Wednesday, 18 January 2017

----- *क्षितीजापलिकडे* ----

🌷💝🌷💝🌷💝🌷💝🌷💝🌷

*स्पर्धेकरिता*

 ----- *क्षितीजापलिकडे* ----

क्षितीजापलिकडे मन जाऊन आले
शोध ख-या प्रेमाचा घेऊन आले
क्षितीजापलिकडे मन जाऊन आले…..||धृ||


स्वप्नात ही मला मिळतो इशारा
आपल्या प्रेमास मिळावा किनारा
क्षितीजाला ही गवसणी घालूनी आले
शोध ख-या प्रेमाचा घेऊन आले
क्षितीजापलिकडे मन जाऊन आले……||1||


अंबर अधुरे आहे जसे  धरे विणा
मीही अधुरा सखये तुझिया विणा
देऊन वचने मन स्वप्नात भेटूनी आले
शोध ख-या प्रेमाचा घेऊन आले
क्षितीजापलिकडे मन जाऊन आले……||2||


नशील्या त्या चंद्रास बोले चांदणी
तुझ्यामुळे फुलली सखया प्रेमकहाणी
तुझे अन् माझे तन मन जुळूनी आले
शोध ख-या प्रेमाचा घेऊन आले
क्षितीजापलिकडे मन जाऊन आले…..||3||


चल घेऊ वचने दोघं साताजन्मांची
विरह न येवो आशा वेड्या मनाची
जन्मभरांची कहाणी जीवन होऊनी गेले
शोध ख-या प्रेमाचा घेऊन आले
क्षितीजापलिकडे मन जाऊन आले…….||4||


-------------गजेंद्र काळे
         ढवळापुरीकर औरंगाबाद

🌷💝🌷💝🌷💝🌷💝🌷💝🌷

No comments:

Post a Comment