Monday, 16 January 2017

👇 तो सध्या काय करतोय👇

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

👇 तो सध्या काय करतोय👇


तो सध्या तीला छ्ळतोय
रोजच तीचा घात करतोय...!
लहान समजेना की मोठी
फक्त जीवन तीचं बरबाद करतोय...!!

पाठलाग तर रोज करतोय
जगणं तीचं मुश्किल करतोय...!
उच्च रूढ या समाजामध्ये
भामटा रोजच तीचा अंत करतोय...!!

हक्क नाही त्याचा कोणावर
तरीही हक्क कसला दाखवतोय...!
आया बहीणींची इज्जत करणे सोडा
समाजमन कलंकित दूषित करतोय...!!

तो सध्या फक्त एकच करतोय
गाडीवर बसवून तीला फिरवतोय...!
तिच्या शालिनतेचा फायदा घेऊन
तीला समाजातून बेदखल करतोय...!!

वापर करून तिच्या चांगुलपणाचा
स्वतःच आई वडीलांचा उद्धार करतोय...!
आणि जगणं हिसकावून घेऊन तीचं
तीला आत्महत्या करायला भाग पाडतोय...!!

तीला आत्महत्या करायला भाग पाडतोय...!
तो निचवृतीचा फक्त हेच करतोय...!!
तो निचवृतीचा फक्त हेच करतोय...!!!


--------------✍🏻गजेंद्र
         ढवळापुरीकर औरंगाबाद

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

No comments:

Post a Comment