Tuesday, 21 July 2020

[28/04, 14:13] Gjendra: *विश्वमूर्ती आई*


वात्सल्यमूर्ती आई,
चैतन्यमूर्ती आई,
ओलावा ममतेचा,
कैवल्यमूर्ती आई..!

त्यागमूर्ती आई,
ईश्वरमूर्ती आई,
जगतास भेटलेली,
प्रेममूर्ती आई...!

श्याममूर्ती आई,
राममूर्ती आई,
आयोध्या वृंदावणाची
देवमूर्ती आई..!

सौख्यमूर्ती आई ,
दु:खमूर्ती आई,
डोळ्यांच्या पापण्यांत,
अश्रूमूर्ती आई..!

भावमूर्ती आई,
न्यायमूर्ती आई,
ईश्वरास लाभलेली,
दानमुर्ती आई..!

चंद्रमूर्ती आई,
सुर्यमूर्ती आई,
ज्वलंतेत ही शीतल
ध्येयमूर्ती आई...!

विश्वमूर्ती आई,
स्वप्नमूर्ती आई,
शांतप्रिय भावनांची
शांतमूर्ती आई...!

भावप्रसन्न आई,
न्यायप्रसन्न आई,
ईश्वराची निर्मिती ही
गुणसंपन्न आई...!


©️गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मी:९६२३७१४०११
दि:२७/४/२०२० सोमवार
[28/04, 15:42] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:गुलाब*


*केसांत गुलाब माळला*(लावणी)


लाल पिवळ्या गुलाबी रंगात खुलला
अहो राया मी केसांत गुलाब माळला..//धृ//

अहो नटून थटून बसले
थोडी लाडात येऊन हसले
सोळाशृंगार करून सजना
तुमच्यासाठी बघा मी सजले
वाट पाहुनी मी तुम्हांला निरोप धाडला
अहो राया मी केसांत गुलाब माळला..//१//

साडी नेसले गुलाबी रंगाची
चोळी त्यावर जरीच्या काठाची,
नऊ रंगाच्या नवरंगी बांगड्या
लाली खुलली माझ्या ओठाची,
तुमच्या विरहात बहर माझा मी जाळला
अहो राया मी केसांत गुलाब माळला..//२//

तुमच्या स्पर्शाने यौवन खुलते
मन हे हिंदोळ्यावरती झुळते
नाचते होऊन बेभान जेव्हा
माझ्या नृत्याला ऊर्जा मिळते,
तुमच्या मिठीत सजना जीव माझा भुलला,
अहो राया मी केसांत गुलाब माळला..//३//


©️गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२४५१४०११
दि:२७/४/२०२० मंगळवार
[28/04, 20:17] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*

*विषय:जीवनगाणे*


*शीर्षक:गातो जीवनगाणे*


गातो जीवनगाणे
मी गातो जीवनगाणे
तुझ्या नी माझ्या प्रेमाचे
उधळीत मुक्त तराने
             गातो जीवनगाणे...//धृ//

निस्वार्थ अक्षय प्रेमाचा
लाभला गं किनारा,
इकडून तिकडे वाहतो
खट्याळ अवखळ वारा,
कौतिक सांगू कुणाला
झाले मन हे दिवाने,
               गातो जीवनगाणे...//१//

ललकारी घुटमळते का
माझ्याच अवती भवती,
जीवनात असंख्य का हे
सुख दुःख येती जाती,
सुखाचे अनमोल माझे
क्षण कुस्करले का जगाने,
                 गातो जीवनगाणे...//२//

अंकुर का उगवते
गर्भारलेली ओली माती
आयुष्यातून माझ्या ही
क्षण हळवे निघून जाती
झुकलेल्या डोळ्यांनी मी
किती शोधायचे बहाने
                गातो जीवनगाणे...//३//

सुवास प्राक्तनाचा घेऊन
चांदनासम झीजली काया,
घे मिठीत थोडे मजला
हा वेळ न जावो वाया,
तू जीवनात येण्यासाठी
होवो सफल माझे झुरणे,
                गातो जीवनगाणे...//४//


माझ्यासम वेदनांचे तु ही
घेऊ नको अंगावर काटे,
वेदनांचा सागर माझ्या
खळखळून मनात दाटे,
तुझ्या उदार अंतःकरणी
माझे असू दे येणे जाणे,
              गातो जीवनगाणे...//५//


©️गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि:२७/४/२०२० मंगळवार
[28/04, 20:18] Gjendra: *जगणे असह्य झाले*


दुरून बघणे तुला माझे आयुष्य झाले,
सांगू कसे तुला जगणे अस्पृश्य झाले..!

तुझी नजर शोधते काय ठाऊक मज नाही,
त्या नजरेतले इशारे देऊन नैराश्य गेले..!

आकाशी चांदण्याचा थवा भासला मज,
तुझ्या चाहुलीने जेव्हा मनी आश्चर्य झाले..!

झलक तुझी माळरानातल्या हरित वृक्षापरी,
जीवन नैराश्यातले का माझे भविष्य झाले..!

येऊन रडवतो जेव्हा माझाच मज टाहो
वाटे तुझ्या आठवणींचे ते बोलके भाष्य झाले..!

तुझे असणे अन् नसणे जीवनी सांगू कुणा मी,
अस्तित्वाचे माझ्या का एवढे हास्य झाले..!

रचून ठेवतो मी जरासे माझ्याच सरणाला,
तुझ्या शिवाय जगणे आता असह्य झाले..!


©️गजेंद्र ढवळापुरीकर स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११ दि:२७/४/२०२० मंगळवार
[29/04, 15:16] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:ताजमहल*


*ताजमहल*


तुझ्या प्रीतीचा ताजमहल
बांधीन गं सखये मी
त्या ताजमहालात आपली
मूर्ती मांडीन सखये मी..!

रंग ताजमहालाचा ऐसा
पाहून उद्गारावे लोक,
आल्या गेल्या सर्वांची नजर
नाही करायची शोक...!

ताजमहल प्रेमाचे प्रतिक
शहाजहान व मुमताजचे,
त्याच मार्गे आपले ही प्रेम
प्रसिद्ध होईल आजचे...!

ताजमहालापरी सुंदर महाल
बांधून आपण ठेऊ
आदर देऊ एकमेकांना
प्रीतीचे गीत आपण गाऊ..!

सुंदर ताजमहल प्रेमाचा
हृदयावर ठेऊ कोरून,
तू माझे नी मी तुझे
सखये हृदय नेऊ चोरून..!


©️गजेंद्र ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि:२९/४/२०२० बुधवार
[29/04, 16:28] Gjendra: *चित्रकाव्य स्पर्धेसाठी*


*रायाच्या संसारी*


मी नववधू या संसारी
मज कामाची नाही लाज,
करते स्वयंपाक ताजा
अंगावरी लेऊनिया साज..!

केसांत माळला गुलाब
आणि शुभ्र मोगऱ्याचा गजरा,
हिरवा शालू नेसला मी
त्यावर जरीचा काठ गं साजरा..!

गोऱ्या गोऱ्या हातामधी
बांगड्यांचा शोभतो गं चुडा,
लाली लाल ओठांवरची
जसा रंगला गं कात केवडा..!

भूक या पोटाची भागवाया
बाई मी पेटविल्या चुली,
आधण भांड्यावर भांडे
शिजवीते गं शेरभर साळी..!

आईबापाचे संस्कार बाई
जपून ठेवीन गं सासरी,
माझ्या रायाच्या संसारी
चुलीनं धगधगते ओसरी


©️गजेंद्र ढवळापुरीकर,
स्वराजनगरऔरंगाबाद
मो:९६२३७१४०११,
दि:२९/४/२०२०बुधवार
[30/04, 14:46] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय :भाकर*


*भाकर*


आयुष्याला माझ्या हवी ती भाकर,
जी उजळेल माझे आयुष्य सारे..!

जीवन हे माझे गोल झाले
मज भाकरीने अस्तित्व दिले..!

भाकरीचा गोल चंद्र भासे,
काळजात दारिद्र्य रुतून बसे..!

कष्टाने मिळावी भाकर हाती,
उजळून जावी आयुष्याची ज्योती..!

चोरट्या भाकरीची इथे होते निंदा,
ही भाकर आहे या भाकरीस वंदा..!

कष्टाने आपण मिळवितो भाकर,
कुटुंबाचे करण्या जीवन सुकर..!

आधार नाही ज्यास भाकरीचा,
सारा जन्म त्याचा असे चाकरीचा..!


©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[30/04, 17:51] Gjendra: *कवी विचार मंच*
*अयोजित स्पर्धेसाठी*

*आभार काव्य*


रविकांत शार्दुल ऐसा नाम,
यह आदमी नही हैं आम।
स्पर्धाओं के आयोजन में,
कवि विचार मंच की शान।

इक माह तक लगातार,
जिन्होंने किया है काम।
अलग अलग विषयो पे,
रंग भरती थी हर श्याम।

जिन्हें बुलाते हैं प्यार से
सभी तात्या के नाम से।
तात्या हम्हारे बड़े प्यारे,
काम करते जी और जान से।

आपका हर कार्य तात्या,
आपका लौकिक बढायेगा।
आपके लौट आने तक,
मंच और शिखर चढायेगा।


©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[01/05, 12:42] Gjendra: *कवी विचार मंच*
*आयोजित स्पर्धेसाठी*

*विषय:कामगार*
(अष्टाक्षरी काव्य)

निष्ठावान कामगार
ध्येयपूर्ती घडवितो,
कष्ट करूनी अपार
घास कुटुंबास देतो..!

स्वप्न पूर्ण करण्याचे
ध्येय असते डोळ्यांशी,
पैसा कमावत राही
एकनिष्ठा कर्तव्याशी..!

चिंतावान कामगार
प्राण असे हातांमध्ये,
घाम गाळीतो बिचारा
भावनिष्ठ कार्यामध्ये..!

चिंता छळते कामाची
कोणा कसे सांगायचे,
दुःख वेड्या भावनांचे
गीत  कोठे  मांडायचे..!

नितीवान कामगार
करी नियतीनं कष्ट,
कधी उपऱ्या पोटास
अन्न घालितो रे उष्ट..!

घोट अपमानित हे
ठेवी मनी साठवून,
आहे मी हि कामगार
स्वप्न पाही आठवून..!


©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०१२ औरंगाबाद.
[01/05, 13:11] Gjendra: *प्रतिभावान साहित्य*
*मंच आयोजित स्पर्धेसाठी*

*विषय: महाराष्ट्र देशा*

कोरले मी हृदयात
नाही मनी भाव दुजा
गीत नव्याने मी गातो
जयजय महाराष्ट्र माझा..!

या महान महाराष्ट्रात
जन्मले हो साधुसंत,
भीम गौतम आणि
जन्मले हो थोर महंत..!

महाराष्ट्राच्या मातीत
झाला जन्म शिवबांचा,
शिवनेरी किल्ल्यावर
गर्जला दख्खनचा राजा..!

माझ्या महाराष्ट्र देशा
करतो मानाचे वंदन,
वंदन वीर जवानांना
भाळास लावूनी चंदन..!

झळके या भारतभूवर,
हा महाराष्ट्र देश माझा,
करतो तन मन अर्पण
राहो खुश इथली प्रजा..!


©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[01/05, 13:37] Gjendra: *ग्लोबल मराठी ऑनलाईन स्पर्धेसाठी*

*तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय*


अरे म्हातारपणी दैना करूनी
मायबापाची कुठवर खाशील हाय,
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय नाय//धृ//

नऊ महिने नऊ दिवस उदरात वाढुनी जन्म दिला
घामाचं पाणी करुनी आईबापांनं वाढविला
त्या झिजणाऱ्या तळमळणाऱ्या
आईबापाची जर किंमत नाय,
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय नाय//१//

जित्यापनी बघा तुम्ही लाथा घाली मायबापाला
मेल्यावर टोपलभर निवद करतो खायाला
करशील जसं भरशील तसं
हाच नियतीचा फेरा हाय,
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय नाय//२//

पैसा अडका गाडी बंगला कमविले सारे तुझ्यासाठी
कधी खाल्ले शिळे टुकडे कधी राहिले उपाशीपोटी
बाप असे छाया सुखाची
आई आहे दुधावरची साय,
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय नाय//३//

दुःखात असो सुखात असो आईबापाला एकच हवं
काळजाचा तुकडा ह्यो त्याच्या हातानं पाणी प्यावं
लाभेल आत्म्याला चिरशांती
अजून दुसरे मिळावे काय,
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय नाय//४//

कर तू सेवा आईबापाची जीवनात सारं भेटल तुला
तुझी मुलं तुझ्यासाठी सोन्याचा बांधतील झुला
जिथे जागा तुझ्या आईबापाला
तिथेच तुझी रं जागा हाय,
तुझ्या पिंडला कावळा शिवणार नाय नाय//५//


© गजेंद्र ढवळपुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[01/05, 17:28] Gjendra: *फुलोरा काव्यमंच*
*आयोजित स्पर्धेसाठी*

*विषय:श्रमिका तुझ्याचसाठी*


स्वप्नांचा भारत घडवूया
श्रमिका तुझ्याचसाठी,
ही महान इथली माती
श्रमिका तुझ्याचसाठी..//धृ//

मिळे भाकर पोटाला
श्रमिका तुझ्यामुळे,
धारा पाहुनी घामाच्या
फुले कष्टाची रानमळे..
जपली शेतीची नाती
श्रमिका तुझ्याचसाठी..//१//

श्रम केले तू मातीत
शेती सारी फुलून आली,
मेहनतीने तुझ्या वेड्या
माती ही बहरून आली
ठेव जपूनी धन संपत्ती
श्रमिका तुझ्याचसाठी..//२//

श्रम तुझे फळास येऊ दे
घामाने देह भिजू दे,
कष्टाच्या धनाने पोती
चौफेर आज भरू दे
घे ओंजळीत भरुनी मोती
श्रमिका तुझ्याचसाठी..//३//

दे वचन आज श्रमिका
वठव तुझी तू भुमिका,
धर्मानेच करशील कर्म
पुण्याने जप तू वंशिका.,
ठेव पेटवूनी वंशज्योती
श्रमिका तुझ्याचसाठी..//४//


©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[02/05, 10:56] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित आजचा उपक्रम*

*विषय:मेंदी*

हळदीच्या अंगावर
मेंदी लावली हातावर,
थांब सखया तू जरा
मी आज नाही भानावर..!

तुझ्या प्रीतीच्या गर्भात
मज चिंब व्हायचे आहे
मेंदीच्या रंगा मधला
मज दुवा बनायचे आहे..!

मेंदीच्या रंगाने माझे
तनमन खुलून राहू दे
प्रेमाने तुझ्या अंतरी
सखया चिंब न्हाऊ दे..!

मेंदी नववधुची प्यारी
सौभाग्यात रंग भरते,
सखयाच्या प्रेमापोटी
लाटांचे तरंग होते..!

मेंदीच्या पाणावरती
राही सख्याचे दृढ नाते,
आर्त भावनांच्या लहरी
तन मन उजळून जाते..!

©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[02/05, 13:47] Gjendra: *मैत्री फाउंडेशन*
*आयोजित स्पर्धेसाठी*


*विषय:वाढवू शान महाराष्ट्राची*


हि भूमी आहे संतांची,वीर शिवबा राजाची,
करू नमन या मातीला वाढवू शान महाराष्ट्राची..//धृ//

सह्याद्रीच्या डोंगर रांगात,शान या भूमीची पसरे,
शिवबांचे तख्त राखीती,उभी उंच उंच शिखरे,
वीर लाभले या भूमीला,आहे ही बाब सन्मानाची
करू नमन या मातीला वाढवू शान महाराष्ट्राची..//१//

गोदावरीस उपमा गंगेची,ती खळखळती धारा
नाथसगर तो पैठणचा,असे लोभणीय किनारा,
जाती धर्माची व्याख्या लिहिते लेखणी एकनाथांची
करू नमन या मातीला वाढवू शान महाराष्ट्राची..//२//

लौकिक किर्ती वाढवते,गड किल्यांचे वर्चस्व,
भ्रमण करण्या येती जाती,इथे सारे विश्व,
अतिथी देवो भव अशी आहे महती या मातीची
करू नमन या मातीला वाढवू शान महाराष्ट्राची..//३//

जय जय महाराष्ट्र माझा, गाती इथली माणसं,
शेतात सन्मानाने डोलती, दाणे भरलेली कणसं,
मातीशी नाते जोडून ठेवते,माणसाला माणसांशी,
करू नमन या मातीला वाढवू शान महाराष्ट्राची..//४//


©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[02/05, 14:21] Gjendra: स्पर्धेसाठी

हे भारत घटनाकारा


हे भारत घटनाकारा तुम्ही लिहिले संविधान,
रंजल्या गांजल्यांना तुमचा नित्य अभिमान..!

हीन दीनांच्या हक्कासाठी लढलास जन्मभर,
बंदिस्त भिंती तोडुनी दिले करून मोकळे रान..!

जातीभेदाच्या पडत होत्या ठिणग्या ज्यावेळी,
राहिलास उभा एकटा ठेऊन देशहिताचे भान..!

मनुवाद्यांचा विद्रोह झुगारून ठरलास कर्दनकाळ,
गरिबांच्या हक्काची मनात जपली होती शान..!

भोंदू रूढी परंपरेला जर तुम्ही दिली नसती माती,
तर फडकत राहिले असते मनुवाद्यांचे निशाण..!

दुरून डोंगर होता साजरा हीन दिनांच्या माथी,
रूढी परंपरेत अडकून होती लोकशाही अजाण..!

तुम्हीच देवता हीन दिनाचे अन गोरगरिबांचे,
तुमच्यामुळेच मोकळा आमचा श्वास घेतो प्राण..!

© गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद

No comments:

Post a Comment