्सप फेसबुकवर
सुंदर दिसतात प्रोफाईल..!
साध्या मोबाईलवर नुसते
व्हायचे दुरून सभांषण,
व्हिडिओ कॉलने दिसते आता
चेहऱ्यावरून आनंदी मन..!
मोबाईल वापराने आता
व्यवहार कॅशलेस झाले,
रांगेत उभे राहून करण्याचे
काम घरी बसून करता आले..!
मोबाईलवर मिळू लागल्या
आता नवनवीन सुविधा,
नाही येत कसलीच अडचण
आणि नाही कसलीच बाधा..!
मोबाईलच्या वापराचे
नाही कसलेच दुष्परिणाम
व्यवस्थित वापर जर केला
वाढत जाते आपले ज्ञान..!
©️गजेंद्र ढवळपुरीकर
मो : ९६२३७१४०११
दि : २४/४/२०२० शुक्रवार
[24/04, 22:25] Gjendra: *वंदन देश सेवकांना महानायकांना*
वंदन त्या देश सेवकांना महानायकांना,
पोलीस परिचारिका कर्तव्यदक्ष डॉक्टरांना..!
कोरोनाचे आले असताना महाभयंकर संकट
चहुबाजूंनी पसरले आहे फक्त मृत्यू चे सावट,
विचार न करता घरदार आणि कुटुंबाचा
कर्तव्य दक्षतेसाठी ज्यांनी पाळले नियमांना,
वंदन त्या देश सेवकांना महानायकांना..!
कोरोना रोगाचे पसरत चालले जाळे,
महासत्ता असलेल्या देशांचे निघाले दिवाळे,
हार नाही मानली भारताच्या शूरवीरांनी
करन परिश्रम वाचविले अनेक देशवाशियांना,
वंदन त्या देश सेवकांना महानायकांना..!
कोरोना रोगाने आणले महामारीचे वादळ
पोलिसांनी रक्षीले डोळ्यात घालून काजळ,
डॉक्टर आणि परिचारिकांनी केली देशसेवा
रक्षीले ज्यांनी उद्याच्या वर्तमान भविष्यांना
वंदन त्या देश सेवकांना महानायकांना..!
रात्रंदिवस जे झटले ते सर्व ठरलेत महानायक
त्या उपकराने उद्याचे जीवन झाले सुखदायक
दुःख सरेल उद्याची नवी सुखी पहाट उगवेल
कधी ही न विसरू आपल्या या देश बांधवांना
वंदन त्या देश सेवकांना महानायकांना..!
©️ गजेंद्र ढवळपुरीकर
मो: ९६२४७१४०११
दि:२४/४/२०२० शुक्रवार
[25/04, 00:22] Gjendra: *स्पर्धेसाठी*
*विषय:वंदन देश सेवकांना*
*शिर्शक:*
*वंदन देश सेवकांना*
वंदन देश सेवकांना
माझे मानाचे अभिवादन
जन्म घेऊनी भारतभूवर
झाले हे सुखी जीवन..!
होऊनी नतमस्तक इथे
वंदन देश सेवकांना
कोरोना रोगावर उपचार
करणाऱ्या डॉक्टरांना..!
डॉक्टरच्या बरोबरीने
उभे राहिले परिचारक,
परिचारिकेनेही केले
उपचार समाधानकारक..!
साफसफाई कामगार
जिद्दीने लढले कोरोनाशी,
वाचवायला हा वर्तमान
फवारणी केली औषधांची..!
पोलीस राहिले गस्तीवर
रात्रंदिवस चौका चौकात,
त्यांच्या समोर जाण्याची
नाही कोरोनाची औकात..!
कोरोनाशी लढा देणाऱ्या
वंदन देश सेवकांना,
अभिमानाचे अभिवादन
या भारतीय बांधवांना..!
चालूच ठेवू अस्तित्वाचा लढा
नायनाट कोरोनाचा करू,
या माझ्या भारतीय बंधूनो
श्वास आपण एकात्मतेचा भरू..!
©️गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७२४०११
दि:२४/४/२०२० शुक्रवार
[25/04, 16:59] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय: मैत्री*
ऋणानुबंध मैत्रीचे
काळजात जपायचे,
आठवणीत सवंगडी
पुन्हा पुन्हा भेटायचे..!
मैत्रीच्या नात्यामधले
श्वास अतूट ठेवलेले,
आठवलेले मित्र सारे
हृदयी घट्ट जपलेले..!
मैत्री दोन्ही बाजुंनी
असावी एक निष्ठतेची,
सुख दुःखात रहावी
भावना आत्मीयतेची..!
निष्ठावान मैत्रीला
सुरंग लागू नये कधी,
युगानुयुगे भेटत राहील
अशा मैत्रीला उपाधी ..!
मैत्री जपावी जीवनात
कृष्ण आणि अर्जुना परी,
संकटात राही सदैव साथ
दुःखाच्या पडत राहो सरी..!
मैत्री आठवा एकदा
कृष्ण आणि सुदामाची
राजा आणि रंकामधे
सरस मैत्री बालपणाची..!
मैत्रीत नसावी अपेक्षा
असावी समर्पणाची भावना,
मित्र रहावा सुखामधे
ही एकच मनोकामना..!
©️गजेंद्र ढवळपुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि:२५/४/२०२० शनिवार
[25/04, 18:36] Gjendra: *स्पर्धेसाठी भारुड*
*विषय:---*
*सत्वर पाव गं मला*
*भवानी आई*
*कोरोनाची जाऊ दे बला*
अवघ्या जगाचा नासाडा केला
व्हायरस भलताच पसरत गेला
सत्वर पाव गं मला सत्वर पाव गं मला
भवानी आई कोरोनाची जाऊ दे बला
कोरोनाची जाऊ दे बला गं
कोरोनाची जाऊ दे बला...//धृ//
लई तापलं वातावरण
कसं करू मी विवरण
आली कुठून ही बला
श्वास गुदमरून गेला
घाली जगण्यावरी घाला
मारी गं काळजात भाला
सत्वर पाव गं मला सत्वर पाव गं मला
भवानी आई कोरोनाची जाऊ दे बला
कोरोनाची जाऊ दे बला गं
कोरोनाची जाऊ दे बला...//१//
सुखी राहत होते लोक
होता व्यवहार रोखठोख,
आज येण्या जाण्याची भीती
बदलली सारी जीवन पद्धती
लाठ्या काठ्यांनी उद्धार केला
समदा पोलिसांचा बोलबाला
सत्वर पाव गं मला सत्वर पाव गं मला
भवानी आई कोरोनाची जाऊ दे बला
कोरोनाची जाऊ दे बला गं
कोरोनाची जाऊ दे बला...//२//
कामधंदा सोडून घरीदारी
लोकं रिकाम टवाळक्या करी
बाहेर येण्या जाण्याची चोरी
काहींना आयती मिळे शिदोरी
बिनकामाचा खोळंबा झाला
कोरोना भलताच मारी टोला
सत्वर पाव गं मला सत्वर पाव गं मला
भवानी आई कोरोनाची जाऊ दे बला
कोरोनाची जाऊ दे बला गं
कोरोनाची जाऊ दे बला...//३//
डॉक्टर समदे झाले हैराण
रुग्णांचे चुहूकडे आक्रमण
कोणी कोणास बोल बोलेना
आत्मीयतेचे भाव खोलेना
दुरदूरूनी राम राम केला
दया क्षमा शांतीचा तुटवडा झाला
सत्वर पाव गं मला सत्वर पाव गं मला
भवानी आई कोरोनाची जाऊ दे बला
कोरोनाची जाऊ दे बला गं
कोरोनाची जाऊ दे बला...//४//
कोरोना धीराने आता घेऊ
त्याचा नायनाट करून राहू,
साथ एकमेकांना देण्याची
गरज आहे ही भविष्याची
वाजवू जनजागृतीच्या संबळा
धरू वात्सल्याच्या डमरूला
सत्वर पाव गं मला सत्वर पाव गं मला
भवानी आई कोरोनाची जाऊ दे बला
कोरोनाची जाऊ दे बला गं
कोरोनाची जाऊ दे बला...//५//
©️गजेंद्र ढवळपुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि:२५/४/२०२० शनिवार
[26/04, 10:08] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय: मैत्री*
*मैत्री*
मैत्री तूझी
मैत्री माझी,
एक ओल
आहे ताजी..!
सुख दुःख
नसे भीती,
जिथे अति
तिथे माती..!
तुझी मैत्री
आर्त भाव
माझे मनी
तुझे नाव..!
एक घाव
राही खोल,
तुझी मैत्री
चिंब ओल..!
शुष्क मैत्री
मनी घाव,
प्रेमा साठी
मिळे भाव..!
दुःख ताजे
एक व्रण
घट्ट मैत्री
माझे प्रण..!
मैत्री माझी
खोल माग,
तुझा मिळो
थोडा भाग..!
आर्त टाहो
तुझा एक
मैत्री माझी
आहे नेक..!
तुही ठेव
एक नोंद,
मनी माझी
मैत्री गोंद..!
साद घाली
गर्द हवा,
मैत्री तुझी
माझी दवा..!
मैत्री मधे
जिथे भोग
तिथे मैत्री
होते रोग..!
मैत्री गंध
तुझी साथ,
हाता मधे
राहो हात..!
सर्व दूर
निळे नभ
तुझी मैत्री
माझे जग..!
©️गजेंद्र ढवळपुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो: ९६२३७१४०११
दि:२५/४/२०२० शनिवार
[26/04, 10:49] Gjendra: *कर्म असे का खालचे*
दुसऱ्याच्या जीवावर
उड्या माराव्या कुठवर,
अरे भरलेले खापर
मिळते चाटायला तोवर..!
जन्म घेऊनी आलास
तू या भूवरी एकटा,
जगशी दुसऱ्याच्या जीवावर
किती आहे रे नकटा..!
आला जन्मास जिथे
वाग तसे तू सत्वर,
किती करशील पापं
देह आहे हा नश्वर...!
काम असे कर तू
जे शोभेल नियतीला,
धर्म कर्म आहे हा
नको विसरुस जातीला...!
जन्म उच्च कुळातला
कर्म असे का खालचे,
विसरू नको नीतिमत्ता
पुण्य संपतील कालचे..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२४७१४०११
दि:२५/४/२०२० रविवार
[27/04, 10:35] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:आई*
*शांतमूर्ती आई*
वात्सल्यमूर्ती आई,
चैतन्यमूर्ती आई,
ओलावा ममतेचा,
कैवल्यमूर्ती आई..!
त्यागमूर्ती आई,
ईश्वरमूर्ती आई,
जगतास भेटलेली,
प्रेममूर्ती आई...!
श्याममूर्ती आई,
राममूर्ती आई,
आयोध्या वृंदावणाची
देवमूर्ती आई..!
सौख्यमूर्ती आई ,
दु:खमूर्ती आई,
डोळ्यांच्या पापण्यांत,
अश्रूमूर्ती आई..!
भावमूर्ती आई,
न्यायमूर्ती आई,
ईश्वरास लाभलेली,
दानमुर्ती आई..!
चंद्रमूर्ती आई,
सुर्यमूर्ती आई,
ज्वलंतेत ही शीतल
ध्येयमूर्ती आई...!
विश्वमूर्ती आई,
स्वप्नमूर्ती आई,
शांतप्रिय भावनांची
शांतमूर्ती आई...!
©️गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मी:९६२३७१४०११
दि:२७/४/२०२० सोमवार
[27/04, 10:38] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:आई*
*शांतमूर्ती आई*
वात्सल्यमूर्ती आई, चैतन्यमूर्ती आई,
ओलावा ममतेचा, कैवल्यमूर्ती आई..!
त्यागमूर्ती आई, ईश्वरमूर्ती आई,
जगतास भेटलेली, प्रेममूर्ती आई...!
श्याममूर्ती आई, राममूर्ती आई,
आयोध्या वृंदावणाची देवमूर्ती आई..!
सौख्यमूर्ती आई , दु:खमूर्ती आई,
डोळ्यांच्या पापण्यांत, अश्रूमूर्ती आई..!
भावमूर्ती आई, न्यायमूर्ती आई,
ईश्वरास लाभलेली, दानमुर्ती आई..!
चंद्रमूर्ती आई, सुर्यमूर्ती आई,
ज्वलंतेत ही शीतल, ध्येयमूर्ती आई..!
विश्वमूर्ती आई, स्वप्नमूर्ती आई,
शांतप्रिय भावनांची, शांतमूर्ती आई..!
©️गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मी:९६२३७१४०११
दि:२७/४/२०२० सोमवार
[27/04, 15:32] Gjendra: *स्पर्धेसाठी पोवाडा*
*पोवाडा कोरोनाचा*
प्रथम करून नमन गणपतीला
वंदन श्री शंकराला शंकराच्या पार्वतीला..,
पोवाडा लिहितो कोरोनाचा
जहरील्या त्या विषाणूचा
आहे हा विषय आपत्कालीनाचा
जी रं जी हा जी हा जी रं जी जी जी..//धृ//
चीनच्या वूहान प्रांतात,
वटवाघूळानं केला घात,
अचानक दुभंगली शांत..
अचानक दुभंगली शांत..
साऱ्या जगावरी कोसळला,
कोरोना विषाणूचा आकांत..,
जी रं जी हा जी हा जी रं जी जी जी..//१//
बघता बघता जगी पसरला
लाखो जणांचा मृत्यू झाला,
जन सेवकांचा इरादा पक्का..
जन सेवकांचा इरादा पक्का..
लॉकडाऊनचा निश्चय केला,
घरात डांबण्याचा जुलुम झाला,
जी रं जी हा जी हा जी रं जी जी जी..//२//
पोलीस डॉक्टरांची पंचाईत,
संचारबंदी केली हो घाईत,
मास्क लावूनी तोंडाला..
मास्क लावूनी तोंडाला..
संशयित कॉरनटाइन केला
उपचार रुग्णांवरी झाला..
जी रं जी हा जी हा जी रं जी जी जी..//३//
समदे लोकं आहे घरामंदी,
बाहेर जाण्याची नाही संधी,
व्यवहारावर झाली बंदी
व्यवहारावर झाली बंदी
पोलीस बडवती हो लोकाला
तरीही भीती नाही कोणाला
जी रं जी हा जी हा जी रं जी जी जी..//४//
कोरोना कमी होण्याची चिन्ह नाही,
दिवसेंदिवस रोग हा वाढत जाई,
नाही उपचाराची टंचाई..
नाही उपचाराची टंचाई..
गजेंद्राने प्रयत्न एक केला
म्हणे पोवाडा लिहुनी झाला
जी रं जी हा जी हा जी रं जी जी जी..//५//
©️गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि:३६/४/२०२० सोमवार
तुझ्या सवे जगावे
की मरावे कळेना,
विरहातं प्रिये तुझ्या
डोळ्यात अश्रू थांबेना..!
तू दूर तिथे मी दूर इथे
हृदयात या हुरहूर होते,
सांगू कसे प्रीतीचे
सूर आज जुळेना….!
बंदिस्त झाल्या भावना
रात्र शापित तुझ्या विना
हे जीवन जगायला
साथ तुझी मिळेना...!
तिमिर भासते मला जग
हृदयात ही कैसी तगमग
सुकलेल्या डोळ्यांतून
अश्रू आता गळेना...!
©️गजेंद्र
मो:९६२३७१४०११
दि:२०/४/२०२० सोमवार
[21/04, 10:59] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय: स्त्रीचे सौभाग्य अलंकार*
*सौभाग्य अलंकार*
सखया तुजसाठी करते सोळाशृंगार,
तूच माझे सौभाग्य अन् तूच अलंकार..!
कुंकू भाळी टिळा कपाळी सजना,
सौंदर्याचा शोभतो साज दयाघना...!
मंगळसूत्र वाढवते शोभा गळ्याची,
गंठण चमचमती माणिकमोत्याची...!
लटकती मोत्याची कानी कर्णफुले,
जणू बांधली ती सोनसाखळी झुले...!
नथ सर्जाची साज सोन्याचा त्यावरी,
उतरली स्वर्गातूनी पहा सौंदर्याची परी..!
बांगड्या हिऱ्या मोत्याच्या हाती शोभती,
स्त्रीच्या सौभाग्यात चंद्र सूर्य लावीती...!
कंबरपट्टा सोनियाचा हिऱ्याचे नक्षीकाम,
कलाकुसरीत सुंदर अवतरले घनशाम...!
दंडात बांधिले सुबक देखणे बाजूबंद,
स्त्रीयांना नटण्याचा अविरत लागे छंद...!
पायी पैंजण छनछन वाजे घुंगरमाळा,
तसा सखयाचा खुणवी चावट चाळा...!
जोडवी साक्ष देतात पतिव्रता धर्माची
सोळाशृंगार करणे रीत जन्माजन्माची...!
सोळाशृंगार करूनी रुपवती दिसे नारी,
सौभाग्याचे अलंकार हे मदनाचे पुजारी...!
©️गजेंद्र
मो९६२३७१४०११
दि:२१/४/२०२० मंगळवार
[22/04, 21:36] Gjendra: *आजचा उपक्रम विषय*
*चित्रकाव्य*
*हे वनदेवी*
हे वनदेवी निसर्ग जननी
तुझ्यामुळेच हे जग आहे,
दिलेस तू सुखी आयुष्य
तरी मानवप्राणी ठग आहे..!
तुझाच नायनाट केला त्याने
संपविले तुझे सुखी जीवन,
तोडुनी तुझेच अवयव सारे
मिळविले त्याने अमाप धन..!
तुझ्यामुळेच हा श्वास चाले
नाही कळले त्यास रहस्य,
जेव्हा संपेल सारा निसर्ग
किती विदारक असेल दृश्य..!
कळ्या पाने फुले नी फळे
यांच्या सुंदरतेने नटतेस तू,
गळूनी जाता मोहर सारा
विवस्त्र अबला दिसतेस तू..!
एकच प्रार्थना करतो आज
हा वाचवू निसर्ग वाचवू धरा,
तूच वनदेवी तूच निसर्गदेवी
देशील विश्वास तूच जलधारा..!
©️गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
दि:२२/४/२०२० गुरुवार
[23/04, 15:39] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:सांजवेळ*
*सांजवेळ*
आयुष्याच्या सांजवेळी
घरट्यात ये परतुनी,
निस्वार्थ ठेवू भावना
झाले गेले ते विसरुनी..!
सोनेरी किरणे लेवून
दिनकर जाई मावळाया,
पुष्प सुंगधी सांजवेळी
घेऊनी ये तू उधळाया..!
आसमंत जातो रंगूनीया
सांजवेळ येता बहरूनी,
नितळ चांदणे आकाशी
उधळीत जाते रातराणी..!
तिमिरात दिसती अंधुक
सांजवेळी तुझ्या निराशा,
रातरणीच्या या सुगंधात
उमलाव्या आपल्या आशा..!
सांजवेळी दिनकराची
किरणे शांत पल्लवीत,
सोनेरी रंगाने आसमंत
उजळून दिसे प्रकाशीत..!
सांजवेळी नित्य व्हावी
शुभमकरोती प्रार्थना,
दिवे लागणीला असावी
भगवंत चरणी याचना..!
©️गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११
दि२३/४/२०२० शुक्रवार
[24/04, 12:41] Gjendra: *टाक तोडुनी मोहपाश*
स्वप्नातल्या संख्या रे
तू येऊनी जा जरा,
अडकले मी विरहात
तू सोडव हा पहारा..!
वृंदावणी ति राधा
वाट पाहते हरीची,
डोळयात आसवे
घेई पहिल्या सरीची..!
कोसळूनी त्या पडल्या
हृदयावरती दामिनी,
जळून खाक झाल्या
साऱ्या तुझ्या आठवणी..!
गंगा यमुना वाहती
डोळ्यातूनी माझ्या
तुज भेटण्याची आहे
इच्छा अपूर्ण राज्या..!
दे वचन आज मला
येशील तू कधीतरी,
मिठीत घेण्या मजला
तोडशील ना दूरी..!
अलवार काळजाचे
तुकडे हजार झाले,
तुझ्या विना सख्यारे
जगणे अनिवार झाले..!
डोळ्यात वेदनांचे
पसरलेत वादळवारे,
लाचार भावनांना
पोळतील निखारे..!
येऊनी साजणा तू
टाक तोडूनी मोहपाश,
नित्य असु दे माझ्या
हृदयात तुझा वास..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो: ९६२४७१४०११
दि:२४/४/२०२० शुक्रवार
[24/04, 13:15] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय : मोबाईलचे फायदे*
*मोबाईलचा वापर*
मोबाईल आला आहे
जेव्हापासून सर्वांच्या हाती,
संवादाने जवळपास
आली आहे दूरवरची नाती..!
सुरवातीला होता अत्यंत
साध्या बटनाचा मोबाईल,
आता व्हाट्सप फेसबुकवर
सुंदर दिसतात प्रोफाईल..!
साध्या मोबाईलवर नुसते
व्हायचे दुरून सभांषण,
व्हिडिओ कॉलने दिसते आता
चेहऱ्यावरून आनंदी मन..!
मोबाईल वापराने आता
व्यवहार कॅशलेस झाले,
रांगेत उभे राहून करण्याचे
काम घरी बसून करता आले..!
मोबाईलवर मिळू लागल्या
आता नवनवीन सुविधा,
नाही येत कसलीच अडचण
आणि नाही कसलीच बाधा..!
मोबाईलच्या वापराचे
नाही कसलेच दुष्परिणाम
व्यवस्थित वापर जर केला
वाढत जाते आपले ज्ञान..!
©️गजेंद्र ढवळपुरीकर
मो : ९६२३७१४०११
दि : २४/४/२०२० शुक्रवार
[24/04, 22:25] Gjendra: *वंदन देश सेवकांना महानायकांना*
वंदन त्या देश सेवकांना महानायकांना,
पोलीस परिचारिका कर्तव्यदक्ष डॉक्टरांना..!
कोरोनाचे आले असताना महाभयंकर संकट
चहुबाजूंनी पसरले आहे फक्त मृत्यू चे सावट,
विचार न करता घरदार आणि कुटुंबाचा
कर्तव्य दक्षतेसाठी ज्यांनी पाळले नियमांना,
वंदन त्या देश सेवकांना महानायकांना..!
कोरोना रोगाचे पसरत चालले जाळे,
महासत्ता असलेल्या देशांचे निघाले दिवाळे,
हार नाही मानली भारताच्या शूरवीरांनी
करन परिश्रम वाचविले अनेक देशवाशियांना,
वंदन त्या देश सेवकांना महानायकांना..!
कोरोना रोगाने आणले महामारीचे वादळ
पोलिसांनी रक्षीले डोळ्यात घालून काजळ,
डॉक्टर आणि परिचारिकांनी केली देशसेवा
रक्षीले ज्यांनी उद्याच्या वर्तमान भविष्यांना
वंदन त्या देश सेवकांना महानायकांना..!
रात्रंदिवस जे झटले ते सर्व ठरलेत महानायक
त्या उपकराने उद्याचे जीवन झाले सुखदायक
दुःख सरेल उद्याची नवी सुखी पहाट उगवेल
कधी ही न विसरू आपल्या या देश बांधवांना
वंदन त्या देश सेवकांना महानायकांना..!
©️ गजेंद्र ढवळपुरीकर
मो: ९६२४७१४०११
दि:२४/४/२०२० शुक्रवार
[25/04, 00:22] Gjendra: *स्पर्धेसाठी*
*विषय:वंदन देश सेवकांना*
*शिर्शक:*
*वंदन देश सेवकांना*
वंदन देश सेवकांना
माझे मानाचे अभिवादन
जन्म घेऊनी भारतभूवर
झाले हे सुखी जीवन..!
होऊनी नतमस्तक इथे
वंदन देश सेवकांना
कोरोना रोगावर उपचार
करणाऱ्या डॉक्टरांना..!
डॉक्टरच्या बरोबरीने
उभे राहिले परिचारक,
परिचारिकेनेही केले
उपचार समाधानकारक..!
साफसफाई कामगार
जिद्दीने लढले कोरोनाशी,
वाचवायला हा वर्तमान
फवारणी केली औषधांची..!
पोलीस राहिले गस्तीवर
रात्रंदिवस चौका चौकात,
त्यांच्या समोर जाण्याची
नाही कोरोनाची औकात..!
कोरोनाशी लढा देणाऱ्या
वंदन देश सेवकांना,
अभिमानाचे अभिवादन
या भारतीय बांधवांना..!
चालूच ठेवू अस्तित्वाचा लढा
नायनाट कोरोनाचा करू,
या माझ्या भारतीय बंधूनो
श्वास आपण एकात्मतेचा भरू..!
©️गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७२४०११
दि:२४/४/२०२० शुक्रवार
[25/04, 16:59] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय: मैत्री*
ऋणानुबंध मैत्रीचे
काळजात जपायचे,
आठवणीत सवंगडी
पुन्हा पुन्हा भेटायचे..!
मैत्रीच्या नात्यामधले
श्वास अतूट ठेवलेले,
आठवलेले मित्र सारे
हृदयी घट्ट जपलेले..!
मैत्री दोन्ही बाजुंनी
असावी एक निष्ठतेची,
सुख दुःखात रहावी
भावना आत्मीयतेची..!
निष्ठावान मैत्रीला
सुरंग लागू नये कधी,
युगानुयुगे भेटत राहील
अशा मैत्रीला उपाधी ..!
मैत्री जपावी जीवनात
कृष्ण आणि अर्जुना परी,
संकटात राही सदैव साथ
दुःखाच्या पडत राहो सरी..!
मैत्री आठवा एकदा
कृष्ण आणि सुदामाची
राजा आणि रंकामधे
सरस मैत्री बालपणाची..!
मैत्रीत नसावी अपेक्षा
असावी समर्पणाची भावना,
मित्र रहावा सुखामधे
ही एकच मनोकामना..!
©️गजेंद्र ढवळपुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि:२५/४/२०२० शनिवार
[25/04, 18:36] Gjendra: *स्पर्धेसाठी भारुड*
*विषय:---*
*सत्वर पाव गं मला*
*भवानी आई*
*कोरोनाची जाऊ दे बला*
अवघ्या जगाचा नासाडा केला
व्हायरस भलताच पसरत गेला
सत्वर पाव गं मला सत्वर पाव गं मला
भवानी आई कोरोनाची जाऊ दे बला
कोरोनाची जाऊ दे बला गं
कोरोनाची जाऊ दे बला...//धृ//
लई तापलं वातावरण
कसं करू मी विवरण
आली कुठून ही बला
श्वास गुदमरून गेला
घाली जगण्यावरी घाला
मारी गं काळजात भाला
सत्वर पाव गं मला सत्वर पाव गं मला
भवानी आई कोरोनाची जाऊ दे बला
कोरोनाची जाऊ दे बला गं
कोरोनाची जाऊ दे बला...//१//
सुखी राहत होते लोक
होता व्यवहार रोखठोख,
आज येण्या जाण्याची भीती
बदलली सारी जीवन पद्धती
लाठ्या काठ्यांनी उद्धार केला
समदा पोलिसांचा बोलबाला
सत्वर पाव गं मला सत्वर पाव गं मला
भवानी आई कोरोनाची जाऊ दे बला
कोरोनाची जाऊ दे बला गं
कोरोनाची जाऊ दे बला...//२//
कामधंदा सोडून घरीदारी
लोकं रिकाम टवाळक्या करी
बाहेर येण्या जाण्याची चोरी
काहींना आयती मिळे शिदोरी
बिनकामाचा खोळंबा झाला
कोरोना भलताच मारी टोला
सत्वर पाव गं मला सत्वर पाव गं मला
भवानी आई कोरोनाची जाऊ दे बला
कोरोनाची जाऊ दे बला गं
कोरोनाची जाऊ दे बला...//३//
डॉक्टर समदे झाले हैराण
रुग्णांचे चुहूकडे आक्रमण
कोणी कोणास बोल बोलेना
आत्मीयतेचे भाव खोलेना
दुरदूरूनी राम राम केला
दया क्षमा शांतीचा तुटवडा झाला
सत्वर पाव गं मला सत्वर पाव गं मला
भवानी आई कोरोनाची जाऊ दे बला
कोरोनाची जाऊ दे बला गं
कोरोनाची जाऊ दे बला...//४//
कोरोना धीराने आता घेऊ
त्याचा नायनाट करून राहू,
साथ एकमेकांना देण्याची
गरज आहे ही भविष्याची
वाजवू जनजागृतीच्या संबळा
धरू वात्सल्याच्या डमरूला
सत्वर पाव गं मला सत्वर पाव गं मला
भवानी आई कोरोनाची जाऊ दे बला
कोरोनाची जाऊ दे बला गं
कोरोनाची जाऊ दे बला...//५//
©️गजेंद्र ढवळपुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि:२५/४/२०२० शनिवार
[26/04, 10:08] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय: मैत्री*
*मैत्री*
मैत्री तूझी
मैत्री माझी,
एक ओल
आहे ताजी..!
सुख दुःख
नसे भीती,
जिथे अति
तिथे माती..!
तुझी मैत्री
आर्त भाव
माझे मनी
तुझे नाव..!
एक घाव
राही खोल,
तुझी मैत्री
चिंब ओल..!
शुष्क मैत्री
मनी घाव,
प्रेमा साठी
मिळे भाव..!
दुःख ताजे
एक व्रण
घट्ट मैत्री
माझे प्रण..!
मैत्री माझी
खोल माग,
तुझा मिळो
थोडा भाग..!
आर्त टाहो
तुझा एक
मैत्री माझी
आहे नेक..!
तुही ठेव
एक नोंद,
मनी माझी
मैत्री गोंद..!
साद घाली
गर्द हवा,
मैत्री तुझी
माझी दवा..!
मैत्री मधे
जिथे भोग
तिथे मैत्री
होते रोग..!
मैत्री गंध
तुझी साथ,
हाता मधे
राहो हात..!
सर्व दूर
निळे नभ
तुझी मैत्री
माझे जग..!
©️गजेंद्र ढवळपुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो: ९६२३७१४०११
दि:२५/४/२०२० शनिवार
[26/04, 10:49] Gjendra: *कर्म असे का खालचे*
दुसऱ्याच्या जीवावर
उड्या माराव्या कुठवर,
अरे भरलेले खापर
मिळते चाटायला तोवर..!
जन्म घेऊनी आलास
तू या भूवरी एकटा,
जगशी दुसऱ्याच्या जीवावर
किती आहे रे नकटा..!
आला जन्मास जिथे
वाग तसे तू सत्वर,
किती करशील पापं
देह आहे हा नश्वर...!
काम असे कर तू
जे शोभेल नियतीला,
धर्म कर्म आहे हा
नको विसरुस जातीला...!
जन्म उच्च कुळातला
कर्म असे का खालचे,
विसरू नको नीतिमत्ता
पुण्य संपतील कालचे..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२४७१४०११
दि:२५/४/२०२० रविवार
[27/04, 10:35] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:आई*
*शांतमूर्ती आई*
वात्सल्यमूर्ती आई,
चैतन्यमूर्ती आई,
ओलावा ममतेचा,
कैवल्यमूर्ती आई..!
त्यागमूर्ती आई,
ईश्वरमूर्ती आई,
जगतास भेटलेली,
प्रेममूर्ती आई...!
श्याममूर्ती आई,
राममूर्ती आई,
आयोध्या वृंदावणाची
देवमूर्ती आई..!
सौख्यमूर्ती आई ,
दु:खमूर्ती आई,
डोळ्यांच्या पापण्यांत,
अश्रूमूर्ती आई..!
भावमूर्ती आई,
न्यायमूर्ती आई,
ईश्वरास लाभलेली,
दानमुर्ती आई..!
चंद्रमूर्ती आई,
सुर्यमूर्ती आई,
ज्वलंतेत ही शीतल
ध्येयमूर्ती आई...!
विश्वमूर्ती आई,
स्वप्नमूर्ती आई,
शांतप्रिय भावनांची
शांतमूर्ती आई...!
©️गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मी:९६२३७१४०११
दि:२७/४/२०२० सोमवार
[27/04, 10:38] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:आई*
*शांतमूर्ती आई*
वात्सल्यमूर्ती आई, चैतन्यमूर्ती आई,
ओलावा ममतेचा, कैवल्यमूर्ती आई..!
त्यागमूर्ती आई, ईश्वरमूर्ती आई,
जगतास भेटलेली, प्रेममूर्ती आई...!
श्याममूर्ती आई, राममूर्ती आई,
आयोध्या वृंदावणाची देवमूर्ती आई..!
सौख्यमूर्ती आई , दु:खमूर्ती आई,
डोळ्यांच्या पापण्यांत, अश्रूमूर्ती आई..!
भावमूर्ती आई, न्यायमूर्ती आई,
ईश्वरास लाभलेली, दानमुर्ती आई..!
चंद्रमूर्ती आई, सुर्यमूर्ती आई,
ज्वलंतेत ही शीतल, ध्येयमूर्ती आई..!
विश्वमूर्ती आई, स्वप्नमूर्ती आई,
शांतप्रिय भावनांची, शांतमूर्ती आई..!
©️गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मी:९६२३७१४०११
दि:२७/४/२०२० सोमवार
[27/04, 15:32] Gjendra: *स्पर्धेसाठी पोवाडा*
*पोवाडा कोरोनाचा*
प्रथम करून नमन गणपतीला
वंदन श्री शंकराला शंकराच्या पार्वतीला..,
पोवाडा लिहितो कोरोनाचा
जहरील्या त्या विषाणूचा
आहे हा विषय आपत्कालीनाचा
जी रं जी हा जी हा जी रं जी जी जी..//धृ//
चीनच्या वूहान प्रांतात,
वटवाघूळानं केला घात,
अचानक दुभंगली शांत..
अचानक दुभंगली शांत..
साऱ्या जगावरी कोसळला,
कोरोना विषाणूचा आकांत..,
जी रं जी हा जी हा जी रं जी जी जी..//१//
बघता बघता जगी पसरला
लाखो जणांचा मृत्यू झाला,
जन सेवकांचा इरादा पक्का..
जन सेवकांचा इरादा पक्का..
लॉकडाऊनचा निश्चय केला,
घरात डांबण्याचा जुलुम झाला,
जी रं जी हा जी हा जी रं जी जी जी..//२//
पोलीस डॉक्टरांची पंचाईत,
संचारबंदी केली हो घाईत,
मास्क लावूनी तोंडाला..
मास्क लावूनी तोंडाला..
संशयित कॉरनटाइन केला
उपचार रुग्णांवरी झाला..
जी रं जी हा जी हा जी रं जी जी जी..//३//
समदे लोकं आहे घरामंदी,
बाहेर जाण्याची नाही संधी,
व्यवहारावर झाली बंदी
व्यवहारावर झाली बंदी
पोलीस बडवती हो लोकाला
तरीही भीती नाही कोणाला
जी रं जी हा जी हा जी रं जी जी जी..//४//
कोरोना कमी होण्याची चिन्ह नाही,
दिवसेंदिवस रोग हा वाढत जाई,
नाही उपचाराची टंचाई..
नाही उपचाराची टंचाई..
गजेंद्राने प्रयत्न एक केला
म्हणे पोवाडा लिहुनी झाला
जी रं जी हा जी हा जी रं जी जी जी..//५//
©️गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि:३६/४/२०२० सोमवार
No comments:
Post a Comment