[25/06, 14:59] Gjendra: *स्पर्श*
स्पर्श तुझा नाजूक
जेव्हा जेव्हा होतो
धुंद कळ्या मनाच्या
फुलवित मज जातो..
ग्रीष्म सरून जावा
आषाढ श्रावण यावा,
उन्हाच्या तप्त झळा
थंड करून जावा..
स्पर्शाने त्या थरथरतो
मनाचा शांत गाभा,
रोमहर्ष एवढा की
राहता येत नाही उभा..
इतका असतो बेभान
काळजाचे तुकडे व्हावे,
पुन्हा पुन्हा जुळवून ही
स्पर्शने विखरून जावे..
अंतरात माझ्या मिसळून
घट्ट व्हावा ऋणानुबंध,
संकटाने यावे कितीही
घट्ट असावा स्पर्शाचा बंध..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि:२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 15:30] Gjendra: *बहाणा*
चल सखे मिठीत येणा
करू नको बहाणा,
तुझ्या प्रेमात झालो सजणे
झालो गं वेडा दिवाना..//धृ//
चाल तुझी नखऱ्याची
गोल गोल भवऱ्याची,
भुरळ पाडून जाते तू
तुझ्यावर नजर साऱ्यांची,
घायाळ झाले माझे मन
जरा तू समजून घेणा
तुझ्या प्रेमात झालो सजणे
झालो गं वेडा दिवाना..//१//
तुझ्या ओठांची ती लाली
गंधित खुलून आली,
दैना मनाची माझ्या
तुझ्यामुळे सखये झाली,
शिकरी बसलो टपून
आता लावितो निशाणा,
तुझ्या प्रेमात झालो सजणे
झालो गं वेडा दिवाना..//२//
तुझ्या पायात वाजती गं
तालासुरात पैंजण,
माझं काळीज चिरून तू
नको गं बसवू इंजन
आग माझ्या हृदयाची
कधी हि विझण सांगना,
तुझ्या प्रेमात झालो सजणे
झालो गं वेडा दिवाना..//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 17:22] Gjendra: *शतजन्म*
उपकर तुझे फेडण्या
घेईन मी शतजन्म,
आशीर्वाद तुझे असू दे
राहीन तुझा आजन्म..
आई तुझ्याचसाठी
भेटावा हा जन्म पुन्हा
रक्तातल्या नात्यांची
वीण व्हावी घट्ट पुन्हा..
दडवून भाग्य ठेवले
मातीतल्या कणांशी,
जोडून पुन्हा बघतो
जुळवून माणसांशी..
शतजन्म भेटावया
नको हजार पुण्य,
असावे चांगले कर्म
असो भाव त्यात शून्य..
शतजन्म घेऊन आई
येईन तुझ्या पोटी,
लाभता जन्म मानवाचा
पुण्य घडो कोटी कोटी..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 17:33] Gjendra: *गीत असे सजले*
गीत असे सजले
तुझे नी माझे,
विहरणाऱ्या मनी
तू नित्य विराजे..
श्वास हा तुझा
हृदयास स्पर्श करतो,
भावनाशून्य प्रेमाचे
स्मरण तुझे स्मरतो..
आल्हाद भावनांचा
शोधून घेतो निवारा,
लपून कुशीत तुझ्या
पाहतो खेळ सारा..
गीतात तुझ्या रममाण
होतील सारे क्षण,
सजवून प्रेम आपले
घट्ट व्हावे हे बंधन..
ताल सूर आर्त माझे
गळ्यात पुन्हा यावे,
गीत तुझे सजलेले
एकरूप त्यात व्हावे..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 17:45] Gjendra: *रूख रूख*
रूख रूख भावनांची
तरसलेल्या श्वासांची,
चंद्र सूर्य तारे होऊन
प्रीत जुळावी आठवांची..
तन मन हे ग्रासलेले
तुझ्या आर्त विरहाने,
रूख रूख मनात या
चौफेर खीन्न भावनाने..
माळून दिप लावलेले
प्रकाश मिटतो सारा
रूख रूख वेदनांची
सुखदुःखाचा खेळ न्यारा..
पचविण्या दुःख प्रेमाचे
रूख रूख बंद व्हावी,
विरह छळणारा वैरी
स्पंदनांना गती यावी
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 19:22] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: असा मी*
आहे असा मी आहे तसा मी
सांगू कुणाला आहे कसा मी
वेदनेचा निखारा पचवतो मी
माझे दुःख हृदयी साठवतो मी..
नाही कुणी माझे या दुनियेत
आयुष्य मुरझावे अशी माझी गत,
गुलाबात काटे आहे टोचणारे
तसे माझ्या जीवनी दुःख बोचणारे..
सल एक सलते मनात मोठी
जीवनात माझ्या मुखवटे खोटी,
दाबून ठेवल्या मी मनी संवेदना
असे आर्त माझ्या दुःखाच्या खुणा..
झाकोळ जीवनाचा छळतो असा
वेदनेत वाहलेला असा मी कसा,
दुभंगले माझे स्वप्न कशाने कळेना
असा मी तसा मी कोणा कळेना..
*©️गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 19:51] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:असा मी*
*असा मी*
मी थोडासा शांत
थोडासा आहे रागीट,
मनात सगळ्या बद्दल
भाव आहे नीट..
कधी कधी रुसतो
थोडा थोडा फुगतो,
वाईटाचे भान सदा
ठेवून मी वागतो..
दुःख असते जवळ
सुख असते लांब,
मी स्वतः बांधून ठेवला
दुःखाचा तो खांब..
दुःखावर मात करत
जगतो आहे इथे,
दुःख येतच राहते
मी जातो जिथे जिथे..
हरणार नाही कधी
मी पळणार नाही कुठे,
वाटेत येवोत माझ्या
संकट मोठे मोठे..
गर्व अहंकार नाही
*असा मी* साधा भोळा,
सर्वांसोबत चालणारा
भासे शांतप्रिय गोळा..
प्रेम देतो सर्वांना
दुःखात साथ देतो,
सुखाचे क्षण सारे
इतरांना वाटतो..
आहे असा मी कसा
आहे जसा मी तसा,
सुख दुःखात माझ्या
जो तो होई वेडापिसा..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२५/६/२९२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[01/07, 21:43] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:आषाढी एकादशी*
एकादशी व्रत
अतिशय पावन,
नित्य विठ्ठलाचे
स्पर्शावे चरण..
पंढरीचा राया
उघड तू झापड,
तुझ्या भक्तीची
लागलीसे आवड..
पांडुरंगा तुझी
सर्वांवरी कृपा,
असु दे भक्तीचा
मार्ग हा सोपा..
आषाढी एकादशी
बारा महिन्याची वारी,
चहूदिशांनी भक्त
येतो तुझ्या दारी..
देवा विठुराया
तुझे नामस्मरण,
जीवनात घडो
नित्य तुझे दर्शन..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.१/७/२०२० बुधवार*
*मो:९६२४७१४०११/औरंगाबाद*
[02/07, 17:25] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: उगवला नव्या युगाचा सूर्य..*
*शीर्षक*
*उगवला नव्या युगाचा सूर्य*
लूटमार चोरी अन् भ्रष्टाचार
चालूच आहेत बलात्कार,
उगवला नव्या युगाचा सूर्य
तरीही थांबत नाही अत्याचार..
समाजमन सुधारत नाही
कितीही खोडलीत पाळंमुळं,
आयुष्याच्या या वळणावर
बेसुमार पडलं अस्थिरतेचं जाळं..
हे देवा जम्मू दे रे पुन्हा इथे
धगधगता शिवाजीसम तारा,
बाबासाहेबाच्या रूपाने पुन्हा
या युगात अंगार सळसळणारा..
पेटू दे मानव रूपाने ज्वाला
इथे करण्यासाठी समाजकार्य,
वाटायला पाहिजे आता पुन्हा
जणू उगवला नव्या युगाचा सूर्य..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. २ / ७ / २०२० गुरुवार*
*मो:९६२३७१५०११/औरंगाबाद*
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.१/७/२०२० बुधवार*
*मो:९६२४७१४०११/औरंगाबाद*
[03/07, 19:01] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: डोळे*
डोळे मनाचा आरसा
शांत सालस निरागस,
नयनांची भाषा कळते
स्वच्छ असावा मानस..
नजरेतील हाव भाव
नजरेलाच समजावा
कला समजण्याची ती
अनोखा संगम व्हावा..
ओलावा पापण्यांचा
डोळ्यात असतो खोल,
दुःखाला पाझर फुटता
पापण्यांच्या कडा ओल..
डोळयांचे आर्त भाव
फुलतात नजरेतुनी
संगम भावनांचा होतो
स्वप्नांतील स्पर्शातूनी..
डोळे सजवी स्वप्नांचे
रंगीबेरंगी ते रंगमहाल,
अलगद् पांघरावी जशी
नितळ भावनांची शाल..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. ३/ ७ / २०२० शुक्रवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[03/07, 21:09] Gjendra: *अंकुर कलामंच महाराष्ट्र*
*आयोजित उपक्रम*
*विषय: कुठे शोधू भाकरी*
किती करावी चाकरी
नाही मनाजोगती नौकरी,
या टिचभर पोटासाठी
कुठे मी शोधू भाकरी..
अपार मेहनत करतो
सुख नाही तरी जीवाला,
गाळलेल्या घामाची
किंमत नाही हो कुणाला..
वणवण भटकावे किती
नौकरी काही मिळना,
कामाविना फुकटची
घशात भाकरी गिळणा..
मिळू दे हातास काही
देवा रे छोटे मोठे काम,
खुशाल राहोत पिलं माझी
सुखाचे असो माझे धाम..
सौख्य यावे या जीवनी
ज्योत आयुष्याची फुलावी,
कुठे शोधू भाकरी आता
ती राजरोसपणे मिळावी...
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि:३ / ७ / २०२० शुक्रवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[04/07, 10:49] Gjendra: *अंकुर कलामंच महाराष्ट्र*
*आयोजित चित्रकाव्य उपक्रम*
*शीर्षक: एकाकी चिमणी*
आजकाल कुठेच दिसत नाही चिमण्या
इकडून तिकडे बेधुंद बागडणाऱ्या,
काड्या काड्या वेचूनिया चोचीमध्ये
खोपा जाळीदार पिलांसाठी बांधणाऱ्या..
कधीकाळी झाड हिरवे हिरवे गार
त्यांच्या वास्तव्याने गजबजलेले असायचे
बेधडक हुंदडणे त्यांचे किलबिलणारे
चौफेर उडणारे थवे पक्षांचे दिसायचे..
आज दिसतेय फक्त एक चिमणी
चहूदिशांना वेध अस्तित्वाचा घेणारी,
बहुधा एकटी शोधत असावी निवारा
खिन्न मनाने सभोवार नाते शोधणारी..
माणसांनो तिचं असं उदास असणं
मनास खूप वेदना देऊन जातंय,
वाटतं ही विनाशाची चाहूल असावी
का तिचं जगणं असं एकाकी होतंय..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. ४ / ७ / २०२० शनिवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[04/07, 12:59] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय : भारतीय स्त्रीशक्ती*
*शीर्षक:भारताच्या सशक्त महिला*
भारतीय स्त्रीची रूपे अनेक
अठरापगड जाती धर्माची,
गरज सर्व समाजस्तरातून
आता महिला सशक्तीकरणाची..
आठवा तो जुना काळ
महान कर्तबगार स्त्रीयांचा,
एकाहून एक सरस होत्या
बांधील नव्हत्या नियमांच्या..
मराठी मुलखतोफ जिजाबाई
जन्मविला शूरवीर पुत्र शिवाजी,
मराठा सम्राज्यासाठी तिने
लावली पुत्र प्राणाची बाजी..
इथूनच सुरू जाहली स्त्रीयांची
धगधगत्या ज्वालाची बंडखोरी,
मराठा साम्राज्याची धुरा सांभाळण्या
यशस्वी येसूबाई अन् ताराबाई खरी..
एक अचानक ज्योत पेटली
नाव तिचे मणिकर्णिका होते,
लढवय्या योद्धा महान ती
राणी लक्ष्मीबाई नाव शोभते,
पेशव्यांच्या काळानंतर
उगवला तारा अहिल्याबाई,
जिर्णोद्धार केला अनेक वास्तूंचा
समाजाने राखली तिची पुण्याई
एक होती लढवय्या चांदबीबी
शत्रूसमोर कधी न डगमगणारी,
राज्य चालवण्यासाठी तिने
हाती उचलल्या धारदार तलवारी..
पुढचा थोडा काळ बदलला
स्त्रीयांना बंधने लादली गेली,
स्त्री शिक्षणासाठी बंध झुगारून
सावित्रीबाई समोर आली...
अवकाशात उंचावर झेप घेणारी
कल्पना चावला भारतीय पहिली,
धावण्याच्या शर्यतीत तर
पी.टी. उषाने कमाल केली..
थोर समाजसेविका सिंधूताई
बनली असंख्य अनाथांची आई,
अख्खे आयुष्य अनाथांना देऊन
सर्वांची बनली ती लाडकी माई..
स्वर्गीय इंदिरा गांधी होत्या
पहिल्या महिला पंतप्रधान,
अन् स्त्रीशक्तीने पुन्हा उंचावला
भारतीय स्त्री जातीचा अभिमान..
अशा अनेक स्त्रीया घडून गेल्या
अन् उत्तरोत्तर घडतच राहतील,
भारताच्या सशक्त महिलांकडे
जगी सन्मानाने बघितले जाईल..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. ४ / ७ / २०२० शनिवार*
*मो:९६२४७१४०११/औरंगाबाद*
[22/07, 10:50] Gjendra: *अंकुर कलामंच महाराष्ट्र*
*आयोजित उपक्रम*
*विषय:तरुणा..तुझ्या हाती नव्या युगाची दोरी*
*शीर्षक:तरुणा..तुझ्या हाती.*
जुने असुदे जीवनी तुझ्या रे
कहाणी...एकूण घे सारी,
तरुणा..तुझ्या हाती नव्या युगाची दोरी..//धृ//
सन्मानाचा काळ होता
कुठेही नव्हती दडपशाही,
संकटात मदत करण्या
जो तो उभा राही,
आजच्या सारखी नजरेत कुणाच्या
नव्हती रे खुमारी,
तरुणा..तुझ्या हाती नव्या युगाची दोरी..//१//
आजचे जगणे एकलकोंडे
कुणाला कुणाशी न घेणे देणे,
चारभिंतीच्या आतमध्ये
त्याचे झूरून झूरून मरणे,
कोणत्या महाशयाने ही रीत बनवली न्यारी,
तरुणा..तुझ्या हाती नव्या युगाची दोरी..//२//
हे युग बदलणे आहे तुला
स्वतः बरोबर समाजासाठी ही,
इथे जन्मलास इथेच मरशील
नियतीही देईल ग्वाही,
उघड माथ्याने जगायला नाही कशाची चोरी,
तरुणा..तुझ्या हाती नव्या युगाची दोरी..//३//
इतरांना प्रेम देणे त्यांचे होणे
ही काळाची गरज आहे,
अरे तरुणा जरा सावध हो
तुझे जगणे गरजेचे आहे,
जगून घे सर्वांसाठी नाहीतर पाटी राहील कोरी,
तरुणा..तुझ्या हाती नव्या युगाची दोरी..//४//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि१२/७/२०२० रविवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[22/07, 10:50] Gjendra: *साहित्य काव्यगंध समुह*
*आयोजित कविता उपक्रम*
*विषय:समाजप्रबोधन करणाऱ्या कविता*
*शीर्षक:मला एवढंच सांगायचं*
दगडाला शेंदूर फासनं
असं कुठवर चालायचं,
जीवंत माणसात देव शोधा
मला एवढंच सांगायचं..
देवाला नारळ फोडता
हार पानफुले चढवता,
दानधर्म करायचं सोडून
आल्या पावली निघून जाता,
आंधळ्या पांगळ्यांना सांगा
का हो लाथाडायचं..
जीवंत माणसात देव शोधा
मला एवढंच सांगायचं..
गरीब झुरतो खाण्यासाठी
तुम्ही करता उधळपट्टी,
तो घाम गाळून करतो काम
तुम्ही आरामात घालवता सुट्टी,
गरीब दुबळ्यांच्या मेहनतीवर
सांगा कुठवर जगायचं..
जीवंत माणसात देव शोधा
मला एवढंच सांगायचं..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.१३/७/२०२० सोमवार*
*दि.९६२३७१५०११/औरंगाबाद*
स्पर्श तुझा नाजूक
जेव्हा जेव्हा होतो
धुंद कळ्या मनाच्या
फुलवित मज जातो..
ग्रीष्म सरून जावा
आषाढ श्रावण यावा,
उन्हाच्या तप्त झळा
थंड करून जावा..
स्पर्शाने त्या थरथरतो
मनाचा शांत गाभा,
रोमहर्ष एवढा की
राहता येत नाही उभा..
इतका असतो बेभान
काळजाचे तुकडे व्हावे,
पुन्हा पुन्हा जुळवून ही
स्पर्शने विखरून जावे..
अंतरात माझ्या मिसळून
घट्ट व्हावा ऋणानुबंध,
संकटाने यावे कितीही
घट्ट असावा स्पर्शाचा बंध..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि:२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 15:30] Gjendra: *बहाणा*
चल सखे मिठीत येणा
करू नको बहाणा,
तुझ्या प्रेमात झालो सजणे
झालो गं वेडा दिवाना..//धृ//
चाल तुझी नखऱ्याची
गोल गोल भवऱ्याची,
भुरळ पाडून जाते तू
तुझ्यावर नजर साऱ्यांची,
घायाळ झाले माझे मन
जरा तू समजून घेणा
तुझ्या प्रेमात झालो सजणे
झालो गं वेडा दिवाना..//१//
तुझ्या ओठांची ती लाली
गंधित खुलून आली,
दैना मनाची माझ्या
तुझ्यामुळे सखये झाली,
शिकरी बसलो टपून
आता लावितो निशाणा,
तुझ्या प्रेमात झालो सजणे
झालो गं वेडा दिवाना..//२//
तुझ्या पायात वाजती गं
तालासुरात पैंजण,
माझं काळीज चिरून तू
नको गं बसवू इंजन
आग माझ्या हृदयाची
कधी हि विझण सांगना,
तुझ्या प्रेमात झालो सजणे
झालो गं वेडा दिवाना..//३//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 17:22] Gjendra: *शतजन्म*
उपकर तुझे फेडण्या
घेईन मी शतजन्म,
आशीर्वाद तुझे असू दे
राहीन तुझा आजन्म..
आई तुझ्याचसाठी
भेटावा हा जन्म पुन्हा
रक्तातल्या नात्यांची
वीण व्हावी घट्ट पुन्हा..
दडवून भाग्य ठेवले
मातीतल्या कणांशी,
जोडून पुन्हा बघतो
जुळवून माणसांशी..
शतजन्म भेटावया
नको हजार पुण्य,
असावे चांगले कर्म
असो भाव त्यात शून्य..
शतजन्म घेऊन आई
येईन तुझ्या पोटी,
लाभता जन्म मानवाचा
पुण्य घडो कोटी कोटी..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 17:33] Gjendra: *गीत असे सजले*
गीत असे सजले
तुझे नी माझे,
विहरणाऱ्या मनी
तू नित्य विराजे..
श्वास हा तुझा
हृदयास स्पर्श करतो,
भावनाशून्य प्रेमाचे
स्मरण तुझे स्मरतो..
आल्हाद भावनांचा
शोधून घेतो निवारा,
लपून कुशीत तुझ्या
पाहतो खेळ सारा..
गीतात तुझ्या रममाण
होतील सारे क्षण,
सजवून प्रेम आपले
घट्ट व्हावे हे बंधन..
ताल सूर आर्त माझे
गळ्यात पुन्हा यावे,
गीत तुझे सजलेले
एकरूप त्यात व्हावे..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 17:45] Gjendra: *रूख रूख*
रूख रूख भावनांची
तरसलेल्या श्वासांची,
चंद्र सूर्य तारे होऊन
प्रीत जुळावी आठवांची..
तन मन हे ग्रासलेले
तुझ्या आर्त विरहाने,
रूख रूख मनात या
चौफेर खीन्न भावनाने..
माळून दिप लावलेले
प्रकाश मिटतो सारा
रूख रूख वेदनांची
सुखदुःखाचा खेळ न्यारा..
पचविण्या दुःख प्रेमाचे
रूख रूख बंद व्हावी,
विरह छळणारा वैरी
स्पंदनांना गती यावी
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 19:22] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: असा मी*
आहे असा मी आहे तसा मी
सांगू कुणाला आहे कसा मी
वेदनेचा निखारा पचवतो मी
माझे दुःख हृदयी साठवतो मी..
नाही कुणी माझे या दुनियेत
आयुष्य मुरझावे अशी माझी गत,
गुलाबात काटे आहे टोचणारे
तसे माझ्या जीवनी दुःख बोचणारे..
सल एक सलते मनात मोठी
जीवनात माझ्या मुखवटे खोटी,
दाबून ठेवल्या मी मनी संवेदना
असे आर्त माझ्या दुःखाच्या खुणा..
झाकोळ जीवनाचा छळतो असा
वेदनेत वाहलेला असा मी कसा,
दुभंगले माझे स्वप्न कशाने कळेना
असा मी तसा मी कोणा कळेना..
*©️गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२५/६/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[25/06, 19:51] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:असा मी*
*असा मी*
मी थोडासा शांत
थोडासा आहे रागीट,
मनात सगळ्या बद्दल
भाव आहे नीट..
कधी कधी रुसतो
थोडा थोडा फुगतो,
वाईटाचे भान सदा
ठेवून मी वागतो..
दुःख असते जवळ
सुख असते लांब,
मी स्वतः बांधून ठेवला
दुःखाचा तो खांब..
दुःखावर मात करत
जगतो आहे इथे,
दुःख येतच राहते
मी जातो जिथे जिथे..
हरणार नाही कधी
मी पळणार नाही कुठे,
वाटेत येवोत माझ्या
संकट मोठे मोठे..
गर्व अहंकार नाही
*असा मी* साधा भोळा,
सर्वांसोबत चालणारा
भासे शांतप्रिय गोळा..
प्रेम देतो सर्वांना
दुःखात साथ देतो,
सुखाचे क्षण सारे
इतरांना वाटतो..
आहे असा मी कसा
आहे जसा मी तसा,
सुख दुःखात माझ्या
जो तो होई वेडापिसा..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२५/६/२९२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[01/07, 21:43] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:आषाढी एकादशी*
एकादशी व्रत
अतिशय पावन,
नित्य विठ्ठलाचे
स्पर्शावे चरण..
पंढरीचा राया
उघड तू झापड,
तुझ्या भक्तीची
लागलीसे आवड..
पांडुरंगा तुझी
सर्वांवरी कृपा,
असु दे भक्तीचा
मार्ग हा सोपा..
आषाढी एकादशी
बारा महिन्याची वारी,
चहूदिशांनी भक्त
येतो तुझ्या दारी..
देवा विठुराया
तुझे नामस्मरण,
जीवनात घडो
नित्य तुझे दर्शन..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.१/७/२०२० बुधवार*
*मो:९६२४७१४०११/औरंगाबाद*
[02/07, 17:25] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: उगवला नव्या युगाचा सूर्य..*
*शीर्षक*
*उगवला नव्या युगाचा सूर्य*
लूटमार चोरी अन् भ्रष्टाचार
चालूच आहेत बलात्कार,
उगवला नव्या युगाचा सूर्य
तरीही थांबत नाही अत्याचार..
समाजमन सुधारत नाही
कितीही खोडलीत पाळंमुळं,
आयुष्याच्या या वळणावर
बेसुमार पडलं अस्थिरतेचं जाळं..
हे देवा जम्मू दे रे पुन्हा इथे
धगधगता शिवाजीसम तारा,
बाबासाहेबाच्या रूपाने पुन्हा
या युगात अंगार सळसळणारा..
पेटू दे मानव रूपाने ज्वाला
इथे करण्यासाठी समाजकार्य,
वाटायला पाहिजे आता पुन्हा
जणू उगवला नव्या युगाचा सूर्य..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. २ / ७ / २०२० गुरुवार*
*मो:९६२३७१५०११/औरंगाबाद*
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.१/७/२०२० बुधवार*
*मो:९६२४७१४०११/औरंगाबाद*
[03/07, 19:01] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय: डोळे*
डोळे मनाचा आरसा
शांत सालस निरागस,
नयनांची भाषा कळते
स्वच्छ असावा मानस..
नजरेतील हाव भाव
नजरेलाच समजावा
कला समजण्याची ती
अनोखा संगम व्हावा..
ओलावा पापण्यांचा
डोळ्यात असतो खोल,
दुःखाला पाझर फुटता
पापण्यांच्या कडा ओल..
डोळयांचे आर्त भाव
फुलतात नजरेतुनी
संगम भावनांचा होतो
स्वप्नांतील स्पर्शातूनी..
डोळे सजवी स्वप्नांचे
रंगीबेरंगी ते रंगमहाल,
अलगद् पांघरावी जशी
नितळ भावनांची शाल..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. ३/ ७ / २०२० शुक्रवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[03/07, 21:09] Gjendra: *अंकुर कलामंच महाराष्ट्र*
*आयोजित उपक्रम*
*विषय: कुठे शोधू भाकरी*
किती करावी चाकरी
नाही मनाजोगती नौकरी,
या टिचभर पोटासाठी
कुठे मी शोधू भाकरी..
अपार मेहनत करतो
सुख नाही तरी जीवाला,
गाळलेल्या घामाची
किंमत नाही हो कुणाला..
वणवण भटकावे किती
नौकरी काही मिळना,
कामाविना फुकटची
घशात भाकरी गिळणा..
मिळू दे हातास काही
देवा रे छोटे मोठे काम,
खुशाल राहोत पिलं माझी
सुखाचे असो माझे धाम..
सौख्य यावे या जीवनी
ज्योत आयुष्याची फुलावी,
कुठे शोधू भाकरी आता
ती राजरोसपणे मिळावी...
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि:३ / ७ / २०२० शुक्रवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[04/07, 10:49] Gjendra: *अंकुर कलामंच महाराष्ट्र*
*आयोजित चित्रकाव्य उपक्रम*
*शीर्षक: एकाकी चिमणी*
आजकाल कुठेच दिसत नाही चिमण्या
इकडून तिकडे बेधुंद बागडणाऱ्या,
काड्या काड्या वेचूनिया चोचीमध्ये
खोपा जाळीदार पिलांसाठी बांधणाऱ्या..
कधीकाळी झाड हिरवे हिरवे गार
त्यांच्या वास्तव्याने गजबजलेले असायचे
बेधडक हुंदडणे त्यांचे किलबिलणारे
चौफेर उडणारे थवे पक्षांचे दिसायचे..
आज दिसतेय फक्त एक चिमणी
चहूदिशांना वेध अस्तित्वाचा घेणारी,
बहुधा एकटी शोधत असावी निवारा
खिन्न मनाने सभोवार नाते शोधणारी..
माणसांनो तिचं असं उदास असणं
मनास खूप वेदना देऊन जातंय,
वाटतं ही विनाशाची चाहूल असावी
का तिचं जगणं असं एकाकी होतंय..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. ४ / ७ / २०२० शनिवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[04/07, 12:59] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय : भारतीय स्त्रीशक्ती*
*शीर्षक:भारताच्या सशक्त महिला*
भारतीय स्त्रीची रूपे अनेक
अठरापगड जाती धर्माची,
गरज सर्व समाजस्तरातून
आता महिला सशक्तीकरणाची..
आठवा तो जुना काळ
महान कर्तबगार स्त्रीयांचा,
एकाहून एक सरस होत्या
बांधील नव्हत्या नियमांच्या..
मराठी मुलखतोफ जिजाबाई
जन्मविला शूरवीर पुत्र शिवाजी,
मराठा सम्राज्यासाठी तिने
लावली पुत्र प्राणाची बाजी..
इथूनच सुरू जाहली स्त्रीयांची
धगधगत्या ज्वालाची बंडखोरी,
मराठा साम्राज्याची धुरा सांभाळण्या
यशस्वी येसूबाई अन् ताराबाई खरी..
एक अचानक ज्योत पेटली
नाव तिचे मणिकर्णिका होते,
लढवय्या योद्धा महान ती
राणी लक्ष्मीबाई नाव शोभते,
पेशव्यांच्या काळानंतर
उगवला तारा अहिल्याबाई,
जिर्णोद्धार केला अनेक वास्तूंचा
समाजाने राखली तिची पुण्याई
एक होती लढवय्या चांदबीबी
शत्रूसमोर कधी न डगमगणारी,
राज्य चालवण्यासाठी तिने
हाती उचलल्या धारदार तलवारी..
पुढचा थोडा काळ बदलला
स्त्रीयांना बंधने लादली गेली,
स्त्री शिक्षणासाठी बंध झुगारून
सावित्रीबाई समोर आली...
अवकाशात उंचावर झेप घेणारी
कल्पना चावला भारतीय पहिली,
धावण्याच्या शर्यतीत तर
पी.टी. उषाने कमाल केली..
थोर समाजसेविका सिंधूताई
बनली असंख्य अनाथांची आई,
अख्खे आयुष्य अनाथांना देऊन
सर्वांची बनली ती लाडकी माई..
स्वर्गीय इंदिरा गांधी होत्या
पहिल्या महिला पंतप्रधान,
अन् स्त्रीशक्तीने पुन्हा उंचावला
भारतीय स्त्री जातीचा अभिमान..
अशा अनेक स्त्रीया घडून गेल्या
अन् उत्तरोत्तर घडतच राहतील,
भारताच्या सशक्त महिलांकडे
जगी सन्मानाने बघितले जाईल..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. ४ / ७ / २०२० शनिवार*
*मो:९६२४७१४०११/औरंगाबाद*
[22/07, 10:50] Gjendra: *अंकुर कलामंच महाराष्ट्र*
*आयोजित उपक्रम*
*विषय:तरुणा..तुझ्या हाती नव्या युगाची दोरी*
*शीर्षक:तरुणा..तुझ्या हाती.*
जुने असुदे जीवनी तुझ्या रे
कहाणी...एकूण घे सारी,
तरुणा..तुझ्या हाती नव्या युगाची दोरी..//धृ//
सन्मानाचा काळ होता
कुठेही नव्हती दडपशाही,
संकटात मदत करण्या
जो तो उभा राही,
आजच्या सारखी नजरेत कुणाच्या
नव्हती रे खुमारी,
तरुणा..तुझ्या हाती नव्या युगाची दोरी..//१//
आजचे जगणे एकलकोंडे
कुणाला कुणाशी न घेणे देणे,
चारभिंतीच्या आतमध्ये
त्याचे झूरून झूरून मरणे,
कोणत्या महाशयाने ही रीत बनवली न्यारी,
तरुणा..तुझ्या हाती नव्या युगाची दोरी..//२//
हे युग बदलणे आहे तुला
स्वतः बरोबर समाजासाठी ही,
इथे जन्मलास इथेच मरशील
नियतीही देईल ग्वाही,
उघड माथ्याने जगायला नाही कशाची चोरी,
तरुणा..तुझ्या हाती नव्या युगाची दोरी..//३//
इतरांना प्रेम देणे त्यांचे होणे
ही काळाची गरज आहे,
अरे तरुणा जरा सावध हो
तुझे जगणे गरजेचे आहे,
जगून घे सर्वांसाठी नाहीतर पाटी राहील कोरी,
तरुणा..तुझ्या हाती नव्या युगाची दोरी..//४//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि१२/७/२०२० रविवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[22/07, 10:50] Gjendra: *साहित्य काव्यगंध समुह*
*आयोजित कविता उपक्रम*
*विषय:समाजप्रबोधन करणाऱ्या कविता*
*शीर्षक:मला एवढंच सांगायचं*
दगडाला शेंदूर फासनं
असं कुठवर चालायचं,
जीवंत माणसात देव शोधा
मला एवढंच सांगायचं..
देवाला नारळ फोडता
हार पानफुले चढवता,
दानधर्म करायचं सोडून
आल्या पावली निघून जाता,
आंधळ्या पांगळ्यांना सांगा
का हो लाथाडायचं..
जीवंत माणसात देव शोधा
मला एवढंच सांगायचं..
गरीब झुरतो खाण्यासाठी
तुम्ही करता उधळपट्टी,
तो घाम गाळून करतो काम
तुम्ही आरामात घालवता सुट्टी,
गरीब दुबळ्यांच्या मेहनतीवर
सांगा कुठवर जगायचं..
जीवंत माणसात देव शोधा
मला एवढंच सांगायचं..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.१३/७/२०२० सोमवार*
*दि.९६२३७१५०११/औरंगाबाद*
No comments:
Post a Comment