Tuesday, 21 July 2020

[10/06, 17:51] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*


*विषय: वृद्धाश्रम*


नको नको रे मानवा
तू वृद्धाश्रमात धाडू,
मायबापाला घराच्या
नको रे बाहेर काढू..//धृ//

माय माऊली तुझ्यासाठी
झेलते हजार कष्ट
बापाची ती वेडी माया
करते काबाड कष्ट
त्या उपकाराची ठेवून जाण
छिद्र काळजास नको पाडू
मायबापाला घराच्या
नको रे बाहेर काढू..//१//

म्हातारपणी जगावे कसे
कोणासाठी तिथे उरावे
केलेल्या कर्माचे फळ
तिथे सांग ना कसे भरावे
गर्भधारणेपासनु जपलेली
ती नाळ नको रे तोडू
मायबापाला घराच्या
नको रे बाहेर काढू..//२//

वृद्धाश्रमी मिळे सर्वकाही
पुत्रप्रेम नाही मिळणार,
नातवासवे खेळण्याचे
ते भाग्य नाही उरणार
झपाटलेला गर्व तुझा रे
त्यास पैलू नको रे पाडू
मायबापाला घराच्या
नको रे बाहेर काढू..//३//



*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[10/06, 18:18] Gjendra: *फुलोरा कलेचे माहेर*
*आयोजित उपक्रम*

*विषय: समुद्र*(हायकू रचना)

१)अथांग लाटा
   चक्रीवादळ येता
   लपती वाटा..!

२)समुद्र दिसे
   निळा निळा छान
   मनी थैमान..!

३)नभात मेघ
   घनघोर बरसे
   मन तरसे..!


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[10/06, 23:31] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित हास्य स्पर्धेसाठी*

*विषय: चहा कॉफी*


सकाळी सकाळी चहाची
मला लई हौस,
बायको साखर अन् पत्तीचं
करते पाणी पाऊच..

चहा पिता पिता वाटतं
ऐकावी छान छान गाणी,
पण बायकोच्या हातची चहा
नुसते फुळ्ळूक पाणी..

साखर अन् पत्तीचा भाऊ
नुसता वाजवीते बाजा,
काय सांगू राव तुम्हाला
देवानं भलती दिली सजा..

चहाचं भगोनं असतं
सारखं सारखं गॅसवर,
गोल्डन करून पिते
आम्ही नुसते आशेवर..

दहा किलो साखर एक किलो पत्ती
आठवड्याला लागते भाऊ,
दूधाचं काही नका विचारू
मही बायकोच हाये मनी म्याँऊ..


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[11/06, 20:41] Gjendra: *फुलोरा कलेचे माहेर घर*
*आयोजित उपक्रम*

*विषय: काव्याक्ष काव्यरचना*


प्रेमाचे फुल तू
मी तोडावे अलगद् ,
तू मदनाची रती नाही का ?
हृदयात माझ्या होते गदगद..!


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[11/06, 21:09] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*


*विषय:माझी आवड*


माझी आवड जरा खासच,
तुझे समोर असणे भासच..

निखळ प्रेमात आनंद देणे,
असते जीवलगांचे देणे घेणे..

आवडीनुसारच सारे जपायचे,
मनातले गुज कानी सांगायचे..

चंचल मनाला या आवरताना,
तुला पटवायचे मन जपताना..

या नभी माझे मन सदा उडते,
तुझ्या अथांग मनाला शोधिते..

तुझे ते सर्वकाही आपुलकीचे,
धुंद भावनांना गंध जणू नभीचे..!

आवड माझी तू अन् तुझे प्रेम,
तुझ्यावर प्रेम  करणे नित्यनेम..



*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो;₹:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[11/06, 21:29] Gjendra: *आम्ही सारस्वत साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*

*विषय: चित्र शेलकाव्य*

चिमणा आणि चिमणी
चिमणी राजा राणी,
पिले पहा ती चार चार
चार जणांची मेजवानी..

चारा शोधून आणते
आणते ती पिलांसाठी,
चोचीत भरविते घास
घास चिमुकल्यांसाठी..

जाणावे मानवाने प्रेम
प्रेम हे मुक्या जीवांचे,
धर्म कर्म नी नीतिमत्ता
नीतिमत्ता घर मानवांचे..

भोळी भाबडी पाखरं
पाखरं ती आहे हुशार,
मानव पैशापाई आज
आज झाला आहे बेजार..

चिमणी बांधते खोपा
खोपा त्यास सुंदर नक्षी,
पाखरांची ती कारागिरी
कारागिरीस निसर्ग साक्षी..


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[11/06, 21:49] Gjendra: *फुलोरा कलेचे माहेर घर*
*आयोजित उपक्रम*

*विषय: काव्याक्ष काव्यरचना*

१)
फुल प्रेमाचे तू
त्यास तोडू अलगद् ,
रती तू मदनाची नाही का ?
हृदयात माझ्या होते गदगद..

२)
माझ्या मनात या
तुझे चाले स्वयंवर,
हात हाती मज घेऊ दे ना ?
माझा गळुनी तो जातो अहंकार..

३)
प्राण प्रिये तुझा
श्वास झालो निरंतर,
प्रेम तुझे मिळवताना का ?
झाली धरती तू आणि मी अंबर..


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[12/06, 22:25] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*


*विषय:भातुकली*


भातुकलीचा खेळ खेळतो
संसाराचा डाव मांडतो,
बालपणीच्या त्या आठवणी
ऋणानुबंधात गच्च बांधतो..

एक नवरा नी एक नवरी
जशी फिरतात गोल भवरी,
इकडून तिकडे फेर धरता
भातुकलीचा साज आवरी..

छोटी छोटी असतात खेळणी
भातुकलीत असती राजाराणी,
डाव असतो हा आरसमानी
अर्ध्यावरती मोडणारी कहाणी..

भातुकलीचा खेळ खेळणे
जीवनात सर्वांच्या येतो क्षण,
मोठे होताच विसरतो पण
खेळ भातुकलीचा आठवते मन..


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो;₹:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[13/06, 21:41] Gjendra: *फुलोरा कलेचे माहेर घर*
*आयोजित उपक्रम*

*विषय : लॉकडाऊन....माझा अनुभव*



          गेले तीन महिने सारखा लॉकडाऊन सुरू आहे. या काळामध्ये सर्वांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. घरी असणारे तर आता आळशी होतात की काय अशी भीती वाटते आहे. रोजचा दिनक्रम बदललेला आहे, खाण्या पिण्याच्या वेळा चेंज झाल्यात, ठरलेली कामं आता वेळेवर न होता करूया घरीच तर आहोत असं झालेलं आहे, म्हणजे एकूण सगळं काही ठप्प झाल्या सारखं झालंय.

            माझं स्वतःचं सांगतो एरव्ही सकाळी 6 वाजता उठणारा मी आठ किंवा नऊ वाजता उठतोय. कारण काहीच कामधंदा नसल्याने लवकर उठून तरी काय करायचे, म्हणून सुस्तत पडायचे अंथुंरणावर. माझ्या शॉप मध्ये तर इतकी धूळ झाली आहे की खूपच मनस्ताप होतो या लॉकडाऊनचा. एक झालं आपण लिहिणाऱ्यानी मनसोक्त उपयोग करून घेतलाय या दिवसांचा पण आर्थिक नुकसान खूप मोठं झालेलं आहे आणि ते कधीच भरून न निघणारे असे आर्थिक नुकसान आहे.

           या लोकडाऊनच्या काळात हतावर पोट असणारे आणि गरिबवर्गाला जो त्रास सहन करावा लागतोय तो डोळ्यांत अश्रू आणणारा आहे. यात परप्रांतीयांना ही जो त्रास सहन करावा लागतोय तो ही भयानक होता. अजूनही परिस्थिती हातात येण्याच्या मार्गावर नाही ती वाढतच जाते आहे. सर्वांचे डोळे लॉकडाऊन कधी उघडतो याकडे आहे. कारण घरी बसून आता मन तर कंटाळले पण शरीर ही आता थकले आहे.

           लवकर सगळ्या सुव्यवस्था होणं गरजेचं आहे. सर्वांनी स्वतःची काळजी घेणं ही तेवढेच महत्वाचं आहे. या संपूर्ण लॉकडाऊनचा आढावा मोजक्या शब्दांत मांडणे कठीण आहे तेव्हा थांबतो जे अनुभवलं ते लिहिलं. आपण सर्व स्वतःची, कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या आणि कोरोनाच्या प्रसारापासून दूर रहा धन्यवाद..!


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[13/06, 21:51] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*

*विषय : रांगोळी*


सडा सारवण करून
स्वच्छ करावे अंगण,
त्यावर काढावी रांगोळी
सुशोभित होते मन..

रांगोळी काढणे अंगणात
घराला घरपण येते,
सुसंस्काराच्या कलागुणांचे
तिथे घेणे देणे होते..

रांगोळी सुंदर असते
अनेक रंगानी बहरलेली,
जशी अंगणातल्या बागेत
असंख्य फुले उमललेली..

रांगोळीच्या सुशोभीकरनाणे
मन होते पतितपावन,
रांगोळीच्या रंगामध्ये दडून
आनंदी होते हे जीवन...


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[14/06, 18:17] Gjendra: *आम्ही सारस्वत साहित्य मंच*
*आयोजित स्पर्धेसाठी*


*विषय: दवबिंदू*(शेलकाव्य प्रकार)
*शीर्ष: दवबिंदू*

दवबिंदू अंगणी पडले
पडले हो सोनसडे,
भासते मजला ते जसे
जसे मन प्रेमवेडे..

नभातुनी धरतीवर आले
आले गवताच्या पात्यावर,
स्वप्न माझे व्हावे हिरवे
हिरवे सुंदरशा नात्यावर..

दवबिंदूचा वाहत नाही लोंढा
लोंढा असंख्य थेंबांचा,
पानोपानी बिलगतो नुसता
नुसता शहारा भावनांचा..

मध्यरात्रीला दवबिंदू पडतो
पडतो चौफेर चहूकडे,
ओसाड माळरानावर आणि
आणि बेसुमार चहूकडे..



*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[14/06, 18:44] Gjendra: *फुलोरा कलेचे माहेर घर*
*आयोजित उपक्रमासाठी*

*विषय :मधूसिंधू काव्य*
*शीर्षक : माझी याचना*


कोरोना आला
        भयंकर रोग
        भलतेच भोग
देऊनी गेला..


ही महामारी
         देवा तू थांबव
         ऐकुनी आर्जव
आर्त जिव्हारी..


सगळीकडे
        आकांत माजला
        अश्रूंत भिजला
जीवास तडे..


आशा मनास
         होईल का शांत
         घडला आकांत
थांबला श्वास..


माझी याचना
       घे ऐकुनी देवा
       दे सोडून कावा
हिच कामना..


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[14/06, 21:23] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*


*विषय : सतर्कता*

*शीर्षक : सतर्कता*

भारतभूवर माजला आहे
दहशद आणि आतंकवाद,
सतर्कता मिटव मानवा
सीमेवरील पसरणारा वाद..

बेसावध राहिलो आपण
तर प्राणावर होईल घाव,
दुष्मन आपले आणतील
चेहऱ्यावरती खोटा आव..

वाद हा संपणारा नसतो
त्यावर टाकावा लागतो पडदा,
सतर्कतेचा इशारा समजून
सावध रहावे आपण सदा..

वैरभाव मनी ठेवून कधीही
होत नाही मानवा प्रगती,
बदलायचे असेल जीवन तुला
तर जीवनाला दे छान गती..

सतर्कता ठेव जीवनात या
भावनांची आणि वेदनांची,
तुझे तुलाच शोधायचे मार्ग
मनी आकांशा नसो वासनांची..


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[15/06, 17:11] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मचं*
*आयोजित उपक्रम*

*विषय: पति पत्नी*


पती आणि पत्नी आहे
एका नाण्याच्या दोन बाजू,
कधी कधी एकमेकांबद्दल
भलतीच सुटत असते खाजू..

एक जोत्यावर एक शिवळावर
संसार येतो मोडकळीला,
मनात अढी असताना दोघे
जाती घटस्फोटाच्या पायरीला..

दोघांनीही समजून घ्यावे
एकमेकांच्या जगण्याबद्दल,
हीन भावना काढून मनातून
आदर असावा एकमेकांबद्दल..

पती असतो पाया घराचा
पत्नी असते वेल मायेची,
पाया भरभक्कम असताना
भीती नसते वेल तुटण्याची..

संसाराचा रहाट गाडा
फिरत असतो दोन पायावर,
सुख दुःखाचे नाते निभवावे
धुरा संसाराची दोघांच्या माथ्यावर..



*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[26/06, 18:41] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*


*विषय:महालक्ष्मी*


आदिशक्ती आदिमाया
कोल्हापूरची अंबाबाई,
महालक्ष्मी महादेवी
साऱ्या जगताची आई..

नारायणी दक्षायनी
रूपे तिची अनेक
भजता तिज मनोभावे
दुःख हरती क्षणेक..

ब्रह्मांड चालविते ती
राक्षसांचा करते वध,
अष्ट भुजाधारी आई
सदा राही ती सावध..

स्मरता महालक्ष्मीला
काही पडत नाही कमी,
छाया ठेवी आशीर्वादाची
सुख मिळते जीवनी..


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२६/६/२०२० शुक्रवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*

No comments:

Post a Comment