Wednesday, 18 January 2017

🌹👬🌹अनाथांची माता:-सिंधूआई 🌹👭🌹

💫💫💫💫स्पर्धेकरिता कविता 💫💫💫💫

🌹👬🌹अनाथांची माता:-सिंधूआई 🌹👭🌹

हुंदका आठवला मनास माझ्या,
माझ्याच सिंधूआईचा….!
श्वासांत भरला होता त्यांनी,
हुंकार समाजसेवेचा……!!
       हुंदका आठवला मनास माझ्या
       माझ्याच सिंधूआईचा…..….…….||धृ||

शेकडो हजारो अनाथांच्या,
आधारस्तंभ त्या बनल्या…..!
स्वतःचा श्वास रोखून हो,
दिनांच्या माता त्या बनल्या..!
ह्रदयातुन वाहतो त्यांच्या,
खळखळ झरा मानवतेचा…!
श्वासांत भरला होता त्यांनी,
हुंकार समाजसेवेचा………!!
       हुंदका आठवला मनास माझ्या
       माझ्याच सिंधूआईचा…………..||1||

पाहता हिन - दुबळ्यांना,
दुःख कळले पण मन जळले..!
पोटाच्या खळगीसाठी त्यांच्या,
मग भिक मागण्याचे ठरले…..!
मातृत्व बहरण्यासाठी त्या,
शोधच घेई फक्त अनाथांचा……!
श्वासांत भरला होता त्यांनी,
हुंकार समाजसेवेचा……..!!
       हुंदका आठवला मनास माझ्या
       माझ्याच सिंधूआईचा….…….….||2||

दिसता अंध लुळे पांगळे,
मनच ते पाझरू लागे…….!
भुकेला दिसताच कुणी,
ममतेचे रूप ते होई जागे…!
घरात आणि दारात सर्वांना
एकच हक्क समानतेचा….!
श्वासांत भरला होता त्यांनी,
हुंकार समाजसेवेचा……….!!
      हुंदका आठवला मनास माझ्या
      माझ्याच सिंधूआईचा…………..…||3||

स्वतः झिजुन या माउलीने,
मोठा मोठाच वटवृक्ष केला…!
साथ मिळाली दानशुरांची…..!
अन् तयार कल्पवृक्ष झाला
लाखो मनातुन होतो आहे,
आज वर्षाव शुभेच्छांचा…….!
श्वासांत भरला होता त्यांनी,
हुंकार समाजसेवेचा.. ………!
       हुंदका आठवला मनास माझ्या,
       माझ्याच सिंधूआईचा…………..…||4||

हुंदका आठवला मनास माझ्या,
माझ्याच सिंधूआईचा……..!
श्वासांत भरला होता त्यांनी,
हुंकार समाजसेवेचा………!
श्वासांत भरला होता त्यांनी,
हुंकार समाजसेवेचा…………!


__________🍂📝कवी:-गजेंद्र🍂
                   🌷औरंगाबाद🌷
                 🌹क्रमांक:-(72)🌹









No comments:

Post a Comment