[24/05, 09:56] Gjendra: *हे भारत घटनाकारा*
हे भारत घटनाकारा तुम्ही लिहिले संविधान,
रंजल्या गांजल्यांना तुमचा नित्य अभिमान..!
हीन दीनांच्या हक्कासाठी लढलास जन्मभर,
बंदिस्त भिंती तोडुनी दिले करून मोकळे रान..!
जातीभेदाच्या पडत होत्या ठिणग्या ज्यावेळी,
राहिलास उभा एकटा ठेऊन देशहिताचे भान..!
मनुवाद्यांचा विद्रोह झुगारून ठरलास कर्दनकाळ,
गरिबांच्या हक्काची मनात जपली होती शान..!
भोंदू रूढी परंपरेला जर तुम्ही दिली नसती माती,
तर फडकत राहिले असते मनुवाद्यांचे निशाण..!
दुरून डोंगर होता साजरा हीन दिनांच्या माथी,
रूढी परंपरेत अडकून होती लोकशाही अजाण..!
तुम्हीच देवता हीन दिनाचे अन गोरगरिबांचे,
तुमच्यामुळेच मोकळा आमचा श्वास घेतो प्राण..!
© गजेंद्र
मो:९६२३७१४०११
[24/05, 09:58] Gjendra: *इतिहासाची पाने*
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे,
जपली बुद्धाच्या कृपेने
ती इतिहासाची पाने,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//धृ//
दीन दलित गोरगरीब
भिमाचे वैभव होते,
आठवा त्यांचे जगणे
या डोळयांत पाणी येते,
हृदयाला पाझर फोडी
समाजासाठी झुरणे,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//१//
अठरापगड जातींना जागा
गावकुसाच्या बाहेर,
मोडून चालीरीती भीमाने
दिला समाजाला आहेर,
गोरगरीबांचा वाली हा
पहिला साऱ्या जगाने,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//२//
लिहिले भीमाने सत्वर
साविंधान या भारताचे,
घटना लिहून देशाची
मिळविले सार जीवनाचे,
त्या पराक्रमी वीराचे
हा गजेंद्र गाई गाणे,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//३//
©गजेंद्र
ढवळपुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.०६/०८/२०१९ मंगळवार
[24/05, 16:11] Gjendra: *काव्यपुष्प साहित्य मंच*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय : नव्या युगाच्या उंबरठ्यावर*
माणूस माणसाचा वैरी झाला
थारा नाही त्यास जीवनपटावर,
गल्लीतले भांडण दिल्लीत नेई
या नव्या युगाच्या उंबरठ्यावर..
माणुसकीने वागा जण हो
कोरून मानवता काळजावर,
माणुसकीचे वैभव जपून ठेवा
या नव्या युगाच्या उंबरठ्यावर..
जातीभेदाच्या जाळून ठिणग्या
प्रेम असू द्या माणसांवर,
तुम्हीच उद्याचे आहात भविष्य
या नव्या युगाच्या उंबरठ्यावर..
वैरपणाचे जे कारण शोधती
घाव घालती या जगण्यावर,
अरे काम क्रोध सोडून वागा
या नव्या युगाच्या उंबरठ्यावर..
जन्म मरण कधी टळत नसते
भोग कळती इथे जन्मल्यावर,
सत्कार्याचे प्रेम असू द्या सारे
या नव्या युगाच्या उंबरठ्यावर..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[25/05, 14:11] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:तुळस* (अष्टाअक्षरी रचना)
माझ्या अंगणी तुळस
शोभा वाढवी घराची,
दिनरात मी जपीनं
धुरा माझिया दाराची..
दारी आहे वृंदावन
त्यात तुळस लाविली,
पाप पुण्य कीर्ती कर्म
तिने मनी जागविली..
जगी तुळस महान
तिला पुजावे धर्माने,
तिचे पुण्य मोठे जगी
सुख येईल कर्माने..
माझी तुळस तुळस
तिची महान ही कीर्ती,
लावा अंगणात रोप
मग फुलेल धरती..
तुळशीचे गणगोत
स्वर्गातील सारे देव,
पुजा लक्ष्मी नारायण
आणि सती महादेव..
©️ गजेंद्र ढववळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[27/05, 17:30] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: वृक्ष*
वृक्ष माझा सखा
श्वास देई प्राणा,
महत्त्व वृक्षाचे
जीवनी या जाणा..
वृक्षा विना नाही
जीवना महत्त्व,
सदोदित जपा
निसर्गाचे तत्व..
धरती अंबर
वृक्षाचे सोबती,
जन्मोजन्मी तिघे
सोबत खेळती..
वृक्ष आणि जीव
एकमेकांचे साथी,
युगे युगे दोघं
आयुष्य सोबती..
वृक्ष एक लावा
आपुल्या अंगणी,
जीवनाचे श्वास
फुलेल वृक्षांनी..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[27/05, 17:45] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:संत ज्ञानेश्वर*
ज्ञानेश्वरीचे रचीयता
महान संत ज्ञानेश्वर,
त्यांचे उपकार जाणी
हे धरती नी अंबर..
आपेगावी जन्म झाला
ब्राम्हनाणीं छळ केला,
माता पिता दोघांनीही
देहांताचा निश्चय केला
माता पिता जाता
या जगाला सोडुनी,
संत ज्ञानेश्वर राहिले
इथे पोरके होऊनी..
किती किती छळ
चार चार भावंडांचा,
आपेगावी ब्राम्हणांनी
केला खेळ गवंड्याचा..
[28/05, 19:39] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय : मोर*
थयथय थयथय मोर नाचतो
रंगबेरंगी पिसारा फुलतो,
बेभान होऊनी नाचताना
टपटप टपटप अश्रू गाळतो..
टपटपणाऱ्या थेंबामधूनी
काही थेंबे लांडोर झेलते,
किमया कशी ही निसर्गाची
लांडोरणीची कूस उपजते..
मोर वैभव आहे जंगलाचे
अंगावर ठसे दिसती फुलांचे,
इंद्रधनूच्या नवरंगाप्रमाणे
मोर लाडके प्राणी मुलांचे..
आहे मोर मनाचा चितचोर
वेड्या जीवाला लावी घोर,
असंख्य तबकड्या पाहुनी
खुशीत हसते नाचते लांडोर..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[28/05, 20:02] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:रणांगण*(स्फूर्ती गीत)
लाखो दिनांची आई बनली माता रमाई
रणांगणी लढायाला भिमास स्फूर्ती देई..
मनुवाद्यांनी घायाळ केले भीमाच्या मनाला,
माता रमाई ध्येर्य देई हरायचे नाही जीवनाला,
एकात्मतेची ढाल घेऊन शौर्याने सामोरे जाई,
रणांगणी लढायाला भिमास स्फूर्ती देई..
चवदार तळ्याच्या सत्याग्रही पेटविले रणांगण,
दिनदुबळ्यांच्या हक्काचे केले सुखी जीवन,
महाडची ती भूमी आजही कृत्य कृत्य होई
रणांगणी लढायाला भिमास स्फूर्ती देई..
लढा लढविला शर्तीने अन् दूर केली गुलामी
युगे युगे समाजबांधव करत राहील सलामी,
कोटी कोटी हृदयांची होती पाठीशी पुण्याई
रणांगणी लढायाला भिमास स्फूर्ती देई..
लाखो दिनांची आई बनली माता रमाई
रणांगणी लढायाला भिमास स्फूर्ती देई..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[28/05, 21:05] Gjendra: शब्द पखाली साहित्य मंच
आयोजित स्पर्धेसाठी
फेरी क्रमांक ३
विषय: वास्तववादी स्त्री दुःख
शीर्षक: पहिलं पाऊल तूच उचल
सावकाश चल तिमीरातुन वाट काढत,
संकटाची तमा न बाळगता,
तु एकटी नाहीस
धडधाकट आहेस झुंज देण्यासाठी....!
दुश्मन खुणावतो आहे पण तु सावध रहा,
आत्मविश्वासाने सामोरी जा,
विजयश्री खेचून आणण्यासाठी....!
पाऊलां पाऊलांचं अंतर हे,
तुला पार करायचंय संकट हे,
तु स्री आहेस पण अबला नाहीस,
अत्याचार इथले सहनकरण्यासाठी.....!
झुंज तुझी एकाकी आहे,
वादळात नौका सापडावी तशी,
मार्ग तुला काढायचा आहे,
हे सुंदर जीवन सुखाने जगण्यासाठी....!
बलात्कारात अत्याचारात इथल्या,
वासनेच्या खेळात रममाण झालेल्या नजरा,
भेदायच्या आहेत अचूक अर्जुनासारख्या,
तुला तुझ्याच रक्षणासाठी..
पाहिलं पाउल तुच उचल,
हा समाज विसरलाय मानपान तुझा,
त्यांच झोपेचं सोंग अंधकारातुन,
प्रकाशात आणण्यासाठी,पहिलं पाउल तुच उचल....!!
©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[29/05, 19:21] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय: मी साहित्य बोलतो*
व्याकरणाची संगत आणि,
काना मात्रा वेलांटीवर डोलतोय,
मी साहित्य बोलतोय..!
शब्द ची माझे वैभव
आहे शब्दची श्रीमंती,
साहित्यिकांची असते
निसर्गाच्या कुशीत भ्रमंती,
लाखो हजार हातांचे ओझे पेलतोय,
मी साहित्य बोलतोय..!
लिहिणारी हातं वाढली
चहूकडे प्रसार झाला,
साहित्याच्या या विश्वात
लेखणीला आश्रय मिळाला,
रोज मनाचे नवेनवे भेद खोलतोय,
मी साहित्य बोलतोय..!
कवी लेखकांच्या मनातून येते
काव्य कथा लेख कादंबरी,
लिहिण्याचे प्रकार हजारो
लेखणी माझी अप्सरा सुंदरी,
आनंद मज लिहिणाऱ्या हातावर मिळतोय,
मी साहित्य बोलतोय..!
कुणाचे शब्द चपखल
कुणाचे आहेत साधे सुधे,
कुणी लिहिती मज अलंकारात
काहींची उमटते मुक्तछंदामधे,
लेखणीच्या टोकावर मुक्त खेळतोय,
मी साहित्य बोलतोय..!
कोऱ्या कोऱ्या कागदावर
लिहिणाऱ्यांचे बहरती हात,
व्याकरणाच्या जोरावरती
साहित्यात मज त्यांची साथ,
इशाऱ्यावर त्यांच्या अथांग लोळतोय
मी साहित्य बोलतोय..!
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[29/05, 22:30] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:पारिजात*
पारिजात वृक्ष
अंगणी लावीयला
फुलांचा सडा
खाली सांडियला,
दरवळतो सुगंधी
सुवास चोहीकडे
मनमधुर गंध
त्याने सोडीयला..
चांदण्यासम फुले
दिसती परिजातकाची
वाऱ्यासवे उधळण
होते फुलांची,
देवानांही आवडती
फुले परिजातकाची
सोनसकाळी पखरण
होई कळ्यांची..
पारिजातक वृक्ष
त्यास महत्त्व फार
कळ्या नी फुले
भासती अजाण,
भेट घडावी सदा
मंदिरी देवदेवकांची
वाहती फुले जशी
ईश्वराशी मुले सुजाण..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[30/05, 13:59] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*शीर्षक: घे साजणा तू मिठीत मजला*
तुझ्या प्रीतीचा महाल सजला
घे साजणा तू मिठीत मजला..//धृ//
युगे युगे आपण दोघे
राहू संकटी दृढ उभे,
सुख दुःखाचे वादळ वारे
आले जरी आपल्या माघे
शहारा थरथर चिंब भिजला
घे साजणा तू मिठीत मजला..//१//
आठवते मज उबणारी
वर्षानुवर्षे तुझी मिठी,
विरहाच्या क्षणानंतर
बहरल्या त्या गाठीभेटी,
देह माझा तुझ्या कुशीत निजला
घे साजणा तू मिठीत मजला..//२//
फुले सुगंधी घेऊन येते
तुला द्यावया सख्या साजणा,
स्पर्शाने तुझ्या मी थरथरते
जीवन अधुरे तुझ्या वीना,
नजरेशी नजर भिडता चंद्र लाजला
घे साजणा तू मिठीत मजला..//धृ//
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[30/05, 15:03] Gjendra: *फुलोरा कलेचे माहेर घर*
*आयोजीत उपक्रम*
*विषय: माझी संस्कृती*
अवघ्या जगात आहे महान कीर्ती
अशी माझी हि भारतीय संस्कृती,
त्याग संयम आणि सहिष्णुतेने
सारे धर्म जिथे एकात्मतेने नांदती..
संत महंत आणि ऋषी मुनींनी
जपली होती अलौकिक संस्कृती,
अंधारकडून प्रकाशाकडे नेणारी
जन्मली होती माणुसकीची नाती..
मोडून आज चालीरीतींना साऱ्या
जो तो आता पैशामाघे धावतोय,
वेगळीच जीवनशैली स्वीकारून
स्वतःच वेदनांचा दिवा लावतोय..
खाणे पिणे खेळणे सारे बदलले
आली उदयास आधुनिक जीवनशैली,
आज घडीला कारनामे हजार घडती
ही जीवनशैली म्हणावी की बदफैली..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[31/05, 11:48] Gjendra: *अंकुर कलमंच महाराष्ट्र*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय: स्त्री शक्ती*
या विश्वाची रूपे हजार
त्यात नारी तुझा अभिमान
गुंफण करते तू नात्यांची
वेल असण्याचा तुला बहुमान..
स्त्री शक्तीची महिमा मोठी
दुर्गा आंबा चंडिका तुझीच रूपे
शस्त्र घेऊनी हाती कितीदा
रणांगणावर लढणे तुला सोपे..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[31/05, 11:52] Gjendra: *सदिच्छा रचना*
*विषय: स्त्री शक्ती*
या विश्वाची रूपे हजार
त्यात नारी तुझा अभिमान
गुंफण करते तू नात्यांची
वेल असण्याचा तुला बहुमान..
स्त्री शक्तीची महिमा मोठी
दुर्गा आंबा चंडिका तुझीच रूपे
शस्त्र घेऊनी हाती कितीदा
रणांगणावर लढणे तुला सोपे..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
हे भारत घटनाकारा तुम्ही लिहिले संविधान,
रंजल्या गांजल्यांना तुमचा नित्य अभिमान..!
हीन दीनांच्या हक्कासाठी लढलास जन्मभर,
बंदिस्त भिंती तोडुनी दिले करून मोकळे रान..!
जातीभेदाच्या पडत होत्या ठिणग्या ज्यावेळी,
राहिलास उभा एकटा ठेऊन देशहिताचे भान..!
मनुवाद्यांचा विद्रोह झुगारून ठरलास कर्दनकाळ,
गरिबांच्या हक्काची मनात जपली होती शान..!
भोंदू रूढी परंपरेला जर तुम्ही दिली नसती माती,
तर फडकत राहिले असते मनुवाद्यांचे निशाण..!
दुरून डोंगर होता साजरा हीन दिनांच्या माथी,
रूढी परंपरेत अडकून होती लोकशाही अजाण..!
तुम्हीच देवता हीन दिनाचे अन गोरगरिबांचे,
तुमच्यामुळेच मोकळा आमचा श्वास घेतो प्राण..!
© गजेंद्र
मो:९६२३७१४०११
[24/05, 09:58] Gjendra: *इतिहासाची पाने*
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे,
जपली बुद्धाच्या कृपेने
ती इतिहासाची पाने,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//धृ//
दीन दलित गोरगरीब
भिमाचे वैभव होते,
आठवा त्यांचे जगणे
या डोळयांत पाणी येते,
हृदयाला पाझर फोडी
समाजासाठी झुरणे,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//१//
अठरापगड जातींना जागा
गावकुसाच्या बाहेर,
मोडून चालीरीती भीमाने
दिला समाजाला आहेर,
गोरगरीबांचा वाली हा
पहिला साऱ्या जगाने,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//२//
लिहिले भीमाने सत्वर
साविंधान या भारताचे,
घटना लिहून देशाची
मिळविले सार जीवनाचे,
त्या पराक्रमी वीराचे
हा गजेंद्र गाई गाणे,
उद्घरिले भीमाने
दिन दलितांचे जगणे..//३//
©गजेंद्र
ढवळपुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.०६/०८/२०१९ मंगळवार
[24/05, 16:11] Gjendra: *काव्यपुष्प साहित्य मंच*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय : नव्या युगाच्या उंबरठ्यावर*
माणूस माणसाचा वैरी झाला
थारा नाही त्यास जीवनपटावर,
गल्लीतले भांडण दिल्लीत नेई
या नव्या युगाच्या उंबरठ्यावर..
माणुसकीने वागा जण हो
कोरून मानवता काळजावर,
माणुसकीचे वैभव जपून ठेवा
या नव्या युगाच्या उंबरठ्यावर..
जातीभेदाच्या जाळून ठिणग्या
प्रेम असू द्या माणसांवर,
तुम्हीच उद्याचे आहात भविष्य
या नव्या युगाच्या उंबरठ्यावर..
वैरपणाचे जे कारण शोधती
घाव घालती या जगण्यावर,
अरे काम क्रोध सोडून वागा
या नव्या युगाच्या उंबरठ्यावर..
जन्म मरण कधी टळत नसते
भोग कळती इथे जन्मल्यावर,
सत्कार्याचे प्रेम असू द्या सारे
या नव्या युगाच्या उंबरठ्यावर..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[25/05, 14:11] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:तुळस* (अष्टाअक्षरी रचना)
माझ्या अंगणी तुळस
शोभा वाढवी घराची,
दिनरात मी जपीनं
धुरा माझिया दाराची..
दारी आहे वृंदावन
त्यात तुळस लाविली,
पाप पुण्य कीर्ती कर्म
तिने मनी जागविली..
जगी तुळस महान
तिला पुजावे धर्माने,
तिचे पुण्य मोठे जगी
सुख येईल कर्माने..
माझी तुळस तुळस
तिची महान ही कीर्ती,
लावा अंगणात रोप
मग फुलेल धरती..
तुळशीचे गणगोत
स्वर्गातील सारे देव,
पुजा लक्ष्मी नारायण
आणि सती महादेव..
©️ गजेंद्र ढववळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[27/05, 17:30] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: वृक्ष*
वृक्ष माझा सखा
श्वास देई प्राणा,
महत्त्व वृक्षाचे
जीवनी या जाणा..
वृक्षा विना नाही
जीवना महत्त्व,
सदोदित जपा
निसर्गाचे तत्व..
धरती अंबर
वृक्षाचे सोबती,
जन्मोजन्मी तिघे
सोबत खेळती..
वृक्ष आणि जीव
एकमेकांचे साथी,
युगे युगे दोघं
आयुष्य सोबती..
वृक्ष एक लावा
आपुल्या अंगणी,
जीवनाचे श्वास
फुलेल वृक्षांनी..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[27/05, 17:45] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:संत ज्ञानेश्वर*
ज्ञानेश्वरीचे रचीयता
महान संत ज्ञानेश्वर,
त्यांचे उपकार जाणी
हे धरती नी अंबर..
आपेगावी जन्म झाला
ब्राम्हनाणीं छळ केला,
माता पिता दोघांनीही
देहांताचा निश्चय केला
माता पिता जाता
या जगाला सोडुनी,
संत ज्ञानेश्वर राहिले
इथे पोरके होऊनी..
किती किती छळ
चार चार भावंडांचा,
आपेगावी ब्राम्हणांनी
केला खेळ गवंड्याचा..
[28/05, 19:39] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय : मोर*
थयथय थयथय मोर नाचतो
रंगबेरंगी पिसारा फुलतो,
बेभान होऊनी नाचताना
टपटप टपटप अश्रू गाळतो..
टपटपणाऱ्या थेंबामधूनी
काही थेंबे लांडोर झेलते,
किमया कशी ही निसर्गाची
लांडोरणीची कूस उपजते..
मोर वैभव आहे जंगलाचे
अंगावर ठसे दिसती फुलांचे,
इंद्रधनूच्या नवरंगाप्रमाणे
मोर लाडके प्राणी मुलांचे..
आहे मोर मनाचा चितचोर
वेड्या जीवाला लावी घोर,
असंख्य तबकड्या पाहुनी
खुशीत हसते नाचते लांडोर..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[28/05, 20:02] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:रणांगण*(स्फूर्ती गीत)
लाखो दिनांची आई बनली माता रमाई
रणांगणी लढायाला भिमास स्फूर्ती देई..
मनुवाद्यांनी घायाळ केले भीमाच्या मनाला,
माता रमाई ध्येर्य देई हरायचे नाही जीवनाला,
एकात्मतेची ढाल घेऊन शौर्याने सामोरे जाई,
रणांगणी लढायाला भिमास स्फूर्ती देई..
चवदार तळ्याच्या सत्याग्रही पेटविले रणांगण,
दिनदुबळ्यांच्या हक्काचे केले सुखी जीवन,
महाडची ती भूमी आजही कृत्य कृत्य होई
रणांगणी लढायाला भिमास स्फूर्ती देई..
लढा लढविला शर्तीने अन् दूर केली गुलामी
युगे युगे समाजबांधव करत राहील सलामी,
कोटी कोटी हृदयांची होती पाठीशी पुण्याई
रणांगणी लढायाला भिमास स्फूर्ती देई..
लाखो दिनांची आई बनली माता रमाई
रणांगणी लढायाला भिमास स्फूर्ती देई..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[28/05, 21:05] Gjendra: शब्द पखाली साहित्य मंच
आयोजित स्पर्धेसाठी
फेरी क्रमांक ३
विषय: वास्तववादी स्त्री दुःख
शीर्षक: पहिलं पाऊल तूच उचल
सावकाश चल तिमीरातुन वाट काढत,
संकटाची तमा न बाळगता,
तु एकटी नाहीस
धडधाकट आहेस झुंज देण्यासाठी....!
दुश्मन खुणावतो आहे पण तु सावध रहा,
आत्मविश्वासाने सामोरी जा,
विजयश्री खेचून आणण्यासाठी....!
पाऊलां पाऊलांचं अंतर हे,
तुला पार करायचंय संकट हे,
तु स्री आहेस पण अबला नाहीस,
अत्याचार इथले सहनकरण्यासाठी.....!
झुंज तुझी एकाकी आहे,
वादळात नौका सापडावी तशी,
मार्ग तुला काढायचा आहे,
हे सुंदर जीवन सुखाने जगण्यासाठी....!
बलात्कारात अत्याचारात इथल्या,
वासनेच्या खेळात रममाण झालेल्या नजरा,
भेदायच्या आहेत अचूक अर्जुनासारख्या,
तुला तुझ्याच रक्षणासाठी..
पाहिलं पाउल तुच उचल,
हा समाज विसरलाय मानपान तुझा,
त्यांच झोपेचं सोंग अंधकारातुन,
प्रकाशात आणण्यासाठी,पहिलं पाउल तुच उचल....!!
©️गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[29/05, 19:21] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय: मी साहित्य बोलतो*
व्याकरणाची संगत आणि,
काना मात्रा वेलांटीवर डोलतोय,
मी साहित्य बोलतोय..!
शब्द ची माझे वैभव
आहे शब्दची श्रीमंती,
साहित्यिकांची असते
निसर्गाच्या कुशीत भ्रमंती,
लाखो हजार हातांचे ओझे पेलतोय,
मी साहित्य बोलतोय..!
लिहिणारी हातं वाढली
चहूकडे प्रसार झाला,
साहित्याच्या या विश्वात
लेखणीला आश्रय मिळाला,
रोज मनाचे नवेनवे भेद खोलतोय,
मी साहित्य बोलतोय..!
कवी लेखकांच्या मनातून येते
काव्य कथा लेख कादंबरी,
लिहिण्याचे प्रकार हजारो
लेखणी माझी अप्सरा सुंदरी,
आनंद मज लिहिणाऱ्या हातावर मिळतोय,
मी साहित्य बोलतोय..!
कुणाचे शब्द चपखल
कुणाचे आहेत साधे सुधे,
कुणी लिहिती मज अलंकारात
काहींची उमटते मुक्तछंदामधे,
लेखणीच्या टोकावर मुक्त खेळतोय,
मी साहित्य बोलतोय..!
कोऱ्या कोऱ्या कागदावर
लिहिणाऱ्यांचे बहरती हात,
व्याकरणाच्या जोरावरती
साहित्यात मज त्यांची साथ,
इशाऱ्यावर त्यांच्या अथांग लोळतोय
मी साहित्य बोलतोय..!
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मो:९६२३७१४०११ औरंगाबाद*
[29/05, 22:30] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:पारिजात*
पारिजात वृक्ष
अंगणी लावीयला
फुलांचा सडा
खाली सांडियला,
दरवळतो सुगंधी
सुवास चोहीकडे
मनमधुर गंध
त्याने सोडीयला..
चांदण्यासम फुले
दिसती परिजातकाची
वाऱ्यासवे उधळण
होते फुलांची,
देवानांही आवडती
फुले परिजातकाची
सोनसकाळी पखरण
होई कळ्यांची..
पारिजातक वृक्ष
त्यास महत्त्व फार
कळ्या नी फुले
भासती अजाण,
भेट घडावी सदा
मंदिरी देवदेवकांची
वाहती फुले जशी
ईश्वराशी मुले सुजाण..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[30/05, 13:59] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*शीर्षक: घे साजणा तू मिठीत मजला*
तुझ्या प्रीतीचा महाल सजला
घे साजणा तू मिठीत मजला..//धृ//
युगे युगे आपण दोघे
राहू संकटी दृढ उभे,
सुख दुःखाचे वादळ वारे
आले जरी आपल्या माघे
शहारा थरथर चिंब भिजला
घे साजणा तू मिठीत मजला..//१//
आठवते मज उबणारी
वर्षानुवर्षे तुझी मिठी,
विरहाच्या क्षणानंतर
बहरल्या त्या गाठीभेटी,
देह माझा तुझ्या कुशीत निजला
घे साजणा तू मिठीत मजला..//२//
फुले सुगंधी घेऊन येते
तुला द्यावया सख्या साजणा,
स्पर्शाने तुझ्या मी थरथरते
जीवन अधुरे तुझ्या वीना,
नजरेशी नजर भिडता चंद्र लाजला
घे साजणा तू मिठीत मजला..//धृ//
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[30/05, 15:03] Gjendra: *फुलोरा कलेचे माहेर घर*
*आयोजीत उपक्रम*
*विषय: माझी संस्कृती*
अवघ्या जगात आहे महान कीर्ती
अशी माझी हि भारतीय संस्कृती,
त्याग संयम आणि सहिष्णुतेने
सारे धर्म जिथे एकात्मतेने नांदती..
संत महंत आणि ऋषी मुनींनी
जपली होती अलौकिक संस्कृती,
अंधारकडून प्रकाशाकडे नेणारी
जन्मली होती माणुसकीची नाती..
मोडून आज चालीरीतींना साऱ्या
जो तो आता पैशामाघे धावतोय,
वेगळीच जीवनशैली स्वीकारून
स्वतःच वेदनांचा दिवा लावतोय..
खाणे पिणे खेळणे सारे बदलले
आली उदयास आधुनिक जीवनशैली,
आज घडीला कारनामे हजार घडती
ही जीवनशैली म्हणावी की बदफैली..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[31/05, 11:48] Gjendra: *अंकुर कलमंच महाराष्ट्र*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय: स्त्री शक्ती*
या विश्वाची रूपे हजार
त्यात नारी तुझा अभिमान
गुंफण करते तू नात्यांची
वेल असण्याचा तुला बहुमान..
स्त्री शक्तीची महिमा मोठी
दुर्गा आंबा चंडिका तुझीच रूपे
शस्त्र घेऊनी हाती कितीदा
रणांगणावर लढणे तुला सोपे..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
[31/05, 11:52] Gjendra: *सदिच्छा रचना*
*विषय: स्त्री शक्ती*
या विश्वाची रूपे हजार
त्यात नारी तुझा अभिमान
गुंफण करते तू नात्यांची
वेल असण्याचा तुला बहुमान..
स्त्री शक्तीची महिमा मोठी
दुर्गा आंबा चंडिका तुझीच रूपे
शस्त्र घेऊनी हाती कितीदा
रणांगणावर लढणे तुला सोपे..
©️ गजेंद्र ढवळापुरीकर
मो:९६२३७१४०११ औरंगाबाद
No comments:
Post a Comment