[28/06, 23:52] Gjendra: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय: देव माझा विठूराया*
गेल्या जन्मीची पुण्याई
विठू माझा पाठीराखा,
किती जन्माचं वैभव
माझा मित्र आणि सखा..
विठू बोलतो चालतो
मजसवे तो खेळतो,
चंद्रभागा तिरावरी
आम्ही डौलाने लोळतो..
विठुराया तुझ्यासंग
मज मिळतो आनंद,
तुझ्या भक्तीच्या नादात
जडे तुझा नाम छंद..
विठू युगे युगे उभा
पंढरीच्या तिरावरी,
देव माझा विठूराया
खुश राही भक्तावरी..
पंढरीचा पांडुरंग
मन त्याच्यासवे दंग,
प्राण माझा नित्य बोले
पांडुरंग पांडुरंग..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२८/६/२९२० रविवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[30/06, 22:36] Gjendra: *अंकुर कलामंच महाराष्ट्र*
*आयोजित चित्रकाव्य उपक्रम*
ढग दाटून आले वरती
खाली ओथंबली धरती,
समय रात्रीचा प्रहर
नदी शांतचित्ते वाहती..
चौफेर निळसर छाया
चंद्र पांढरा शुभ्र नभी,
काठावरती डौलबाज
झाडे दिमाखात उभी,
नाव चालली काठवरती
चहूंबाजूने कडा शोभती,
मनमोहक दृश्य भुलवी
पाखरांची चलबिचल वरती..
*©️गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.३०/६/२०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[06/07, 07:21] Gjendra: *कवी विचारमंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:देशभक्तीपर कविता*
*शीर्षक: हिंद देश हा भारत देश हा*
हिंद देश हा भारत देश हा
वीर जवानांचा, वीर शिपायांचा...//धरी//
देशा साठी बलिदान देती
आपल्या मुलाखाचे रक्षण करती
कणखर देश हा मजबूत देश हा
वीर जवानांचा वीर शिपायांचा..//१//
मेहनत घेती मातीत इथल्या
हजारो कथा घामात भिजल्या
सुफलाम देश हा सुजलाम देश हा
वीर जवानांचा वीर शिपायांचा..//२//
येवोत संकट पहा हजार येथे
वीर योद्धयांची माघार न होते
राकट देश हा महायोद्धा देश हा
वीर जवानांचा वीर शिपायांचा..//३//
देशाचे रक्षण करती सीमेवर
वीर जवान या देशाची धरोहर
बलवान देश हा किर्तीवान देश हा
वीर जवानांचा वीर शिपायांचा..//४//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. ५ / ७ / २०२० रविवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[06/07, 09:44] Gjendra: *प्रतिभावान साहित्य समुह*
*आयोजित उपक्रम*
*विषय: पाणीपुरी*
*शीर्षक:पाणीपुरी*
आंबट गोड पाणीपुरी
त्यात असते शेव खारी
कसे सांगू बाबा हो
खाण्याची चवच न्यारी
छोटी बनवतात मैद्याची
गोल गोल करम करम,
त्यात चटणी बटाट्याची
घालून देतात नरम नरम..
चटणीमधे बटाट्यासोबत
कांदा नी भिजवलेला हरबरा,
वरून घालतात चिरून
कोथिंबीरिचा बारीक चुरा..
पाणीपुरी सोबत तिखट
मिरची पुदिन्याचं पाणी,
चिंचेचा कोळ आंबटगोड
तोंडाला चवच आणी..
एकत्र जाऊन खाण्याची
गंमत काही और असते,
मित्र आणि घरच्यासोबत
पाणीपुरीची पार्टी रंगते..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. ६ / ७ / २०२० सोमवार*
*मो:९६२४७१४०११/औरंगाबाद*
[07/07, 18:07] Gjendra: ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*डोळे माझे माहेराच्या*
*वाटेला लागले*
दादा कधी येशील तु मला घ्यायाले,
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//धृ//
काय सांगू दादा तुला मी सासुरवाशीण,
लग्नाआधी होते मी रे जशी वाघीण,
कंटाळले दादा आता सासरच्या छळाले,
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//१//
पती माझा आडदांड नी सासू खट्याळ,
जीवनाची माझ्या होते आहे आबाळ,
दोन दिस घेऊनी जा मज तुझ्या घराले
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//२//
तू का आहे रे दादा वहिनीच्या मुठीत,
सासर आहे खास्ट मज ना सुख माहेरात,
सांग कसे सांगू दादा मी गाऱ्हाणे देवाले
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//३//
सासरी ना सुख दादा माहेर झाले परके,
जाऊ कोण्या दिशेला मी सारे सारखे,
ऐकू येते कारे कानी माझे हिंदोळे
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//४//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मी:९६२३७१४०११/औरंगाबाद*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
[07/07, 19:14] Gjendra: *अंकुर कलामंच महराष्ट्र*
*आयोजित उपक्रम*
*विषय: बीज पेरू मानव्याचे*
आज घडीला कोसळत आहे
मानवतेवर घातक विद्रोही धारा
माणुसकीला देऊन थारा
माणसांनो मानव्याचे बीज पेरा,
चहुबाजूंनी पडतो आहे
आपणांस दुष्मनांचा घातक वेढा,
लावूनी सापळा एकात्मतेचा
दुष्मनांना त्या जाळ्यात ओढा..
जाती धर्म भेद भावाला
आपल्यापासून कोसो दूर ठेवा,
बीज असे पेरा मानव्याचे
सर्वांना आपुलकीची हुरहूर लावा..
स्वच्छ ठेवा मनाची नीतिमत्ता
सुखदुःखाच्या त्या वादळवाऱ्यात,
कर्तव्य कधीही विसरू नका
या जन्मांच्या मानवी फेऱ्यात...
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. ७ / ७ / २०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[07/07, 19:15] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:चायनीज टाळा*
*शीर्षक:एकमताने घालू बहिष्कार*
अवघ्या भारतात होता
मेड इन चायनाचा बोलबाला
आता भारतीय जनतेने
त्यावर एकमताने घातला घाला..
चीनच्या बनावट वस्तूनी
भारताची बाजारपेठ भरायची
कमी किमतीच्या वस्तू
त्यावर चीनची वट चालायची..
बहिष्कार घालू त्या वस्तूवर
लावू घ्या चायनीज टाळा,
पुन्हा थारा नको चीनला
घालू त्यास प्रतिबंधक आळा..
चीन बनला शत्रू आपला
घाला घालतोय सीमेवरती,
एक होऊ सारे भारतीय
आणि वाचवू आपली धरती..
चीनला अद्दल घडवण्यासाठी
एकमताने त्यावर घालू बहिष्कार,
भारतीय जनतेसाठी घडवूया
नवभारत अन् नवे आविष्कार..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.७ / ७ / २०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[08/07, 18:37] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:कुठल्याही फुलावर कविता*
*शीर्षक:चाफा*
पांढरा शुभ्र चाफा
मस्त हवेशीर डोले,
हिरवीगार पाने
झाले दवबिंदूनी ओले..
मन आनंदते माझे
सुगंध दरवळता चौफेर,
श्वास सुखावतो त्याने
आहे सुगंधाचे माहेर..
येती सुंदर कळ्या
त्यातून उमलते फुल,
छान मोहक पाकळ्या
चाफा सुगंधाचं मूळ..
दारासमोर लावा
एक धुंदणारा चाफा,
वातावरण प्रसन्न घरातील
होई श्वास घेणं सोपा..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.८/७/२०२०बुधवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[08/07, 18:38] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:नको हा दुरावा*
*शीर्षक:नको हा दुरावा*
नको हा अबोला
नको हा दुरावा,
माझ्या मनी तू
एकरूप व्हावा..
भावना मनाच्या
तुझ्या गंधळाव्या,
माझ्या डोळ्यांच्या
पापण्या झुराव्या..
विरहाच्या वेदनांनी
हे काळीज झुरते,
तुझ्या भेटीसाठी
मन माझे तरसते..
श्वास माझा तुझ्यात
हा संपेल का दुरावा,
आस डोळ्यांना तू
सदा समोर दिसावा..
नको हा दुरावा
नुसता दुःखाचा त्रास,
भावनिक जिव्हाळा
देतो मनाला आस..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. ८ / ७ / २०२० बुधवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[10/07, 04:28] Gjendra: कालचा उपक्रम
विषय: शहराची कविता
*शहराची कविता*
गावाकडच्या अंधाराने
एकच उडविला कहर,
तिकडे प्रकाशाने उजळून
सारे लखलखते शहर..
घाणेरड्या साम्राज्यावर
सरकार घालत असते आळा,
गल्लोगल्ली सारा मोहल्ला
चक्क रस्ते सुंदर शाळा..
रस्त्याच्या दुतर्फा लावली
उंच उंच हिरवी झाडी,
त्यातून सुसाट धावत जाते
पांढरी शुभ्र मोटार गाडी..
केमिकल कंपन्यानी आता
घोटला आहे शहराचा गळा,
त्यांच्या विषारी पाण्यावरती
फुलतो आहे विषारी मळा..
खाण्या पाण्यावर ठरत आहे
ज्याचा त्याचा मृत्यू आता,
गावाकडे परततो आहे
शहरातील माणसांचा जत्था..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.१०/७/२०२० शुक्रवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[10/07, 04:29] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:अविस्मरणीय वाढदिवस*
*शीर्षक:आठवणीतला वाढदिवस*
आठवणीतला वाढदिवस
छान असतो प्रत्येकाचा,
शुभेच्छांचे घेणे देणे
व्यवहार हा ज्याचा त्याचा..
जीवलगाच्या भेटीसाठी
एक दिवस खास असतो,
माणूसपण जाणून घेण्या
झुरत हा श्वास असतो..
आयुष्याच्या वळणावरती
सरुण जाती अनेक वर्षे,
होई अविस्मरणीय वाढदिवस
असे वाटते श्रावण बरसे..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.९/७/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[10/07, 21:52] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:चष्मा*
*शीर्षक: माझा चष्मा*
गोल गोल काचेचा
खासच होता माझा चष्मा,
चष्म्याच्या तालावर फार
फिदा होती प्यारी सुषमा..
लावून ऐटीत चष्मा मी
फिरायचो हुंदडायचो गावभर,
उषा निशा दिशा हसायची
माझ्या याच नखऱ्यावर..
खोडकर स्वभाव माझा
वाटायचा उनाड टपोरी,
रीना मीना टीना म्हणायची
तुझी आवडते अदा भारी..
चष्मा डोळ्यांवरचा काढून घेता
दिसली तिरके बांगे डोळे सारी
चावट माझ्या नखऱ्यामुळे
पळून गेल्या हो साऱ्या पोरी..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.10/7/2020 शुक्रवार*
*मो:9623714011/औरंगाबाद*
[11/07, 21:23] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:सासूबाई*
*शीर्षक: सासू प्रेमाची वीण*
सासू असते मनातून प्रेमळ
आपली नजर असावी तशी,
तिच्या संस्कारांनीच असते
जीवनाची गाथा सोनं जशी..
आपल्या पुढे पुढे करणं तिचं
समाजाने बांधून ठेवल्यामुळं,
मुलीच्या सुखासाठी नेहमीच
मन तिचं असते फारच खुळं..
सासू कुणाची खास असते
कुणाकुणाची खास्ट विचित्र,
काही असतात सुसंस्कारी
काही नुसत्या अपवाद मात्र..
सासू प्रेमाची वीण दयेची खाण
आपल्या साठी मोकळं रान,
दया क्षमा शांती अन् प्रेमाचं
लाभलेलं अभिमानाचं वरदान..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.11/7/2020 शनिवार*
*मो:9623714011/औरंगाबाद*
[11/07, 22:01] Gjendra: *आम्ही सारस्वत*
*समुह आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:बंदिस्त जीवन*
*बंदिस्त जीवन*
भावना या बंद
मनात त्रासून
बंदिस्त जीवन
फेडू कसे ऋण..
उद्विग्न मन हे
निराशा गर्तेत,
मोह नाही आता
जगाच्या स्पर्धेत..
जाळूनी भावना
शब्द वार घेई,
बिचाऱ्या मनाची
घालमेल होई..
विश्वास मोडला
बंदिस्त झाल्याने,
विचार पोखरे
प्राण झुरल्याने..
जीवन बंदिस्त
अनामिक भीती,
श्वास गुदमरे
जपावे हो किती..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.११/७/२०२०शनिवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[11/07, 22:16] Gjendra: *यारिया साहित्य कला*
*समूह आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:मला काही सांगायचंय*
*शीर्षक:मला काही सांगायचंय*
मला काही सांगायचंय
हरवलेल्या भावनांना शोधायचंय,
विरक्त झालेल्या मनात पुन्हा
तुला एकदा तरी बघायचंय..
सुखदुःखाच्या वेदनांना
पुन्हा तुझ्यासाठी सोसायचंय,
तुझ्या सुखातून माझ्या
दुःखांना अलदग् वेचायचंय..
चिखलातीळ कमळासारखं
चिखलात टवटवीत फुलायचंय,
फुले अंथरून वाटेत तुझ्या
स्वतः काट्यासारखं टोचायचंय..
विरहाच्या क्षण दूर सारून
फक्त तुझ्यासाठीच जगायचंय,
यातना घेऊन ओंजळीत तुला
सुखात हसताना बघायचंय..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.११/७/२०२० शनिवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय: देव माझा विठूराया*
गेल्या जन्मीची पुण्याई
विठू माझा पाठीराखा,
किती जन्माचं वैभव
माझा मित्र आणि सखा..
विठू बोलतो चालतो
मजसवे तो खेळतो,
चंद्रभागा तिरावरी
आम्ही डौलाने लोळतो..
विठुराया तुझ्यासंग
मज मिळतो आनंद,
तुझ्या भक्तीच्या नादात
जडे तुझा नाम छंद..
विठू युगे युगे उभा
पंढरीच्या तिरावरी,
देव माझा विठूराया
खुश राही भक्तावरी..
पंढरीचा पांडुरंग
मन त्याच्यासवे दंग,
प्राण माझा नित्य बोले
पांडुरंग पांडुरंग..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२८/६/२९२० रविवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[30/06, 22:36] Gjendra: *अंकुर कलामंच महाराष्ट्र*
*आयोजित चित्रकाव्य उपक्रम*
ढग दाटून आले वरती
खाली ओथंबली धरती,
समय रात्रीचा प्रहर
नदी शांतचित्ते वाहती..
चौफेर निळसर छाया
चंद्र पांढरा शुभ्र नभी,
काठावरती डौलबाज
झाडे दिमाखात उभी,
नाव चालली काठवरती
चहूंबाजूने कडा शोभती,
मनमोहक दृश्य भुलवी
पाखरांची चलबिचल वरती..
*©️गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.३०/६/२०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[06/07, 07:21] Gjendra: *कवी विचारमंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:देशभक्तीपर कविता*
*शीर्षक: हिंद देश हा भारत देश हा*
हिंद देश हा भारत देश हा
वीर जवानांचा, वीर शिपायांचा...//धरी//
देशा साठी बलिदान देती
आपल्या मुलाखाचे रक्षण करती
कणखर देश हा मजबूत देश हा
वीर जवानांचा वीर शिपायांचा..//१//
मेहनत घेती मातीत इथल्या
हजारो कथा घामात भिजल्या
सुफलाम देश हा सुजलाम देश हा
वीर जवानांचा वीर शिपायांचा..//२//
येवोत संकट पहा हजार येथे
वीर योद्धयांची माघार न होते
राकट देश हा महायोद्धा देश हा
वीर जवानांचा वीर शिपायांचा..//३//
देशाचे रक्षण करती सीमेवर
वीर जवान या देशाची धरोहर
बलवान देश हा किर्तीवान देश हा
वीर जवानांचा वीर शिपायांचा..//४//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. ५ / ७ / २०२० रविवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[06/07, 09:44] Gjendra: *प्रतिभावान साहित्य समुह*
*आयोजित उपक्रम*
*विषय: पाणीपुरी*
*शीर्षक:पाणीपुरी*
आंबट गोड पाणीपुरी
त्यात असते शेव खारी
कसे सांगू बाबा हो
खाण्याची चवच न्यारी
छोटी बनवतात मैद्याची
गोल गोल करम करम,
त्यात चटणी बटाट्याची
घालून देतात नरम नरम..
चटणीमधे बटाट्यासोबत
कांदा नी भिजवलेला हरबरा,
वरून घालतात चिरून
कोथिंबीरिचा बारीक चुरा..
पाणीपुरी सोबत तिखट
मिरची पुदिन्याचं पाणी,
चिंचेचा कोळ आंबटगोड
तोंडाला चवच आणी..
एकत्र जाऊन खाण्याची
गंमत काही और असते,
मित्र आणि घरच्यासोबत
पाणीपुरीची पार्टी रंगते..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. ६ / ७ / २०२० सोमवार*
*मो:९६२४७१४०११/औरंगाबाद*
[07/07, 18:07] Gjendra: ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*डोळे माझे माहेराच्या*
*वाटेला लागले*
दादा कधी येशील तु मला घ्यायाले,
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//धृ//
काय सांगू दादा तुला मी सासुरवाशीण,
लग्नाआधी होते मी रे जशी वाघीण,
कंटाळले दादा आता सासरच्या छळाले,
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//१//
पती माझा आडदांड नी सासू खट्याळ,
जीवनाची माझ्या होते आहे आबाळ,
दोन दिस घेऊनी जा मज तुझ्या घराले
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//२//
तू का आहे रे दादा वहिनीच्या मुठीत,
सासर आहे खास्ट मज ना सुख माहेरात,
सांग कसे सांगू दादा मी गाऱ्हाणे देवाले
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//३//
सासरी ना सुख दादा माहेर झाले परके,
जाऊ कोण्या दिशेला मी सारे सारखे,
ऐकू येते कारे कानी माझे हिंदोळे
डोळे माझे माहेराच्या वाटेला लागले..//४//
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*मी:९६२३७१४०११/औरंगाबाद*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
[07/07, 19:14] Gjendra: *अंकुर कलामंच महराष्ट्र*
*आयोजित उपक्रम*
*विषय: बीज पेरू मानव्याचे*
आज घडीला कोसळत आहे
मानवतेवर घातक विद्रोही धारा
माणुसकीला देऊन थारा
माणसांनो मानव्याचे बीज पेरा,
चहुबाजूंनी पडतो आहे
आपणांस दुष्मनांचा घातक वेढा,
लावूनी सापळा एकात्मतेचा
दुष्मनांना त्या जाळ्यात ओढा..
जाती धर्म भेद भावाला
आपल्यापासून कोसो दूर ठेवा,
बीज असे पेरा मानव्याचे
सर्वांना आपुलकीची हुरहूर लावा..
स्वच्छ ठेवा मनाची नीतिमत्ता
सुखदुःखाच्या त्या वादळवाऱ्यात,
कर्तव्य कधीही विसरू नका
या जन्मांच्या मानवी फेऱ्यात...
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. ७ / ७ / २०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[07/07, 19:15] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:चायनीज टाळा*
*शीर्षक:एकमताने घालू बहिष्कार*
अवघ्या भारतात होता
मेड इन चायनाचा बोलबाला
आता भारतीय जनतेने
त्यावर एकमताने घातला घाला..
चीनच्या बनावट वस्तूनी
भारताची बाजारपेठ भरायची
कमी किमतीच्या वस्तू
त्यावर चीनची वट चालायची..
बहिष्कार घालू त्या वस्तूवर
लावू घ्या चायनीज टाळा,
पुन्हा थारा नको चीनला
घालू त्यास प्रतिबंधक आळा..
चीन बनला शत्रू आपला
घाला घालतोय सीमेवरती,
एक होऊ सारे भारतीय
आणि वाचवू आपली धरती..
चीनला अद्दल घडवण्यासाठी
एकमताने त्यावर घालू बहिष्कार,
भारतीय जनतेसाठी घडवूया
नवभारत अन् नवे आविष्कार..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.७ / ७ / २०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[08/07, 18:37] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:कुठल्याही फुलावर कविता*
*शीर्षक:चाफा*
पांढरा शुभ्र चाफा
मस्त हवेशीर डोले,
हिरवीगार पाने
झाले दवबिंदूनी ओले..
मन आनंदते माझे
सुगंध दरवळता चौफेर,
श्वास सुखावतो त्याने
आहे सुगंधाचे माहेर..
येती सुंदर कळ्या
त्यातून उमलते फुल,
छान मोहक पाकळ्या
चाफा सुगंधाचं मूळ..
दारासमोर लावा
एक धुंदणारा चाफा,
वातावरण प्रसन्न घरातील
होई श्वास घेणं सोपा..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.८/७/२०२०बुधवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[08/07, 18:38] Gjendra: *प्रतिभावान साहित्य मंच*
*आयोजित उपक्रम*
*विषय:नको हा दुरावा*
*शीर्षक:नको हा दुरावा*
नको हा अबोला
नको हा दुरावा,
माझ्या मनी तू
एकरूप व्हावा..
भावना मनाच्या
तुझ्या गंधळाव्या,
माझ्या डोळ्यांच्या
पापण्या झुराव्या..
विरहाच्या वेदनांनी
हे काळीज झुरते,
तुझ्या भेटीसाठी
मन माझे तरसते..
श्वास माझा तुझ्यात
हा संपेल का दुरावा,
आस डोळ्यांना तू
सदा समोर दिसावा..
नको हा दुरावा
नुसता दुःखाचा त्रास,
भावनिक जिव्हाळा
देतो मनाला आस..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि. ८ / ७ / २०२० बुधवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[10/07, 04:28] Gjendra: कालचा उपक्रम
विषय: शहराची कविता
*शहराची कविता*
गावाकडच्या अंधाराने
एकच उडविला कहर,
तिकडे प्रकाशाने उजळून
सारे लखलखते शहर..
घाणेरड्या साम्राज्यावर
सरकार घालत असते आळा,
गल्लोगल्ली सारा मोहल्ला
चक्क रस्ते सुंदर शाळा..
रस्त्याच्या दुतर्फा लावली
उंच उंच हिरवी झाडी,
त्यातून सुसाट धावत जाते
पांढरी शुभ्र मोटार गाडी..
केमिकल कंपन्यानी आता
घोटला आहे शहराचा गळा,
त्यांच्या विषारी पाण्यावरती
फुलतो आहे विषारी मळा..
खाण्या पाण्यावर ठरत आहे
ज्याचा त्याचा मृत्यू आता,
गावाकडे परततो आहे
शहरातील माणसांचा जत्था..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.१०/७/२०२० शुक्रवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[10/07, 04:29] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:अविस्मरणीय वाढदिवस*
*शीर्षक:आठवणीतला वाढदिवस*
आठवणीतला वाढदिवस
छान असतो प्रत्येकाचा,
शुभेच्छांचे घेणे देणे
व्यवहार हा ज्याचा त्याचा..
जीवलगाच्या भेटीसाठी
एक दिवस खास असतो,
माणूसपण जाणून घेण्या
झुरत हा श्वास असतो..
आयुष्याच्या वळणावरती
सरुण जाती अनेक वर्षे,
होई अविस्मरणीय वाढदिवस
असे वाटते श्रावण बरसे..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.९/७/२०२० गुरुवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[10/07, 21:52] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:चष्मा*
*शीर्षक: माझा चष्मा*
गोल गोल काचेचा
खासच होता माझा चष्मा,
चष्म्याच्या तालावर फार
फिदा होती प्यारी सुषमा..
लावून ऐटीत चष्मा मी
फिरायचो हुंदडायचो गावभर,
उषा निशा दिशा हसायची
माझ्या याच नखऱ्यावर..
खोडकर स्वभाव माझा
वाटायचा उनाड टपोरी,
रीना मीना टीना म्हणायची
तुझी आवडते अदा भारी..
चष्मा डोळ्यांवरचा काढून घेता
दिसली तिरके बांगे डोळे सारी
चावट माझ्या नखऱ्यामुळे
पळून गेल्या हो साऱ्या पोरी..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.10/7/2020 शुक्रवार*
*मो:9623714011/औरंगाबाद*
[11/07, 21:23] Gjendra: *आजचा उपक्रम*
*विषय:सासूबाई*
*शीर्षक: सासू प्रेमाची वीण*
सासू असते मनातून प्रेमळ
आपली नजर असावी तशी,
तिच्या संस्कारांनीच असते
जीवनाची गाथा सोनं जशी..
आपल्या पुढे पुढे करणं तिचं
समाजाने बांधून ठेवल्यामुळं,
मुलीच्या सुखासाठी नेहमीच
मन तिचं असते फारच खुळं..
सासू कुणाची खास असते
कुणाकुणाची खास्ट विचित्र,
काही असतात सुसंस्कारी
काही नुसत्या अपवाद मात्र..
सासू प्रेमाची वीण दयेची खाण
आपल्या साठी मोकळं रान,
दया क्षमा शांती अन् प्रेमाचं
लाभलेलं अभिमानाचं वरदान..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.11/7/2020 शनिवार*
*मो:9623714011/औरंगाबाद*
[11/07, 22:01] Gjendra: *आम्ही सारस्वत*
*समुह आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:बंदिस्त जीवन*
*बंदिस्त जीवन*
भावना या बंद
मनात त्रासून
बंदिस्त जीवन
फेडू कसे ऋण..
उद्विग्न मन हे
निराशा गर्तेत,
मोह नाही आता
जगाच्या स्पर्धेत..
जाळूनी भावना
शब्द वार घेई,
बिचाऱ्या मनाची
घालमेल होई..
विश्वास मोडला
बंदिस्त झाल्याने,
विचार पोखरे
प्राण झुरल्याने..
जीवन बंदिस्त
अनामिक भीती,
श्वास गुदमरे
जपावे हो किती..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.११/७/२०२०शनिवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
[11/07, 22:16] Gjendra: *यारिया साहित्य कला*
*समूह आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:मला काही सांगायचंय*
*शीर्षक:मला काही सांगायचंय*
मला काही सांगायचंय
हरवलेल्या भावनांना शोधायचंय,
विरक्त झालेल्या मनात पुन्हा
तुला एकदा तरी बघायचंय..
सुखदुःखाच्या वेदनांना
पुन्हा तुझ्यासाठी सोसायचंय,
तुझ्या सुखातून माझ्या
दुःखांना अलदग् वेचायचंय..
चिखलातीळ कमळासारखं
चिखलात टवटवीत फुलायचंय,
फुले अंथरून वाटेत तुझ्या
स्वतः काट्यासारखं टोचायचंय..
विरहाच्या क्षण दूर सारून
फक्त तुझ्यासाठीच जगायचंय,
यातना घेऊन ओंजळीत तुला
सुखात हसताना बघायचंय..
*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.११/७/२०२० शनिवार*
*मो:९६२३७१४०११/औरंगाबाद*
No comments:
Post a Comment