[18/05, 20:53] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:प्रेम वरती बोलू काही*
इकडचे तिकडचे खूप झाले
आता प्रेमावरती बोलू काही,
तू माझे नी मी तुझे लपवलेले
ते राज प्रेमाचे खोलू गं काही..!
त्या आठवणीं अन् भावनांनी
आपले हृदयांतर केलेले असते,
जपून ठेवलेल्या काही क्षणांना
चिंब आठवांनी भिजवलेले असते..!
नशीब असावे मना सारखे अन्
नकळत प्रेमावरचे भाष्य खुलावे,
वचनपूर्तीने एकमेकांच्या जीवनी
निरंतर प्रेमावरती बोलत जावे..!
प्रेमावरती बोलत असताना थोडे
रंग बावरे मन हे जावे होऊन,
ओघळलेल्या आठवणींचा ओघळ
भिजता भिजता चिंब जावे न्हाऊन..!
सावळा गोंधळ हा तुझ्या प्रेमाचा
प्रेमावरती छान सुंदर बोलून गेला,
कोरडा ठाव हा तूझ्या आठवांचा
माझ्यासमोर अलगद खोलून गेला..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[18/05, 21:18] Gjendra: *साहित्य संस्कृती समूह*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:साथ तुझी माझी*
साथ तुझी माझी सखे
निभावत जाऊ आता,
गुंता गुंती थोडी झाली
भाव प्रीतीचा हा रिता..!
फुललेला प्रेमाकुंर
समाधान देतो मना,
आहे घरटे अधुरे
तुझ्या माझ्या प्रेमाविना..!
प्रेमछाया ही दिसते
अंधाराला छेदणारी,
वेल प्रीतीची वाढता
जाई ती गगनावरी..!
आज दैवाने मिळाली
वेडे साथ तुझी माझी,
स्वप्न होईल ते पूर्ण
जिथे प्रेम तुझे राजी..!
भान छळते हे जेव्हा
अंती माझ्या भावनांना
स्पर्श तुझा मोहणारा
आर्त हाक वेदनांना..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[18/05, 22:48] Gjendra: *आम्ही सारस्वत समूह*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:माहेर*
माहेरची पाहुनी
सासुरवासीन,
दारात आली
सुखी दिन,
नात्याची
विन,
ही.
सुखात नातलग
येतात जातात,
दुःखाचे कधी
गाणे गात,
वेंधळी
जात,
ही.
माहेरच्या अंगणी,
दोन दिवसांची
आहे पाहुनी,
नाते गोते
धरुनी,
उभी
मी.
आठवते माहेरा
जाता मी सासरी,
आठवांचा पूर
वाहतो दारी,
गार वारा
भरारी,
मारी
हा.
©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[19/05, 22:39] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: इंद्रधनुष्य*
आकाशात इंद्रधनुष्य
खुलून दिसतो चौफेर,
सात रंगाची ही कमान
साऱ्या धरित्रीला आहेर..!
उजळून जाती दिशा
जिथे बहरतो इंद्रधनू,
तन मनास हा खुलवी
या आकाशातील वेणू..!
सुर्यासही लाजविते
असे सौंदर्य असते,
चहुदिशांना चमचम
अलवार खुलत जाते..!
धरती आणि अंबराचा
बनतो बाह्य दुवा,
सदैव बहरणारा जगती
इंद्रधनुष्य नभी हवा..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२४७१४०११ औरंगाबाद
[19/05, 22:54] Gjendra: *देव नाही देवालयी*
जाऊ कुठे रानावना
देव नाही देवालयी,
शोध हरीचा घ्यावया
आज निघालो मी पायी..!
चहुदिशां पायाखाली
घालूनिया मी पाहिल्या,
देव मज का भेटेना
गंगा जमुना वाहिल्या..!
देव आहे का या जगी
मज छळते हे वारे,
चहूकडे का अन्याय
न्याय तो संपला कारे..!
देवा आहेस तू तर
देवालयी फिर मागे,
झोपलेल्या मानवास
आता पुन्हा कर जागे..!
सिद्ध कर तू वास्तव्य
तुझी आता गरज आहे,
बघ तुझे देवालय
किती हे उदास आहे..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[20/05, 14:33] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:वेदना*
वेदना सांगू कुणाला
दुःख हे संपत नाही,
काळजात वाहणाऱ्या
अश्रूला किंमत नाही....//धृ//
गेली किती वर्षांनुवर्ष
माझ्या मनाला नाही हर्ष,
दुःखाच्या काहिलीला
तोडण्याची हिंमत नाही..//१//
हृदयात विरह वेदनांना
जागा दिली भावनांना,
जाणून घेण्या प्रेम तुझे
या श्वासांची ऐपत नाही..//२//
साद घातली मी कितींदा
तरी ऐकू येई मज निंदा,
स्वप्नांची आठवणीला
तुझी साथ सुसंगत नाही..//३//
मी भेदूनी या तिमिराला
शोधू पाहिले आनंदाला,
सापडेना माझे वैभव
ती जगण्यात गंम्मत नाही..//४//
भावविश्व माझे हरले
ते वेदनादायी ठरले,
ऋणानुबंध जपण्याची
माझी का कुवत नाही..//५//
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[20/05, 18:21] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:कर्तव्य*
कर्तव्य माझे कुटुंबातील
प्रेमळ माणसांना जपावे,
त्यांच्या स्वभावातील दोष
अलगद बाजूला सारावे..!
कर्तव्याचे पालन करावे
आयुष्याचा सुगधं घेत,
दिप होऊन जळत रहावे
वात समईची मंद होत..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[20/05, 23:48] Gjendra: *क चा खेळ*
*कर्म*
कशी काया कमनीय किती
कुणा कोणते कारण कळवू,
कित्येकदा कणखर कोळ्यापरी
कितीतरी कुरघोड्या करवू,
किमान केशरी केव्हातरी
कोमल कौतुकास्पद काही,
कुंचले कुणासाठी कुरकुरीत
किंबहुना कंटाळा कर काही
कौशल्य कुणाचे किंचित
कर्मनिय कर्मनिष्ठ कसले,
कामना करते केविलवाणी
कर्मही कुचित कुजलेले..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[21/05, 18:42] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: पहाट*(सहाक्षरी रचना)
पहाट सोनेरी
आली माझ्या दारी,
कोंबडा आरवे
घेऊन भरारी..!
चमचमे उन्हं
या सोनेरी शाली,
गवताची पाती
दवबिंदू ल्याली..!
पहाटेचा वारा
वाहतो भरारा,
थरथरे स्पर्श
अंगात शहारा..!
सूर्य डोकावता
झुंजूमुंजू होई,
पाखरे दिवानी
नभी झेप घेई..!
आनंदी आनंद
पहाटचे स्वप्नी,
मन माझे वेडे
गाते प्रेम गाणी..!
प्रतिबिंब नभी
चंद्राची चांदणी,
लुप्त होई येता
सूर्य या गगनी..!
पहाट नव्याची
रोज उगवते,
जगाला ज्ञानाची
शिकवण देते..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[21/05, 22:19] Gjendra: 🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘
*🥗रेसिपी🥗*
*🥞बटाटा टोमॅटो इडली विथ खोबरेशेंगा चटणी🥞*
*साहित्य बटाटा टोमॅटो इडली साठी:* तांदूळ दोन वाटी, उडद डाळ एक वाटी, एक कांदा, एक टोमॅटो, एक बटाटा, चार हिरव्या मिरच्या, कोशिंबीर, जिरं, मोहरी, मीठ, खाता सोडा एक चमचा आणि तेल.
*साहित्य चटणी साठी:* एक वाटी भाजलेले शेंगदाणे, एक खोबरे वाटी तुकडे करून भजलेले, जिरं, मोहरी, कडीपत्ता, एक चमचा मिरची पावडर तेल आणि पाणी.
*कृती:* तांदूळ आणि उडद डाळ स्वच्छ धुवून दहा तास भीजत ठेवावे. नंतर तांदूळ व डाळीचे सालं निघेपर्यंत डाळ स्वच्छ धुवावी नंतर मिक्सर मध्ये डाळ बारीक वाटून घ्यावी व तांदूळ रवाळ वाटून घ्यावे व एकत्र मिक्स करून पुन्हा आठ ते दहा तास चांगली फुलेपर्यंत भिजत ठेवावी. आठ दहा तासानंतर त्यात मीठ व एक चमचा खाता सोडा घालून चांगली मिक्स करून घ्यावी. एक छोटी कढईमध्ये तेल टाकून मोहरी घालावी तडतडल्यावर जिरं घालावं लालसर झालं की मिरची घालावी.त्यात बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतून घ्यावा.त्यात बारीक चिरलेल्या बटाट्याच्या फोडी आणि टोमॅटो घालून चांगलं परतून घ्यावं.एक वाफ निघाली की मीठ घालून परत एक वाफ निघेपर्यंत ठेवावं सगळे पदार्थ व्यवस्थित शिजलेले असतील ते मिश्रण भिजलेल्या तांदूळ उडदाच्या मिश्रणात घालून चांगले मिक्स करावे. आता इडली पात्रात ते मिश्रण भरून उकळत्या पाण्यावर पंधरा मिनिटे ठेवावे. बटाटा टोमॅटो इडली तयार झालेली असेल.
*चटणीची कृती:* शेंगदाणे आणि खोबरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. एक कढईत तेल टाकून मोहरी तडतडली की जिरं घालून वाटलेलं मिश्रण घालावं प्रमाणात मीठ टाकावं चांगलं परतल्यावर हवं तसं पाणी घालून मंद आचेवर उकळी येऊ द्यावी. चटणी तयार
गरमागरम चटणी आणि बटाटा टोमॅटो इडली सर्व करावी...
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:,९६२३७१४०११ औरंगाबाद.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗
[21/05, 23:54] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित चित्रकाव्य स्पर्धेसाठी*
*शीर्षक:*
*तुझी रूपे तुझीच काया*
धरती माता हरित क्रांती
होऊ दे जगाची रोज उन्नती,
तुझ्या अवती भवती केली
मानवाने आज छान प्रगती.
हिरव्या झाडांची निगा राखती
पानाफुलांचे तोरण शोभती,
किरणे सूर्याची ती सोनसळी
रोज नव्याने युग पाहती.
गर्द झाडी फुलवी पिसारा
इकडून तिकडे भरभर वारा,
धरती माते तुझ्या रक्षणा
हिरव्या फुलांच्या पाऊसधारा.
कात टाकुनी पृथ्वी सारी
बहरेल धरा चमचमणारी,
विवेक बुद्धी ज्ञान वाढता
मानव होतील सुसंस्कारी.
कमलकांतीसम तुझी छाया
अवघ्या जगावर करते माया,
प्राणीमात्रांवर तुझेच उपकार
सारी तुझी रुपे तुझीच काया..
©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[21/05, 23:55] Gjendra: *हे पृथ्वी माते*
हे पृथ्वी माते हे धरती माते
तुझ्यासाठी मन व्याकुळ होते..//धृ//
हिरवाईने नटले तुझे अंगण
निसर्गाशी तुझे ऋणानुबंधन,
हिरवळ जपण्या तू वरदान मागते
तुझ्यासाठी मन व्याकुळ होते..//१//
गोल गाभा तुझा फळासारखा
मानव आज तुला झाला पारखा
जपेना मानव तुझ्याशी नाते
तुझ्यासाठी मन व्याकुळ होते..//२//
खुलली धरती हि हिरवीगार
जगणे मानवाचे अधाशी फार,
मन हावरट हे गुंगत जाते
तुझ्यासाठी मन व्याकुळ होते..//३//
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[22/05, 08:53] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:कृष्ण*
नंदाच्या पोराने खोड काढली,
नंदाच्या पोराने खोड काढली,
वेणी ओढली वेणी ओढली..
वेणी ओढली वेणी ओढली..
या या कृष्णाने या या कान्हाने
या कृष्णाने या कान्हाने
वेणी ओढली आणि माठ फोडली
वेणी ओढली आणि माठ फोडली..//धृ//
नंदाच्या पोराला लई खोड गं
सवंगड्याची त्याशी जोड गं
येऊनी बाई आडवाटेमध्ये
दह्या दुधाची मटकी फोडे गं
मटकी फोडे गं
अडवुनी बाई माझी वाट धरली
वेणी ओढली वेणी ओढली..
वेणी ओढली वेणी ओढली..
या या गोविंदाने या या मुकुंदाने
या गोविंदाने या मुकुंदाने
वेणी ओढली आणि माठ फोडली
वेणी ओढली आणि माठ फोडली..//१//
जाता आम्ही गं यमुनातीरी
कपडे धुण्या पाटी घेऊनी शिरी
लाल यशोदेचा मागे मागे येता
काळीज माझं बाई धडधड करी
धडधड करी
करंगळी माझी गं त्याने मोडली
वेणी ओढली वेणी ओढली..
वेणी ओढली वेणी ओढली..
या या कृष्णाने या या कान्हाने
या कृष्णाने या कान्हाने
वेणी ओढली आणि माठ फोडली
वेणी ओढली आणि माठ फोडली..//२//
यमुनेच्या तीरी बाई रास खेळे
मन मोहुन टाकी गं रूप सावळे
कृष्ण सख्याचे मज जडते बाधा
वेडे जाई होऊनी माझे मन वेंधळे मन वेंधळे
आठवणीत त्याच्या बाई उचकी लागली
वेणी ओढली वेणी ओढली..
वेणी ओढली वेणी ओढली..
या या कृष्णाने या या कान्हाने
या कृष्णाने या कान्हाने
वेणी ओढली आणि माठ फोडली
वेणी ओढली आणि माठ फोडली..//३//
©️ गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[22/05, 11:09] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: मैत्री शाळेतील*
मैत्री शाळेतील होती
घनिष्ठ आणि सोजवळ,
नित्य भरायची माझी
रीती प्रेमाची ओंजळ..!
हृदयाचा सागर माझा
तुडूंब भरून वाह्यचा,
मैत्री शाळेतील माझी
मनःपूर्वक तो जपायचा..!
मित्र ते शाळेतील माझे
हृदयास आजही आठवते,
चित्र तेव्हाचे रोमांचकारी
आठवणींना मनी साठवते..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[22/05, 12:57] Gjendra: *काव्यप्रतिभा साहित्य मंच*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:सार सुखी जीवनाचे*
सार सुखी जीवनाचे
जाणुनी घे रे माणसा,
भरु दे साचा सुखांचा
तु रे भल्या माणसा..!
छळते तुला वासना
जळू दे भोग भावना,
काम क्रोध सोडुनी
कर तू सुखी जीवना..!
मानवा तुझे रंग रूप
कळू दे साऱ्या जगाला,
आयुष्य सुखी करण्या
दुःख तुझे सार बाजूला..!
सार जीवनाचे तुझ्या
नशिबाने पालटेल,
आढे वेढे तू विसरता
सुखाचे भाव उमटेल..!
वेदना छळती असंख्य
चालता नी बोलता,
सार सुखी जीवनाचे
कळतील कळता कळता..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
*आयोजित उपक्रम*
*विषय:प्रेम वरती बोलू काही*
इकडचे तिकडचे खूप झाले
आता प्रेमावरती बोलू काही,
तू माझे नी मी तुझे लपवलेले
ते राज प्रेमाचे खोलू गं काही..!
त्या आठवणीं अन् भावनांनी
आपले हृदयांतर केलेले असते,
जपून ठेवलेल्या काही क्षणांना
चिंब आठवांनी भिजवलेले असते..!
नशीब असावे मना सारखे अन्
नकळत प्रेमावरचे भाष्य खुलावे,
वचनपूर्तीने एकमेकांच्या जीवनी
निरंतर प्रेमावरती बोलत जावे..!
प्रेमावरती बोलत असताना थोडे
रंग बावरे मन हे जावे होऊन,
ओघळलेल्या आठवणींचा ओघळ
भिजता भिजता चिंब जावे न्हाऊन..!
सावळा गोंधळ हा तुझ्या प्रेमाचा
प्रेमावरती छान सुंदर बोलून गेला,
कोरडा ठाव हा तूझ्या आठवांचा
माझ्यासमोर अलगद खोलून गेला..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[18/05, 21:18] Gjendra: *साहित्य संस्कृती समूह*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:साथ तुझी माझी*
साथ तुझी माझी सखे
निभावत जाऊ आता,
गुंता गुंती थोडी झाली
भाव प्रीतीचा हा रिता..!
फुललेला प्रेमाकुंर
समाधान देतो मना,
आहे घरटे अधुरे
तुझ्या माझ्या प्रेमाविना..!
प्रेमछाया ही दिसते
अंधाराला छेदणारी,
वेल प्रीतीची वाढता
जाई ती गगनावरी..!
आज दैवाने मिळाली
वेडे साथ तुझी माझी,
स्वप्न होईल ते पूर्ण
जिथे प्रेम तुझे राजी..!
भान छळते हे जेव्हा
अंती माझ्या भावनांना
स्पर्श तुझा मोहणारा
आर्त हाक वेदनांना..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[18/05, 22:48] Gjendra: *आम्ही सारस्वत समूह*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:माहेर*
माहेरची पाहुनी
सासुरवासीन,
दारात आली
सुखी दिन,
नात्याची
विन,
ही.
सुखात नातलग
येतात जातात,
दुःखाचे कधी
गाणे गात,
वेंधळी
जात,
ही.
माहेरच्या अंगणी,
दोन दिवसांची
आहे पाहुनी,
नाते गोते
धरुनी,
उभी
मी.
आठवते माहेरा
जाता मी सासरी,
आठवांचा पूर
वाहतो दारी,
गार वारा
भरारी,
मारी
हा.
©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[19/05, 22:39] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: इंद्रधनुष्य*
आकाशात इंद्रधनुष्य
खुलून दिसतो चौफेर,
सात रंगाची ही कमान
साऱ्या धरित्रीला आहेर..!
उजळून जाती दिशा
जिथे बहरतो इंद्रधनू,
तन मनास हा खुलवी
या आकाशातील वेणू..!
सुर्यासही लाजविते
असे सौंदर्य असते,
चहुदिशांना चमचम
अलवार खुलत जाते..!
धरती आणि अंबराचा
बनतो बाह्य दुवा,
सदैव बहरणारा जगती
इंद्रधनुष्य नभी हवा..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२४७१४०११ औरंगाबाद
[19/05, 22:54] Gjendra: *देव नाही देवालयी*
जाऊ कुठे रानावना
देव नाही देवालयी,
शोध हरीचा घ्यावया
आज निघालो मी पायी..!
चहुदिशां पायाखाली
घालूनिया मी पाहिल्या,
देव मज का भेटेना
गंगा जमुना वाहिल्या..!
देव आहे का या जगी
मज छळते हे वारे,
चहूकडे का अन्याय
न्याय तो संपला कारे..!
देवा आहेस तू तर
देवालयी फिर मागे,
झोपलेल्या मानवास
आता पुन्हा कर जागे..!
सिद्ध कर तू वास्तव्य
तुझी आता गरज आहे,
बघ तुझे देवालय
किती हे उदास आहे..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[20/05, 14:33] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:वेदना*
वेदना सांगू कुणाला
दुःख हे संपत नाही,
काळजात वाहणाऱ्या
अश्रूला किंमत नाही....//धृ//
गेली किती वर्षांनुवर्ष
माझ्या मनाला नाही हर्ष,
दुःखाच्या काहिलीला
तोडण्याची हिंमत नाही..//१//
हृदयात विरह वेदनांना
जागा दिली भावनांना,
जाणून घेण्या प्रेम तुझे
या श्वासांची ऐपत नाही..//२//
साद घातली मी कितींदा
तरी ऐकू येई मज निंदा,
स्वप्नांची आठवणीला
तुझी साथ सुसंगत नाही..//३//
मी भेदूनी या तिमिराला
शोधू पाहिले आनंदाला,
सापडेना माझे वैभव
ती जगण्यात गंम्मत नाही..//४//
भावविश्व माझे हरले
ते वेदनादायी ठरले,
ऋणानुबंध जपण्याची
माझी का कुवत नाही..//५//
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[20/05, 18:21] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:कर्तव्य*
कर्तव्य माझे कुटुंबातील
प्रेमळ माणसांना जपावे,
त्यांच्या स्वभावातील दोष
अलगद बाजूला सारावे..!
कर्तव्याचे पालन करावे
आयुष्याचा सुगधं घेत,
दिप होऊन जळत रहावे
वात समईची मंद होत..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[20/05, 23:48] Gjendra: *क चा खेळ*
*कर्म*
कशी काया कमनीय किती
कुणा कोणते कारण कळवू,
कित्येकदा कणखर कोळ्यापरी
कितीतरी कुरघोड्या करवू,
किमान केशरी केव्हातरी
कोमल कौतुकास्पद काही,
कुंचले कुणासाठी कुरकुरीत
किंबहुना कंटाळा कर काही
कौशल्य कुणाचे किंचित
कर्मनिय कर्मनिष्ठ कसले,
कामना करते केविलवाणी
कर्मही कुचित कुजलेले..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[21/05, 18:42] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: पहाट*(सहाक्षरी रचना)
पहाट सोनेरी
आली माझ्या दारी,
कोंबडा आरवे
घेऊन भरारी..!
चमचमे उन्हं
या सोनेरी शाली,
गवताची पाती
दवबिंदू ल्याली..!
पहाटेचा वारा
वाहतो भरारा,
थरथरे स्पर्श
अंगात शहारा..!
सूर्य डोकावता
झुंजूमुंजू होई,
पाखरे दिवानी
नभी झेप घेई..!
आनंदी आनंद
पहाटचे स्वप्नी,
मन माझे वेडे
गाते प्रेम गाणी..!
प्रतिबिंब नभी
चंद्राची चांदणी,
लुप्त होई येता
सूर्य या गगनी..!
पहाट नव्याची
रोज उगवते,
जगाला ज्ञानाची
शिकवण देते..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[21/05, 22:19] Gjendra: 🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘🥘
*🥗रेसिपी🥗*
*🥞बटाटा टोमॅटो इडली विथ खोबरेशेंगा चटणी🥞*
*साहित्य बटाटा टोमॅटो इडली साठी:* तांदूळ दोन वाटी, उडद डाळ एक वाटी, एक कांदा, एक टोमॅटो, एक बटाटा, चार हिरव्या मिरच्या, कोशिंबीर, जिरं, मोहरी, मीठ, खाता सोडा एक चमचा आणि तेल.
*साहित्य चटणी साठी:* एक वाटी भाजलेले शेंगदाणे, एक खोबरे वाटी तुकडे करून भजलेले, जिरं, मोहरी, कडीपत्ता, एक चमचा मिरची पावडर तेल आणि पाणी.
*कृती:* तांदूळ आणि उडद डाळ स्वच्छ धुवून दहा तास भीजत ठेवावे. नंतर तांदूळ व डाळीचे सालं निघेपर्यंत डाळ स्वच्छ धुवावी नंतर मिक्सर मध्ये डाळ बारीक वाटून घ्यावी व तांदूळ रवाळ वाटून घ्यावे व एकत्र मिक्स करून पुन्हा आठ ते दहा तास चांगली फुलेपर्यंत भिजत ठेवावी. आठ दहा तासानंतर त्यात मीठ व एक चमचा खाता सोडा घालून चांगली मिक्स करून घ्यावी. एक छोटी कढईमध्ये तेल टाकून मोहरी घालावी तडतडल्यावर जिरं घालावं लालसर झालं की मिरची घालावी.त्यात बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतून घ्यावा.त्यात बारीक चिरलेल्या बटाट्याच्या फोडी आणि टोमॅटो घालून चांगलं परतून घ्यावं.एक वाफ निघाली की मीठ घालून परत एक वाफ निघेपर्यंत ठेवावं सगळे पदार्थ व्यवस्थित शिजलेले असतील ते मिश्रण भिजलेल्या तांदूळ उडदाच्या मिश्रणात घालून चांगले मिक्स करावे. आता इडली पात्रात ते मिश्रण भरून उकळत्या पाण्यावर पंधरा मिनिटे ठेवावे. बटाटा टोमॅटो इडली तयार झालेली असेल.
*चटणीची कृती:* शेंगदाणे आणि खोबरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. एक कढईत तेल टाकून मोहरी तडतडली की जिरं घालून वाटलेलं मिश्रण घालावं प्रमाणात मीठ टाकावं चांगलं परतल्यावर हवं तसं पाणी घालून मंद आचेवर उकळी येऊ द्यावी. चटणी तयार
गरमागरम चटणी आणि बटाटा टोमॅटो इडली सर्व करावी...
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:,९६२३७१४०११ औरंगाबाद.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗
[21/05, 23:54] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित चित्रकाव्य स्पर्धेसाठी*
*शीर्षक:*
*तुझी रूपे तुझीच काया*
धरती माता हरित क्रांती
होऊ दे जगाची रोज उन्नती,
तुझ्या अवती भवती केली
मानवाने आज छान प्रगती.
हिरव्या झाडांची निगा राखती
पानाफुलांचे तोरण शोभती,
किरणे सूर्याची ती सोनसळी
रोज नव्याने युग पाहती.
गर्द झाडी फुलवी पिसारा
इकडून तिकडे भरभर वारा,
धरती माते तुझ्या रक्षणा
हिरव्या फुलांच्या पाऊसधारा.
कात टाकुनी पृथ्वी सारी
बहरेल धरा चमचमणारी,
विवेक बुद्धी ज्ञान वाढता
मानव होतील सुसंस्कारी.
कमलकांतीसम तुझी छाया
अवघ्या जगावर करते माया,
प्राणीमात्रांवर तुझेच उपकार
सारी तुझी रुपे तुझीच काया..
©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[21/05, 23:55] Gjendra: *हे पृथ्वी माते*
हे पृथ्वी माते हे धरती माते
तुझ्यासाठी मन व्याकुळ होते..//धृ//
हिरवाईने नटले तुझे अंगण
निसर्गाशी तुझे ऋणानुबंधन,
हिरवळ जपण्या तू वरदान मागते
तुझ्यासाठी मन व्याकुळ होते..//१//
गोल गाभा तुझा फळासारखा
मानव आज तुला झाला पारखा
जपेना मानव तुझ्याशी नाते
तुझ्यासाठी मन व्याकुळ होते..//२//
खुलली धरती हि हिरवीगार
जगणे मानवाचे अधाशी फार,
मन हावरट हे गुंगत जाते
तुझ्यासाठी मन व्याकुळ होते..//३//
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[22/05, 08:53] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:कृष्ण*
नंदाच्या पोराने खोड काढली,
नंदाच्या पोराने खोड काढली,
वेणी ओढली वेणी ओढली..
वेणी ओढली वेणी ओढली..
या या कृष्णाने या या कान्हाने
या कृष्णाने या कान्हाने
वेणी ओढली आणि माठ फोडली
वेणी ओढली आणि माठ फोडली..//धृ//
नंदाच्या पोराला लई खोड गं
सवंगड्याची त्याशी जोड गं
येऊनी बाई आडवाटेमध्ये
दह्या दुधाची मटकी फोडे गं
मटकी फोडे गं
अडवुनी बाई माझी वाट धरली
वेणी ओढली वेणी ओढली..
वेणी ओढली वेणी ओढली..
या या गोविंदाने या या मुकुंदाने
या गोविंदाने या मुकुंदाने
वेणी ओढली आणि माठ फोडली
वेणी ओढली आणि माठ फोडली..//१//
जाता आम्ही गं यमुनातीरी
कपडे धुण्या पाटी घेऊनी शिरी
लाल यशोदेचा मागे मागे येता
काळीज माझं बाई धडधड करी
धडधड करी
करंगळी माझी गं त्याने मोडली
वेणी ओढली वेणी ओढली..
वेणी ओढली वेणी ओढली..
या या कृष्णाने या या कान्हाने
या कृष्णाने या कान्हाने
वेणी ओढली आणि माठ फोडली
वेणी ओढली आणि माठ फोडली..//२//
यमुनेच्या तीरी बाई रास खेळे
मन मोहुन टाकी गं रूप सावळे
कृष्ण सख्याचे मज जडते बाधा
वेडे जाई होऊनी माझे मन वेंधळे मन वेंधळे
आठवणीत त्याच्या बाई उचकी लागली
वेणी ओढली वेणी ओढली..
वेणी ओढली वेणी ओढली..
या या कृष्णाने या या कान्हाने
या कृष्णाने या कान्हाने
वेणी ओढली आणि माठ फोडली
वेणी ओढली आणि माठ फोडली..//३//
©️ गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[22/05, 11:09] Gjendra: *फुलोरा साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: मैत्री शाळेतील*
मैत्री शाळेतील होती
घनिष्ठ आणि सोजवळ,
नित्य भरायची माझी
रीती प्रेमाची ओंजळ..!
हृदयाचा सागर माझा
तुडूंब भरून वाह्यचा,
मैत्री शाळेतील माझी
मनःपूर्वक तो जपायचा..!
मित्र ते शाळेतील माझे
हृदयास आजही आठवते,
चित्र तेव्हाचे रोमांचकारी
आठवणींना मनी साठवते..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[22/05, 12:57] Gjendra: *काव्यप्रतिभा साहित्य मंच*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:सार सुखी जीवनाचे*
सार सुखी जीवनाचे
जाणुनी घे रे माणसा,
भरु दे साचा सुखांचा
तु रे भल्या माणसा..!
छळते तुला वासना
जळू दे भोग भावना,
काम क्रोध सोडुनी
कर तू सुखी जीवना..!
मानवा तुझे रंग रूप
कळू दे साऱ्या जगाला,
आयुष्य सुखी करण्या
दुःख तुझे सार बाजूला..!
सार जीवनाचे तुझ्या
नशिबाने पालटेल,
आढे वेढे तू विसरता
सुखाचे भाव उमटेल..!
वेदना छळती असंख्य
चालता नी बोलता,
सार सुखी जीवनाचे
कळतील कळता कळता..!
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
No comments:
Post a Comment