Tuesday, 3 January 2017

🌹🌹माझं बालपण🌹🌹



बालपण हा जीवनातला,
अविस्मरणीय अनुभव…..!
पण मला चाखायला नाही
मिळाली या अनुभवाची चव…!
आज पुन्हा वाटतं मी लहान व्हावं,
न मिळालेले प्रेम भरून काढावं….!
सुंदरशा आठवणीनी पुन्हा एकदा ,
बालपण सजवून काढावं….!
का….? का माझं आयुष्य,
इतकं दगडा सारखं कठीण…!
त्यावर संस्कार घडवायला हातं तर होती,
पण त्या हातानां ती धार नव्हती…,
जी मला घडवायला हवी होती……..!
खरंच माझं बालपण सर्वात कठीण असावं,
वडीलांच दारू पिणं…,
आईचं मोल मजुरीला जाणं…,
बहिणीचं लग्न ही लवकर झालेलं……!
मग घरात लहान असूनही दुःखच मिळत गेलं…,
आई-वडीलांच्या भांडणापासून ते
गरीबीत मिळणार्या वैतागापर्यंत…!
सर्व बाजूंनी मन चिरशांत असायचं…..!
हौस-मौज अशी कधीच नाही,
कुठली सहल नाही की…,
कसलं मनोरंजन नाही…सतत जीव गुदमरलेला…!
कसंतरी दहावी झालं अन्…,
पुढच्याच दिवसात वडीलांच अकाली निधन झालं…!
…………पुन्हा एकदा सगळी जबाबदारी….,
बालखांद्यावर घेउन…लग्ना आधीच……,
संसार सुरू झाला…!
नंतर लग्न झालं..,मुलं झाली…,
तो संसार चालतोच आहे आजही….,
बालपणीच्या आठवणी शोधत……!
आता फक्त एकच करायचं….,
जे आपणांस अनुभवायला नाही मिळालं,
ती कमतरता या मुलांना नाही होउ द्यायची…!
कारण….!कारण मला "माझं बालपण"…!
माझ्या या मुलांत पहायचंय….,
त्यांच्या आनंदात रहायचंय….,
त्यांना सतत हसत ठेवायचंय…,
आणि "माझं बालपण "मला त्यांच्यात जगायचंय…!
………..माझं बालपण मला त्यांच्यात जगायचंय….!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
___________कवी गजेंद्र कचरू काळे
                     मो:-9623725011
                          (औरंगाबाद )……!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

No comments:

Post a Comment