Monday, 2 January 2017

🌹वेळ बदलता काळ बदलतो🌹

वेळ बदलते काळ बदलतो
माणुसही का तसाच बदलतो,
आपलेच खरे करण्यासाठी
दिलेल्या वचनांना विसरतो.....||धृ||

नाजुक धागा असे मैञीचा,
वर्षानुवर्षेे नसे खाञीचा.
मिञ बदलता आपणही बदलतो,
आपलेच खरे करण्यासाठी
दिलेल्या वचनांना विसरतो....||१||

येईल एखादी अशीच वेळं,
मैञित आपल्या उठेल वादळं.
रुप बदलते रंगही बदलतो,
आपलेच खरे करण्यासाठी
दिलेल्या वचनांना विसरतो.....||२||

इच्छा उफळली जर या मनाची,
हाक एेकणा तु त्या ह्रदयााची.
तन बदलता श्वासही बदलतो.
आपलेच खरे करण्यासाठी
दिलेल्या वचनांना विसरतो.....||३||

असेल किंमत तुला आमची,
जाणिव असुदे तु या श्वासांची.
रीत बदलता कर्मही बदलतो.
आपलेच खरे करण्यसाठी
दिलेल्या वचनांना विसरतो.....||४||

दिलेले वचन तर मी पाळणार,
हि भावणा तुला तिथे छळणार.
ह्रदय बदलता प्राणही बदलतो.
आपलेच खरे करण्यासाठी
दिलेल्या वचनांना विसरतो.....||५||

                        कवी
        गजेंद्र काळे औरंगाबाद
           9623714011

No comments:

Post a Comment