Tuesday, 3 January 2017

@@रास@@



मी चंद्र आहे तुझा
तू  माझी  तारका
शोधितो मी वेडा
तुला एकसारखा,
नको छेडु गं सखे
वेड्या मनास माझ्या
मी कृष्णा तुझा गं
तू माझी राधिका....1

रास रंगु दे आपला
या  चांदण्यां राती
उजळुन  जाऊ  दे
माझी जीवन ज्योती,
टीपऱ्यांच्या तालात
माझे  भान  हरु दे
तुझेच गीत सखये
माझ्या ओठी येती...2

तुझ्या प्रेमाचा मला गं
सहवास  कळू  दे
ज्योत होऊन मज
तुझ्या ह्रदयात जळु दे,
सातजन्म घेऊन मी
तुजकडे  येईन पुन्हा
थोडेसे प्रेम तुझे वेडे
साजणी मला मिळू दे...3

कवी:-गजेंद्र कचरू काळे
           ढवळापुरीकर
           संभाजीनगर

No comments:

Post a Comment