अंतरीचे दुःख,त्याची सल,
अन् असतात भावना अबोल...!
प्रित दुहेरी असह्य होणारी,
तरी जाना प्रितीचे मोल......!
गांभीर्य अंजनाचे नयनांच,
जाणवते दुःख ह्रदयालाच....!
घडला कितीही भयंकर गुन्हा,
माफी का असते आपल्यालाच...!
अपराधी कोण आहे इथे,
तुम्ही आणि आम्ही सगळेच....!
भावना नसतात ह्रदयामधे,
या जीवनात सगळे का सारखेच....!
______________📚कवी :-गजेंद्र📚
(औरंगाबाद)
No comments:
Post a Comment